Arjit Raja Varishth Nivad Shreni Prashikshan
Earned Leave For Teachers Completed Senior And Selection Grade Training
क्र.शिउसं उमावि/वरिष्ठ निवड/२०२५/6641
दिनांक :- 17 JUN 2025
विषय :- वरिष्ठ निवडश्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षण पुर्ण झालेल्या प्राथमिक/माध्यमिक शिक्षकांच्या खाती अर्जित रजा जमा करणेबाबत..
संदर्भ :-मा.आ.श्री. ज. मो. अभ्यंकर यांचे निवेदन क्र. २४४ दि.१६.०६.२०२५
महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली १९८१ मधील नियम क्र. १६ (१८) (अ) नुसार एखादा स्थायी कर्मचारी मोठया सुट्यांचा हक्कदार असुनही एखाद्या वर्षात पुर्ण मोठया सुट्यांचा किंवा त्याच्या एखाद्या भागाचा लाभ घेण्यास प्रतिवर्षी झालेला असेल तर त्याबद्दल त्याला पुर्ण सुट्टीशी त्याने सुट्टीच्या न उपभोगलेल्या दिवसांच्या संख्येचे जे प्रमाण असेल त्या प्रमाणात वार्षिक ३० दिवसांच्या अर्जित रजेशी प्रमाणशीर असलेल्या संख्येएवढी अर्जित रजा अनुज्ञेय होईल अशी तरतुद आहे.
ज्या शिक्षकांनी वरिष्ठ वेतनश्रेणी/निवडश्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षण (गृहपाठासह) पुर्ण केल्यामुळे त्यांना सुट्टी उपभोगण्यात प्रतिबंध झाला असेल त्यांच्या खाती अर्जित रजा जमा करण्याबाबत महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली १९८१ मधील नियम क्र. १६ (१८) (अ) मधील वरील नियमानुसार कार्यवाही करावी.
विभागीय शिक्षण उपसंचालक मुंबई विभाग, मुंबई
महाराष्ट्र शासन
विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय, मुंबई विभाग, मुंबई
प्रति.
शिक्षण निरीक्षक/शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई उत्तर/दक्षिण/पश्चिम,
जि.प.ठाणे, रायगड, पालघर
प्रत माहितीस्तव सविनय सादर,
मा.आ.श्री. ज. मो. अभ्यंकर सदस्य, महाराष्ट्र विधान परिषद.
Earned Leave For Teachers Who Have Completed Senior And Selection Grade Training
Regarding crediting earned leave to the accounts of primary/secondary teachers who have completed senior grade and selection grade training or inservice training
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon