Anganwadi Sevika Madatnis Protsahan Bhatta Nikash Sudharna
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमधील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या प्रोत्साहन भत्त्याच्या निकषामध्ये सुधारणा करण्याबाबत.
दिनांक :- २४ जून, २०२५
संदर्भ :-
१) महिला व बाल विकास विभाग, शासन निर्णय क्र. एबावि-२०२४/प्र.क्र.१३१/का.६, दिनांक ४ ऑक्टोबर, २०२४
२) आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, नवी मुंबई यांचे पत्र क्र. एबाविसेयो/का-३ /२९४०/२०२५-२६, दिनांक ११ जून, २०२५
प्रस्तावना:-
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यात ५५३ प्रकल्पातंर्गत अंगणवाडी सेविका यांची ११०६६९, अंगणवाडी मदतनीस यांची ११०६६९ अशी एकूण २२१३३८ मानधनी तत्वावरील पदे मंजूर आहेत. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी होवून बालकांमधील कुपोषणाचे प्रमाण कमी करणे, पूर्व शालेय शिक्षणाचा दर्जा सुधारणे इत्यादी बाबींचे गुणात्मक मूल्यमापन करून पात्र ठरणा-या अंगणवाडी सेविका यांना प्रोत्साहन भत्ता लागू करण्यास संदर्भाधीन क्र. १ येथील शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. सदरचा प्रोत्साहन भत्ता माहे ऑक्टोबर, २०२४ पासून लागू करण्यात आला आहे. तथापि, पोषण ट्रॅकर अॅप्लिकेशन मध्ये निकषांनुसार गुणांकन करणे शक्य होत नव्हते.
प्रोत्साहन भत्याच्या निकषांमध्ये आवश्यकतेनुसार सुधारणा करण्याबाबत तसेच धोरणात्मक अंमलबजावणीमध्ये सुधारणा करणे आवश्यक असल्यास त्यासंदर्भात निर्णय घेण्याबाबत संदर्भाधीन क्र. १ येथील दिनांक ०४.१०.२०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये मा. मंत्री, महिला व बाल विकास यांचे अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. त्यानुषंगाने प्रोत्साहन भत्याच्या निकषांमध्ये बदल करण्यासंदर्भात सदर समितीच्या दिनांक २८.०५.२०२५ रोजीच्या बैठकीमध्ये विचारविनिमय करण्यात आला. त्यानुषंगाने एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय, नवी मुंबई यांनी संदर्भाधीन क्र. २ येथील पत्रान्वये सादर केलेल्या प्रस्तावास अनुसरून अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या प्रोत्साहन भत्त्याच्या निकषांमध्ये बदल करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय :-
एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे प्रोत्साहन
भत्त्याकरिता संदर्भाधीन क्र. १ येथील दिनांक ०४.१०.२०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये विहित करण्यात आलेले
निकष अधिक्रमित करण्यात येत आहेत. त्यानुषंगाने अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांना प्रोत्साहन भत्ता देण्याकरिता अंगणवाडी केंद्रांकरिता खालीलप्रमाणे निकष विहित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. त्याआधारे पात्र ठरणा-या अंगणवाडी केंद्रामधील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांना प्रोत्साहन भत्ता अनुज्ञेय करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.
अ.क्र. कामाचे नाव प्रोत्साहन भत्ता निकष
१.कामाचे नाव - समुदाय आधारित कार्यक्रम (CBE)
प्रोत्साहन भत्ता निकष - दरमहा किमान दोन समुदाय आधारित कार्यक्रम (CBE) कार्यक्रम घेणे व त्याची पोषण ट्रॅकरवर नोंद घेणे.
२.कामाचे नाव - घरपोच आहार (THR)
प्रोत्साहन भत्ता निकष - ३ वर्षे ते ६ वर्षे वयोगटातील नोंदणी झालेल्या एकूण बालकांच्या ८०% बालकांची किमान १६ दिवस उपस्थिती
३.कामाचे नाव -३ वर्षे ते ६ वर्षे वयोगटातील बालकांचे पूर्व शालेय शिक्षण
प्रोत्साहन भत्ता निकष -३ वर्षे ते ६ वर्षे वयोगटातील नोंदणी झालेल्या एकूण बालकांच्या ८०% बालकांची किमान १६ दिवस उपस्थिती
४.कामाचे नाव - गरम ताजा आहार (HCM)
३ वर्षे ते ६ वर्षे वयोगटातील नोंदणी झालेल्या एकूण बालकांच्या ८०% बालकांना दरमहा २१ दिवस आहाराचे वाटप
५.कामाचे नाव - VHSND (आहार आरोग्य दिवस)
प्रोत्साहन भत्ता निकष - दरमहा एका VHSND (आहार आरोग्य दिवस) कार्यक्रमाचे आयोजन करणे व त्याची पोषण ट्रॅकरवर नोंद घेणे.
६.कामाचे नाव - SAM (अतितीव्र कुपोषित) व MAM (मध्यम कुपोषित)
प्रोत्साहन भत्ता निकष - अंगणवाडीमधील SAM व MAM बालकांचे प्रमाण मागील महिन्याच्या तुलनेत कमी झालेले असणे.
७.कामाचे नाव - SUW (अतितीव्र कमी वजन) व MUW (मध्यम कमी वजन)
प्रोत्साहन भत्ता निकष - SUW व MUW असलेल्या बालकांचे प्रमाण बीटच्या सरासरीपेक्षा कमी असणे.
८.कामाचे नाव - HCM (गरम ताजा आहार) व THR (घरपोच आहार) साठा नोंदी
प्रोत्साहन भत्ता निकष - पोषण ट्रॅकरवरील दरमहा अहवाल
९.कामाचे नाव - स्थूल/लठ्ठ बालके यांचे प्रमाण प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा कमी करणे.
प्रोत्साहन भत्ता निकष - स्थूल / लठ्ठ बालके यांचे प्रमाण प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा कमी असणे.
१०.कामाचे नाव - खुजी बालके यांचे प्रमाण प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा कमी करणे.
प्रोत्साहन भत्ता निकष - खुजी बालके यांचे प्रमाण प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा कमी असणे
२. पोषण ट्रॅकर अॅप्लिकेशनवर उपलब्ध होणाऱ्या माहितीनुसार अंगणवाडी केंद्रांचे प्रतिमाह मूल्यांकन करण्यात यावे. तदनुषंगाने उपरोक्त नमूद १० निकषांपैकी किमान ७ निकष पूर्ण करणा-या अंगणवाडी केंद्रातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना खालीलप्रमाणे प्रतिमाह प्रोत्साहन भत्ता अनुज्ञेय राहील.
अंगणवाडी केंद्रांकरिता किमान पात्र निकष संख्या |
अंगणवाडी सेविकांना अनुज्ञेय प्रोत्साहन भत्ता |
अंगणवाडी मदतनीसांना अनुज्ञेय प्रोत्साहन भत्ता |
७ |
रु.१४०० |
रु. ७०० |
८ |
रु.१६०० |
रु. ८०० |
९ |
रु. १८०० |
रु. ९०० |
१० |
रु. २००० |
रु.१००० |
३. अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांना दिनांक १ ऑक्टोबर, २०२४ पासून प्रोत्साहन भत्ता अनुज्ञेय करण्यात आला आहे, त्यानुषंगाने उपरोक्त सुधारित निकषांच्या आधारे परिगणना करून दिनांक १ ऑक्टोबर, २०२४ पासून प्रोत्साहन भत्ता अदा करण्याची कार्यवाही आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांनी करावी.
४. सदरहू आदेश मा. मंत्रीमंडळाने दिनांक ३० सप्टेंबर, २०२४ रोजीच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने मा. मंत्री, महिला व बाल विकास यांचे अध्यक्षतेखालील समितीने घेतलेल्या निर्णयानुसार निर्गमित करण्यात येत आहेत.
५. वरीलप्रमाणे प्रोत्साहन भत्ता राज्य शासनाकडून देण्यात येत असल्याने याप्रकरणी येणारा अतिरिक्त खर्च हा मागणी क्र. एक्स-१, २२३६-पोषण आहार ०२-पोषक अन्न व पेये यांचे वितरण, १०१-विशेष पोषण आहार कार्यक्रम, (०८) (०५) अंगणवाडी सेवा, अतिरिक्त राज्य हिस्सा १००% (२२३६ १९४५) ०२-मजूरी या लेखाशीर्षाखाली उपलब्ध करण्यात येणा-या तरतुदीमधून भागविण्यात यावा.
६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२५०६२४१५०४००५२३० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
GR PDF COPY LINK
सह सचिव, महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांकः- एबावि-२०२५/प्र.क्र. ३१/का-६, मंत्रालय, मुंबई
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon