Sankalit Mulyamapan 2 PAT 3 Chatbot link
Sankalit Mulyamapan 2 PAT 3 Chatbot link
Sankalit Mulyamapan Chachini 2 PAT 3 Chatbot link SCERT circular pdf Download LinK
विषय : संकलित मूल्यमापन चाचणी-२ (PAT-३) (महाराष्ट्र) या चाटबॉटवर गुण नोंदविणेबाबत......
संदर्भ :
१. मा. आयुक्त यांचे पत्र जा.क्र. आशिका/प्राथमिक/२०२५/११३० दि. ०५ मार्च २०२५.
२. या कार्यालयाचे पत्र जा.क्र. राशैसंप्रपम/मूल्यमापन/सं.चा.जिल्हा पत्र/२०२४-२५/०२२५७, दि. ०४ एप्रिल २०२५.
३. मा. संचालक यांची मान्य टिपणी दि.२३/०४/२०२५
उपरोक्त विषयान्वये STARS प्रकल्पामधील SIG-२ Improved Learning Assessment System नुसार सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत संकलित मूल्यमापन २ (PAT-३) चे आयोजन दि. ०८ एप्रिल ते २५ एप्रिल २०२५ या कालावधीत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी अनुदानित शाळामध्ये करण्यात आलेले होते. प्रथम भाषा (सर्व माध्यम), गणित (सर्व माध्यम), तृतीय भाषा- इंग्रजी या विषयांचे संकलित मूल्यमापन चाचणी-२ (PAT -३) घेण्यात आलेली आहे. सदर संकलित मूल्यमापन चाचणी-२ (PAT-३) शिक्षकांनी तपासणेबाबत सूचित करण्यात आलेले होते. तसेच सदर मूल्यमापनाचे गुण विद्या समीक्षा केंद्र (VSK) यांचेमार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या पोर्टलवर भरायचे असून याबाबतच्या सविस्तर सूचना यापूर्वी यु-ट्युबद्वारे देण्यात आलेल्या आहेत.
विद्या समीक्षा केंद्र (VSK), पुणे यांचेमार्फत PAT (महाराष्ट्र) हा चाटबॉट संकलित मूल्यमापन चाचणी-२ (PAT -३) गुण भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. यावर संकलित मूल्यमापन चाचणी-२ (PAT - ३) शिक्षकांनी नोंदविणे आवश्यक आहे. सदर चाटबॉटवर संकलित मूल्यमापन चाचणी-२ (PAT -३) चे गुण शिक्षकांनी कसे नोंदवावेत याच्या सविस्तर मार्गदर्शिकाची लिंक खालीलप्रमाणे देण्यात येत आहे.
१. संकलित मूल्यमापन चाचणी-२ (PAT-३) चाटबॉट मार्गदर्शिका लिंक -
https://bit.ly/PATUserManual
तसेच संकलित मूल्यमापन चाचणी-२ (PAT३) चे गुण PAT (महाराष्ट्र) या चाटबॉटवर नोंदविणेकरिता जिल्ह्यांना दि. २४ एप्रिल २०२५ ते ५ मे २०२५ पर्यंतचा कालावधी देण्यात येत आहे. करिता गुणनोंद लिंक खालीलप्रमाणे देण्यात येत आहे.
२. संकलित मूल्यमापन चाचणी-२ (PAT३) गुणांची नोंद करणेसाठी लिंक -
https://bit.ly/PAΑΤ-ΜΗ
तथापि उपरोक्त कामकाजासाठी जिल्हा शिक्षणाधिकारी प्राथमिक/माध्यमिक, शिक्षण निरीक्षक व प्रशासन अधिकारी, म.न.पा./न.पा. यांनी आपल्या कार्यालयातील एका अधिकाऱ्याकडे PAT (महाराष्ट्र) जिल्हा समन्वयक म्हणून जबाबदारी यापूर्वी निश्चित केलेली असेल. त्यानुसार सदर जिल्हा समन्वयक यांनी जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना विद्या समीक्षा केंद्र (VSK), पुणे यांचेमार्फत PAT (महाराष्ट्र) हा चाटबॉटवर संकलित मूल्यमापन चाचणी-२ (PAT-३) चे गुण कसे भरावेत याबाबत आवश्यकतेनुसार मार्गदर्शन करावे. तसेच ज्या शाळांमध्ये संकलित मूल्यमापन चाचणी-२ (PAT-३) घेण्यात आलेली आहे अशा इयत्ता तिसरी ते नववीच्या शाळामधील विषयनिहाय विद्यार्थ्यांचे गुण चाटबॉटवर नोंदविणेबाबत कार्यवाही करण्यात यावी. चाटबॉटच्या बाबतीत तांत्रिक अडचण येणाऱ्या शिक्षकांनी सोबत दिलेल्या गुगल लिंकवर (https://forms.gle/९ssWv४bu५QPCq६XHA) प्रतिसाद नोंदवावा.
संकलित मूल्यमापन २ चाचणीच्या (PAT३) सर्व विषयांच्या उत्तरपत्रिका तपासणे व निकाल जाहीर करणे या सर्व शैक्षणिक बाबी दि. १ मे २०२५ पर्यंत पूर्ण झालेल्या असणार आहेत. सदर संकलित मूल्यमापन चाचणी -२ (PAT-३) चे गुणनोंद करण्याची सुविधा चाटबॉटवर दि. २४ एप्रिल २०२५ पासून उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच सदरच्या गुणनोंदणी करिता दि. ५ मे २०२५ या पर्यंतचा कालावधी देण्यात येत असून याच मुदतीत १०० टक्के शाळांनी गुणनोंदणी करणे अनिवार्य आहे. तरी आपल्या अधिनस्थ शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक यांना याबाबतची आवश्यक कार्यवाही करण्याबाबत आपल्या स्तरावरून सूचित करण्यात यावे. याकरिता मुदतवाढ देण्यात येणार नाही. तरी आपल्या कार्यक्षेत्रातील १०० टक्के शाळांची गुणनोंदणी होईल याची दक्षता घ्यावी.
परिपत्रक पीडीएफ प्रत हवी असल्यास या ओळीला स्पर्श करा
(राहूल रेखावार भा.प्र.से.)
संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.
Also Read 👇
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
जा.क्र. राशैसंप्रपम / मूल्यमापन /संकलित मूल्यमापन २-VSK/२०२३-२४/०२२८८
दि.६ मे २०२४
प्रति,
१) शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) जि.प. (सर्व),
२) शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई, मनपा,
३) शिक्षण निरीक्षक, मुंबई (उत्तर, दक्षिण, पश्चिम),
४) प्रशासन अधिकारी, म.न.पा./न.पा./न. प. (सर्व),
विषय: संकलित मूल्यमापन -२ (PAT-३) (महाराष्ट्र) या चाटबॉटवर गुण नोंदविण्या करिता मुदतवाढ देणेबाबत
संदर्भ : १. या कार्यालयाचे पत्र जा.क्र. राशैसंप्रपम/मूल्यमापन/पायाभूत चाचणी/२०२३-२४/३६७५, दि.८ ऑगस्ट २०२३
दि.१३ सप्टेंबर २०२३
२. या कार्यालयाचे पत्र जा.क्र. राशैसंप्रपम/मूल्यमापन/पायाभूत चाचणी-VSK/२०२३-२४/४३४५
३. या कार्यालयाचे पत्र जा.क्र. राशैसंप्रपम/मूल्यमापन/संकलित मूल्यमापन-२-४४४/२०२३-२४/२०२४
दि.८ एप्रिल २०२४
४. या कार्यालयाचे पत्र जा.क्र. राशैसंप्रपम/मूल्यमापन /संकलित मूल्यमापन-२-४७४/२०२३-२४/०२२०९
दि.२६ एप्रिल २०२४
उपरोक्त विषयान्वये STARS प्रकल्पामधील SIG-२ limproved Learning Assessment System नुसार सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन
(PAT) अंतर्गत पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन १ व संकलित मूल्यमापन PAT-३) चेआयोजन करण्यात आलेले होते. उपरोक्त संदर्भानुसार राज्यात संकलित मूल्यमापन २ (PAT-वेआयोजन दि. ४ ते ६ एप्रिल २०२४ या कालावधीत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी अनुदानित शाळामध्ये करण्यात आलेले होते. प्रथम भाषा (सर्व माध्यम), गणित (सर्व माध्यम), तृतीय भाषा इंग्रजी या विषयांचे संकलित मूल्यमापन-२ घेण्यात आलेले आहे. सदर संकलित मूल्यमापन २(PAT-३) शिक्षकांनी तपासणेबाबत सूचित करण्यात आलेले होते. तसेच सदर मूल्यमापनाचे गुण विद्या समीक्षा केंद्र (VSK)
यांचेमार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या पोर्टलवर भरायचे असून याबाबतच्या सविस्तर सूचना यु-
ट्युबद्वारे देण्यात आलेल्या आहेत.
विद्या समीक्षा केंद्र (VSK), पुणे यांचेमार्फत PAT (महाराष्ट्र) हा चाटबॉटसंकलित मूल्यमापन २ (PAT-३) गुण भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. यावर संकलित मूल्यमापन २(PAT-३) चे
गुण शिक्षकांनी नोंदविणे आवश्यक आहे. सदर चाटबॉटवर संकलित मूल्यमापन २(PAT-शेचे गुण शिक्षकांनी कसे नोंदवावेत याच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना व याबाबतच्या व्हिडीओची यु-ट्यूब लिंक यापूर्वी सोबत देण्यात आलेली आहे. तसेच PAT (महाराष्ट्र) या चाटबॉटबाबतचे प्रशिक्षणदि. १५ एप्रिल २०२४ रोजी यु-ट्युबद्वारे शिक्षकांना देण्यात आलेले आहे. यापूर्वी शिक्षकांना संकलित मूल्यमापन २ (PAT-३) चे गुण दि.२६ एप्रिल २०२४ ते दि.५ मे २०२४पर्यंत PAT (महाराष्ट्र) या चाटबॉटवर नोंदविणे करिता कालावधी देण्यात आलेला होता.
तथापि सदरची माहिती अद्याप पूर्ण झाली नसल्याने सदरचे गुण चाटबॉटवर नोंदविण्याकरिता जिल्ह्यांनादि.१० मे २०२४ पर्यंतचा कालावधी देण्यात येत आहे. उपरोक्त कामासाठी जिल्हाशिक्षणाधिकारी यांनी आपल्या कार्यालयातील एका अधिकाऱ्याकडे PAT (महाराष्ट्र) जिल्हा समन्वयकम्हणून जबाबदारी यापूर्वी निश्चित केलेली असेल. त्यानुसार सदर जिल्हा समन्वयक यांनी जिल्हातील सर्व शिक्षकांनाविद्या समीक्षा केंद्र (VSKI), पुणे यांचेमार्फत PAT (महाराष्ट्र) हा चाटबॉटवर संकलित मूल्यमापन (PAT-३) चे गुण कसे भरावेत याबाबत आवश्यकतेनुसार मार्गदर्शन करावे. तसेच ज्या शाळांमध्ये संकलित मूल्यमापन - २ (PAT-३घेण्यात आलेली आहे. अशा इयत्ता तिसरी ते आठवीच्या शाळामधील विषयनिहाय विद्यार्थ्यांचे गुण चाटबॉटवर नोंदविणेबाबत कार्यवाही करण्यात यावी. चाटबॉटच्या बाबतीत तांत्रिक अडचण येणाऱ्या शिक्षकांनी सोबत दिलेल्या गुगल लिंकवर (https://forms.gle/9ssWv4bu5QPC6XHA) प्रतिसाद नोंदवाचा.
तरी आपल्या अधिनस्थ शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक यांना याबाबतची आवश्यक कार्यवाही करण्याबाबत सूचित करण्यात यावे.
यु-ट्यूब लाईव्ह लिंक (शिक्षकांसाठी मार्गदर्शन)
https://youtube.com/live/con.TodMyxY?feature=share
https://drive.google.com/file/d/1xXdh5HCmEsB5RI QhbVl207gQgW5Zj/view?usp=sharing
PAT-३ चाटबॉट मार्गदर्शिका :
संकलित मूल्यमापन २ गुणांची नोंद करणेसाठी लिंक - २ (PAT- 3)
प्रत माहितीस्तव सविनय सादरः-
१. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई.
२. मा. राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई. ३. मा. आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.
प्रत उचित कार्यवाहीस्तव :
१. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. (सर्व). २. मा. आयुक्त, महानगरपालिका (सर्व).
३. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व)
हेही वाचाल 👇
महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र,
पुणे
जा.क्र. राशैसंप्रपम / मूल्यमापन /संकलित मूल्यमापन २-VSK/२०२३-२४/०२२०९
दि.२६एप्रिल २०२४
प्रति,
१) शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) जि.प. (सर्व),
२) शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई, मनपा,
३) शिक्षण निरीक्षक, मुंबई (उत्तर, दक्षिण, पश्चिम),
४) प्रशासन अधिकारी, म.न.पा./न.पा./न. प. (सर्व),
विषय : संकलित मूल्यमापन -२ (PAT-३) (महाराष्ट्र) या चाटबॉटवर गुण नोंदविण्या करिता मुदतवाढ देणेबाबत
संदर्भ :
१. या कार्यालयाचे पत्र जा.क्र. राशैसंप्रपम/मूल्यमापन/पायाभूत चाचणी/२०२३-२४/३६७५, दि.८ ऑगस्ट २०२३
३. या कार्यालयाचे पत्र जा.क्र. राशैसंप्रपम/मूल्यमापन /संकलित मूल्यमापन-२-VSK/२०२३-२४/२०२४ दि.८ एप्रिल २०२४
उपरोक्त विषयान्वये STARS प्रकल्पामधील SIG-२ limproved Learning Assessment System नुसार सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन
(PAT) अंतर्गत पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन १ व संकलित मूल्यमापन २ (PAT-३) चे आयोजन करण्यात आलेले होते. उपरोक्त संदर्भानुसार राज्यात संकलित मूल्यमापन २ (PAT-३) चे आयोजन दि. ४ ते ६ एप्रिल २०२४ या कालावधीत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी अनुदानित शाळामध्ये करण्यात आलेले होते. प्रथम भाषा (सर्व माध्यम), गणित (सर्व माध्यम), तृतीय भाषा इंग्रजी या विषयांचे संकलित मूल्यमापन-२ घेण्यात आलेले आहे. सदर संकलित मूल्यमापन - २(PAT-३) शिक्षकांनी तपासणेबाबत सूचित करण्यात आलेले होते. तसेच सदर मूल्यमापनाचे गुण विद्या समीक्षा केंद्र (VSK) यांचेमार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या पोर्टलवर भरायचे असून याबाबतच्या सविस्तर सूचना यु- ट्युबद्वारे देण्यात आलेल्या आहेत.
विद्या समीक्षा केंद्र (VSK), पुणे यांचेमार्फत PAT (महाराष्ट्र) हा चाटबॉट संकलित मूल्यमापन - २ (PAT-३) गुण भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. यावर संकलित मूल्यमापन २(PAT-३) चे गुण शिक्षकांनी नोंदविणे आवश्यक आहे. सदर चाटबॉटवर संकलित मूल्यमापन २ (PAT-३) चे गुण शिक्षकांनी कसे नोंदवावेत याच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना व याबाबतच्या व्हिडीओची यु-ट्यूब लिंक
यापूर्वी सोबत देण्यात आलेली आहे. तसेच PAT (महाराष्ट्र) या चाटबॉटबाबतचे प्रशिक्षण दि.१५ एप्रिल २०२४ रोजी यु-ट्युबद्वारे शिक्षकांना देण्यात आलेले आहे. यापूर्वी शिक्षकांना संकलित मूल्यमापन - २ (PAT- ३) चे गुण दि.१५ एप्रिल ते २६ एप्रिल २०२४ पर्यंत PAT (महाराष्ट्र) या चाटबॉटवर नोंदविणे करिता देण्यात आलेला होता.
तथापि सदरची माहिती अद्याप पूर्ण झाली नसल्याने सदरचे गुण चाटबॉटवर नोंदविण्याकरिता जिल्ह्यांना दि.५ मे २०२४ पर्यंतचा कालावधी देण्यात येत आहे. उपरोक्त कामासाठी जिल्हा शिक्षणाधिकारी यांनी आपल्या कार्यालयातील एका अधिकाऱ्याकडे PAT (महाराष्ट्र) जिल्हा समन्वयक म्हणून जबाबदारी यापूर्वी निश्चित केलेली असेल. त्यानुसार सदर जिल्हा समन्वयक यांनी जिल्हातील सर्व शिक्षकांना विद्या समीक्षा केंद्र (VSK), पुणे यांचेमार्फत PAT (महाराष्ट्र) हा चाटबॉटवर संकलित मूल्यमापन २ (PAT-३) चे गुण कसे भरावेत याबाबत आवश्यकतेनुसार मार्गदर्शन करावे. तसेच ज्या शाळांमध्ये संकलित मूल्यमापन - २ (PAT-३) घेण्यात आलेली आहे. अशा इयत्ता तिसरी ते आठवीच्या शाळामधील विषयनिहाय विद्यार्थ्यांचे गुण चाटबॉटवर नोंदविणेबाबत कार्यवाही करण्यात यावी. चाटबॉटच्या बाबतीत तांत्रिक अडचण येणाऱ्या शिक्षकांनी सोबत दिलेल्या गुगल लिंकवर प्रतिसाद नोंदवावा.
संकलित मूल्यमापन २ गुणांची नोंद करणेसाठी लिंक - २ (PAT-३)
यु-ट्यूब लाईव्ह लिंक (शिक्षकांसाठी मार्गदर्शन)
PAT-३ चाटबॉट मार्गदर्शिका :
तरी आपल्या अधिनस्थ शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक यांना याबाबतची आवश्यक कार्यवाही करण्याबाबत सूचित करण्यात यावे.
(शरद गोसावी)
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.
प्रत माहितीस्तव सविनय सादरः-
१. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई.
२. मा. राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई.
प्रत उचित कार्यवाहीस्तव :
१. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. (सर्व).
२. मा. आयुक्त, महानगरपालिका (सर्व).
३. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व)
Also Read 👇
महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,
महाराष्ट्र708, सदाशिवपेठ, कुमठेकरमार्ग,
पुणे- 411030
जा.क्र. राशैसंप्रपम/ मूल्यमापन/संकलित मूल्यमापन २-VSK/२०२३-२४/०२०२४
दि. ८ एप्रिल २०२४
प्रति,
१) शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) जि.प. (सर्व),
२) शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई, मनपा,
३) शिक्षण निरीक्षक, मुंबई (उत्तर, दक्षिण, पश्चिम),
४) प्रशासन अधिकारी, म.न.पा./न.पा./न.प. (सर्व),
विषय : संकलित मूल्यमापन -२ (PAT-३) (महाराष्ट्र) या चाटबॉटवर नोंदविणेबाबत...
संदर्भ : १. या कार्यालयाचे पत्र जा.क्र. राशैसंप्रपम/मूल्यमापन/पायाभूत चाचणी/२०२३-२४/३६७५,
दि.८ ऑगस्ट २०२३
२. या कार्यालयाचे पत्र जा.क्र. राशैसंप्रपम/मूल्यमापन/पायाभूत चाचणी-VSK/२०२३-२४/४३४५
दि.१३ सप्टेंबर २०२३
उपरोक्त विषयान्वये STARS प्रकल्पामधील SIG-२ limproved Learning Assessment System नुसार सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक
मूल्यांकन (PAT) अंतर्गत पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन १ व संकलित मूल्यमापन २(PAT-३१थे आयोजन करण्यात आलेले होते. उपरोक्त संदर्भानुसार राज्यात संकलित मूल्यमापन २ (PAT-३) चे आयोजन दि. ४ ते ६ एप्रिल २०२४ या कालावधीत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी अनुदानित शाळामध्ये करण्यात आलेले होते. प्रथम भाषा (सर्व माध्यम), गणित (सर्व माध्यम), तृतीय भाषा- इंग्रजी या विषयांचे संकलित मूल्यमापन-२ घेण्यात आलेले आहे. सदर संकलित मूल्यमापन - २(PAT-3) शिक्षकांनी तपासणेबाबत सूचित करण्यात आलेले होते. तसेच सदर मूल्यमापनाचे गुण विद्या समीक्षा केंद्र (VSK) यांचेमार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या पोर्टलवर भरायचे असून याबाबतच्या सविस्तर सूचना
यु-ट्युबद्वारे देण्यात येतील. विद्या समीक्षा केंद्र (VSK), पुणे यांचेमार्फत PAT (महाराष्ट्र) हा चाटबॉट संकलित मूल्यमापन - २
(PAT-३) गुण भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. यावर संकलित मूल्यमापन - २(PAT-३) चे गुण शिक्षकांनी नोंदविणे आवश्यक आहे. सदर चाटबॉटवर संकलित मूल्यमापन २(PAT-३) चे गुण शिक्षकांनी कसे नोंदवावेत याच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना व याबाबतच्या व्हिडीओची यु-ट्यूब लिंक सोबत देण्यात येत आहे. तसेच PAT (महाराष्ट्र) या चाटबॉटबाबतचे प्रशिक्षण दि.१५ एप्रिल २०२४ रोजी दुपारी ठीक १२:०० ते १:०० या कालावधीत यु-ट्युबद्वारे शिक्षकांना देण्यात येईल. संबधित शिक्षकांना
Sankalit Mulyamapan 2 PAT 3 Chatbot link
यु-ट्यूब लाईव्ह लिंक (शिक्षकांसाठी मार्गदर्शन)
दि १५ एप्रिल २०२४ रोजी दुपारी १२.०० ते १.००
PAT-३ चाटबॉट मार्गदर्शिका :
संकलित मूल्यमापन २ गुणांची नोंद करणेसाठी लिंक-२ (PAT-३)
1 comments:
Click here for commentsधन्यवाद सुंदर आणि परिपूर्ण माहिती
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon