DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Payabhut Chachani PAT 1 2025 26

Payabhut Chachani PAT 1 2025 26



Periodic aptitude test 
महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे


विषय: पायाभूत चाचणी (PAT-१) २०२५-२६ साठी जिल्ह्यातील सेमी इंग्रेजीच्या विद्यार्थी संख्येची माहिती पाठविणेबाबत.

उपरोक्त विषयांन्वये PAT१ पायाभूत चाचणी २०२५-२६ साठी जिल्ह्यांकडून फक्त सेमी इंग्रेजी माध्यामची नव्याने माहिती मागविण्यात येत आहे. तरी त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र GOOGLE SPREAD SHEET दिली आहे. ती SHEET फक्त कार्यालयीन मेल वरून ACCESS करता येईल. जेणे करून अचूक DATA संकलन करण्यात मदत मिळेल, म्हणून ३६ जिल्ह्यांना स्वतंत्र GOOGLE SPREAD SHEET देऊन एकूण दहा माध्यमातील इयत्ता दुसरी ते नववी च्या शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थेतील व फक्त खाजगी अनुदानित शाळेतील सेमी इंग्रजी विद्यार्थी संख्या मागविण्यात येत आहे.

विद्यार्थी संख्या नोंदविताना खालील सूचनांचे पालन करावे.

१. विद्यार्थी संख्येमध्ये अचूकता यावी यासाठी UDISE मधील माहितीचा आधार घेऊन बिनचूक माहिती नोंदविली जावी. आपण दिलेल्या सेमी इंग्रजी माध्यमाची संख्या UDISE + मधील नमूद एकूण संख्या मधून वजा करून त्या त्या माध्यमातील संख्या अंतिम करण्यात येईल. या दोघांची बेरीज UDISE + मधील विद्यार्थ्यांच्या संख्या पेक्षा जास्त होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. जिल्ह्यात चाचणी पत्रिका कमी पडल्यास याची सर्वस्वी जबाबदारी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांची असेल.

२. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) हे माहिती पाठविण्यासाठी नोडल अधिकारी असल्याने त्यांनी जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारी नगरपालिका, कटकमंडळ व महानगरपालिका यांचेकडून विद्यार्थीसंख्या एकत्रित करून माहिती सादर करावी.

३. विनाअनुदानित शाळा व तुकड्यांमधील विद्यार्थीसंख्या नोंदविण्यात येऊ नये.

४. विद्यार्थीसंख्या अचूक नोंदविली न गेल्यास संबंधित सर्व त्यास सर्वस्वी जबाबदार असाल याची नोंद घ्यावी.

५. सदर SHEET मध्ये गांभीर्याने सर्व माध्यमांच्या सेमी इंग्रेजीच्या विद्यार्थ्यांचीच अचूक माहिती देण्यात यावी कारण हि माहिती UDISE वर उपलब्ध नाही, UDISE वरील माहितीशी जुळणे आवशयक आहे. चुकीची मागणी केल्यास सर्वस्वी जबाबदारी तुमची असेल.

माहिती भरण्यासाठी फक्त या मेल चा वापर करावा.


Circular PDF Copy Link




प्रति,
१. शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) जिल्हा परिषद सर्व
२. प्रशासन अधिकारी, महानगरपालिका, नगरपालिका, कटकमंडळ (सर्व)
३. शिक्षण निरीक्षक मुंबई (सर्व)
Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon