DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

TAIT Pravishtha Tartud sudharna GR

 TAIT Pravishtha Tartud sudharna


TAIT Entrance Provisions Amended


TAIT Examination Entrance Provisions Amended



Amending the provisions regarding admission to teacher aptitude and intelligence tests



शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणीस प्रविष्ठ होण्याबाबतची तरतूद

सुधारित करणे.


महाराष्ट्र शासन

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शासन शुध्दीपत्रक क्रमांकः संकीर्ण- २०२२/प्र.क्र. १०६/टिएनटि-१,मंत्रालय, मुंबई


दिनांक: ०२ मे, २०२५.


संदर्भ: शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०२२/प्र.क्र.१०६/टिएनटि-१, दि.१०.११.२०२२.


प्रस्तावना:-


संदर्भाधीन शासन निर्णयान्वये शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणीस प्रविष्ठ होण्यासाठी उमेदवारास किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करणे अनिवार्य असेल अशी तरतूद करण्यात आली आहे. व्यावसायिक अर्हतेच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असणाऱ्या उमेदवारांनी त्यांना शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणीस प्रविष्ठ होण्याची मागणी वारंवार केली आहे. सन २०१७ मध्ये अशा प्रकारची पहिली व सन २०२२ मध्ये दूसरी चाचणी घेण्यात आली होती. त्यानंतर सन २०२५ मध्ये अशा प्रकारची चाचणी घेण्यात येत आहे. पहिल्या व दूसऱ्या चाचणीत जवळपास ५ वर्ष व दूसऱ्या व तिसऱ्या चाचणीत जवळपास ३ वर्ष इतके अंतर आहे. 


TAIT Exam 2025 Online Apply Web Link 


शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता प्राप्त केल्यानंतर शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणीस प्रविष्ठ होण्यासाठी कालावधी लागत असल्याने व्यावसायिक अर्हतेच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या उमेदवारांनी त्यांना अशा चाचणीस प्रविष्ठ होण्याची मागणी केली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडूनही पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षास प्रवेश घेतलेल्या उमेदवारांना परीक्षेची संधी दिली जाते. ही सर्व पार्श्वभूमी विचारात घेता, शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणीबाबत उमेदवारांनी केलेली मागणी रास्त असल्याचे निदर्शनास आल्याने यासंदर्भात योग्य तो निर्णय घेण्याबाबतचा प्रस्ताव व त्याअनुषंगाने संदर्भाधीन शासन निर्णयातील संबंधित तरतूदी दुरुस्ती करणेबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.


       शासन शुध्दीपत्रक


उक्त संदर्भाधीन शासन निर्णय दिनांक १०.११.२०२२ मधील परिच्छेद क्र. ०३ (२) येथील " शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणीस प्रविष्ठ होण्यासाठी उमेदवारास किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करणे अनिवार्य असेल." या तरतूदीऐवजी शिक्षक निवडीकरीता आवश्यक किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करणारे उमेदवार शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणीकरीता पात्र राहतील. त्याचप्रमाणे शैक्षणिक अर्हता प्राप्त केल्यानंतर व्यावसायिक अर्हता अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रात प्रविष्ठ असणारे अथवा शेवटच्या सत्राच्या अंतिम परीक्षेस प्रविष्ठ असणारे उमेदवार देखील शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी परीक्षेस प्रविष्ठ होण्यास पात्र राहतील. परंतु शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणीत त्यांनी प्राप्त केलेले गुण उघड केले जाऊ नये व पर्यायाने त्यांचा निकाल राखून ठेवण्यात यावा. अशा उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता त्याच वेळीच्या संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक वा अन्य वैध प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल १ महिना कालावधीत सादर करावे. या मुदतीत असे गुणपत्रक वा अन्य वैध प्रमाणपत्र उमेदवाराने सादर न केल्यास शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणीतील गुणांच्या आधारे त्याचा शिक्षक पदभरतीसाठीचा दावा ग्राह्य धरण्यात येणार नाही. विहीत मुदतीत गुणपत्रक वा अन्य वैध प्रमाणपत्र उमेदवाराने सादर केल्यानंतर त्यांनी प्राप्त केलेले गुण व या गुणांनुसार त्यांचा निकाल स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल." अशी तरतूद समाविष्ट करण्यात येत आहे.


०२. उपरोक्त प्रमाणे करण्यात आलेली तरतूद सन २०२५ मध्ये व त्या पुढील काळात घेण्यात येणाऱ्या सर्व शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचण्यांना लागू राहील.


०३. सदर शासन शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२५०५०२२०३६२९७७२१ असा आहे. हे शासन शुध्दीपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.


महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.


शासन शुद्धिपत्र पीडीएफ मध्ये हवे असल्यास फक्त या ओळीला स्पर्श करा 


कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

Newest
Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon