महाराष्ट्र शासन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद
व्दारा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (दुसरा व चौथा मजला) सव्र्व्हे क्र. 832 ए, फायनल प्लॉट क्र. 178 व 179, बालचित्रवाणी जवळ, आघारकर रिसर्च इन्स्टिट्युटच्या मागे, भांबुर्डा, शिवाजीनगर, पुणे
महत्त्वाचे प्रसिध्दीपत्रक
जा.क्र. मरापप/शिष्यवृत्ती/2024/2772
दिनांक :- 02/07/2024
प्रति,
मा. महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, मंत्रालय, मुंबई - 400 302.
विषय :- पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) दि. 18 फेब्रुवारी, 2024 च्या अंतिम निकालाच्या प्रसिध्दी निवेदनाबाबत.....
महोदय,
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत रविवार दि. 18 फेब्रुवारी, 2024 रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी), शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) चा अंतिम निकाल, शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता याद्या आणि त्या अनुषंगिक माहिती मंगळवार दि. 02 जुलै, 2024 रोजी ०५-०० वाजता परिषदेच्या
FINAL RESULT LINK
या संकेतस्थळावर पाहता येईल. त्याबाबतचे प्रसिध्दीपत्रक सोबत जोडले आहे. कृपया सरदहू निवेदनास राज्यातील प्रमुख वर्तमानपत्रातून, आकाशवाणी व दूरदर्शन केंद्रावरून विनामूल्य प्रसिध्दी द्यावी अशी आपणास विनंती आहे. सोबत :
आपला विश्वासू,
(डॉ. नंदकुमार बेडसे)
अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,
पुणे
Also Read 👇
महाराष्ट्र शासन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कार्यालय इमारत (दुसरा व चौथा मजला) सव्र्व्हे नं. ८३२ ए. शिवाजी नगर, पुणे ४११००४.
Website: www.mscepune.in Email: mscescholarship@gmail.com
दूरध्वनी क्र. 020-26123066/67
प्रसिद्धीपत्रक
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी)
दि. १८ फेब्रुवारी, २०२४.
अंतरिम निकाल
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक १८ फेब्रुवारी, २०२४ रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी), शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) चा अंतरिम (तात्पुरता) निकाल मंगळवार, दि. ३० एप्रिल २०२४ रोजी
परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी फक्त आपला रोल नंबर या ठिकाणी नोंदवून आपला निकाल बघावा
Interim Result
5th Scholarship Exam February 2024.
👆👆👆👆👆👆
या परिषदेच्या संकेतस्थळावर घोषित करण्यात आला आहे. शाळांना आपल्या विद्यार्थ्यांचा निकाल त्यांच्या लॉगीनमधून तसेच पालकांना आपल्या पाल्यांचा निकाल संकेतस्थळावर पाहता येईल.
विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करुन घ्यावयाची असल्यास संबंधित शाळांच्या लॉगीनमध्ये दि. ३०/०४/२०२४ ते १०/०५/२०२४ या कालावधीत ऑनलाईन अर्ज उपलब्ध करुन देण्यात येत आहे. गुणांच्या पडताळणीसाठी प्रत्येक पेपरकरीता रु. ५०/- याप्रमाणे शुल्काची रक्कम ऑनलाईन पेमेंटद्वारे भरणे आवश्यक आहे.
विद्यार्थ्यांचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, इत्यादीमध्ये दुरूस्तीसाठी दि. १०/०५/२०२४ पर्यंत संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. सदर अर्ज ऑनलाईन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पध्दतीने पाठविल्यास स्वीकारले जाणार नाहीत. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. तसेच शाळा माहिती प्रपत्रात शाळेचे क्षेत्र (शहरी/ ग्रामीण) व अभ्यासक्रमात दुरूस्ती करावयाची असल्यास शाळा मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीचे विनंती पत्र पूर्ण माहिती नमूद करून सदरचे पत्र puppsshelpdesk@gmail.com या ईमेलवर दि. १०/०५/२०२४ रोजीपर्यंत पाठविण्यात यावे.
विहित मुदतीत आवश्यक शुल्कासह ऑनलाईन प्राप्त झालेल्या अर्जानुसार गुणपडताळणीचा निर्णय संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये अर्ज प्राप्त झाल्यानंतर ३० दिवसांपर्यंत कळविण्यात येईल. विहित मुदतीत ऑनलाईन आलेले गुणपडताळणी अर्ज निकाली काढल्यानंतर अंतिम निकाल व गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल.
उपायुक्त
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,
पुणे - ०४.
दिनांक :- ३०/०४/२०२४.
ठिकाण :- पुणे.
Also Read -
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon