Sarpanch Upsarpanch Mandan wadh GR
सरपंचांच्या व उपसरपंचांच्या मानधनात वाढ करण्याबाबत
प्रस्तावना -
महाराष्ट्रातील सरपंच संघटना व लोकप्रतिनिधी यांनी वेळोवेळी केलेल्या मागणीनुसार व काळाच्या ओघात महागाई निर्देशांकात झालेली वाढ, कर्तव्यात झालेली वाढ विचारात घेऊन तसेच सरपंच संघटनांच्या आझाद मैदान येथिल आंदोलनकर्त्यांना मा. मंत्री (ग्राम विकास) यांनी सरपंच व उपसरपंचांच्या मानधनात वाढ करण्याबाबत दिलेल्या आश्वासनच्या अनुषंगाने सरपंच व उपसरपंचांच्या मानधनात वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होता. संदर्भाधिन शासन निर्णय क्रमांक ४ अनुसार ग्रामपंचायतीची लोकसंख्यानिहाय वर्गवारी विचारात घेऊन सरपंच व उपसरपंचांना खालीलप्रमाणे दरमहा मानधन देण्यात येत होते-
हे ही वाचाल
ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी ही दोन्ही पदे एकत्रित करुन सदर पदाचे नामाभिदान "ग्रामपंचायत अधिकारी" करणेबाबत. वाचण्यासाठी या ओळीला स्पर्श करा
ग्रामपंचायतींची लोकसंख्यानिहाय वर्गवारी
अ) ० ते २००० पर्यंत लोक संख्येच्या ग्रामपंचायती
सरपंचांना मानधनाची दरमहा रक्कम (रुपये) ३,०००/
उपसरपंचांना मानधनाची दरमहा रक्कम (रुपये) १,०००/-
शासन अनुदान टक्केवारी ७५%
सरपंचांसाठी शासन अनुदानाची रक्कम २,२५०/-
उपसरपंचांसाठी शासन अनुदानाची रक्कम ७५०/-
ग्रामपंचायतींची लोकसंख्यानिहाय वर्गवारी
ब) २००१ ते ८००० पर्यंत लोकसंख्येच्या ग्रामपंचायती
सरपंचांना मानधनाची दरमहा रक्कम (रुपये) ४,०००/-
उपसरपंचांना मानधनाची दरमहा रक्कम (रुपये) १,५००/-
शासन अनुदान टक्केवारी ७५%
सरपंचांसाठी शासन अनुदानाची रक्कम ३,०००/-
उपसरपंचांसाठी शासन अनुदानाची रक्कम १,१२५/-
क) ८००१ पेक्षा जास्त लोक संख्येच्या ग्रामपंचायती
सरपंचांना मानधनाची दरमहा रक्कम (रुपये) ५,०००/-
उपसरपंचांना मानधनाची दरमहा रक्कम (रुपये) २,०००/-
शासन अनुदान टक्केवारी ७५%
सरपंचांसाठी शासन अनुदानाची रक्कम ३,७५०/-
उपसरपंचांसाठी शासन अनुदानाची रक्कम १,५००/-
शासन निर्णय -
ग्रामपंचायतीची लोकसंख्यानिहाय वर्गवारी विचारात घेऊन सरंपचांना आणि उपसरपंचांना खालीलप्रमाणे दरमहा मानधन अनुज्ञेय राहील.
ग्रामपंचायतींची लोकसंख्यानिहाय वर्गवारी
अ) ० ते २००० पर्यंत लोक संख्येच्या ग्रामपंचायती
सरपंचांना मानधनाची दरमहा रक्कम (रुपये) ६,०००/-
उपसरपंचांना मानधनाची दरमहा रक्कम (रुपये) २,०००/-
सरपंचांसाठी शासन अनुदानाची रक्कम ४,५००/-
उपसरपंचांसाठी शासन अनुदानाची रक्कम १,५००/-
ब) २००१ ते ८००० पर्यंत लोकसंख्येच्या ग्रामपंचायती
सरपंचांना मानधनाची दरमहा रक्कम (रुपये) ८,०००/-
उपसरपंचांना मानधनाची दरमहा रक्कम (रुपये) ३,०००/-
सरपंचांसाठी शासन अनुदानाची रक्कम ६,०००/-
उपसरपंचांसाठी शासन अनुदानाची रक्कम २,२५०/-
क) ८००१ पेक्षा जास्त लोक संख्येच्या ग्रामपंचायती
सरपंचांना मानधनाची दरमहा रक्कम (रुपये) १०,०००/-
उपसरपंचांना मानधनाची दरमहा रक्कम (रुपये) ४,०००/-
सरपंचांसाठी शासन अनुदानाची रक्कम ७,५००/-
उपसरपंचांसाठी शासन अनुदानाची रक्कम ३,०००/-
०२. सरपंच व उपसरपंच यांना देण्यात येणा-या मानधनावरील खर्चापैकी ७५% खर्च शासन उचलेल व उर्वरित २५% मानधनाची रक्कम संबंधित ग्रामपंचायत स्वनिधीमधून देईल.
०३. प्रस्तुत शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून सुधारित मानधन अनुज्ञेय राहील. तसेच पुर्वीच्या शासन निर्णयातील इतर अटी कायम राहतील.
०४. सरपंच व उपसरपंच मानधनाचा खर्च मागणी क्रमांक एल-२, प्रधानशिर्ष २०५३-जिल्हा प्रशासन, ०९३-जिल्हा आस्थापना-(०७) (०१)-ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य यांचे मानधन व इतर भत्ते आणि कर्मचा- यांचे किमान वेतन यासाठी अनुदाने (२०५३ १०४२)-३१-सहायक अनुदान याखाली खर्च करण्यात येईल.
०५. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक ६०१/२०२४/व्यय-१५, दि.०५/०९/२०२४५ अन्वये निर्गमित करण्यात येत आहे.
०६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या 🌐👉 www.maharashtra.gov.in 👈 या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२४०९२४१७३२५३५०२० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
(वर्षा मुं. भरोसे)
सह सचिव, महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग
शासन निर्णय क्रमांकः व्हीपीएम २०२४/प्र.क्र. २३४/पंरा-३ बांधकाम भवन,मुंबई
तारीख: २४ सप्टेंबर, २०२४
वाचा -
१) शासन निर्णय क्रमांकः व्हीपीएम २६९९/प्र.क्र.२०६ (२)/पंरा-३ दिनांक २१ जानेवारी २०००
२) शासन निर्णय क्रमांकः व्हीपीएम २००९/प्र.क्र. १२५/पंरा-३ दिनांक २७ जुलै, २००९
३) शासन निर्णय क्रमांकः व्हीपीएम २०११/प्र.क्र. ४०/पंरा-३ दिनांक ६ सप्टेंबर, २०१४
४) शासन निर्णय क्रमांक : व्हीपीएम २०१९/प्र.क्र. २५५/पंरा-३ दिनांक ३० जुलै, २०१९
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon