DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

IDOL Shikshak Shodh Prakriya

 IDOL Shikshak Shodh Prakriya

आयडॉल शिक्षक शोध प्रक्रिया

Search Process opf Idol Teacher 

जा.क्र. राशैसंप्रपम/अविवि/idol/2025/

दिनांक 07/07/2025


प्रति,

जिल्हास्तर समिती प्रमुख तथा जिल्हाधिकारी (सर्व)


विषय- आयडॉल शिक्षक शोध प्रक्रियेबाबत...


संदर्भ-

1. शासन निर्णय क्र. नमाशा-2025/ प्र.क्र.14/ टीएनटी-4 दिनांक: 16/04/2025

2. शासन पत्र संकीर्ण-2025/प्र क्र-14/टीएनटी-4 दिनांक 16/06/2025

उपरोक्त संदर्भ क्र.1 येथील शासन निर्णया‌द्वारे वि‌द्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी संपूर्ण आयुष्य शाळा व वि‌द्यार्थी विकासाकरीता देणाऱ्या शिक्षकांच्या अनुभवाचा उपयोग राज्यातील अन्य शाळांना, शिक्षकांना, विद्यार्थ्यांना व पालकांना होण्यासाठी तसेच सर्व शाळांमधील शिक्षकांना प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीने अशा शिक्षकांच्या कामाचा गौरव व सन्मान करण्यासाठी विशेष मोहीम शासनाने हाती घेतलेली आहे.

यासाठी संदर्भीय शासन निर्णयानुसार समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत व आपण यासाठीच्या जिल्हास्तरीय समितीचे प्रमुख आहात.

वाचा 

 शासन निर्णय क्र. नमाशा-2025/ प्र.क्र.14/ टीएनटी-4 दिनांक: 16/04/2025


संदर्भ क्र. 2 अन्वये आयडॉल शिक्षक यांची निवड करून यादी शासनास सादर करणेबाबत या संदर्भ क्र. 2 अन्वये आयडॉल शिक्षक यांची निवड करून यादी शासनास सादर करणेबाबत या कार्यालयास कळविण्यात आलेले आहे. त्याअनुषंगाने गठित करण्यात आलेल्या जिल्हा व तालुका समित्यांनी पात्र शिक्षकांचे मूल्यमापन करुन याबाबत खालीलप्रमाणे कार्यवाही करावी. 


अ.क्र.कार्यवाही मुदत


1 अशा शिक्षकांचा शोध घ्यावा ज्यांच्या शैक्षणिक वर्ष 2024- 25 मधील त्यांना नेमून दिलेल्या कोणत्याही एका तुकडीच्या बाबतीत त्यांनी शिकविलेल्या सर्व विषयांसाठी वर्गातील किमान 90% विद्यार्थ्यांना सर्व अध्ययन निष्पती प्राप्त आहेत. यासाठी संबंधित शिक्षकांशी चर्चा करण्यास तसेच सदरील बाब संबंधित वर्गात जाऊन तपासणी करण्यास हरकत नाही. यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था व संपूर्ण पर्यवेक्षीय यंत्रणेची मदत घ्यावी.

15.07.2025


2 उपरोक्त शिक्षकांसाठी संदर्भ क्रमांक 1 अन्वये इतर आठ निकषांची पडताळणी पूर्ण करावी.

25.07.2025


3 सर्व तालुकास्तरीय समितींनी त्यांची गुणांकनासह बनवलेली प्रस्तावित शिक्षकांची यादी जिल्हास्तरीय समितीला द्यावी.

26.07.2025


संदर्भीय शासन निर्णयामध्ये यासाठीच्या शिक्षक मूल्यमापनाकरिता बाबी व गुणांकन दिलेले आहे. बाबनिहाय मूल्यमापन निकष सोबत संलग्न आहेत. निकषानुसार गुणांकन कार्यपद्धती अनुसरण्यात यावी. आणि दिलेल्या वेळापत्रकानुसार सर्व कार्यवाही काटेकोरपणे पूर्ण होईल याची दक्षता घ्यावी.

परिपत्रक पीडीएफ लिंक

संचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

महाराष्ट्र शासन

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे

Newest
Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon