DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Varishtha Nivad Vetanshreni Prashikshan Suchna

Varishtha Nivad Vetanshreni Prashikshan Suchna

Varishtha Nivad Vetanshreni Prashikshan 2025 update information


Varishtha Nivad Vetanshreni Prashikshan 2025 update information

Senior and selection grade training 2025

जा.क्र. राशैसंप्रपम/सेवापूर्व शिक्षण (SBTE)/२०२४-२५/ E-mail(6)

दिनांक: २१/०५/२०२५

सुधारित पत्र


विषयः- वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षणा बाबतच्या सूचना


संदर्भ :-

१) शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय क्र. शिप्रधो २०१९/प्र.क्र.४३/प्रशिक्षण, दि.२०/०७/२०२१

२) शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे पत्र क्र. शिप्रधो २०१९/प्र.क्र.६७/प्रशिक्षण, दि.०६/१०/२०२१

उपरोक्त संदर्भीय विषयात नमूद केल्यानुसार राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील अध्यापकाचार्य यांना देण्यात येणाऱ्या वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षणाच्या अनुषंगाने जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांना मार्गदर्शक सूचना पुढीलप्रमाणे-


प्रशिक्षण पूर्वतयारी -

१) प्रशिक्षणाचे जिल्हयाचे प्रमुख म्हणून प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था हे कामकाज पाहतील, तर तालुकास्तरचे प्रशिक्षण केंद्र समन्वयक म्हणून प्रशिक्षणाची जबाबदारी वरिष्ठ अधिव्याख्याता / अधिव्याख्याता यांची राहील. तालुकास्तरीय प्रशिक्षणासाठी वरिष्ठ अधिव्याख्याता /अधिव्याख्याता हे पूर्णवेळ प्रशिक्षणस्थळी उपस्थित राहून प्रशिक्षणाचे संनियंत्रण करतील. तसेच आवश्यकता असल्यास केंद्रप्रमुख । विस्तार अधिकारी /गटशिक्षणाधिकारी यांनाही केंद्र समन्वयक म्हणून जबाबदारी सोपवावी.

२) प्रशिक्षणासंदर्भात नियोजन करण्यासाठी परिषदेमार्फत देण्यात आलेल्या पोर्टलद्वारे आपल्या जिल्ह्यातील स्तरनिहाय (प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, अध्यापक विद्यालय) व प्रशिक्षण प्रकारनिहाय (वरिष्ठ व निवड) प्रशिक्षणार्थ्यांची संख्या आपल्याला उपलब्ध झाली आहे.

३) तालुकास्तरावर प्रशिक्षणार्थी संख्येनुसार दोन ते तीन तालुके एकत्र करून पुरेशाप्रमाणात सुविधा असणारे प्रशिक्षणस्थळ निश्चित करावे.

४) एका प्रशिक्षण ठिकाणी किमान १ वर्ग (५० प्रशिक्षणाची) व कमाल ४ वर्ग (२०० प्रशिक्षणार्थी) यामयर्यादित नियोजन करावे, स्तरनिहाय व प्रशिक्षण प्रकारनिहाय वर्गांची निश्चिती करावी.

५) प्रशिक्षणार्थ्यांना देण्याचे वाचनसाहित्य व सुलभकांसाठीचे घटकसंच पुरेशा प्रमाणात आले आहेत यांची खात्री करावी.

६) प्रशिक्षणार्थी संख्या लक्षात घेऊन सर्व भौतिक सुविधायुक्त असे योग्य प्रशिक्षणाचे स्थळ निश्चित करावे. (उदा. LCD प्रोजेक्टर असलेले वर्ग, स्मार्ट क्लास रूम)

७) प्रशिक्षण हे उन्हाळी काळात असल्याने प्रशिक्षणाच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची, पंखे, योग्य बैठक व्यवस्था, महिला व पुरुष स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्याची जबाबदारी प्रशिक्षण केंद्रसंचालकाची राहील. (केंद्र व राज्यसरकारने उन्हाळ्याविषयी निर्गमित केलेल्या मार्गदर्शन सूचनांचे काटेकोर पालन करण्यात यावे.)

८) प्रशिक्षणस्थळी प्रशिक्षणार्थ्यांच्या संख्येच्या प्रमाणात (किमान ४ प्रशिक्षणार्थ्यांमागे १ संगणक) संगणककक्ष उपलब्ध असावा.

९) प्रशिक्षणस्थळी सक्षम इंटरनेटची व्यवस्था असावी.

१०) पी.पी.टी. दाखवण्यासाठी एल. सी. डी. प्रोजेक्टरची (व्हिडिओ/ऑडिओ) सोय प्रशिक्षणाच्या ठिकाणी करावी. (प्रत्येक कक्षात १ LCD प्रोजेक्टर)

११) वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षणासाठी सुलभकाची निवड करताना खालील निकष लक्षात घेतले जावेत.

अ) वरिष्ठ व निवड वेतन श्रेणीसाठी स्वतः प्रशिक्षण पूर्ण केलेले ज्यांना राज्यस्तरावर/जिल्हास्तरावर शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचा अनुभव आहे.

ब) अध्यापक विद्यालयातील सेवांतर्गत तुकडीला अध्यापन करणाऱ्या अध्यापकाचार्यांचा प्राधान्याने समावेश करण्यात यावा.

क) प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय स्तरावर अध्यापन करणाऱ्या अनुभवी शिक्षकांचा समावेश करावा.

१२) राज्यस्तरावरील TOT प्रशिक्षणानंतर पोर्टलवर उपलब्ध होणाऱ्या स्तरनिहाय (प्राथमिक, माध्यमिक, उच्च्चमाध्यमिक, अध्यापक विद्यालय) व प्रशिक्षण प्रकारनिहाय (वरिष्ठ व निवड) शिक्षक संख्येनुसार आवश्यक सुलभक (एका वर्गासाठी चार सुलभक याप्रमाणात) तयार करण्यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था स्तरावर करण्यात यावे. त्यामध्ये पुरेसे सुलभक उपलब्ध होतील असे नियोजन करण्यात यावे. आवश्यक सुलभक संख्येमध्ये तातडीचे कारणास्तव अतिरिक्त म्हणून काही सुलभक संख्या वाढविण्यात यावी (अंदाजे एकूण आवश्यक संख्येमध्ये १०%), सदर प्रशिक्षण राज्यस्तराप्रमाणे चार दिवसीय आयोजित करण्यात यावे. १३) आपणास उपलब्ध करून देण्यात आलेल्या ऑनलाईन प्रणालीवरील लॉगिनच्या माध्यमातून सुलभक यादी (Trainers List), प्रशिक्षण स्थळ (Training Center), केंद्र समन्वयक (Co-ordinator List) इत्यादी बाबी दिनांक १६/०५/२०२५ रोजी सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत अद्ययावत करण्यात यावी.

१४) प्रत्येक वर्गाचे प्रत्येकी सहा ते सात प्रशिक्षणार्थी याप्रमाणात आठ गट तयार करावेत. दोन गटास एक याप्रमाणे सुलभकाची नेमणूक करावी. प्रत्येक सुलभकाने आपल्या गटातील प्रशिक्षणार्थ्यांचे प्रशिक्षणा दरम्यान आणि प्रशिक्षणोत्तर कार्याचे निकषावर आधारित मूल्यांकन करणे अपेक्षित आहे तशी सूचना सुलभकांना द्यावी.

१५) प्रशिक्षण कार्यक्रम सुरु होण्यापुर्वी प्रशिक्षणार्थ्यांला पुढील सूचना पत्राद्वारे निर्गमित करण्यात याव्यात.

अ) प्रशिक्षणाचे स्थळ, दिनांक व वेळ कळविण्यात यावे.

ब) तालुकास्तरीय प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षणार्थीना भोजन अल्पोपहार सुविधा नसल्याचे सूचित करणेत यावे.

क) प्रशिक्षणला येण्यापूर्वी स्वाध्याय लेखनासाठी फुलस्केप कागद, वही सोबत आणावी.

ड) ऑनलाईन बहुपर्यायी प्रश्न सोडविता यावेत यासाठी Android मोबाईल फोन पूर्णतः चार्ज असेल असा बरोबर असावा.

ई) आपण शिकवत असलेल्या विषयाची किमान पाठ्यपुस्तके, प्रश्नपत्रिका सोबत असाव्यात (वरिष्ठ वेतनश्रेणी प्रशिक्षणासाठी)

ए) राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०, राज्य अभ्यासक्रम आराखडा, शाळामूल्यांकन शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखड (SQAAF), यासारखे साहित्य परिषदेच्या संकेत स्थळावरील सदर साहित्याचे वाचन करावे.

प्रशिक्षणादरम्यान -

१) प्रशिक्षण नियोजनाप्रमाणे चालू आहे याविषयीचा आढावा समन्वयकांमार्फत घेणे व आवश्यक सूचना देणे.

२) प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण साहित्याचे वाटप करणे. साहित्य मिळाल्याची पोच घेणे.

३) प्रशिक्षणार्थ्यांच्या प्रत्येक तासिकेला उपस्थित असल्याबद्दलची तासीका निहाय स्वाक्षरी पत्रक रोजच्या रोज प्रशिक्षण पोर्टलवरून डाउनलोड करुन ती प्रत्येक तासादरम्यान स्वाक्षरीसाठी उपलब्ध होईल असे पहावे. प्रत्येक तासिके दरम्यान स्वाक्षरी घेऊन तासिकानिहाय उपस्थितीची नोंद पोर्टलवर अपलोड विहीत वेळेमध्येच करावी

४) तासिकेनंतर घेतल्या जाणाऱ्या बहुपर्यायी चाचणी व सुलभकाच्या तासिकेबद्दल प्रत्याभरणासाठीची लिंक उपलब्ध करुन दिली असेल, त्यादृष्टिने चाचणी होईल असे पहावे. केंद्रसंचालकाने प्रत्याभरणाचे विश्लेषणावर सुलभकांना वैयक्तिकरित्या मार्गदर्शन करावे.

५) प्रशिक्षणाच्या शेवटी लेखी चाचणीचे नियोजन परीक्षापद्धतीप्रमाणे करावे.

६) प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर विहित नमुन्यात प्रशिक्षणार्थ्यांना उपस्थिती प्रमाणपत्र देणे.

७) प्रशिक्षणार्थ्यांना उर्वरित पाच स्वाध्याय व प्रकल्प/ कृतिसंशोधन नवोपक्रम अहवाल प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर (४० दिवसांत) आपल्या जिल्ह्य शिक्षण व प्रशिक्षण संस्थात जमा करणेविषयीची तारीख, वेळ याबाबत स्पष्ट सूचना द्याव्यात.

प्रशिक्षणानंतर -

१) प्रशिक्षण संपल्यानंतर ४० दिवसांनी प्रशिक्षणार्थ्यांकडून पाच स्वाध्याय व प्रकल्प/ कृतिसंशोधन / नवोपक्रम अहवाल जमा करुन घ्यावेत.

२) आपल्या केंद्रावरील सर्व प्रशिक्षणार्थ्याच्या कडून पाच स्वाध्याय व प्रकल्प / कृतिसंशोधन / नवोपक्रम अहवाल प्राप्त झाल्यानंतर आपल्या केंद्रावरील सुलभकांना तपासणी, गुणांकन आणि तक्त्यात गुणांची नोंद करण्याकरीता दोन दिवसांसाठी निमंत्रित करण्यात यावे.

प्रशिक्षण कालावधी व प्रशिक्षण खर्च -

१) जिल्हास्तरावर दिनांक २६/०५/२०२५ ते दिनांक २९/०५/२०२५ या कालावधीत ४ दिवसीय TOT चे आयोजन एकाच टप्पामध्ये करावे.

२) तालुकास्तरावरील प्रशिक्षण दिनांक ०२/०६/२०२५ ते दिनांक १२/०६/२०२५ या कालावधीत एकाच टप्प्यात आयोजित करावे.

३) प्रशिक्षणासाठी प्रत्येकी ५० प्रशिक्षणार्थी चा एक वर्ग करण्यात यावा व त्यानुसार पोर्टलवर नोंद करावी.

४) शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय दिनांक २४ जुलै २०१७ व दिनांक २४ ऑगस्ट २०१७-शालेय शिक्षण व क्रीडा विभागातील जिल्हास्तर प्रशिक्षणासाठी प्रशिक्षण अनुषंगिक खर्च या शासन निर्णया प्रमाणे करावा.

५) अध्यापक विद्यालयातील अध्यापकाचार्यचे १० दिवसांचे प्रशिक्षण हे राज्यस्तरावर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, पुणे यांचे मार्फत आयोजित केले जाईल याबाबतच्या सविस्तर नियोजन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, पुणे यांनी करून याबाबतच्या सूचना निर्गमित करणेत यावेत

६) कला व क्रिडा शिक्षकाचे तालुकास्तरीय ७ दिवसीय प्रशिक्षण नियमित प्रशिक्षण वर्गासोबत (दिनांक २ जून ते ९ जून एकूण ०७ दिवस) होईल. त्यांच्या मुल्याकन व उपस्थिती बाबतच्या नोंदी संबधित जिल्ह्याने ठेवाव्यात. तसेच विभाग स्तरीय प्रशिक्षणास उपस्थित राहण्यासाठी कला व क्रिडा शिक्षकांना दिनांक ९जून रोजी प्रशिक्षण कार्यमुक्त करण्यात यावे.

(७) कला व क्रीडा शिक्षकाचे विभागीय प्रशिक्षण दिनांक १० जून ते १२ जून या कालावधीत विभागीय जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था याचेमार्फत आयोजित केले जाईल. संबधित विभागीय जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांनी आपल्या विभागातील सर्व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांना आवश्यक सूचना निर्गमित करण्यात याव्यात.

८) कला व क्रिडा शिक्षकांसाठी TOT आयोजन विभागस्तरावर करण्यात यावे.

९) जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांना देण्यात येणार रक्कमेची बाबनिहाय विभागणी पुढीलप्रमाणे करण्यात येत आहे. जिल्हास्तरीय प्रशिक्षकाचे प्रशिक्षणा (TOT) साठी रु १०००/- प्रती दिन प्रतिव्यक्ती या खर्चमयदित वित्तीय नियमांच्या आधीन राहून करण्यात यावा

जिल्हातर प्रशिक्षकांचे प्रशिक्षण (TOT)

अ.क्र. खर्च तपशील दर (रु.) दिवस

TOT जिल्हास्तर-प्रतिदिन प्रतिव्यक्ती

१,०००/-

अ.क्र. तालुकास्तर प्रशिक्षण (प्रति वर्ग)

खर्च तपशील

दर (रु.)

दिवस

तज्ञ संख्या

एकूण

केवळ सुलभक मानधनासाठी

५००/-

१०

२०,०००/-

इतर अनुषंगिक खर्च (सादिल, प्रमाणपत्र, प्रश्नपत्रिका, स्टेशनरी, L.C.D. प्रोजेक्टर, पिण्याच्या पाण्याची सुविधा इ.) (प्रति वर्गासाठी)

४०००/-

तरी वरील सूचनांप्रमाणे जिल्हास्तरीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण व तालुकास्तरीय प्रशिक्षणार्थ्यांचे प्रशिक्षण विहित कालावधीमध्ये सर्व सूचनांच्या काटेकोर पालनासह करण्यात यावे.


परिपत्रक पीडीएफ मध्ये या ओळीला स्पर्श करून प्राप्त करा


(डॉ. माधुरी सावरकर) 

उपसंचालक (सेवापूर्व शिक्षण) राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

महाराष्ट्र शासन

शिक्षण व क्रीडा विभाग

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

प्रति,

१) उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबई

२) प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व)

Instructions regarding Senior Pay Scale and Selected Pay Scale Training

Newest
Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon