STARS PAT 2 ANTARGAT SANKALIT CHACHANI
DATA 11 NOVEMBER 2024
संकलित मूल्यमापन चाचणी-१ (PAT-२) (महाराष्ट्र) या चाटबॉटवर गुण नोंदविणे बाबत..........
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
जा.क्र. राशैसंप्रपम/ मूल्यमापन/सं. मू.चा.-१-VSK/२०२४-२५/05636
प्रति,
१. शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) जि.प. (सबै)
२. शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई, मनपा, (सर्व) ३. शिक्षण निरीक्षक, मुंबई (उत्तर, दक्षिण, पश्चिम)
४. प्रशासन अधिकारी, म.न.पा./न.पा./न.प. सर्व)
विषय: संकलित मूल्यमापन चाचणी-१ (PAT-२) (महाराष्ट्र) या चाटबॉटवर गुण नोंदविणेबाबत...
संदर्भ: १. या कार्यालयाचे पत्र जा.क्र. राशैसंप्रपम/मूल्यमापन/सं. था. जिल्हा पत्र/२०२४- २५/०४५०२, दि.२४ सप्टेंबर २०२४.
२. प्रस्तुत कार्यालय पत्र जा.क्र. राशैसंप्रथम/संकीर्ण/इतिवृत्त/२०२४-२५/०५१४६, दि.२३ ऑक्टोबर २०२४.
३. या कार्यालयाचे पत्र जा.क्र. राशैसंप्रथम/मूल्यमापन/सं.मू.चा.१-VSK/२०२४- २५/५४०९, दि.११ नोव्हेंबर २०२४.
उपरोक्त विषयान्वये STARS प्रकल्पामधील SIG-२ Improved Learning Assessment System नुसार सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन (PAT) अंतर्गत पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन १ व संकलित मूल्यमापन २(PAT-१ ते ३) चे आयोजन करण्यात येणार आहे. उपरोक्त संदर्भानुसार राज्यात संकलित मूल्यमापन चाचणी-१ (PAT -२) चे आयोजन दि. २२ ते २५ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी अनुदानित शाळामध्ये करण्यात आलेले होते. प्रथम भाषा (सर्व माध्यम), गणित (सर्व माध्यम), तृतीय भाषा इंग्रजी या विषयांचे संकलित मूल्यमापन चाचणी-१ (PAT-2) घेण्यात आलेली आहे. सदर संकलित मूल्यमापन चाचणी-१ (PAT-२) शिक्षकांनी तपासणेबाबत सूचित करण्यात आलेले होते. तसेच सदर मूल्यमापनाचे गुण विद्या समीक्षा केंद्र (VSK) यांचेमार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या पोर्टलवर भरायचे असून याबाबतच्या सविस्तर सूचना यापूर्वी यु-ट्युबद्वारे देण्यात आलेल्या आहेत.
Also Read -
उत्तर सूची उपलब्ध
शिक्षकांसाठी सूचना, प्रश्न पत्रिका ,उत्तर सूची,गुण नोंद तक्ते साठी फक्त या ओळीला स्पर्श करा
विद्या समीक्षा केंद्र (VSK), पुणे यांचेमार्फत PAT (महाराष्ट्र) हा चाटबॉट संकलित मूल्यमापन चाचणी-१(PAT-2 गुण भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. यावर संकलित मूल्यमापन चाचणी-१ (PAT-२) शिक्षकांनी नोंदविणे आवश्यक आहे. सदर चाटबॉटवर संकलित मूल्यमापन चाचणी १७०AT-२) चे गुण शिक्षकांनी कसे नोंदवावेत याच्या सविस्तर मार्गदर्शिकाची लिंक खालीलप्रमाणे देण्यात येत आहे.
तसेच राज्यातील शिक्षकांना संकलित मूल्यमापन चाचणी-१ (PAT-२) चे गुण PAT (महाराष्ट्र) या चाटबॉटवर
गोंदविणेकरिता जिल्ह्यांना यापूर्वी दि. ११ नोव्हेंबर २०२४ ते २६ नोव्हेंबर २०२४ पर्यंतचा कालावधी देण्यात आलेला होता. तथापि, सदरची माहिती अद्याप पूर्ण झाली नसून राज्यातील फक्त ४० टक्के शाळांनी विद्यार्थ्यांच्या गुणांची नोंद केलेली दिसून येत आहे.
तथापि, सदरचे गुण चाटबॉटवर नोंदविणेकरिता जिल्ह्यांना दि. २७ नोव्हेंबर २०२४ ते ५ डिसेंबर २०२४ पर्यंतचा कालावधी देण्यात येत आहे. करिता गुणनोंद करण्यासाठीची लिंक खालीलप्रमाणे देण्यात येत आहे.
तसेच संदर्भ क्र. ३ अन्वये १०० टक्के शाळांनी सर्व विद्यार्थ्यांची माहिती भरणे अनिवार्य असून यानंतर सदर गुण भरण्यासाठी कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही. याबाबत उपरोक्त सर्व संबंधित जबाबदार अधिकारी यांनी नोंद घ्यावी.
२. संकलित मूल्यमापन चाचणी-१ (PAT-२) गुणांची नोंद करणेसाठी लिंक -
उपरोक्त कामकाजासाठी जिल्हा शिक्षणाधिकारी प्राथ/माध्य, शिक्षण निरीक्षक व प्रशासन अधिकारी, म.न.पा./न.पा. यानी आपल्या कार्यालयातील एका अधिकाऱ्याकडे PAT (महाराष्ट्र) जिल्हा समन्वयक म्हणून जबाबदारी यापूर्वी निक्षित केलेली असेल, त्यानुसार सदर जिल्हा समन्वयक यांनी जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना विद्या समीक्षा केंद्र (VSKI), पुणे यांचेमार्फत PAT (महाराष्ट्र) हा चाटबॉटवर संकलित मूल्यमापन चाचणी-१ (PAT-२) चे गुण कसे भरावेत याबाबत आवश्यकतेनुसार मार्गदर्शन करावे, तसेथ ज्या शाळांमध्ये संकलित मूल्यमापन चाचणी-१ (PAT- २) घेण्यात आलेली आहे अशा इयत्ता तिसरी ते नववीच्या शाळामधील विषयनिहाय विद्यार्थ्यांचे गुण चाटबॉटवर नोंदविणेबाबत कार्यवाही करण्यात यावी.
चाटबॉटच्या बाबतीत तांत्रिक अडचण येणाऱ्या शिक्षकांनी सोबत दिलेल्या गुगल लिंकवर
LINK प्रतिसाद नोंदवावा.
प्रतिसाद नोंदवावा, तरी आपल्या अधिनस्थ शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक यांना याबाबतची आवश्यक कार्यवाही करण्याबाबत आपल्या स्तरावरून सूचित करण्यात यावे.
संचालक
प्रत माहितीस्तव सविनय सादरः-
दि. २२ नोव्हेंबर २०२४
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.
संदर्भ : १. या कार्यालयाचे पत्र जा.क्र. राशैसंप्रपम/मूल्यमापन/सं.चा. जिल्हा पत्र/२०२४- २५/०४५०२, दि.२४ सप्टेंबर २०२४.
उपरोक्त विषयान्वये STARS प्रकल्पामधील SIG-२ Improved Learning Assessment System नुसार सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन (PAT) अंतर्गत पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन १ व संकलित मूल्यमापन २ ( PAT-१ ते ३) चे आयोजन करण्यात येणार आहे. उपरोक्त संदर्भानुसार राज्यात संकलित मूल्यमापन चाचणी-१ (PAT-२) चे आयोजन दि. २२ ते २५ जुलै २०२४ या कालावधीत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी अनुदानित शाळामध्ये करण्यात आलेले होते. प्रथम भाषा (सर्व माध्यम), गणित (सर्व माध्यम), तृतीय भाषा इंग्रजी या विषयांचे संकलित मूल्यमापन चाचणी-१ (PAT-२) घेण्यात आलेली आहे. सदर संकलित मूल्यमापन चाचणी-१ (PAT -२) शिक्षकांनी तपासणेबाबत सूचित करण्यात आलेले होते. तसेच सदर मूल्यमापनाचे गुण विद्या समीक्षा केंद्र (VSK) यांचेमार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या पोर्टलवर भरायचे असून याबाबतच्या सविस्तर सूचना यापूर्वी यु-ट्युबद्वारे देण्यात आलेल्या आहेत.
विद्या समीक्षा केंद्र (VSK), पुणे यांचेमार्फत PAT (महाराष्ट्र) हा चाटबॉट संकलित मूल्यमापन चाचणी-१ (PAT -२) गुण भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. यावर संकलित मूल्यमापन चाचणी-१ (PAT - २) शिक्षकांनी नोंदविणे आवश्यक आहे. सदर चाटबॉटवर संकलित मूल्यमापन चाचणी -१ (PAT - २) चे गुण शिक्षकांनी कसे नोंदवावेत याच्या सविस्तर मार्गदर्शिकाची लिंक खालीलप्रमाणे देण्यात येत आहे.
१. संकलित मूल्यमापन चाचणी-१ (PAT-२) चाटबॉट मार्गदर्शिका लिंक -
तसेच राज्यातील शिक्षकांना संकलित मूल्यमापन चाचणी-१ (PAT -२) चे गुण PAT (महाराष्ट्र) या चाटबॉटवर नोंदविणेकरिता जिल्ह्यांना दि. ११ नोव्हेंबर २०२४ ते २६ नोव्हेंबर २०२४ पर्यंतचा कालावधी देण्यात येत आहे. करिता गुणनोंद लिंक खालीलप्रमाणे देण्यात येत आहे.
२. संकलित मूल्यमापन चाचणी-१ (PAT-२) गुणांची नोंद करणेसाठी लिंक -
https://bit.ly/PAΤ-ΜΗ
उपरोक्त कामकाजासाठी जिल्हा शिक्षणाधिकारी प्राथ./ माध्य., शिक्षण निरीक्षक व प्रशासन अधिकारी, म.न.पा./न.पा. यांनी आपल्या कार्यालयातील एका अधिकाऱ्याकडे PAT (महाराष्ट्र) जिल्हा समन्वयक म्हणून जबाबदारी यापूर्वी निश्चित केलेली असेल. त्यानुसार सदर जिल्हा समन्वयक यांनी जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना विद्या समीक्षा केंद्र (VSK), पुणे यांचेमार्फत PAT (महाराष्ट्र) हा चाटबॉटवर संकलित मूल्यमापन चाचणी-१ (PAT-२) चे गुण कसे भरावेत याबाबत आवश्यकतेनुसार मार्गदर्शन करावे. तसेच ज्या शाळांमध्ये संकलित मूल्यमापन चाचणी-१ (PAT - २) घेण्यात आलेली आहे अशा इयत्ता तिसरी ते नववीच्या शाळामधील विषयनिहाय विद्यार्थ्यांचे गुण चाटबॉटवर नोंदविणेबाबत कार्यवाही करण्यात यावी.
चाटबॉटच्या बाबतीत तांत्रिक अडचण येणाऱ्या शिक्षकांनी सोबत दिलेल्या गुगल लिंकवर
LINK प्रतिसाद नोंदवावा.
तरी आपल्या अधिनस्थ शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक यांना याबाबतची आवश्यक कार्यवाही करण्याबाबत आपल्या स्तरावरून सूचित करण्यात यावे.
Circular pdf Copy Link
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.
Also read -
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे-३०. 'STARS' प्रकल्पांतर्गत
संकलित मूल्यमापन १ : २०२४-२५
इयत्ता - तिसरी ते नववी : विषय - मराठी ,इंग्रजी ,गणित,गणित (सेमी)
शिक्षकांसाठी सूचना प्रश्न पत्रिका उत्तर सूची
Maths Teacher Instruction Marathi Medium Std 3rd To Std 9th
Maths Teacher Instruction English Medium Std 3rd To Std 9th
English Third Language Teacher Instruction English Medium Std 3rd To Std 9th
Marathi First Language Teacher Instruction Std 3rd To Std 9th
संकलित मूल्यमापन १ : २०२४-२५
इयत्ता - तिसरी ते नववी : विषय - मराठी ,इंग्रजी ,गणित,गणित (सेमी)
शिक्षकांसाठी सूचना प्रश्न पत्रिका उत्तर सूची
Maths Teacher Instruction Marathi Medium Std 3rd To Std 9th
Maths Teacher Instruction English Medium Std 3rd To Std 9th
English Third Language Teacher Instruction English Medium Std 3rd To Std 9th
Marathi First Language Teacher Instruction Std 3rd To Std 9th
उत्तर सूची उपलब्ध
शिक्षकांसाठी सूचना प्रश्न पत्रिका ,उत्तर सूची,गुण नोंद तक्ते साठी फक्त या ओळीला स्पर्श करा
Also Read -
Internal Summative Test- 1 under Periodic Assessment Test (PAT- 2) under
Conducted Compilation Test-1 under Periodic Assessment Test (PAT-2) under STARS project
STARS प्रकल्प अंतर्गत नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT-२) अंतर्गत संकलित चाचणी -१ आयोजन
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे
जा.क्र. राशैसंप्रपम/सं.चा. १/शाळाभेट /२०२४-२५/05053
दि. १७/१०/२०२४
विषयः - STARS प्रकल्प अंतर्गत नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत संकलित चाचणी-१ करिता शाळा भेटीबाबत
उपरोक्त संदर्भीय विषयान्वये सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी खालील तीन नियतकालिक मूल्यांकन चाचण्याचे (PAT) आयोजन करण्यात येत आहे. यास अनुसरून पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी १ व संकलित मूल्यमापन चाचणी-२ अशा तीन नियतकालिक चाचण्यांचे नियोजन करण्यात आलेले आहे. नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत संकलित चाचणी-१ दि. २२ ते २५ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे.
सदर चाचणी अंतर्गत प्रथम भाषा, गणित, व तृतीय भाषा (इंग्रजी) या विषयांच्या इयत्ता ३ री ते ९ वी तील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय तसेच खाजगी अनुदानित सर्व शाळातील विद्यार्थ्यांची संकलित चाचणी - १ होणार आहे.
शालेय वेळापत्रकानुसार सकाळ सत्र / दुपार सत्र नुसार उपरोक्तप्रमाणे आपल्या स्तरावरून वेळेचे नियोजन करण्याचे स्वातंत्र्य देण्यात येत आहे. तथापि दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणेच चाचणी घेण्यात यावी, यात कोणताही बदल करण्यात येवू नये. तसेच प्रथम भाषा (सर्व माध्यम) गणित (सर्व माध्यम) व तृतीय भाषा इंग्रजी या विषयांची तोंडी परीक्षा/प्रात्यक्षिक/स्वाध्याय ही त्या त्या दिवशी लेखी परीक्षेनंतर वैयक्तिक स्वरुपात घेण्यात यावी. विद्यार्थी संख्या जास्त असेल तर दुसऱ्या दिवशी आपल्या उपलब्ध वेळेनुसार घ्यावी.
इयत्ता ३ री ते ९ वी करिता भाषा, गणित व इंग्रजी (तृतीय भाषा) वगळून इतर सर्व विषयांची संकलित चाचणी-१ लेखी, तोंडी, स्वाध्याय व प्रात्यक्षिक परीक्षा प्रचलित पद्धतीनुसार घेण्याबाबत शाळास्तरावरून नियोजन करण्याबाबत कळविण्यात आलेले आहे.
कोणत्याही शाळेत भाषा, गणित व इंग्रजी (तृतीय भाषा) या विषयांची दुबार संकलित चाचणी-१ घेण्याची आवश्यकता नाही.
तरी सदर कालावधीत उपरोक्त सर्व अधिकाऱ्यांनी दि. २२ ते २५ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत किमान तीन शाळाभेटी कराव्यात. सदर शाळाभेटी करताना सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळांचा यात समावेश असावा. तसेच सदर शाळाभेटी संदर्भातील माहिती
या लिंकमध्ये त्याच दिवशी भरण्यात यावी.
संकलित चाचणी १ दि. २२ ते २५ ऑक्टोबर २०२४ च्या शाळाभेटीसाठी उपरोक्त सर्व अधिकारी यांनी आपल्या अधिनस्थ अधिकाऱ्यांना नेमून दिलेल्या संपर्क तालुक्यात सदर भेटीसाठी आवश्यकतेनुसार आदेशित करावे. तसेच संबंधित सर्व जिल्ह्यातील प्राचार्य, (जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था) यांनी PAT शाळाभेटीचा व संकलित चाचणी-१ नंतर १०% शाळांच्या १० % विद्यार्थ्यांच्या प्रश्नपत्रिकांची/उत्तरपत्रिकांची फेरतपासणी बाबतचा एकत्रित अहवाल सदर कार्यालयास मूल्यमापन विभागाच्या
Email ✉️ LinK
या इमेल वर पाठविण्यात यावा.
(राहुल रेखावार मा.प्र.से.) संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
हेही वाचाल -
जा.क्र. राशैसंप्रपम/मूल्यमापन / स.चा. जिल्हा पत्र शु.प./२०२४-२५/04588 दि. २६/०९/२०२४
शुद्धीपत्रक
प्रति,
१) विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व),
२) विभागीय विद्याप्राधिकरण (सर्व),
३) प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व),
४) शिक्षणाधिकारी (प्राथ/माध्य. व योजना) जि.प. (सर्व),
५) शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई, मनपा,
६) शिक्षण निरीक्षक, मुंबई (उत्तर, दक्षिण, पश्चिम),
७) प्रशासन अधिकारी, म.न.पा./न.पा./न. प. (सर्व),
विषय : STARS प्रकल्प अंतर्गत नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत संकलित चाचणी -१ आयोजनाबाबत....
संदर्भ
: १. राज्यातील शिक्षणपध्दतीचे अध्यापन, अध्ययन व परिणाम यांचे बळकटीकरण (Strengthening Teaching-Learning And Results for States) केंद्रपुरस्कृत प्रकल्प मान्यता देण्याबाबत शासन निर्णय, दिनांक ११ फेब्रुवारी २०२१.
२. राज्यातील शिक्षण पध्दतीचे अध्यापन, अध्ययन व परिणाम यांचे बळकटीकरण (Strengthening Teaching - Learning And Results for States) केंद्र पुरस्कृत प्रकल्प राज्य अनुदान वितरण वित्तीय नियमावली मार्गदर्शक तत्वे.
३. STAR प्रकल्प अतर्गत मंजूर PAB मिटिंगचे इतिवृत्त, दि. ३१ मार्च २०२४
४. प्रस्तुत कार्यालयाचे पत्र जा. क्र. राशैसंप्रपम/मूल्यमापन/पा.चा. जिल्हा पत्र/२०२४-२५/०२९२६ दि.१९/०६/२०२४
५. प्रस्तुत कार्यालयाचे पत्र जा. क्र. राशैसंप्रपम/मूल्यमापन/सं.चा. जिल्हा पत्र/२०२४-२५/०४५०२ दि.२४/०९/२०२४
६. मा. संचालक यांनी दिलेले निर्देश दि. २५/०९/२०२४
उपरोक्त विषयान्वये या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी खालील तीन नियतकालिक मूल्यांकन चाचण्याचे (PAT) आयोजन करण्यात येत आहे. यास अनुसरून २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी- १ व संकलित मूल्यमापन चाचणी-२ अशा तीन नियतकालिक चाचण्यांचे नियोजन करण्यात आलेले आहे. नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत संकलित चाचणी-१ (PAT-२) दि. २२ ते २५ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे. सदर चाचणी अंतर्गत प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या विषयांच्या इयत्ता तिसरी ते नववीतील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शाळा तसेच खाजगी अनुदानित शाळातील सर्व विद्यार्थ्यांची चाचणी होणार आहे. तरी सदर संकलित मूल्यमापन चाचणीचे वेळापत्रक खालीलप्रमाणे -
शालेय वेळापत्रकानुसार सकाळ सत्र / दुपार सत्र नुसार उपक्तिप्रमाण आपल्या वेळेचे नियोजन करण्याचे स्वातंत्र्य देण्यात येत आहे. तथापि दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणेच चाचणी घेण्यात यावी, यात कोणताही बदल करण्यात येवू नये. तसेच प्रथम भाषा (सर्व माध्यम), गणित (सर्व माध्यम ) व तृत्तीय भाषा इंग्रजी या विषयांची तोंडी परीक्षा/प्रात्यक्षिक/स्वाध्याय ही त्या - त्या दिवशी लेखी परीक्षेनंतर वैयक्तिक स्वरुपात घेण्यात यावी. विद्यार्थी संख्या जास्त असेल तर दुसऱ्या दिवशी आपल्या उपलब्ध वेळेनुसार घ्यावी.
इयत्ता ३ री ते ९ वी करिता भाषा, गणित व इंग्रजी ( तृतीय भाषा) वगळून इतर सर्व विषयांची संकलित चाचणी-१ लेखी, तोंडी, स्वाध्याय व प्रात्यक्षिक परीक्षा प्रचलित पद्धतीनुसार घेण्याबाबत शाळास्तरावरून नियोजन करण्याबाबत कळविण्यात यावे. कोणत्याही शाळेत भाषा, गणित व इंग्रजी (तृतीय भाषा) या विषयांची दुबार संकलित चाचणी-१ घेण्याची आवश्यकता नाही.
(रमाकांत काठमोरे)
सहसंचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण
परिषद, महाराष्ट्र, पुणे.
Also Read -
• संकलित मूल्यमापन चाचणी उद्देश :-
• संकलित चाचण्यांचे माध्यम व विषय :
• चाचणीचा अभ्यासक्रम :
• संकलित मूल्यमापन चाचणी-१ वेळापत्रक (कालावधी दि. २२ ते २५ ऑक्टोबर २०२४)
• संकलित मूल्यमापन चाचणी अंमलबजावणीबाबत सूचना :
• चाचणी कालावधीत करावयाच्या शाळा भेटीबाबत -
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,
महाराष्ट्र पुणे
जा.क्र. राशैसंप्रपम / मूल्यमापन / स.चा. जिल्हा पत्र/२०२४-२५/०४५०२
दि. २४/०९/२०२४
विषय : STARS प्रकल्प अंतर्गत नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT-२) अंतर्गत संकलित चाचणी -१ आयोजनाबाबत....
उपरोक्त विषयान्वये या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी खालील
तीन नियतकालिक मूल्यांकन चाचण्याचे (PAT) आयोजन करण्यात येत आहे. यास अनुसरून २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी १ व संकलित मूल्यमापन
चाचणी -२ अशा तीन नियतकालिक चाचण्यांचे नियोजन करण्यात आलेले आहे. नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत संकलित चाचणी-१ (PAT-२) दि. २२ ते २५ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे. सदर चाचणी अंतर्गत प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा
(इंग्रजी) या विषयांच्या इयत्ता तिसरी ते नववीतील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शाळा तसेच खाजगी अनुदानित शाळातील सर्व विद्यार्थ्यांची चाचणी होणार आहे.
प्रत्येक विद्यार्थ्याने इयत्तानिहाय अपेक्षित अध्ययन संपादणूक प्राप्त केली आहे किंवा नाही याची पडताळणी होऊन अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ होण्यास या चाचणीमुळे शिक्षकांना मदत होईल. चाचण्यांचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांनी अध्ययन निष्पत्ती किती प्रमाणात प्राप्त केलेल्या आहेत हे शिक्षकांनी लक्षात घेऊन गरजेनुरूप अध्ययन अध्यापन प्रक्रियेत मुलभूत सुधारणा करणे व कृती-कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे हा आहे.
➤ संकलित मूल्यमापन चाचणी उद्देश :-
१) विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पती संपादणूक पडताळणे व त्यामध्ये वाढ करणे.
२) अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ होण्यास मदत करणे.
३) राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (NAS) मधील संपादणूक वाढविण्याच्या दृष्टीकोनातून मदत करणे.
४) अध्ययनात मागे असणा-या विद्यार्थ्यांना पुढे नेण्याच्या दृष्टीकोनातून कृतिकार्यक्रम तयार करणे जेणेकरून अंमलबजावणीस दिशा प्राप्त होईल.
५) इयत्ता व विषयनिहाय अध्ययन निष्पत्तीमधील राज्याची संपादणूक स्थिती समजण्यास मदत मिळणे.
➤ संकलित चाचण्यांचे माध्यम व विषय :
सदर चाचणी ही एकूण दहा माध्यमात (मराठी, उर्दू, इंग्रजी, हिंदी, कन्नड, गुजराती, तमिळ, तेलगु, सिंधी, बंगाली) होईल. प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या तीन विषयांची इयत्ता ३ री ते ९ वी च्या विद्यार्थ्यांसाठी चाचण्यांचे आयोजन करण्यात येणार आहे.
पुढील अद्यावत माहतीसाठी आपल्या समाज माध्यमात सामील व्हा
➤ चाचणीचा अभ्यासक्रम :
१. इयत्ता ३ री ते ८ वी एकात्मिक पाठ्यपुस्तकातील भाग-१ व भाग २ (प्रथम सत्रांत अभ्यासक्रम) यावर आधारित असेल.
२. इयत्ता ९ वी - प्रचलित पद्धतीनुसार भाषा, गणित व इंग्रजी करिता खालील अभ्यासक्रम असेल. भाषा (सर्व माध्यम) - प्रथम सत्रांत अभ्यासक्रम यावर आधारित असेल. गणित (सर्व माध्यम) भाग-१ (१ ते ३ घटक) भाग-२ (१ ते ४ घटक) इंग्रजी (प्रथम व तृतीय भाषा) प्रथम सत्रांत अभ्यासक्रम यावर आधारित असेल.
इयत्ता ९ वी साठी अध्ययन निष्पत्ती ऐवजी क्षमता विधाने असून संबंधित सर्व माध्यमाच्या वरील तीन विषयांच्या चाचणी पत्रिका व शिक्षक सूचना यात क्षमता विधानांचे कोडींग नमूद करण्यात आलेले आहेत.
➤ संकलित मूल्यमापन चाचणी-१ वेळापत्रक (कालावधी दि. २२ ते २५ ऑक्टोबर २०२४)
शालेय वेळापत्रकानुसार सकाळ सत्र / दुपार सत्र नुसार उपरोक्तप्रमाणे आपल्या स्तरावरून वेळेचे नियोजन करण्याचे स्वातंत्र्य देण्यात येत आहे. तथापि दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणेच चाचणी घेण्यात यावी, यात कोणताही बदल करण्यात येवू नये. तसेच प्रथम भाषा (सर्व माध्यम), गणित (सर्व माध्यम) व तृतीय भाषा इंग्रजी या विषयांची तोंडी परीक्षा/प्रात्यक्षिक/स्वाध्याय ही त्या त्या दिवशी लेखी परीक्षेनंतर वैयक्तिक स्वरुपात घेण्यात यावी. विद्यार्थी संख्या जास्त असेल तर दुसऱ्या दिवशी आपल्या उपलब्ध वेळेनुसार घ्यावी.
इयत्ता ३ री ते ९ वी करिता भाषा, गणित व इंग्रजी (तृतीय भाषा) वगळून इतर सर्व विषयांची संकलित चाचणी-१ लेखी, तोंडी, स्वाध्याय व प्रात्यक्षिक परीक्षा प्रचलित पद्धतीनुसार घेण्याबाबत शाळास्तरावरून नियोजन करण्याबाबत कळविण्यात यावे. कोणत्याही शाळेत भाषा, गणित व इंग्रजी (तृतीय भाषा) या विषयांची दुबार संकलित चाचणी-१ होणार नाही याची दक्षता घ्यावी.
➤ संकलित मूल्यमापन चाचणी अंमलबजावणीबाबत सूचना :
१. संकलित मूल्यमापन चाचणी-१ ही शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व शाळा तसेच खाजगी अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यासाठी चाचणीचे आयोजन करण्यात येणार आहे.
२. संकलित मूल्यमापन चाचणी १ करिता प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या विषयांच्या चाचण्या राज्य स्तरावरून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचे मार्फत विद्यार्थीनिहाय पुरविण्यात येणार आहेत.
३. सदर वेळापत्रक हे संबंधित सर्व शाळांच्या निदर्शनास येईल याची दक्षता घ्यावी.
४. संकलित मूल्यमापन चाचणी-१ च्या चाचणी पत्रिका प्रत्येक जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी (प्राथ/माध्य.) यांच्या स्वाक्षरीने प्राप्त झालेल्या अंतिम विद्यार्थी संख्येनुसार प्रत्येक विषय व वर्गासाठी आपल्या तालुक्यामध्ये समक्ष पोहोच करण्यात येत आहेत.
५. तालुकास्तरावर पोहचविण्यात येणाऱ्या सर्व चाचणी पत्रिका सुरक्षित राहतील याची दक्षता घ्यावी. त्यासाठी तालुकास्तरावर एक सुरक्षित व स्वतंत्र खोली ताब्यात घ्यावी. या खोलीमध्ये प्राप्त चाचणी पत्रिका ठेवाव्यात. तसेच चाचणी पत्रिका फाटणार नाहीत किंवा पावसाने भिजणार नाहीत व सुरक्षित राहतील याची दक्षता घ्यावी.
६. तालुका स्तरावर साहित्य प्राप्त होताच संबंधित गटशिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी यांनी त्यांचे स्तरावर थेट शाळास्तरावर पोहचवाव्यात.
७. चाचणी पत्रिका वितरणा संदर्भात पुढील सूचनांचे गांभीर्याने पालन करावे.
अ. गटशिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी व तालुका समन्वयकांनी यांनी इयत्ता ३ री ते ९ वी च्या विद्यार्थी संख्येनुसार पुरवठा होताना स्वतः उपस्थित राहून आवश्यक पुरवठा झाला असल्याची खातरजमा करूनच विषय, माध्यम व इयत्तानिहाय गड्ढे मोजूनच गड्ढे / प्रती कमी किंवा जास्त असतील तर तसे पोहोच पावतीवर स्पष्टपणे नमूद करून पोहोच द्यावी.
आ. तालुका समन्वयकांनी सदर चाचणी पत्रिका समक्ष मोजूनच आवश्यक तेवढ्या मुख्याध्यापकांच्या ताब्यात द्यावयाच्या आहेत. तसेच झेरॉक्ससाठी तालुका समन्वयकांनी कोणत्याही चाचणी पत्रिका अथवा इतर साहित्य बाहेर जाणार नाही याची दक्षता घ्यावी.
इ. शाळा स्तरावरील चाचणी पत्रिका वेळापत्रकाप्रमाणे त्या दिवशी वापरल्या जातील याची दक्षता घ्यावी.
८. चाचणी पत्रिकाचा मोबाईल मधून फोटो काढणे, समाजमाध्यमाद्वारे इतरांना पाठविणे असे गैरप्रकार होणार नाहीत याची दक्षता घेण्यात यावी. प्रश्नपत्रिकांची गोपनियता काटेकोरपणे पाळण्यात यावी. गोपनीयता भंग झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर नियमानुसार प्रशासकीय कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
९. तालुका स्तरावर चाचणी पत्रिका ताब्यात घेणे, सुरक्षित ठिकाणी ठेवणे व त्याचे शाळानिहाय वाटप करणे तसेच चाचणीचे कामकाज सुरळीतपणे होण्याची सर्वस्वी जबाबदारी तालुका समन्वयकाबरोबरच गटशिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी यांची राहील.
१०. जिल्हास्तरावर प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक) जिल्हा परिषद (सर्व) यांची संकलित चाचणी१ आयोजनाबाबत सर्वस्वी जबाबदारी असेल.
११. शिक्षणाधिकारी यांचेकडून प्राप्त सांख्यिकीय माहितीच्या आधारे संभाव्य दि. १ ऑक्टोबर २०२४ च्या पहिल्या आठवड्यात चाचणी पत्रिका वितरीत करण्यात येत आहेत. त्यामुळे चाचणी पत्रिका कमी पडल्यास अथवा XEROX काढण्यात येणाऱ्या प्रश्नपत्रिकांचे देयक कोणत्याही परिस्थितीत अदा करण्यात येणार नाही त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित शिक्षणाधिकारी (प्राथ/माध्य.) / शिक्षण निरीक्षक / प्रशासन अधिकारी (मनपा/नपा) यांची असेल याची नोंद घ्यावी. तसेच सर्व विद्यार्थ्यांना चाचणी पत्रिका मिळतील याची जबाबदारी शिक्षणाधिकारी/प्राचार्य DIET यांची वैयक्तिकरित्या राहील.
१२. संकलित चाचणी-१ कालावधीत सर्व विद्यार्थी उपस्थित राहतील याची दक्षता घ्यावी. एखादा विद्यार्थी गैरहजर असल्यास तो शाळेत हजर झालेल्या दिवशी त्याची परीक्षा घेण्यात यावी.
१३. दिव्यांग विद्यार्थ्याच्या बाबतीत सदर परीक्षा घेण्याबाबतचा निर्णय संबधित विद्यार्थ्याच्या दिव्यांग प्रकारावरून शाळा मुख्याध्यापक व शिक्षक यांनी घ्यावा. आवश्यकतेनुसार विशेष तज्ज्ञ किंवा विशेष शिक्षक यांची मदत घ्यावी.
१४. प्रस्तुत संकलित चाचणी-१ बाबत शिक्षकांना आवश्यक सर्वसाधारण सूचना शिक्षक सूचनापत्रात देण्यात आलेल्या आहेत. शिक्षकांनी सदर सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करून अनुषंगिक कार्यवाही करावी. तसेच या शिक्षक सूचना www.maa.ac.in या वेबसाईटवर परीक्षेपूर्वी उपलब्ध असेल. उत्तरसूची परीक्षेदिवशी संध्याकाळी वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात येईल. त्यानुसार उत्तरपत्रिका तपासण्यात याव्यात.
१५. शिक्षक सूचना व उत्तरसूची ही फक्त शिक्षकासाठी आहे, ती विद्यार्थ्यांना देऊ नये. विद्यार्थ्याना फक्त चाचणी पत्रिका देण्यात याव्यात.
१६. संकलित चाचणी १ ची गुण नोंद प्रश्नपत्रिकेच्या पहिल्या पानावर दिलेल्या अध्ययन निष्पत्तीनिहाय रकान्यात भरावी.
१७. संकलित चाचणी १ मधील गुणांच्या आधारे शिक्षकांनी विद्यार्थीनिहाय कृतिकार्यक्रम तयार करून अंमलबजावणी करावी, जेणेकरून संकलित मूल्यमापन चाचणी २ मध्ये अध्ययन निष्पत्तीनिहाय संपादणूक वाढण्यास मदत होईल.
➤ • चाचणी कालावधीत करावयाच्या शाळा भेटीबाबत -
१) जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांच्या शाळानिहाय भेटीचे दिनांकासहित नियोजन प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, व शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक) यांनी एकत्रितरित्या बैठक घेऊन करावे.
२) जिल्हास्तरावरून केलेले नियोजन संबधित तालुक्यांना कळवावे. प्रत्येक तालुक्यांनी जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांना दिलेल्या भेटीच्या शाळा वगळून उर्वरित शाळांसाठी शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, विषय साधन व्यक्ती व विशेष तज्ज्ञ यांच्या भेटीचे नियोजन करावे.
३) संकलित चाचणी-१ कालावधीत राज्यातील १०० टक्के शाळाभेटी होतील यासाठी संबंधित जिल्ह्यातील प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, व शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक) व पर्यवेक्षीय यंत्रणेतील सर्व अधिकारी/कर्मचारी यांनी दक्षता घ्यावी.
४) तपासणी केलेल्या १०% उत्तरपत्रिकांची Randomly तपासणी करण्याचे नियोजन शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक व प्राचार्य जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था यांनी करावे.
Also Read -
संकलित मूल्यमापन -२ (PAT-३) (महाराष्ट्र) या चाटबॉटवर नोंदविणेबाबत.........अधिक वाचण्यासाठी या ओळीला स्पर्श करा
STARS PAT Summative EvaluationAnswer Key .....अधिक वाचण्यासाठी या ओळीला स्पर्श करा
नियतकालिक मूल्यांकन (PAT) अंतर्गत संकलित मूल्यमापन चाचणी २ आणि इयत्ता पाचवी व आठवी वार्षिक परीक्षेसंदर्भात सुधारित सूचना देणेबाबत..........अधिक वाचण्यासाठी या ओळीला स्पर्श करा
STARS प्रकल्प - नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत संकलित मूल्यमापन २ व इयत्ता ५ वी व ८ वी वार्षिक परीक्षा आयोजनाबाबत.....अधिक वाचण्यासाठी या ओळीला स्पर्श करा
STARS PAT Sankalit Mulyamapan Gunnond Takte संकलित मूल्यमापन गुण नोंद तक्ते .....अधिक वाचण्यासाठी या ओळीला स्पर्श करा
पायाभूत चाचणी (PAT 1) जुलै 2024 च्या इयत्तानिहाय, माध्यमनिहाय व विषयनिहाय शिक्षक सूचना व उत्तरसूची परिषदेच्या संकेत स्थळावर उपलब्ध करून दिलेबाबत .....अधिक वाचण्यासाठी या ओळीला स्पर्श करा
STARS प्रकल्पांतर्गत नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व खाजगी अनुदानित शाळांमध्ये इयत्ता ३ री ते ८ वी वर्गासाठी संकलित मूल्यमापन १ आयोजनाबाबत .....अधिक वाचण्यासाठी या ओळीला स्पर्श करा
STARS प्रकल्प अंतर्गत नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत पायाभूत चाचणी २०२४-२५ आयोजनाबाबत.........अधिक वाचण्यासाठी या ओळीला स्पर्श करा
संकलित मूल्यमापन -२ (PAT-३) (महाराष्ट्र) या चाटबॉटवर नोंदविणेबाबत.........अधिक वाचण्यासाठी या ओळीला स्पर्श करा
STARS प्रकल्प - नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत संकलित मूल्यमापन २ व इयत्ता ५ वी व ८ वी वार्षिक परीक्षा आयोजनाबाबत..........अधिक वाचण्यासाठी या ओळीला स्पर्श करा
STARS प्रकल्पांतर्गत नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) त्यामध्ये पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी - १ व संकलित मूल्यमापन चाचणी-२ अशा तीन नियतकालिक चाचण्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. करिता अध्ययन निष्पत्ती वर आधारित प्रश्नांचा सराव प्रश्नसंच विद्यार्थ्यांचा सराव व्हावा याकरिता www.dnyanyatritantrasnehi.com मार्फत प्रश्नसंच विकसित करण्यात आले आहेत. इयत्ता तिसरी. चौथी. पाचवी, सहावी. सातवी व नववी च्या विद्यार्थ्यांकडून हे सराव प्रश्न सोडवून घेतले जावेत .....अधिक वाचण्यासाठी या ओळीला स्पर्श करा
STARS प्रकल्पांतर्गत नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व खाजगी अनुदानित शाळांमध्ये इयत्ता ३ री ते ८वी वर्गासाठी संकलित मूल्यमापन १ आयोजनाबाबत.....अधिक वाचण्यासाठी या ओळीला स्पर्श करा
मागील इयत्तेच्या अभ्यासक्रम अध्ययन निष्पत्ती / मुलभूत क्षमता यावर आधारित विद्यार्थ्यांना ऊपयोगी आशा ऑनलाईन प्रश्न मंजुषा आदर्श उत्तरासह सोडविण्यासाठी हवे असेल त्या इयत्तेवर टिचकी मारा.....अधिक वाचण्यासाठी या ओळीला स्पर्श करा
राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (NAS २०२१) अंमलबजावणीबाबत सूचना......अधिक वाचण्यासाठी या ओळीला स्पर्श करा
उपरोक्त नियोजनानुसार दिलेल्या वेळेत सर्व नमूद इयत्तांची चाचणी होईल याप्रमाणे नियोजन करण्याची जबाबदारी शाळेच्या मुख्याध्यापकांची असेल. तथापि, अपवादात्मक किंवा स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन काही बदल करायचे असल्यास संबधित शिक्षणाधिकारी यांनी या कार्यालयाची परवानगी घेवूनच वेळापत्रकात बदल करावा.
वरीलप्रमाणे आपल्या अधिनस्त संबंधित सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक यांचेपर्यंत संकलित चाचणी -१ च्या अनुषंगाने योग्य त्या कार्यवाहीसाठी सूचना द्याव्यात. संकलित चाचणी -१ चे गुण हे विद्या समीक्षा केंद्र (VSK) येथे नोंदवण्यात येणार आहे. त्याकरिता संबंधित शाळेच्या शिक्षकांनी चाचणी तपासून त्याचे गुण विद्या समीक्षा केंद्र (VSK) यांचे मार्फत उपलब्ध पोर्टलवर विहित कालावधीत भरायचे असून याबाबतच्या सविस्तर सूचना यथावकाश देण्यात येतील याची नोंद घेण्यात यावी.
(राहुल रेखावार भा.प्र.से.)
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,
महाराष्ट्र पुणे
१) विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व),
२) विभागीय विद्याप्राधिकरण (सर्व),
३) प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व),
४) शिक्षणाधिकारी (प्राथ/माध्य. व योजना) जि.प. (सर्व),
५) शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई, मनपा,
६) शिक्षण निरीक्षक, मुंबई (उत्तर, दक्षिण, पश्चिम),
७) प्रशासन अधिकारी, म.न.पा./न.पा./न. प. (सर्व),
संदर्भ :
१. राज्यातील शिक्षणपध्दतीचे अध्यापन, अध्ययन व परिणाम यांचे बळकटीकरण (Strengthening Teaching-Learning And Results for States) केंद्रपुरस्कृत प्रकल्प मान्यता देण्याबाबत शासन निर्णय, दिनांक ११ फेब्रुवारी २०२१.
२. राज्यातील शिक्षण पध्दतीचे अध्यापन, अध्ययन व परिणाम यांचे बळकटीकरण (Strengthening Teaching - Learning And Results for States) केंद्र राज्य अनुदान वितरण वित्तीय नियमावली मार्गदर्शक तत्वे. पुरस्कृत प्रकल्प
३. STAR प्रकल्प अतर्गत मंजूर PAB मिटिंगचे इतिवृत्त, दि. ३१ मार्च २०२४
४. प्रस्तुत कार्यालयाचे पत्र जा. क्र. राशैसंप्रपम/मूल्यमापन/पा.चा. जिल्हा पत्र/२०२४-२५/०२९२६ दि.१९/०६/२०२४
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon