Dakshana Scholarship for JEE NEET
Dakshana Scholarship for JEE NEET Registration
दक्षणा
JEE आणि NEET निवासी स्कॉलरशिप २०२४ |
दक्षणा संस्था, पुणे
ही सेवाभावी शिक्षण संस्था असून इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य JEE
आणि NEET विषयी निवासी स्कॉलरशिप व Indian
Institute of Technology (IIT), National Institute of
Technology (NIT) All India Institute of Medical Science (AIIMS) किंवा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशासाठी प्रशिक्षण विषयक काम
करीत आहे. दरवर्षी किमान ६०० विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती दिली जाते. आणि
साधारणतः ८०% विद्यर्थ्यांना प्रशिक्षण दिले जाते. दक्षणा या संस्थेने आतापर्यंत
७२०० + विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिलेल्या आहेत. दक्षणा एक वर्षाच्या
विनामूल्य प्रशिक्षण शिष्यवृत्तीमध्ये दक्षणा व्हॅली पुणे येथे विनामूल्य
प्रशिक्षण, भोजन व निवास व्यवस्था करण्यात येते.दक्षणा
संस्था, पुणे यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या दक्षणा एक वर्षाच्या
शिष्यवृत्ती कार्यक्रमाचे निकष खालीलप्रमाणे आहेत. |
विद्यार्थ्यांची निवड चाचणीद्वारे
केली जाते. Dakshana Scholarship for JEE NEET सरकारी किंवा अनुदानित शाळेत २०२३ -
२४ या वर्षात इयत्ता बारावीच्या विज्ञान खेचे विद्यार्थी Joint Dakshana
Selection Test (JDST) २०२४ साठी पात्र आहेत. इयत्ता दहावीला
विज्ञान व गणित विषयामध्ये आवश्यक गुण पुढीलप्रमाणे आहे. GEN/EWS OBC:
85%, SC: 70%, ST: 60%, PD: No Cut off तसेच ज्याचे वार्षिक
कौटुंबिक उत्पन्न रु. २ लाख पेक्षा कमी आहे असे विद्यार्थी पात्र आहेत. |
JDST (Joint Dakshana Selection Test) २०२४ नोंदणी प्रकिया: पात्र विद्यार्थी दि.३१/१०/२०२३ पर्यंत येथे नोंदणी
करू शकतात नोंदणी पूर्ण करण्यासाठी
विद्यार्थ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एक लिंक मिळेल आणि ३०
मिनिटांच्या अभियोग्यता चाचणीसाठी ऑनलाईन उपस्थित राहण्य साठी ईमेल मिळेल. पात्र
विद्यार्थ्यांना JDST
- २०२४ परीक्षेसाठी बोलावले जाईल आणि डिसेंबर २०२३ पूर्वी
त्यांच्याशी संस्थेकडून संपर्क केला जाईल. |
अधिक माहितीसाठी या वेबसाईटवर भेट द्यावी किंवा +९१७७९८७८६४०५ या दूरध्वनी
क्रमांकावर संपर्क साधावा. Dakshana Scholarship for JEE NEET JDST परीक्षा जानेवारी २०२४
मध्ये आपल्या राज्यातील / जिल्ह्यातील नियुक्त ठिकाणी घेण्यात येईल.दक्षणा
निवासी शिष्यवृत्तीअंतर्गत दिल्या जाणाऱ्या मोफत मार्गदर्शनाचा जास्तीत जास्त
विद्यार्थ्यांना लाभ व्हावा या दृष्टीने पात्र, गरजू आणि
इच्छुक विद्यार्थ्यापर्यंत ही माहिती पोहोचविण्याबाबत आपल्या स्तरावरून पुढील
कार्यवाही करण्यात यावी. |
Click
here to apply for JDST 2024
1 comments:
Click here for commentsआपण करीत असलेले कार्य अतिशय महत्वपूर्ण आहे. हे शैक्षनिक कार्यासाठी,आमच्या सारख्या खेड्यातील लोकांसाठी अतिशय महत्वपूर्ण योगदान आहे याकरिता मी आपले अभिनंदन करतो. आपले कार्य अधिकाधिक वृध्दींगत होत जावो ही नम्र प्रार्थना. जय श्री कृष्णा.
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon