Visit Hundred Schools
"१०० शाळांना भेटी देणे" हा उपक्रम राबविणेबाबत
क्र. प्रशिसं/८०२/शाळा भेटी/२०२५/
दिनांक-/०५/२०२५
विषयः- “१०० शाळांना भेटी देणे" हा उपक्रम राबविणेबाबत
संदर्भ :-
१) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्र. संकीर्ण-११२५/प्र.क्र. २५२/एसएम -१, दिनांक-१२/०३/२०२५
२) शिक्षण संचालक (माध्य. व उच्च माध्य.) व शिक्षण संचालक (प्राथ.), पुणे यांचे पत्र जा.क्र. शिसंमा-२५/ (ओ-०१)/उन्हाळी सुट्टी/एस-१/२२३७, दिनांक २९/०४/२०२५
उपरोक्त विषयान्वये संदर्भीय शासन निर्णय दिनांक -१२/०३/२०२५ नुसार सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात शाळेत मुलांची उपस्थिती व शाळेची गुणवत्ता वृद्धिंगत करण्यासाठी शासनाने निर्देश दिलेले आहेत. तसेच संदर्भ क्र. २ च्या पत्रान्वये सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात राज्य मंडळाच्या शाळा सुरु करणेबाबत विस्तृत सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार शैक्षणिक वर्ष सुरु होतांना करावयाच्या शाळा भेटी, विद्यार्थ्यांचे स्वागत, दत्तक शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांच्या पटामध्ये लक्षणीय वाढ करण्याच्या दृष्टीने करावयाच्या उपाययोजना या अनुषंगाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी.
शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत :-
सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाची सुरुवात विदर्भ वगळता इतर सर्व विभागातील राज्य मंडळाच्या शाळा सोमवार दिनांक - १६/०६/२०२५ पासून व जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळ्याची सुट्टी नंतर विदर्भातील राज्य मंडळाच्या शाळा सोमवार दिनांक २३/०६/२०२५ पासून सुरु होणार आहेत. यानुसार शाळा सुरु होण्याच्या पहिल्या व दुसऱ्या दिवशी मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री (नगर विकास विभाग), मा. उपमुख्यमंत्री (वित्त व नियोजन), सर्व मा.मंत्री व राज्यमंत्री, मा. खासदार, मा. आमदार, लोकप्रतिनिधी तसेच सर्व सनदी अधिकारी यांनी त्यांच्या मतदार संघातील किंवा नजीकच्या किमान एकेक शाळेमध्ये भेट देऊन सर्व नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करणेकरीता मा.आयुक्त (मनपा), मा.जिल्हाधिकारी व मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे मार्गदर्शनानुसार कार्यक्रमाचे नियोजन करावे. यात नमूद मान्यवर लोकप्रतिनिधी व अधिकारी यांना एक संपर्क अधिकारी नेमून द्यावा. तसेच ते कोणत्या शाळेला /शाळांना भेटी देणार आहेत याबाबत पूर्व नियोजन करून आवश्यक पूर्व तयारी करावी. शिक्षणाधिकारी प्राथमिक जि. प. व प्रशासन अधिकारी मनपा यांनी पुढील नमुन्यात अहवाल राज्यस्तरावर सादर करावा.
अ.क्र. मा. लोकप्रतिनिधी/अधिकारी यांचे नाव पद संपर्क अधिकारी नाव पद दिनांक भेट देणाऱ्या शाळेचे नाव व पत्ता
१०० शाळांना भेटी :-
येत्या शैक्षणिक वर्षात शाळेच्या पहिल्या व दुसऱ्या दिवशी जिल्हा स्तरावरील सर्व विभागातील शासकीय यंत्रणेचे वर्ग १ व वर्ग २ चे अधिकारी मिळून जिल्ह्यातील किमान १०० शाळांना भेटी देण्याचे नियोजन मा. आयुक्त (मनपा), मा. जिल्हाधिकारी व मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे मार्गदर्शनानुसार करावे. याबाबत शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जि. प. व प्रशासन अधिकारी, मनपा यांनी अधिकारी निहाय शाळांची माहिती पुढील नमुन्यात राज्यस्तरावर सादर करावी.
अ.क्र. नाव पद कार्यालय दिनांक भेट देणाऱ्या शाळेचे नाव व UDISE क्रमांक
दत्तक शाळा :-
उपरोक्त नमूद शाळा सदर अधिकाऱ्यांना वर्षभरासाठी दत्तक शाळा म्हणून देण्यात येत आहेत. संबंधित अधिकारी यांनी या शाळांना वर्षभरात वेळोवेळी भेटी देऊन विद्यार्थी गुणवत्ता व शाळेच्या भौतिक सुविधा यांचा आढावा घ्यावा तसेच मार्गदर्शन करावे.
उपरोक्त नमूद शाळा सदर अधिकाऱ्यांना वर्षभरासाठी दत्तक शाळा म्हणून देण्यात येत आहेत. संबंधित अधिकारी यांनी या शाळांना वर्षभरात वेळोवेळी भेटी देऊन विद्यार्थी गुणवत्ता व शाळेच्या भौतिक सुविधा यांचा आढावा घ्यावा तसेच मार्गदर्शन करावे.
शिक्षण विभागातील अधिकारी [प्राचार्य, DIET, शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक, योजना), ज्येष्ठ अधिव्या-ख्याता, उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, अधिव्याख्याता, अधीक्षक, विस्तार अधिकारी (शिक्षण)] यांना उपरोक्त नमूद शाळे व्यतिरिक्त अजून प्रत्येकी २ शाळा दत्तक म्हणून द्याव्यात. याबाबत पुढील नमुन्यात माहिती या कार्यालयाकडे सादर करावी.
अ.क्र. नाव पद कार्यालय दत्तक शाळेचे नाव व UDISE क्रमांक
पट नोंदणी :-
१०० टक्के विद्यार्थ्यांची पट नोंदणी व्हावी व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांच्या इयत्ता १ ली च्या पटात लक्षणीय वाढ होण्याच्या दृष्टीने पुढील प्रमाणे उपाय योजना कराव्यात.
१. शाळेच्या परिसरातील अंगणवाडी व बालवाडी यांना शिक्षकांनी भेट देऊन त्यातील इयत्ता १ ली मध्ये दाखल पात्र विद्यार्थी यादी घ्यावी.
२. शिक्षकांनी अंगणवाडी ताई व पालक यांना भेटून १०० % विद्यार्थी शाळेच्या पहिल्या दिवशी जिल्हा परिषद/नगरपालिका/ महानगरपालिका शाळेत दाखल व्हावेत यासाठी प्रयत्न करावेत.
३. जिल्हा परिषद/ नगरपालिका/ महानगरपालिका शाळांमधील सोयी, सुविधा, शिष्यवृत्ती, विविध उपक्रम याबाबत पालकांना माहिती द्यावी. समाज माध्यमात प्रसिद्धी देऊन जास्तीत जास्त विद्यार्थी जिल्हा परिषद / नगरपालिका/महानगरपालिका शाळेत दाखल होतील यासाठी प्रयत्न करावा.
४. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या काही शाळा/शिक्षक यांनी इयत्ता १ ली मध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी दाखल व्हावेत यासाठी नाविन्यपूर्ण पद्धतीने जाहिरात करून समाज माध्यमावर प्रसिद्धी दिली आहे. यामध्ये शाळेचे यश, सोयी सुविधा, राबविले जाणारे विविध उपक्रम, विद्यार्थी सहभाग व यश याला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी दिली आहे.
५. याच धर्तीवर सर्व शाळांनी प्रचार प्रसिद्धी करावी. यासाठी आवश्यक मार्गदर्शन करावे व त्याबाबत सूचना द्याव्यात.
६. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचा पट वाढवा. प्रामुख्याने इयत्ता १ ली मध्ये दाखल होणाऱ्या विद्यार्थी पटात मागील वर्षीच्या तुलनेने लक्षणीय वाढ व्हावी यासाठी शाळा, तालुका, जिल्हा पातळीवर विशेष प्रयत्न करावेत.
७. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी प्रवेशित व्हावेत यासाठी शाळा भेटीच्या वेळेस मा. लोकप्रतिनिधी तसेच अधिकारी यांनी शाळा व्यवस्थापन समिती, ग्राम पंचायत सदस्य, सरपंच, नागरिक यांचेशी चर्चा करावी.
८. मा. आयुक्त (मनपा), मा.जिल्हाधिकारी व मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी याबाबत विशेष लक्ष देऊन आपल्या कार्यक्षेत्रातील जिल्हा परिषद/ नगरपालिका/ महानगरपालिका शाळांमध्ये इयत्ता १ ली च्या पटात लक्षणीय वाढ व्हावी यासाठी उपरोक्त नमूद केले प्रमाणे उपक्रम सर्व शाळांमध्ये होतील यापद्धतीने नियोजन करावे. याव्यतिरिक्त इतर नाविन्यपूर्ण उपक्रमही घेता येईल यासाठी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) / प्रशासन अधिकारी यांनी मा.मुख्य कार्यकारी अधिकारी, मा. आयुक्त मनपा यांचे मार्गदर्शनानुसार कार्यवाही करावी.
शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पुढील प्रमाणे कार्यवाही करावी.
१. शाळा सुरू होण्यापूर्वी मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री (नगर विकास विभाग), मा. उपमुख्यमंत्री (वित्त व नियोजन), सर्व मा. मंत्री व राज्यमंत्री, मा. खासदार, मा. आमदार, लोकप्रतिनिधी तसेच सर्व सनदी अधिकारी यांच्या शाळा भेटी बाबत वर्तमानपत्रात प्रसिद्धी द्यावी, तसेच शाळा सुरु होण्याचा स्थानिक स्तरावर प्रचार प्रसार करावा.
२. सदर कार्यक्रमांतर्गत मा. लोकप्रतिनिधी व अधिकारी यांनी शाळेचे पहिले दोन दिवस शाळा भेटी कराव्यात. मा. लोकप्रतिनिधी यांना संपर्क अधिकारी निश्चित करून द्यावेत शाळा भेटीचे नियोजन करावे.
३. शाळा सुरु होणार असल्याबत ग्रामीण भागात दवंडी काढून सर्वांना कळविण्यात यावे. तसेच पालकांचे what's app ग्रुप व शालेय नोटीस बोर्ड यावर कळवावे.
४ शाळा सुरु होण्यापूर्वी शाळा व शालेय परिसराची स्वच्छता करावी.
५. शाळा सुरु होण्याच्या पहिल्या दिवशी पालकांना बोलवावे, अंगणवाडी सेविका/ताई यांना बोलवावे.
६. शालेय विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढावी/आयोजन करावे.
७. नवागत विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करावे.
८. "पहिले पाउल या संकल्पने अतर्गत इयत्ता पहिलीमध्ये दाखल झालेल्या विद्यार्थ्यांच्या पायाचा ठसा कागदावर घ्यावा. त्याची प्रत पालकांना द्यावी.
९. सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके व गणवेश यांचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात यावे.
१०. शैक्षणिक गुणवत्ता विषयक उपक्रमाचा/नियोजनाचा आढावा घ्यावा.
११. निपुण महाराष्ट्र अभियानाअंतर्गत केलेल्या कार्यवाहीचा आढावा घ्यावा.
१२. शालेय भौतिक सुविधांचा आढावा घ्यावा. आवश्यकतेनुसार उपाययोजनांसाठी मार्गदर्शन करावे.
१३. शालेय स्वच्छता, विद्यार्थ्यांच्या स्वच्छतेच्या सवयी याबाबत आढावा घ्यावा.
१४. शालेय क्रीडा साहित्य, खेळाच्या सुविधा, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना, विविध स्पर्धा परीक्षा इत्यादी बाबींचा आढावा घ्यावा व मार्गदर्शन करावे.
१५. करावे. सर्व विद्यार्थ्यांकरीता शाळेचा पहिला दिवस हा उत्सवाप्रमाणे साजरा करून शाळेमध्ये तिथी भोजन आयोजन
तरी याबाबत, आपल्या जिल्ह्यामध्ये १०० शाळांना भेटी" या उपक्रमाअंतर्गत संदर्भीय शासन निर्णयानुसार आवश्यक कार्यवाही करून शाळांना भेटी दिल्याबाबतचा अहवाल शिक्षण संचालनालयास सादर करावा.
या ओळीला स्पर्श करून परिपत्रक पीडीएफ मध्ये प्राप्त करा
शिक्षण संचालक (प्राथमिक)
प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे
महाराष्ट्र शासन
प्राथमिक शिक्षण संचालनालय, मध्यवर्ती इमारत, पुणे
प्रति,
१. विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व)
२. शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक/योजना), जिल्हा परिषद (सर्व)
३. शिक्षणाधिकारी बृहन्मुंबई
४. शिक्षण निरीक्षक (उत्तर, दक्षिण, पश्चिम)
५. प्रशासन अधिकारी मनपा/नपा (सर्व)
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon