DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Annual Exam Summative Evaluation PAT Time Table SCERT Guidelines

Annual Exam Summative Evaluation PAT Time Table SCERT Guidelines

Annual Exam Summative Evaluation PAT Time Table SCERT Guidelines

गहाराष्ट्र शासन

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे

जा.क्र. राशैसंप्रपम / मूल्यमापन / स.चा.-२ जिल्हा सू. पत्र/२०२४-२५/022-57 प्रति,

दि. ३/०४/२०२५ 41041025

१. विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व),

२. विभागीय विद्याप्राधिकरण (सर्व),

३. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व),

४. शिक्षणाधिकारी (प्राथ. / माध्य. व योजना) जि.प. (सर्व),

५. शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई, मनपा,

६. शिक्षण निरीक्षक, मुंबई (उत्तर, दक्षिण, पश्चिम),

७. प्रशासन अधिकारी, म.न.पा./न.पा./न. प. (सर्व),

विषय : इयत्ता ३ री ते ९ वी नियतकालिक मूल्यांकन चाचणी अंतर्गत इयत्ता १ ली ते ९ वी संकलित चाचणी -२ (PAT-३) तसेच इयत्ता ५ वी, ८ वी व ९ वी वार्षिक परीक्षेसाठी अंमलबजावणी करणे करिता सूचना कळविणेबाबत.......

संदर्भ : १. राज्यातील शिक्षणपध्दतीचे अध्यापन, अध्ययन व परिणाम यांचे वळकटीकरण (Strengthening Teaching-Learning And Results for States) केंद्रपुरस्कृत प्रकल्प मान्यता देण्याबाबत शासन निर्णय, दिनांक ११ फेब्रुवारी २०२१.

२. राज्यातील शिक्षण पध्दतीचे अध्यापन, अध्ययन व परिणाम यांचे बळकटीकरण (Strengthening Teaching - Learning And Results for States) केंद्र पुरस्कृत प्रकल्प राज्य अनुदान वितरण वित्तीय नियमावली मार्गदर्शक तत्वे.

३. इयत्ता पाचवी व आठवी वार्षिक परीक्षा शासन निर्णय दि.०७/१२/२०२३

४. STAR प्रकल्प अतर्गत मंजूर PAB मिटिंगचे इतिवृत्त, दि. ३१ मार्च २०२४

५. शिक्षण आयुक्त कार्यालयाचे पत्र जा. क्र. अशिका/प्राथमिक/२०२५/०११३० दि.०५/०३/२०२५

उपरोक्त विषयान्वये या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी तीन नियतकालिक मूल्यांकन चाचण्याचे (PAT) आयोजन करण्यातयेत आहे. यास अनुसरून २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी १ व संकलित मूल्यमापन चाचणी -२ अशा तीन नियतकालिक चाचण्यांचे नियोजन करण्यात आलेले आहे. इयत्ता ३ री ते ९ वी नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT-३) चे आयोजन दि. ०८ ते २५ एप्रिल २०२५ या खातरजमा करूनच विषय, माध्यम व इयत्तानिहाय गठे मोजूनच गड्ढे / प्रती कमी किंवा जास्त असतील तर तसे पोहोच पावतीवर स्पष्टपणे नमूद करून पोहोच द्यावी.

उ. तालुका समन्वयकांनी सदर चाचणी पत्रिका समक्ष मोजूनच आवश्यक तेवढ्या मुख्याध्यापकांच्या ताब्यात द्यावयाच्या आहेत. तसेच झेरॉक्ससाठी तालुका समन्वयकांनी कोणत्याही चाचणी पत्रिका अथवा इतर साहित्य बाहेर जाणार नाही याची दक्षता घ्यावी.

ऊ. शाळा स्तरावरील चाचणी पत्रिका वेळापत्रकाप्रमाणे त्या दिवशी वापरल्या जातील याची दक्षता घ्यावी.

८ चाचणी पत्रिकाचा मोबाईल मधून फोटो काढणे, समाजमाध्यमाद्वारे इतरांना पाठविणे असे गैरप्रकार होणार नाहीत याची दक्षता घेण्यात यावी. प्रश्नपत्रिकांची गोपनियता काटेकोरपणे पाळण्यात यावी. गोपनीयता भंग झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर नियमानुसार प्रशासकीय कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

९ तालुका स्तरावर चाचणी पत्रिका ताब्यात घेणे, सुरक्षित ठिकाणी ठेवणे व त्याचे शाळानिहाय वाटप करणे तसेच चाचणीचे कामकाज सुरळीतपणे होण्याची सर्वस्वी जबाबदारी तालुका समन्वयकाबरोबरच गटशिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी यांची राहील.

१० जिल्हास्तरावर प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक) जिल्हा परिषद (सर्व) यांची संकलित चाचणी २ (PAT ३) आयोजनाबाबत सर्वस्वी जबाबदारी असेल.

११ शिक्षणाधिकारी यांचेकडून प्राप्त सांख्यिकीय माहितीच्या आधारे चाचणी पत्रिका वितरीत करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे चाचणी पत्रिका कमी पडल्यास अथवा XEROX काढण्यात येणाऱ्या प्रश्नपत्रिकांचे देयक कोणत्याही परिस्थितीत अदा करण्यात येणार नाही त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित शिक्षणाधिकारी (प्राथ/माध्य.)/ शिक्षण निरीक्षक / प्रशासन अधिकारी (मनपा/नपा) यांची असेल याची नोंद घ्यावी. तसेच सर्व विद्यार्थ्यांना चाचणी पत्रिका मिळतील याची जबाबदारी शिक्षणाधिकारी/प्राचार्य DIET यांची वैयक्तिकरित्या राहील.

१२ संकलित चाचणी-२ (PAT ३) कालावधीत सर्व विद्यार्थी उपस्थित राहतील याची दक्षता घ्यावी. एखादा विद्यार्थी गैरहजर असल्यास तो शाळेत हजर झालेल्या दिवशी त्याची परीक्षा घेण्यात यावी.

१३ दिव्यांग विद्यार्थ्यांच्या बाबतीत सदर चाचणी घेण्याबाबतचा निर्णय संबधित विद्यार्थ्याच्या दिव्यांग प्रकारावरून शाळा मुख्याध्यापक व शिक्षक यांनी घ्यावा. आवश्यकतेनुसार विशेष तज्ज्ञ किंवा विशेष शिक्षक यांची मदत घ्यावी

१४ प्रस्तुत संकलित चाचणी २ (PAT ३) बाबत शिक्षकांना आवश्यक सर्वसाधारण सूचना शिक्षक सूचनापत्रात देण्यात आलेल्या आहेत. शिक्षकांनी सदर सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करून अनुषंगिक कार्यवाही करावी. तसेच या शिक्षक सूचना www.maa.ac in या वेबसाईटवर परीक्षेपूर्वी उपलब्ध असेल. उत्तरसूची परीक्षेदिवशी संध्याकाळी वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात येईल. त्यानुसार उत्तरपत्रिका तपासण्यात याव्यात.

१५ शिक्षक सूचना व उत्तरसूची ही फक्त शिक्षकासाठी आहे, ती विद्यार्थ्यांना देऊ नये. विद्यार्थ्यांना फक्त चाचणी पत्रिका देण्यात याव्यात.

१६ संकलित चाचणी २ (PAT ३) ची गुण नोंद प्रश्नपत्रिकेच्या पहिल्या पानावर दिलेल्या अध्ययन निष्पत्तीनिहाय रकान्यात भरावी.

१७ संकलित चाचणी-२ मधील गुणांच्या आधारे शिक्षकांनी विद्यार्थीनिहाय कृतिकार्यक्रम तयार करून अंमलबजावणी करावी.

• चाचणी कालावधीत करावयाच्या शाळा भेटीबाबत -

१. जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांच्या शाळानिहाय भेटीचे दिनांकासहित नियोजन प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, व शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक) यांनी एकत्रितरित्या बैठक घेऊन करावे.

२. जिल्हास्तरावरून केलेले नियोजन संबधित तालुक्यांना कळवावे. प्रत्येक तालुक्यांनी जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांना दिलेल्या भेटीच्या शाळा वगळून उर्वरित शाळांसाठी शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, विषय सहाय्यक, विषय साधन व्यक्ती व विशेष तज्ज्ञ यांच्या शाळा भेटीचे नियोजन करावे.

३. संकलित चाचणी-२ कालावधीत राज्यातील १०० टक्के शाळाभेटी होतील यासाठी संबंधित जिल्ह्यातील प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, व शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक) व पर्यवेक्षीय यंत्रणेतील सर्व अधिकारी/कर्मचारी यांनी दक्षता घ्यावी.

४. तपासणी केलेल्या १०% उत्तरपत्रिकांची RANDAMLY तपासणी करण्याचे नियोजन शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक व प्राचार्य जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था यांनी करावे.

उपरोक्त नियोजनानुसार दिलेल्या वेळेत सर्व नमूद इयत्तांची चाचणी होईल याप्रमाणे नियोजन करण्याची जबाबदारी शाळेच्या मुख्याध्यापकांची असेल. तथापि, अपवादात्मक किंवा स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन काही बदल करायचे असल्यास संबधित शिक्षणाधिकारी यांनी या कार्यालयाची परवानगी घेवूनच वेळापत्रकात बदल करावा.

वरीलप्रमाणे आपल्या अधिनस्त संबंधित सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक यांचेपर्यंत संकलित चाचणी -२ च्या अनुषंगाने योग्य त्या कार्यवाहीसाठी सूचना द्याव्यात.

संकलित चाचणी -२ चे गुण हे विद्या समीक्षा केंद्र (VSK) येथे नोंदवण्यात येणार आहे. त्याकरिता संबंधित शाळेच्या शिक्षकांनी चाचणी तपासून त्याचे गुण विद्या समीक्षा केंद्र (VSK) यांचे मार्फत उपलब्ध पोर्टलवर विहित कालावधीत भरायचे असून याबाबतच्या सविस्तर सूचना यथावकाश देण्यात येतील याची नोंद घेण्यात यावी.


संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे


क्र.आशिका/प्राथमिक/२०२५/1130 
दि.:  मार्च, २०२५ 

05 MAR 2025 

विषय - राज्यातील सर्व शाळांमध्ये इ.१ ली ते ९ वी इयत्तांसाठी वार्षिक परीक्षा / संकलित मूल्यमापन /PAT चाचण्यांचे आयोजन एकाच वेळी करणेबाबत
 
संदर्भ राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे यांचे पत्र जा.क्र. राशैसंप्रपम/मुल्यमापन / PAT/२०२५ दि. २७.०२.२०२५ 

संदर्भीय पत्राचे अवलोकन व्हावे. (प्रत संलग्न) 

    राज्यातील शाळांमध्ये इयत्ता १ ली ते ९ वी वर्गाच्या परीक्षा साधारणपणे मार्च अखेरीस अथवा एप्रिल महिन्यांमध्ये शाळास्तरावरुन घेण्यात येतात. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीसच वार्षिक परीक्षा पूर्ण झाल्यास त्यानंतरच्या कालावधीत शाळा सुरु असल्या तरी विद्यार्थी उपस्थिती पुरेशी असत नाही. अशा पद्धतीने परीक्षांचे आयोजन वर्षा अखेर करण्याऐवजी लवकर केल्यामुळे विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी मिळणारा कालावधी कमी होतो. तसेच प्रत्येक शाळेचे वेळापत्रक वेगवेगळे असल्याचे निदर्शनास येते. सबब, राज्यातील सर्व शाळांमध्ये एकवाक्यता असावी व उपलब्ध वेळेचा पुरेपुर उपयोग विद्यार्थ्यांच्या अध्ययनासाठी व्हावा, यासाठी मा. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांनी संदर्भीय पत्राद्वारे राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये इयत्ता १ ली ते ९ वीच्या वार्षिक परीक्षा/यंकलित चाचणी २ व नियताकालीक मूल्यांकन (PAT) सन २०२४-२५ साठी वेळापत्रक जाहिर केले आहे. 

प्रश्नपत्रिका लिंक 


सदरचे वेळापत्रक विहित मुदतीत आपल्या अधिनस्थ क्षेत्रातील सर्व शाळांच्या निदर्शनास आणून देऊन वेळापत्रकाप्रमाणे परीक्षांचे आयोजन होईल यादृष्टीने आवश्यक कार्यवाही व नियोजन करावे. अपवादात्मक अथवा स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन वरील नियोजनात बदल करावयाचे असल्यास शिक्षणाधिकारी यांनी मा. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांची परवानगी घेवूनच बदल करावा. 

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे
PAT 3 (2024-2025) चाचणी संदर्भात-शिक्षक मार्गदर्शिका,उत्तर सूची व विद्यार्थी चाचणी पत्रिका STARS अंतर्गत PAT ३ संकलित चाचणी - 2 एप्रिल २०२५ साठीच्या इयत्ता निहाय, विषयनिहाय व माध्यम निहाय  शिक्षक मार्गदर्शिका  Download करण्यासाठी खालील लिंक वर टिचकीकरा.

 

मार्गदर्शिका लिंक

टीप : उत्तर सूची ज्या दिवशी ज्या विषयाची चाचणी असेल त्या दिवशी साय.५.०० वाजता खालील लिंक वर उपलब्ध असेल.

उत्तरसूची लिंक 

विषयनिहाय चाचणी पत्रिका वेळापत्रका प्रमाणे चाचणी झाल्यानंतर त्या त्या दिवशी असणाऱ्या विषयाच्या नियोजनानुसार  खालील लिंकवर उपलब्ध होतील.
विद्यार्थी चाचणी पत्रिका

विद्यार्थी चाचणी पत्रिका लिंक 

मूल्यमापन विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र,पुणे

गुण नोंद तक्ते


टिप - मा. आयुक्त शिक्षण यांच्या मान्यतेने 
(रंजनी रावडे) शिक्षण उपसंचालक (प्रशासन)
महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय 
महाराष्ट्र राज्य, पुणे
प्रति, 
शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), सर्व जिल्हे प्रशासन अधिकारी (न.पा./म.न.पा.), सर्व शिक्षण निरीक्षक, मुंबई (पश्चिम/दक्षिण/उत्तर) 


Annual Exam Summative Evaluation PAT Time table SCERT Guidelines  

विषयः राज्यातील सर्व शाळांमध्ये इ. १ ली ते ९ वी इयत्तांसाठी वार्षिक परीक्षा / संकलित मूल्यमापन / PAT चाचण्यांचे आयोजन एकाच वेळी करणेबाबत. 

संदर्भ: 
१. शासन निर्णय, दिनांक ११ फेब्रुवारी २०२१ (STARS) 
२. इयत्ता पाचवी व आठवी वार्षिक परीक्षा शासन निर्णय क्र. आरटीई २०२२/प्र.क्र.२७६/एस.डी-१ दि. ०७/१२/२०२३ 

महोदय, 
राज्यातील शाळांमध्ये इयत्ता १ ली ते ९ वी वर्गाच्या परीक्षा साधारणपणे मार्च अखेरीस अथवा एप्रिल महिन्यांमध्ये शाळास्तरावरुन घेण्यात येतात. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीसच वार्षिक परीक्षा पूर्ण झाल्यास त्यानंतरच्या कालावधीत शाळा सुरु असल्या तरी विद्यार्थी उपस्थिती पुरेशी असत नाही. अशा पद्धतीने परीक्षांचे आयोजन वर्षा अखेर करण्याऐवजी लवकर केल्यामुळे विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी मिळणारा कालावधी कमी होतो. तसेच प्रत्येक शाळेचे वेळापत्रक वेगवेगळे असल्याचे निदर्शनास येते. सबब, राज्यातील सर्व शाळांमध्ये एकवाक्यता असावी व उपलब्ध वेळेचा पुरेपुर उपयोग विद्यार्थ्यांच्या अध्ययनासाठी व्हावा यासाठी राज्यातील शाळांमध्ये वार्षाअखेरीस घेण्यात येणारे मूल्यमापन एप्रिल महिन्याच्या उत्तरार्धात करण्याचे विचाराधीन आहे. 
राज्यातील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित शाळांमध्ये इयत्ता तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन चाचण्यांचे (PAT) आयोजन करण्यात येत आहे. यास अनुसरून सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी- १ व संकलित मूल्यमापन चाचणी-२ अशा तीन चाचण्यांचे आयाजन करण्यता येणार आहे. त्यासोबत चालू शैक्षणिक वर्षात राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये इयत्ता १ ली ते ९ वीच्या वार्षिक परीक्षांचा कालावधी समान ठेवण्यासाठी याद्वारे सूचना निर्गमित करण्यात येत आहेत. 

सन.२०२४-२५ मध्ये राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांसाठी वार्षिक परीक्षा व संकलित चाचणी २ (नियतकालिक मूल्यांकन चाचणी PAT) आयोजनाबाबत वेळापत्रक खालीलप्रमाणे देण्यात येत आहे.

वार्षिक परीक्षा /संकलित बाचणी २ व नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) आयोजनाबाबत 
येळापत्रक २०२४-२५ 
इयत्ता १ ली ते ९ वी (लेखी मूल्यमापनाकरिता) (राजमंडळ संलग्न सर्व माध्यम व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांसाठी)


सर्वसाधारण सूचनाः 

१) संकलित मूल्यमापन- २ साठी परीक्षांचे आयोजन शाळा स्तरावरुन करण्यात येईल तथापि त्यांसाठी यासोबत दिलेल्या वेळापत्रकाचा वापर करण्यात यावा. 
२) शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच खाजगी अनुदानित शाळांना PAT अंतर्गत इयत्ता ३ री ते ९ वी साठी प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या विषयांसाठी संकलित मूल्यमापन- २ च्या प्रश्नपत्रिका राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे या कार्यालयाकडून पुरविण्यात येतील. इतर व्यवस्थापनाच्या शाळांना सर्व प्रश्नपत्रिका शाळा स्तरावर तयार करावयाच्या आहेत. 
३) इयत्ता १ ली व २ री साठी सर्व विषयांच्या व इ. ३ री ते ९ वी अन्य विषयांच्या संकलित चाचणी-२/लेखी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका शाळा स्तरावर विकसित करून प्रचलित पद्धतीनुसार मूल्यमापन करावे. 
४) इयत्ता ९ वी साठी PAT शिवाय अन्य विषयांसाठी वेळापत्रक यासोबत देण्यात आलेले नाही ते शाळास्तरावरून ठरविण्यात यावे. 
५) वेळापत्रकात नमूद न केलेल्या (कलाशिक्षण, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण, इत्यादी) श्रेणी विषयांच्या मूल्यमापनाचे नियोजन शाळास्तरावर करण्यात यावे. 
६) शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच खाजगी अनुदानित शाळांना PAT अंतर्गत पुरविण्यात येणाऱ्या प्रश्नपत्रिकांचा वापर करूनच त्या विषयाची संकलित चाचणी २ घ्यावयाची आहे. इतर विषयांसाठी शाळास्तरावर प्रश्नपत्रिका तयार करून संकलित चाचणी-२ घेण्यात यावी. 
७) तथापि, इयत्ता ५ वी व ८ वी वर्गासाठी वार्षिक परीक्षा शासन निर्णय दि. ०७/१२/२०२३ मधील तरतूदीनुसार स्वतंत्रपणे शाळांनी सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका स्वतः तयार करून घ्यावयाची आहे. PAT-३ अंतर्गत दिलेल्या प्रश्नपत्रिका वार्षिक परीक्षा म्हणून वापरता येणार नाही. 
टीप- इ. ५ वी व इ.८ वी मधील विद्यार्थ्यांना प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या विषयांसाठी दोन प्रश्नपत्रिका सोडावाव्या लागतील. त्यानुसार नियोजन करावे. इयत्ता पाचवी व आठवी वगळता अन्य इयत्तांकरिता कोणत्याही विषयांची दुबार परीक्षा होणार नाही याची दक्षता घ्यावी. 
८) शाळेच्या स्थानिक वेळेनुसार (सकाळ सत्र / दुपार सत्र) परीक्षेचे नियोजन करण्याचे स्वातंत्र्य शाळांना राहील. तथापि यासोबत दिलेल्या वेळापत्रकानुसार त्या विषयाची परीक्षा त्याच तारखेस हईल याची दक्षता घ्यावी. 
९) तोंडी / प्रात्यक्षिक परीक्षा त्या-त्या दिवशी लेखी परीक्षेनंतर घेण्यात यावी. विद्यार्थी संख्या जास्त असेल तर दुसऱ्या दिवशी अथवा उपलब्ध वेळेनुसार घ्यावी.
१०) संकलित चाचणी- २ च्या कालावधीत शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित राहतील याची दक्षता घ्यावी. एखादा विद्यार्थी त्या विषयाच्या परीक्षेच्या दिवशी गैरहजर असल्यास तो शाळेत हजर झालेल्या दिवशी त्याची परीक्षा घेण्यात यावी. 
११) राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळांचा निकाल महाराष्ट्र दिन ध्वजारोहनानंतर दि. ०१/०५/२०२५ रोजी जाहीर करण्यात यावा. याचबरोबर ०२ मे २०२५ पासून सर्व शाळांना उन्हाळी सुट्टी सुरु होईल. 
१२) सदर सूबना राज्यमंडळाव्यतिरिक्त अन्य मंडळाच्या शाळांना लागू असणार नाहीत. 
संकलित बाचणी- २ आयोजनाची जबाबदारी जिल्हास्तरावर प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक) यांची असेल. त्यांनी सदर वेळापत्रक हे संबंधित सर्व शाळांच्या निदर्शनास येईल याची दक्षता घ्यावी. 
उपरोक्त नियोजनानुसार दिलेल्या वेळेत सर्व नमूद इयत्तांची चाचणी होईल याप्रमाणे नियोजन करण्याची जबाबदारी शाळेच्या मुख्याध्यापकांची असेल. तथापि, अपवादात्मक किंवा स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन काही बदल करायचे असल्यास संबधित शिक्षणाधिकारी यांनी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांची परवानगी घेवूनच वेळापत्रकात बदल करावा. 
वरीलप्रमाणे सूचना शाळा व पर्यवेक्षकीय यंत्रणा यांचेसाठी निर्गमित करण्याबात कार्यवाहीसाठी आपले स्तरावरून आदेश व्हावेत ही विनंती. 
आपला विश्वासू, 

Circular Pdf Copy Link


संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र. पुणे.


Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon