DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Navin Abhyaskram Shikshak Prashikshan

Navin Abhyaskram Shikshak Prashikshan

इयत्ता १ ली च्या शिक्षकांसाठी नवीन अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण अंतर्गत, जिल्हास्तर व तालुकास्तर प्रशिक्षण आयोजनासाठी मार्गदर्शक सूचना


SCERT Margdarshak suchna 



जा.क्र. राशैसंप्रपम/अविवि/SE/२०२५/दिनांक- २४/०५/२०२५ 02989


विषयः इयत्ता १ ली च्या शिक्षकांसाठी नवीन अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण अंतर्गत, जिल्हास्तर व तालुकास्तर प्रशिक्षण आयोजनासाठी मार्गदर्शक सूचना.

संदर्भः
१. या कार्यालयाचे पत्र क्रमांक- राशैसंप्रपम/अविवि/SE/२०२५/०२८३२ दिनांक. ०९/०५/२०२५
२. समग्र शिक्षा समग्र शिक्षा अंतर्गत २०२५-२६ साठी मंजूर तरतूद ५.६.१ उपक्रम.
३. शासन निर्णय क्रमांक-२०२५/प्रक्र.९४/एस.डी.-४ दि.१६/०४/२०२५

उपरोक्त विषयान्वये कळविण्यात येते की, राज्यामध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० चे अनुषंगाने सन २०२५-२६ पासून नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी टप्याटप्याने करण्यात येणार आहे. त्यानुसार राज्यातील इयत्ता १ ली च्या शिक्षकांचे पायाभूत शिक्षण अभ्यासक्रम २०२४ अंमलबजावणीसाठी प्रशिक्षणाचे आयोजन करावयाचे आहे. नवीन शैक्षणिक वर्ष दि. १६ जून २०२५ पासून सुरु होणार असल्यामुळे त्यापुर्वी हे प्रशिक्षण पूर्ण होणे आवश्यक आहे. संदर्भ क्र.१ अन्वये राज्यस्तर, जिल्हास्तर व तालुकास्तर प्रशिक्षणाचे नियोजन आपणास कळविण्यात आलेले आहे.

जिल्हास्तर व तालुकास्तर प्रशिक्षणाचे आयोजन परिणामकारक होण्यासाठी जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारी यांच्या सहकार्याने अंमलबजावणी करुन घेण्याची जबाबदारी उपसंचालक / प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांची राहील. याबाबत पुढील सूचनांचे अनुषंगाने कार्यवाही करावी.

प्रशिक्षणासाठी सर्वसाधारण सूचना-

१. हे प्रशिक्षण शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित शाळांमधील सर्व माध्यमांच्या शिक्षकासाठी लागू असेल. तसेच खाजगी विना अनुदानित व स्वयंअर्थसहायित शाळांमधील शिक्षकासाठी स्वतंत्रपणे लागू असेल.

२. जिल्हा व तालुकास्तरासाठी अपेक्षित प्रशिक्षणार्थी संख्या निश्चित करुन देण्यात आलेली आहे त्या मर्यादेतच प्रत्येक घटकास प्रशिक्षण दिले जाईल, प्रत्येक शाळेतून इ.१ली वर्गास शिकविणारे सर्व शिक्षक याचा लाभ घेतील असे नियोजन करावे. त्यानंतरच उपलब्धतेनुसार पुढील वर्षी इ.१ली वर्गास शिकविणाऱ्या शिक्षकांचा यामध्ये समावेश करावा.

३. शाळेत इ.१ली वर्गाच्या जेवढ्या तुकड्या मंजूर असतील त्यांवरील शिक्षकांनाही हे प्रशिक्षण मिळेल असे नियोजन करावे.

४. प्रशिक्षण घेणाऱ्या शिक्षकांच्या एकूण संख्येनुसार ५० प्रशिक्षणार्थ्यांची एक बंच याप्रमाणे बैठक व्यवस्था करावी.

५. प्रत्येक वर्गासाठी कमाल ०३ तज्ज्ञ मार्गदर्शक / सुलभक अनुज्ञेय असतील. जिल्हा अथवा तालुका स्तरावरील प्रशिक्षण एकापेक्षा अधिक टप्प्यामध्ये आयोजित केले जात असेल तर त्यासाठी उपलब्ध सुलभक दुबार वापरता येतील.

६. या प्रशिक्षणाचा कालावधी एकूण ०३ दिवस असून, प्रशिक्षणासाठी दिलेल्या विषयांनुसार एक तासिका ९० मिनिटांची याप्रमाणे दररोज ०४ तासिका होतील.

७. प्रशिक्षणादरम्यान घ्यावयाच्या तासिकांचे नियोजन, व आशय यास्तरावरुन पुरविण्यात येईल. त्यानुसार चर्चा, सादरीकरण, गटकार्य, प्रात्यक्षिक पूर्ण होतील याची दक्षता घ्यावी.

८. प्रशिक्षणार्थी यांचेसाठी पूर्वचाचणी, उत्तरचाचणी आणि अभिप्राय फॉर्म ऑनलाईन स्वरुपात प्रशिक्षार्थी वेळचेवेळो नोंदवतील याची खात्री कराची,

९. प्रशिक्षकांसाठी घटकसंच जिल्हास्तरापर्यंत आणि वाचन साहित्य म्हणून पायाभूत शिक्षण अभ्यासक्रम २०२४ भाग-१ व भाग-२ (प्रत्येक शाळेस एक संच याप्रमाणे) तालुकास्तरापर्यंत पुरविण्यात आलेले आहे. सर्व प्रशिक्षणार्थी यांना आपल्या शाळेस पुरविण्यात आलेला पायाभूत शिक्षण अभ्यासक्रम संच सोबत आणणेबाबत कळवावे.

१०. जिल्हास्तरीय प्रशिक्षण आवश्यकतेप्रमाणे निवासी स्वरुपाचे असू शकेल व तालुकास्तर प्रशिक्षण हे अनिवासी स्वरूपाचे असेल.

११. सदर प्रशिक्षण हे मराठी, उर्दू व इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील शिक्षकांसाठी स्वतंत्रपणे घ्यावयाचे आहे.

क्र उपक्रम

नियोजित कालावधी

प्रशिक्षण

जिल्हास्तर TOT मराठी माध्यम

२८ ते ३० मे, २०२५

०२ दिवस

२ जिल्हास्तर प्रशिक्षण उर्दू व इंग्रजी

माध्यम०२ ते १५ जून, २०२५

२३ दिवस

३ तालुकास्तर प्रशिक्षण मराठी माध्यम

०२ ते १५ जून, २०२५

०३ दिवस

१२. केवळ मराठी माध्यमासाठी जिल्हा व तालुकास्तर प्रशिक्षणाचे नियोजन असेल.

१३. उर्दू व इंग्रजी माध्यमांसाठी तालुकास्तरावर पुरेशी संख्या होऊ शकत नसल्याने त्यांचेसाठी जिल्हास्तर हा शेवटचा टप्पा असेल. संख्येनुसार वर्ग पूर्ण होण्यासाठी काही ठिकाणी एकापेक्षा अधिक जिल्ह्याचे प्रशिक्षण नियोजन एकत्र दिलेले आहे. सदर प्रशिक्षण ज्या जिल्ह्यात असोन त्या DIET मार्फत सदर प्रशिक्षणाचे आयोजन होईल.

१४. वरिष्ठ व निवड श्रेणी (दि.०२ ते १२ जून) प्रशिक्षणामध्ये काही इ.१ली चे प्रशिक्षणार्थी सहभागी असू शकतील त्यांचेसाठी स्वतंत्र बंच दि. १३ ते १५ जून, २०२५ दरम्यान आयोजित कराबी.

१५. खर्च लेखाशीर्ष (शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या साठी)-

Samagra Shiksha २०२५-२६

Component: ५.६-Training for In-service Teacher and Head Teachers

Activity: ५.६.१-In-Service Training (Elementary)

Sub Activity: -Teachers Class I to V (Govemment Schools)

१६. खर्च लेखाशीर्ष (खाजगी अनुदानित साठी)

Samagra Shiksha २०२५-२६

Component: ५६-Training for In-service Teacher and Head Teachers

Activity: ५.६.१-In-Service Training (Elementary)

Sub Activity: -Teachers Class I to V (Government Aided Schools)

१७. खर्चाच्या बाबी व निकष (प्रशिक्षण, प्रशिक्षणार्थी व तया मार्गदर्शक यांचेसाठी)

प्रशिक्षण स्तर

खर्च मर्यादा

जिल्हास्तर (निवासी)

रु.१०००/- प्रतिव्यक्ती प्रतिदिन

(प्रशिक्षणार्थी व तज्ज्ञ)

तालुकास्तर (अनिवासी)

रु.१५०/

प्रतिव्यक्ती प्रतिदिन (प्रशिक्षणार्थी व तज्ज)

खर्चाच्या बाबी

बैठक व्यवस्था, स्टेशनरी, प्रमाणपत्र व अनुषगिक खर्च,

उपस्थित प्रशिक्षणार्थी व सुलभकांसाठी २ वेळ चहा, अल्पोपाहार, २ वेळ भोजन निवास व प्रवास खर्च (एकदा येणे व जाणे), यावरील खर्च, सुलभकांना मानधन- रु.५०० प्रतिव्यक्ती प्रतिदिन मार्यदेत,

स्टेशनरी, प्रमाणपत्र व अनुषंगिक खर्च,

उपस्थित प्रशिक्षणार्थी व सुलभकांसाठी- २ वेळ चहा व दुपारचे भोजन यावरील खर्च,

सुलभकांना मानधन- रु.४०० प्रतिव्यक्ती प्रतिदिन मर्यादित.

नेमून दिलेल्या मयदित खर्चाचे नियोजन करावे, दिलेल्या खर्च मरितच एकूण खर्च होईल याची दक्षता घ्यावी

आर्थिक तरतूदीनुसार निधी प्राप्त झाल्यानंतर PFMS/ NEFT च्या माध्यमातून अदा करण्यात येईल.

सर्व खर्च व देयके, अभिलेखे वित्तीय नियमानुसार ठेवली जातील याची दक्षता घ्यावी.

१८. शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या प्रशिक्षण नोंदी स्वतंत्र व खाजगी अनुदानित प्रशिक्षण नोंदी स्वतंत्र ठेवाव्यात. खर्चाचे लेखाशीर्ष स्वतंत्र आहे. त्यानुसार निधी मागणी व वितरण होईल.

१९. खाजगी विना अनुदानित व स्वयंअर्थसहायित शाळांतील शिक्षकांसाठी सदर प्रशिक्षण स्वतंत्रपणे व मोफत आयोजित करावे त्यासाठी कोणतीही आर्थिक तरतूद उपलब्ध असणार नाही,

२०. दि.१५ जून २०२५ पर्यंत सर्वांचे प्रशिक्षण पूर्ण होईल याची खात्री करावी.

२१. परिणामकारकतेसाठी पायाभूत शिक्षण अभ्यासक्रम २०२४ नुसार नवीन पाठ्यक्रमाचे प्रशिक्षण घेतलेल्या शिक्षकांनाच इ.१लीचा वर्ग अध्यापनासाठी दिला जाईल याची खात्री शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी करावी.

तरी, आपल्या कार्यक्षेत्रातील इ. १ली इयत्तेस शिकविणाऱ्या प्रत्येक शाळेतील शिक्षकांचे प्रशिक्षण निर्धारित वेळेत पूर्ण केले जाईल याची दक्षता गटशिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारी यांनी घ्यावी. प्राचार्य डाएट व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी संनियंत्रण करावे.

प्रत, माहितीस्तव सादर

मा. आयुक्त शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे

मा. राज्य प्रकल्प संबालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई.

📂 👉परिपत्रक या ओळीला स्पर्श करून पीडीएफ मध्ये प्राप्त करा

(राहुल रेखावार) 
संचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.
महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

प्रति,
उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण (सर्व) प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था. (सर्व) शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सर्व


Guidelines for organizing district-level and taluka-level training under the new curriculum for class 1 teachers
Newest
Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon