DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Bal Chitrkala Spardha

Bal Chitrkala Spardha


Bal Chitrkala Spardha Shulk Bakshis Rakkam Sudharna Spardha Aayojan Margdarshak Suchana

Bal Chitrkala Spardha Shulk Bakshis Rakkam Sudharna Spardha Aayojan Margdarshak Suchana

बालचित्रकला स्पर्धा शुल्क आणि बक्षिसांच्या रक्कमेमध्ये सुधारणा करणे तसेच स्पर्धा आयोजनाबाबत मार्गदर्शक सुचना.

महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग,


दिनांक:- १४ जुलै, २०२५.

वाचा :-

१) उच्च व तंत्रशिक्षण आणि सेवायोजन विभाग शासन निर्णय क्रमांक ओडीआर-१०९२/९७५८ (५३) साशि-५, दिनांक ११ नोव्हेंबर, १९९४.

२) महाराष्ट्र कला शिक्षण मंडळ अधिनियम, २०२३ अधिसूचना असाधारण क्रमांक १४, दिनांक १९ जानेवारी, २०२४.

३) महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ स्थापना अधिसूचना दिनांक २९ मे, २०२४.

४) महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाचे पत्र क्रमांक मराकशिमं/२०२५/सात/४८९,

दिनांक ३० मे, २०२५.

५) कला संचालक यांचे पत्र क्रमांक डिओओ-२०२५/दोन/९३१, दिनांक ०३ जून, २०२५.

प्रस्तावना:-

कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्याकडून सन १९७२ पासून शालेय विद्यार्थ्यांकरिता बाल चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. कला शिक्षणाशी संबंधित असणाऱ्या कला परिसंस्था व त्यातील अभ्यास पाठयक्रम यांचे संलग्निकरण करण्याशी संबंधित असणाऱ्या बाबींचे विनियमन करणे आणि अनुषंगिक बाबींकरिता महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ अधिनियम, २०२३ अन्वये महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. उपरोक्त अधिनियमाचे कलम ८ मधील तरतुदीनुसार, सन २०२५-२०२६ पासून, बाल चित्रकला स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाकडून करण्यात येणार आहे.

२. प्रचलित बालचित्रकला स्पर्धेचे परीक्षा शुल्क व बक्षिसांच्या रक्कमा दि. ११ नोव्हेंबर, १९९४ च्या शासन निर्णयानुसार विहित करण्यात आल्या आहेत. तद्नंतर मागील ३० वर्षापासून बक्षिसांच्या रकमा आणि परीक्षा शुल्क यामध्ये सुधारणा करण्यात आली नव्हती. सबब, बालचित्रकला स्पर्धेचे परिक्षा शुल्क व बक्षिसांच्या रक्कमांमध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुषंगाने पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे:-

        शासन निर्णय

१. सन २०२५-२०२६ या शैक्षणिक वर्षापासून बालचित्रकला स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ यांच्याकडून करण्यात येईल.

२. "बालचित्रकला स्पर्धा" याकरिता आकारण्यात येणारे परीक्षा शुल्क सन २०२५-२६ पासून खालील प्रमाणे सुधारित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

बालचित्रकला स्पर्धा परीक्षा शुल्कः-

बालचित्रकला स्पर्धा स्पर्धा प्रवेश शुल्क

सध्याचे स्पर्धा प्रवेश शुल्क (रु) प्रति विद्यार्थी रु.५/-

सुधारीत स्पर्धा प्रवेश शुल्क (रु) प्रति विद्यार्थी रु. २०/-


३. बक्षीसांची रक्कम खालील प्रमाणे सुधारित करण्यात आली आहे.

अ) जिल्हास्तरीय बक्षीसांची रक्कम :-

Bal Chitrkala Spardha Shulk Bakshis Rakkam Sudharna Spardha Aayojan Margdarshak Suchana

ब) तालुका स्तरीय बक्षीसांची रक्कम :-

Bal Chitrkala Spardha Shulk Bakshis Rakkam Sudharna Spardha Aayojan Margdarshak Suchana

४. बालचित्रकला स्पर्धा आयोजनाकरिता मार्गदर्शक सुचना:-

१) बालचित्रकला स्पर्धा दरवर्षी ऑगस्ट महिन्यात, शक्यतो १५ ऑगस्ट रोजी सर्व जिल्हयांमध्ये, एकाच दिवशी आयोजित करण्यात यावी.

२) खालील प्रमाणे स्पर्धा आयोजित करण्यात यावी :-

अ.क्र. गट इयत्ता

१.गट-१ इयत्ता पहिली व दुसरी

२. गट-२ इयत्ता तिसरी व चौथी

३.गट-३ इयत्ता पाचवी, सहावी व सातवी

४. गट-४ इयत्ता आठवी, नववी व दहावी


३) मुंबई शहर आणि उपनगर या दोन जिल्ह्यांमध्ये स्पर्धेचे आयोजन उपसंचालक (प्राथमिक/ माध्यमिक), शालेय शिक्षण संचालनालय, चर्नी रोड, मुंबई यांच्यामार्फत करण्यात येईल. उर्वरित जिल्हयांमध्ये संबंधित जिल्हापरिषदेच्या शिक्षण अधिकाऱ्यांकडून (प्राथमिक/माध्यमिक) स्पर्धेचे आयोजन करण्यात येईल.

४) संबंधित केंद्र / शाळांनी महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाच्या www.msbae.ac.in या संकेतस्थळावर बालचित्रकला टॅबमध्ये, स्पर्धेत गटनिहाय सहभागी होणारी केंद्र/शाळा व विद्यार्थ्यांची प्रवेश नोंदणी ऑनलाईन पध्दतीने करावा.

५) स्पर्धेच्या गटनिहाय प्रश्नपत्रिका, संबंधित केंद्र / शाळांना ऑनलाईन (प्रत्येक केंद्र/शाळा करिता एक) उपलब्ध करुन देण्यात येतील व तद्नंतर संबंधित वर्गातील पर्यवेक्षकांने गटनिहाय प्रश्नपत्रिकेचा विषय फळ्यावर (Black board) लिहून देणे बंधकानकारक राहील.

६) स्पर्धकांना ११ इंच X १५ इंच आकाराचा कागद (ड्रॉईग पेपर) संबंधित केंद्र / शाळांनी पुरविणे आवश्यक राहील. बालचित्रकला स्पर्धेकरिता जमा होणाऱ्या स्पर्धा शुल्कातून केंद्र /शाळांनी ड्रॉईंग कागदाचा खर्च वजा करुन उर्वरित रक्कम मंडळाकडे जमा करावी.

७) स्पर्धकांनी नेमून दिलेल्या ठिकाणी, स्वतःचे रंग (क्रेयॉन, जलरंग, पोस्टर कलर), ब्रश व इतर चित्रकला साहित्य वापरुन दोन तासात चित्र पूर्ण करणे आवश्यक राहील.

८) जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय स्पर्धा बक्षीसे व प्रमाणपत्रे यांचे वितरण बालदिनी म्हणजेच दि.१४ नोव्हेंबर रोजी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) / शिक्षण निरीक्षक यांच्याकडून करण्यात येईल.

९) बालचित्रकला स्पर्धा आयोजित करण्यासाठी विद्यार्थ्यांकडून प्राप्त होणारे स्पर्धा शुल्क, महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल. जिल्हा व राज्य पातळीवर होणारा बक्षिसांवरील खर्च महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाकडून करण्यात येईल.

५. तालुका पातळीवरील स्पर्धेचे आयोजनः-

तालुका पातळीवरील स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी, संबंधित पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी यांच्याकडून खालील प्रमाणे समिती गठित करण्यात येईल.


अ.क्र.समिती

१.मुख्याध्यापक, तालुकास्तरावरील माध्यमिक शाळा.

२.मुख्याध्यापक, तालुकास्तरावरील प्राथमिक शाळा.

३.प्राथमिक/माध्यमिक शाळेतील प्रशिक्षित चित्रकला शिक्षक.

४.स्थानिक चित्रकार.


समितीकडून प्रत्येक गटामधील २० चित्रे (२० X ४ गट = एकूण ८० चित्रे) निवडण्यात येतील.

निवडण्यात आलेली चित्रे स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी संबंधित जिल्हयाच्या शिक्षण अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येतील.

६. जिल्हापातळीवरील स्पर्धेचे आयोजन व बक्षिसांची निवड करण्याकरिता समिती:-

जिल्हा पातळीवरील स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून खालील ९ सदस्यांचा समावेश असलेली समिती गठीत करण्यात येईल:-


अ.क्र. समिती समितीमधील पदनाम

१. संबंधित जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीचे अध्यक्ष अध्यक्ष

२. जिल्ह्यातील दोन प्रसिध्द अनुदानित माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक सदस्य

३. जिल्हयातील दोन प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक सदस्य

४. दोन स्थानिक चित्रकला शिक्षक (चित्रकला शिक्षण शक्यतो आर्ट मास्टर प्रमाणपत्रधारक असावेत) सदस्य

५. संबंधित जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सदस्य

६. संबंधित जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सदस्य सचिव


स्पर्धेकरिता चित्रांची निवड करण्यासाठी जिल्हा पातळीवरील समितीकडून तीन सदस्यांची निवड समिती गठीत करण्यात येईल. निवड समितीमधील दोन सदस्य कलेचे शिक्षण प्राप्त केलेले असतील. निवड समितीने तालुका पातळीवरील समितीकडून प्राप्त झालेल्या चित्रांमधून प्रत्येक गटासाठी ४ बक्षीसे (पहिले-१, दुसरे-१, तिसरे-१, व चौथे-१) असे एकूण प्रत्येक जिल्हयास १६ चित्रे निवडावी [एकूण बक्षीसांची संख्या ६०८ (१६४३८)], राज्यस्तरीय बक्षीसांची संख्या प्रत्येक गटास -४ याप्रमाणे एकूण १६ बक्षीसे होईल. तसेच, प्रत्येक गटातील विजेत्यांखेरीज पाच स्पर्धकांना गुणवत्ता प्रमाणपत्र देण्यात येतील.

७. राज्य स्तरावरील बक्षिसांसाठी चित्र निवडण्यासाठी समिती:-

राज्य पातळीवरील बक्षिसांसाठी चित्रे निवडण्यासाठी संचालक, कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली पुढील तीन सदस्यीय समिती गठीत करण्यात यावी.


अ.क्र. अधिकाऱ्यांचे पदनाम समितीमधील पदनाम

१. संचालक, कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई अध्यक्ष

२. अधिष्ठाता/प्राचार्य, शासकीय कला महाविद्यालय सदस्य

३. सचिव, महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ, मुंबई सदस्य सचिव


८. सदर शासन निर्णय वित विभागाचा अनौपचारीक संदर्भ क्रमांक ७४२/व्यय-५, दिनांक ३ जुलै, २०२५ अन्वये प्राप्त मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

९. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५०७१४१७५९२९६३०८ असा आहे. सदर आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.


महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

पीडीएफ प्रत लिंक 

सह सचिव, महाराष्ट्र शासन

महाराष्ट्र शासन

उच्च व तंत्र शिक्षण विभाग, शासन निर्णय क्रमांकः- एडीआर-२०२५/CN-११८२७३२/प्र.क्र. ७४/तांशि-६, मुंबई


Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon