DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

State Teacher Award Apply Online Link

 State Teacher Award Apply Online Link


क्र.शिसं/राशिपु/२०२५/अ-२/विद्याशाखा /03698 दि 17 JUL 2025


महत्वाचे/कालमर्यादित ई-मेल व्दारे



विषय :- क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार सन २०२४-२५ करीता आवेदने ऑनलाईन मागविण्याबाबत.

संदर्भ :- शासन निर्णय क्र. पीटीसी-२०२२/प्र.क्र.३४/ टीएनटी-४ दि.१६/०७/२०२५.


शिक्षण हा समाजाच्या सर्वांगीण विकासाचा पाया आहे. समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांमुळेच समाज अणि राज्याचा तसेच राष्ट्राचा विकास होतो. अशा समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांना राज्य शासनाच्या वतीने दरवर्षी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराने गौरविले जाते.

संदर्भीय शासन निर्णयान्वये शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी हे पुरस्कार वस्तूनिष्ठ निकषाव्दारे प्रदान करण्यात येणार आहेत. आवेदने सादर करू इच्छिणाऱ्या प्राथमिक, माध्यमिक/उच्च माध्यमिक शिक्षकांनी पुढे नमूद केल्यानुसार वेबलिंकवर 


State Teacher Award Apply Online Link


या लिंकवर आपली आवेदने दिनांक १८ जुलै, २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजलेपासून दिनांक ३१ जुलै, २०२५ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत सादर करावीत. सोबत पुरस्काराचे वेळापत्रक जोडले आहे. त्याप्रमाणे आपल्या स्तरावरील कालमर्यादित कार्यवाही होणे आवश्यक आहे. सदर वेळापत्रकात बदल झाल्यास त्याबाबत आपणांस संचालनालय स्तरावरुन अवगत करण्यात येईल.

सदरील बाबत आपल्या कार्यालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या सर्व संबंधितांना आपल्या स्तरावरून देखील स्वतंत्रपणे सूचना/लेखी आदेश निर्गमित करुन सर्व संबंधित शिक्षकांपर्यंत माहिती पोहचेल असे पाहावे.

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार सन २०२४-२५

वेळापत्रक

अ.क्र. दिनांक बाब

१.प्रसिध्दी करणे

दि. १७/०७/२०२५


२.ऑनलाईन नोंदणी कालावधी

दि. १८/०७/२०२५ ते दि. ३१/०७/२०२५


३.संचालनालय स्तरावरील काम

दि. ०१/०८/२०२५ ते दि.०३/०८/२०२५


४.जिल्हास्तरावरून प्रत्यक्ष शाळा भेट

दि. ०४/०८/२०२५ ते दि. ०८/०८/२०२५


५.जिल्हास्तरावरील मुलाखत/पडताळणी करुन शिफारशी संचालनालयाकडे सादर करणे

दि. ११/०८/२०२५ ते दि. १४/०८/२०२५


६.राज्यस्तरावरील मुलाखत/पडताळणी

दि. १८/०८/२०२५ ते दि. २१/०८/२०२५


७.राज्य शिक्षक पुरस्कार संबंधित संचालनालय स्तरावरील काम पूर्ण करणे.

दि.२२/०८/२०२५ ते दि.२४/०८/२०२५


८.राज्य निवड समिती सदस्यांची अंतिम बैठक आयोजित करणे

दि.२५/०८/२०२५


९.निवड समितीने अंतिम शिफारस केलेल्या शिक्षकांच्या यादीसह माहिती शासनास सादर करणे

दि.२८/०८/२०२५


१०.शासन निर्णय निर्गमित

दि.०१/०९/२०२५


११शिक्षक पुरस्कार समारंभ

दि.०५/०९/२०२५



(डॉ. महेश पालकर)

शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक)

महाराष्ट्र शासन

शिक्षण संचालनालय

(माध्यमिक व उच्च माध्यमिक)

महाराष्ट्र राज्य, मध्यवर्ती इमारत, डॉ. अॅनी बेझंट रोड, पुणे-४११ ००१.

ई-मेल - doesecondary1@gmail.com

दूरध्वनी क्रमांक : ०२०-२६१२२४९१

प्रत :-

१) मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मुंबई ४०० ०३२ माहितीसाठी सविनय सादर

२) मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण विभाग, मुंबई ४०० ०३२ माहितीसाठी सविनय सादर

३)मा. आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे ४११ ००१ माहितीस्तव सविनय सादर.

४) शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे यांना माहितीस्तव.

प्रति,

१) विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व विभाग

२) प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण सस्था, सर्व

३) शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) जिल्हा परिषद, सर्व,

४) शिक्षण निरीक्षक (बृहन्ममुंबई) (उत्तर/दक्षिण/पश्चिम)

५) शिक्षण प्रमुख/शिक्षणाधिकारी/प्रशासन अधिकारी सर्व महानगरपालिका

Regarding online solicitation of applications for the Krantijyoti Savitrimai Phule State Teacher Merit Award for the year 2024-25.


क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराचे निकष सुधारित करणेबाबत.

महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक: पीटीसी-२०२२/प्र.क्र.३४/टीएनटी-४

मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय विस्तार भवन, मुंबई ४०००३२.

दिनांक : १६ जुलै, २०२५


Krantijyoti Savitrimai Phule State Teacher Merit Award 2024-25

Schedule

Newest
Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon