DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Rajmata Jijaoo Mofat Cycle Vatap Yojana

Rajmata Jijaoo Mofat Cycle Vatap Yojana


 
Rajmata Jijau Free Cycle Distribution Scheme Circular GR pdf copy link 

क्रमांकः शिर्सयो/यो-१-३०२/रा.मा.जिजाऊ. सायकल वाटप/00083

दि.१६.०१.२०२५


विषयः राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजना संदर्भः मा. मंत्री, महोदय, शालेय शिक्षण यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे.

उपरोक्त विषयानुसार मुलीच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील शाळांमध्ये मुलीचे गळतीचे प्रमाण कमी करण्याकरीता व मुलींना शिक्षणाकडे आकर्षित करुन घेण्याचया दृष्टीने माध्यमिक शाळेत शिक्षण घेणाऱ्या दारिद्ररेषेखालील इयत्ता ८ वी च्या मुलीसाठी ही योजना सुरु करण्यास शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२००८/३३८९२(१८१/०८)/माशि-३,दि.१८ फेब्रुवारी, २००९ अन्वये मान्यता देण्यात आली.

या योजनेबाबत लाभार्थी निवडीच्या अटी व शती खालीलप्रमाणे आहे.

१) ग्रामीण भाग व क वर्ग नगरपरिषद क्षेत्रातील शाळा या ठिकाणी ही योजना लाग होती.

२) तसेच इयत्ता ७ वी मध्ये ४५ टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक आहे.

३) तसेच लाभाथी ही शासन मान्यताप्राप्त अनुदानित माध्यमक शाळेत शिक्षण घेत असावी,

४) लाभार्थींची निवड करतांना दुर्गम/अतिदुर्गम ग्रामीण भाग तसेच शहरी भागातील

ओपडपटटी/ गलिच्छवस्तीतील मुलीना प्राधान्य देण्यात यावे,

शासन निर्णय क्र.माविमि-२०१०/प्र.क्र.८१/का.१४१८, दि.१९ जुलै, २०११ अन्वये राज्यामध्ये मानव विकास कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरु करण्यात आलेली आहे. या मिशन अंतर्गत राज्यातील २२ जिल्हयामधील १२५ तालुक्यामध्ये मुलीना मोफत सायकल वाटप योजना सुरु आहे. २२ जिल्हयामधील १२५ तालुके वगळून इतर जिल्हयामध्ये व तालुक्यामध्ये शासनास राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजने अंतर्गत पात्र होत असलेल्या आपल्या जिल्हयामधील व तालुक्यामधील शासनमान्यता प्राप्त माध्यमिक अनुदानित शाळेतील इ.८ वी ते १२ मध्ये शिक्षण घेत असलेल्या

दारिद्रयरेषेखालील मुलीची माहिती तात्काळ या कार्यालयास खालील विहित नमून्यामध्ये सादर करावी. माहिती सादर करतांना उपरोक्त नमूद अटी व शर्तीचे पालन करुनच माहिती सादर करावी.

अ.क्र. जिल्हा

तालुका

वर्ग

दारिद्ररेषेखालील मुलीची संख्या
८ वी 
९ वी
१० वी
११ वी
१२ वी

सोबतः शासन निर्णय दि.१९ जुलै, २०११ मधील विवरण पत्र १ जोडले आहे.

Circular pdf Copy LINK


(डॉ. महेश पालकर) शिक्षण संचालक शिक्षण संचालनालय (योजना) महाराष्ट्र राज्य, पुणे-१

राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजना
Rajmata Jijau Free Cycle Distribution Scheme
Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon