DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Shala Vetanettar Anudan Vitrit GR


राज्यातील मान्यताप्राप्त अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना वेतनेतर अनुदान वितरीत करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत

आर्थिक वर्ष २०२३-२४

महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शासन निर्णय क्रमांकः वेतने-२०२३/प्र.क्र.१३३/एसएम-४,

मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई-४०००३२

दिनांक:-२९ मार्च, २०२४

वाचा (१) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क, माझा-२०१२/१८६/१२/माशि-१, दिनांक १९ जानेवारी, २०१३

(२) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क. एसएसएन-२०१५/प्र.३.१२/ टीएनटी-२, दिनांक ११ डिसेंबर, २०२०

(३) शासन परिपत्रक, वित्त विभाग, क. अर्थसं २०२३/प्र.क्र.४०/अर्थ-३, दिनांक १२ एप्रिल, २०२३

(४) रामक्रमांकाचा शासन निर्णय, दिनांक १६ नोव्हेंबर, २०२३ व दिनांक १५ मार्च, २०२४



प्रस्तावना:-

संदर्भ क्र. (१) येथील शासन निर्णय, दिनांक १९ जानेवारी, २०१३ अन्वये, दिनांक १ एप्रिल, २००८

रोजी वेतन अनुदानावर असलेल्या शालेय शिक्षण विभागाअंतर्गत राज्यातील खाजगी प्राथमिक/ माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सन २००८ या वर्षी पाचच्या वेतन आयोगानुसार ज्या राण्यावर चेतन अनुदान अनुज्ञेय होते, त्या टप्प्यावरील देय वेतन अनुदानास गोठवून त्यांच्या पाच टक्के प्रमाणे चेतनेत्तर अनुदान (४ टक्के वेतनेतर अनुदान व टक्का इमारत भाडे/ देखभाल अनुदान) सुमारे रु.२६६.८२ कोटी च्या मर्यादत दिनांक १ एप्रिल, २०१३ पासून उपलब्ध करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

संदर्भ क्र. (२) येथील शासन निर्णय, दिनांक ११ डिसेंबर, २०२० अन्वये राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशतः पूर्णतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांसाठी सुधारीत आकृतीबंध लागू करण्याऐवजी, चतुर्थश्रेणी कर्मचारी नियत क्योमानानुसार सेवानिवृत्त झाल्यानंतर, त्या व्यपगत होणाऱ्या पदासाठी प्रतिशाळा शिपाईभत्ता लागू करण्यात आला आहे.

संदर्भ क्र. (३) येथील शासन परिपत्रकास अनुसरुन, यापूर्वी संदर्भ क्र. (४) येथील शासन निर्णयान्वये आर्थिक वर्ष २०२३-२४ या वर्षाकरीता राज्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक/ माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना त्यांचा वेतनेतर खर्च भागविण्यासाठी तसेच खाजगी अंशतः / पूर्णतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्याच्या नियत वयोमानानुसार रिक्त झालेल्या पदांच्या प्रमाणात शिपाई भत्ता अदा करण्यासाठी वेतनेतर अनुदान मंजूर करण्यात आले असून आता उक्त नमूद शाळांसाठी सुधारीत अंदाजाच्या मर्यादेत वेतनेतर अनुदान मंजूर करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे.

शासन निर्णय क्रमांका बैतने-२०२३/प्र.क्र.१३३/एसएम-४

शासन निर्णय :-

संदर्भाधीन शासन निर्णय, दिनांक १९ जानेवारी, २०१३ मधील तरतूदीनुसार राज्यातील मान्यता प्राप्त प्राथमिक, माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांना खालील अटींच्या अधीन राहून रु. ५८.१६,८४,४१०/- (रुपये अठ्ठावण्ण कोटी सोळा लक्ष चौऱ्याऐंशी हजार चारशे दहा फक्त इतका निधी वेतनेतर अनुदान म्हणून मंजूर व मुक्त करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

2.११०० टक्के वेतनेतर (Non Plan) मध्ये वेतन घेणाऱ्या शिक्षक/शिक्षकेतर कर्मचा-यांच्या वेतनानुसार दिनांक ०१ एप्रिल, २००८ रोजी देय असलेल्या ५ व्या वेतन आयोगानुसार वेतन अनुदान गोठवून त्यानुषगाने ५ टक्के वेतनेतर अनुदान देय होईल. 
२) बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम, २००९ नुसार व मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निदेशानुसार दिनांक ३० मार्च, २०१३ पर्यंत भौतिक सुविधा व इतर बाबींची पूर्तता करणाऱ्या शाळांना गुणवत्तेनुसार, सर्वांत जास्त पटसंख्या असलेल्या व प्रत्यक्ष सुरु शाळांना प्राधान्य देऊन वेतनेतर अनुदान वितरीत करावे. श तसेच, संदर्भ क्र. (२) येथील शासन निर्णयानुसार खाजगी अंशतः पूर्णतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्याऱ्यांच्या नियत वयोमानानुसार रिक्त झालेल्या पदांच्या प्रमाणात शिपाई मत्ता अदा करण्यासाठी वेतनेतर अनुदान वितरीत करावे 

४) सदर वेतनेतर अनुदान आयुक्त (शिक्षण), शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अधिनस्त सुपूर्द करण्यात येत असून, वेतनेतर अनुदानाचे वाटप शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशातील अटी व शर्तीच्या अधीनतेने करावे. तसेच, आयुक्त (शिक्षण), शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी शाळांना वाटप केलेल्या वेतनेतर अनुदानाबी सविस्तर माहिती शासनास सादर करावी,

उपरोक्त बाबीवर होणारा खर्च "मागणी क्र. ई-२' या मुख्य लेखाशिर्षांतर्गत खालील तक्त्यात दर्शविण्यात आलेल्या लेखाशिर्षाखाली आर्थिक वर्ष २०२३-२४ करीता मंजूर तरतूदीतून भागविण्यात यावा.



(रुपये अष्ठावण्ण कोटी सोळा लख चौऱ्याऐंशी हजार चारशे दहा फक्त)

शासन निर्णय क्रमांका चैतने-२०२३/प्र.क्र.१३३/एसएम-४

३. सदर शासन निर्णय, वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क. ४३५/५ दिनांक २८.०३.२०२४

अन्यये दिलेल्या मान्यतेच्या अधीनतेने निर्गमित करण्यात येत आहे.


उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक
२०२४०३२९११३५४११५२१ असा आहे. हा आदेश

डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

PRAMOD

VITHOBA KADAM

(प्रमोद कदम)

कार्यासन अधिकारी, 
महाराष्ट्र शासन
Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon