Special Casual Leave
Special casual leave to teaching and non-teaching staff
दिनांक: ०५ फेब्रुवारी, २०२५.
प्रति,
१) आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे.
२) शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे.
३) शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे.
विषयः- शिक्षक सेनेचे आयोजित अधिवेशानास उपस्थित शिक्षकांना विशेष मंजूर रजा करणेबाबत.
संदर्भ:-
२) मा. श्री. ज.मो. अभ्यंकर, विधानपरिषद सदस्य, महाराष्ट्र राज्य यांचे दि.२७.१२.२०२४ चे निवेदन.
महोदय,
उपरोक्त विषयाबाबत संदर्भ क्र. २ येथील मा. श्री. ज.मो. अभ्यंकर, विधानपरिषद सदस्य, महाराष्ट्र राज्य यांच्या निवेदनान्वये शिक्षक सेना या संघटनेच्यावतीने दि.१०.०२.२०२५ व दि.११.०२.२०२५ रोजी दोन दिवसीय वार्षिक शैक्षणिक अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले असून या वार्षिक शैक्षणिक अधिवेशनास उपस्थित राहण्यास इच्छुक असणाऱ्या शिक्षक व मुख्याध्यापकांना १० व ११ फेब्रुवारी, २०२५ या दिवसांची विशेष रजा मंजूर करावी, अशी शासनास विनंती करण्यात आली आहे.
त्यानुषंगाने प्राप्त निर्देशानुसार आपणास कळविण्यात येते की, शिक्षक सेना या संघटनेच्यावतीने दि.१०.०२.२०२५ व दि.११.०२.२०२५ रोजी आयोजित वार्षिक शैक्षणिक अधिवेशनास उपस्थित राहण्यास इच्छुक असणाऱ्या शिक्षक व मुख्याध्यापकांना स्वखर्चाने उपस्थित राहण्याच्या तसेच सदर अधिवेशनास उपस्थित राहिल्याबाबतचे उपस्थिती पत्रक सादर करण्याच्या अटीच्या अधीन राहून दिनांक १०.०२.२०२५ या १ दिवसाची विशेष नैमित्तीक रजा मंजूर करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे. त्यानुसार पूढील आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी, ही विनंती.
आपला,
(शरद श्री. माकणे) कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
दालन क्र. ४३९, मंत्रालय, मुंबई
क्रमांक: संकीर्ण-२०२५/प्र.क्र.४३/टिएनटि-१,
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon