DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

PAT Sankalit Mulyamapan New Guidelines

STARS PROJECT PAT Sankalit Mulyamapan New Guidelines

Strengthening Teaching-Learning and Results for States

PAT(Periodic Assesment Test) परीक्षेचे गुण चॅटबॉटवर भरत असताना येणाऱ्या काही तांत्रिक अडचणी आणि त्यावरील उपाय

नियतकालिक मुल्यांकन चाचणी PAT ३ अंतर्गत संकलित मूल्यमापन - २

• प्राप्त गुणांची नोंद चॅटबॉटच्या माध्यमातून करणे -

चाचणी तपासून झाल्यानंतर शिक्षकांनी प्रश्ननिहाय प्राप्त गुणांची नोंद प्रश्नपत्रिकेवर करुन ठेवावी. सदर गुणांची ऑनलाईन नोंद करण्याची सुविधा विद्या समीक्षा केंद्र (VSK) यांचे मार्फत उपलब्ध केलेल्या swift chat या app (चॅट-बॉट) वर तात्काळ करणेत यावी.


👇👇👇👇👇

PAT Chatbot चॅटबॉटवर वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे गुण भरत असताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी येथे मांडा तुम्हाला काही शंका असल्यास त्या शंकांचे निरसन करा


 
Swift Chat  👉 App LINK



WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin Now


महाराष्ट्र शासन 
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे ७०८ सदाशिव पेठ, कुमठेकर मार्ग, पुणे ४११०३०

संपर्कक्रमांक (०२०) २४४७ ६९३८

E-mail: evaluationdept@maa.ac.in

जा/ क्र. राशैसंप्रपम. मूल्यमापन / PAT संकलित २/२०२३-२४/

दि. ३१.०३.२०२४

प्रति, 
शिक्षणाधिकारी प्राथमिक, 
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग (सर्व).

विषयः नियतकालिक मुल्यांकन चाचणी PAT ३ अंतर्गत संकलित मूल्यमापन - २ आयोजनाबाबत ...

संदर्भः १. संकलित मूल्यमापन-२ (PAT ३) बाबतची VC (बैठक दिनांक ३० मार्च २०२४)

२.. जा.क्र. राशैसप्रप / मूल्यमापन /संकलित चाचणी २/प्रश्नपत्रिका मागणी/२०२३-२४/५५५० दि.२३ नोव्हे.२०२३

३. स्मरणपत्र. जा.क्र. राशैसप्रप/मूल्यमापन/संकलित चाचणी २/प्रश्नपत्रिका मागणी/२०२३-२४. दि.२८/१२/२०२३

४. स्मरणपत्र. जा.क्र. राशैसप्रप / मूल्यमापन /संकलित चाचणी २/प्रश्नपत्रिका मागणी/२०२३-२४/६२९८ 

दि.१०/०१/२०२४

५. जा.क्र. राशैसप्रप/पाचवी आठवी आणि PAT / मूल्यमापन /२०२३-२४/१६७५ दि.२५.०३.२०२४

नियतकालिक मूल्यमापन चाचणी २ अंतर्गत संकलित मूल्यमापन चाचणी चे आयोजन दिनांक ०४ ते ०६ एप्रिल २०२४ या कालावधीत करण्यात येणार आहे. या अंतर्गत राज्यातील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व खाजगी अनुदानित शाळांमध्येएकूण दहा माध्यमांसाठी इयत्ता तिसरी ते आठवी करीता प्रथम भाषा, गणित, तृतीय भाषा (इंग्रजी) या विषयांच्या प्रश्नपत्रिकांचा पुरवठा राज्यस्तरावरून करण्यात येत आहे.

संदर्भ क्र.५ नुसार संकलित मूल्यमापन २ चे आयोजन वेळापत्रकाप्रमाने करण्यात यावे.

संदर्भ क्र.२,३ व ४ नुसार प्रस्तुत कार्यालयामार्फत मागविलेल्या नमुन्यात जिल्ह्यांकडून प्राप्त सांख्यिकीय माहितीनुसार प्रश्नपत्रिका छपाई व वितरण करण्यात आले आहे.

याअनुषंगाने जिल्ह्यांकडून नियतकालिक मुल्यांकन चाचणी PAT ३) अंतर्गत संकलित मूल्यमापन - २ करीता प्राप्त तसेच कमी अथवा जास्त प्रश्नपत्रिका मिळाल्याबाबत मागणी संदर्भात दि. ३०.०३.२०२४ रोजी
VC द्वारे सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक व प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था याची बैठक आयोजित करण्यात आली होती. मा. संचालक यांनी सदर बैठकीत खालीलप्रमाणे सूचना दिलेल्या आहेत.

• जिल्ह्यांनी सोबत दिलेल्या EXCEL sheet मध्ये दिलेल्या नमुन्यात इयत्ता, विषय व माध्यम निहाय कमी अथवा जास्त झालेल्या प्रश्नपत्रिकांची संख्या नमूद करून SOFT कॉफी व हार्ड कॉफी साक्षांकित करून


या मेल वर दिनांक ०१.०४.२०२४ रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत पाठवण्यात यावी. या नंतर प्राप्त संख्यांचा विचार केला जाणार नाही.
तसेच कमी पडलेल्या प्रश्नपत्रिका आपल्या स्तरावरून गोपनीयता बाळगून झेरॉक्स करून शाळाना पुरविण्यात याव्यात. अनावश्यक झेरॉक्स काढल्या जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
शासकीय कार्यपद्धतीनुसार कमीत कमी दराने झेरॉक्स करून त्याचे देयक शिक्षणाधिकारी यांनी एकत्रित सादर करावे.
काही ठिकाणी जास्त प्रश्नपत्रिका प्राप्त झाल्या असतील तर आपले स्तरावरून जेथे कमी असतील तेथे पोचवाव्यात.

• संकलित मूल्यमापन २ साठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या प्रश्नपत्रिका या फक्त शासकीय शाळा, खाजगी अनुदानित शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा या शाळांसाठीच पुरविण्यात आलेल्या आहेत. सदर प्रश्नपत्रिका विनाअनुदानित शाळा, स्वयंअर्थसहाय्यित शाळांसाठी पुरविण्यात आलेल्या नाहीत.
PAT ३ अंतर्गत या कार्यालयाकडील दि.२८/१२/२०२३ च्या पत्राप्रमाणे जिल्ह्यांकडून करण्यात आलेल्या मागणी पेक्षा प्रश्नपत्रिका कमी प्राप्त झाल्या असतील तरच झेरॉक्स देयक मान्य केले जाईल.
तसेच सदर झेरॉक्स देयक दिनांक १५.०४.२०२४ पर्यंत सदर कार्यालयास प्रत्यक्ष सादर करावेत.

• गोपनीयतेचा भंग होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.

तरी उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने तात्काळ कार्यवाही करून आवश्यक माहिती दिलेल्या नमुन्यात सादर करावी व सदर संकलित चाचणी नियोजित दिनांकास होईल याची दक्षता घ्यावी. निवडणुकीबाबत काही ठिकाणी प्रशिक्षण असण्याची शक्यता आहे. तेथे फक्त वेळेमध्ये बदल करण्याचा निर्णय परीस्थितीनुरूप स्थानिक प्रशासनाने घ्यावा.

सोबतः नियतकालिक मुल्यांकन चाचणी (PAT ३) अंतर्गत संकलित मूल्यमापन - २

करीता प्राप्त तसेच कमी अथवा जास्त प्रश्नपत्रिका मिळाल्याबाबत मागणीची

EXCEL sheet.

(शरद गोसावी)

संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,
 महाराष्ट्र पुणे.



Also Read -

STARS PROJECT PAT Summative Evaluation New Guidelines
महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे ७०८ सदाशिव पेठ, कुमठेकर मार्ग, पुणे ४११०३०
संपर्क क्रमांक (०२०) २४४७ ६९३८
E-mail: evaluationdept@maa.ac.in
जा.क्र. राशैसंप्रपम/पाचवी आठवी परीक्षा व PAT / मूल्यमापन/२०२३-२४/1675 

परीक्षा प्राधान्य / महत्त्वाचे

दि. 25/3/२०२४

प्रति,
१) शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) जि.प. (सर्व),
२) शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई, मनपा
३) शिक्षण निरीक्षक, मुंबई (उत्तर, दक्षिण, पश्चिम),
४) प्रशासन अधिकारी, म.न.पा../न.पा./नप (सर्व),

विषय:-  नियतकालिक मूल्यांकन (PAT) अंतर्गत संकलित मूल्यमापन चाचणी २ आणि इयत्ता पाचवी व आठवी वार्षिक परीक्षेसंदर्भात सुधारित सूचना देणेबाबत ...

संदर्भ:
१. शासन निर्णय क्रमांकः आरटीई-२०२२/प्र.क्र.२७६/एसडी.१ दि. ०७.१२.२०२३
२. प्रस्तुत कार्यालयाचे पत्र क्र. राशैसंप्रपम/मूल्यमापन/PAT संमू २/२०२३-२४/११८२ दि. ०७.०३.२०२४
उपरोक्त विषयाच्या अनुशंगाने संदर्भ क्र. २ अन्वये नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) (संकलित मूल्यमापन - २) व इयत्ता पाचवी व आठवी वार्षिक परीक्षेच्या आयोजनासंदर्भात सविस्तर सूचना देणेत आलेल्या होत्या. त्या अनुषंगाने सदर परीक्षांच्या बाबतीतील अधिक स्पष्टीकरणासाठी सविस्तर सूचना खालीलप्रमाणे आहेत. नियतकालिक मूल्यांकन अंतर्गत (संकलित मूल्यमापन - २)

२. नियतकालिक मूल्यांकन अंतर्गत संकलित मूल्यमापन २ द्वारे शासकीय व स्थानिक स्वराज संस्थांच्या आणि खाजगी अनुदानित शाळेतील इयत्ता तिसरी ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांची प्रथम भाषा, गणित व इंग्रजी या विषयांची दहा माध्यमात चाचणी घेण्यात येणार आहे. यासाठी राज्यस्तरावरून प्रश्नपत्रिका, उत्तर पत्रिका व उत्तर सूची पुरविण्यात येणार आहेत.

३. संदर्भ क्र. २ नुसार दिनांक ०२.०४.२०२४ ते ०४.०४.२०२४ या कालावधीत संकलित मूल्यमापन २ घेण्याचे नियोजन कळविण्यात आलेले होते. परंतु काही तांत्रिक कारणास्तव सदर संकलित मूल्यमापन - २ ही दि. ०४.०४.२०२४ ते ०६.०४.२०२४ या कालावधीमध्ये घेण्यात यावी. त्याचा सविस्तर तपशील पुढीलप्रमाणे.

संकलित मूल्यमापन - २ चे वेळापत्रक

३. इयता ३ री. ४ थी, ६ वी व ७ वी या इयत्तांना प्रथम भाषा, गणित व इंग्रजी हे विषय सोडून इतर विषयांच्या संकलित मूल्यमापन -२ च्या प्रश्नपत्रिका वर्ग/विषय शिक्षकांनी स्वतः तयार करून नियमानुसार आपल्या शाळेपुरते परीक्षा घेण्याचे नियोजन करावे.
४. वेळापत्रकात दिलेल्या वेळेत शाळेच्या स्थानिक गरजेनुसार बदल करता येतील परंतु दिनांक, विषय व इतरबा बतीत बदल करण्यात येऊ नयेत.
५. संकलित मूल्यमापन - २ अंमलबजावणी संदर्भात संदर्भ क्र. २ नुसार सविस्तर सूचना देण्यात आल्या आहेत. त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.
• इयता पाचवी व आठवीसाठी वार्षिक परीक्षाः
२. संदर्भ क्र. १ च्या शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे इयता पाचवी व आठवी करिता शिक्षकांनी स्वतः शालेय स्तरावर प्रश्नपत्रिकांची निर्मिती करून सर्व विषयांची वार्षिक परीक्षा एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात घेण्याचे नियोजन करावे. तसेच पुनर्परीक्षा व निकालासंदर्भात कार्यवाही करावी.
४. याकरिता राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे च्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या नमुन्याप्रमाणे प्रश्नपत्रिका तयार कराव्यात व वार्षिक परीक्षा घेणेत यावी. यासाठी राज्यस्तरावरून प्रश्नपत्रिका पुरविण्यात येणार नाहीत याची नोंद घ्यावी.
५. इयत्ता पाचवी व आठवी या वर्गाना PAT अंतर्गत उपरोल्लेखित तक्त्याप्रमाणे तीन विषयांची संकलित मूल्यमापन २ व शासन निर्णयानुसार या तीन विषयांसह सर्व विषयांची वार्षिक परीक्षा या दोन्ही परीक्षा स्वतंत्रपणे घेणे बंधनकारक आहे. ज्या शाळांना शासना मार्फत घेण्यात येणारी PAT३ लागू नाही त्यांनी फक्त सर्व विषयांच्या वार्षिक परीक्षेचे नियोजन विहित प्रक्रियेने करावयाचे आहे.

🙋 हे ही वाचा 

नियतकालिक मूल्यांकन (PAT) अंतर्गत संकलित मूल्यमापन चाचणी २ आणि इयत्ता पाचवी व आठवी वार्षिक परीक्षेसंदर्भात दि ०७ मार्च  २०२४ सूचना वाचण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा

(डॉ. शोभा खंदारे)

सहसंचालक,
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, 
महाराष्ट्र, पुणे

प्रत माहितीस्तव सविनय सादर :-

१. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई.
२. ३. मा. राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई. मा. आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.

👇👇👇👇👇

दरचे परिपत्रक पीडीएफ मध्ये डाऊनलोड करण्यासाठी फक्त ओळीला स्पर्श करा

👇👇👇👇👇

प्रत उचित कार्यवाहीस्तव :
१. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. (सर्व).
२. मा. आयुक्त, महानगरपालिका (सर्व).
३. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व),
Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon