DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

STARS PROJECT PAT 2024 25 SCERT CIRCULAR


STARS PROJECT PAT 2024-25 SCERT GUIDELINE

महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे


जा.क्र. राशैसंप्रपम / मूल्यमापन/पायाभूत मूल्यमापन चाचणी -VSK/२०२४-२५/०३५८९ 

दि. २६ जुलै २०२४

प्रति,

१) शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) जि.प. (सर्व)

२) शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई, मनपा, (सर्व)

३) शिक्षण निरीक्षक, मुंबई (उत्तर, दक्षिण, पश्चिम)

४) प्रशासन अधिकारी, म.न.पा./न.पा./न. प. (सर्व)

विषय : पायाभूत मूल्यमापन चाचणी (PAT-१) (महाराष्ट्र) या चाटबॉटवर गुण नोंदविणेबाबत.... 

संदर्भ : १. या कार्यालयाचे पत्र जा.क्र. राशैसंप्रपम/मूल्यमापन/पायाभूत चाचणी/२०२४- २५/०२९२६, दि.१९ जून २०२४.

उपरोक्त विषयान्वये STARS प्रकल्पामधील SIG-२ limproved Learning Assessment System नुसार सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन (PAT) अंतर्गत पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन १ व संकलित मूल्यमापन २ (PAT-१ ते ३) चे आयोजन करण्यात येणार आहे. उपरोक्त संदर्भानुसार राज्यात पायाभूत मूल्यमापन चाचणी PAT-१ चे आयोजन दि. १० ते १२ जुलै २०२४ या कालावधीत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी अनुदानित शाळामध्ये करण्यात आलेले होते. प्रथम भाषा (सर्व माध्यम), गणित (सर्व माध्यम), तृतीय भाषा इंग्रजी या विषयांचे पायाभूत मूल्यमापन चाचणी PAT-१ घेण्यात आलेली आहे. सदर पायाभूत मूल्यमापन चाचणी PAT-१ शिक्षकांनी तपासणेबाबत सूचित करण्यात आलेले होते. तसेच सदर मूल्यमापनाचे गुण विद्या समीक्षा केंद्र (VSK) यांचेमार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या पोर्टलवर भरायचे असून याबाबतच्या सविस्तर सूचना यापूर्वी यु-ट्युबद्वारे देण्यात आलेल्या आहेत.

विद्या समीक्षा केंद्र (VSK), पुणे यांचेमार्फत PAT (महाराष्ट्र) हा चाटबॉट पायाभूत मूल्यमापन चाचणी PAT-१ गुण भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. यावर पायाभूत मूल्यमापन चाचणी PAT-१ शिक्षकांनी नोंदविणे आवश्यक आहे. सदर चाटबॉटवर पायाभूत मूल्यमापन चाचणी PAT-१ चे गुण शिक्षकांनी कसे नोंदवावेत याच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना

सोबत देण्यात येत आहे. तसेच याबाबतच्या व्हिडीओची यु-ट्यूब लिंक प्रस्तुत कार्यालयाच्या संकेतस्थळावर देण्यात येणार आहे. राज्यातील शिक्षकांना पायाभूत चाचणी (PAT-१) चे गुण दि. २७ जुलै २०२४ ते दि. २० ऑगस्ट २०२४ पर्यंतचा PAT (महाराष्ट्र) या चाटबॉटवर नोंदविणेकरिता जिल्ह्यांना कालावधी देण्यात येत आहे.

उपरोक्त कामकाजासाठी जिल्हा शिक्षणाधिकारी प्राथ/माध्य., शिक्षण निरीक्षक व प्रशासन अधिकारी, म.न.पा./न.पा. यांनी आपल्या कार्यालयातील एका अधिकाऱ्याकडे PAT (महाराष्ट्र) जिल्हा समन्वयक म्हणून जबाबदारी यापूर्वी निश्चित केलेली असेल. त्यानुसार सदर जिल्हा समन्वयक यांनी जिल्हातील सर्व शिक्षकांना विद्या समीक्षा केंद्र (VSK), पुणे यांचेमार्फत PAT (महाराष्ट्र) हा चाटबॉटवर पायाभूत मूल्यमापन चाचणी PAT-१ चे गुण कसे भरावेत याबाबत आवश्यकतेनुसार मार्गदर्शन करावे. तसेच ज्या शाळांमध्ये पायाभूत मूल्यमापन चाचणी PAT-१ घेण्यात आलेली आहे. अशा इयत्ता तिसरी ते नववीच्या शाळामधील विषयनिहाय विद्यार्थ्यांचे गुण चाटबॉटवर नोंदविणेबाबत कार्यवाही करण्यात यावी. चाटबॉटच्या बाबतीत तांत्रिक अडचण येणाऱ्या शिक्षकांनी सोबत दिलेल्या गुगल लिंकवर प्रतिसाद नोंदवावा.
तरी आपल्या अधिनस्थ शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक यांना याबाबतची आवश्यक कार्यवाही करण्याबाबत सूचित करण्यात यावे. 
१. पायाभूत मूल्यमापन चाचणी (PAT-१) चाटबॉट मार्गदर्शिका :
२. पायाभूत मूल्यमापन चाचणी (PAT-१) गुणांची नोंद करणेसाठी लिंक -


(डॉ. शोभा खंदारे)
सहसंचाल
सहसंचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.

  STARS प्रकल्प अंतर्गत पायाभूत चाचणीचे गुण PAT (महाराष्ट्र) या चाटबॉटवर नोंदणी सुरू

पायाभूत चाचणी (PAT 1) जुलै 2024 च्या  गुण नोंदविण्याची सुविधा उपलब्ध

STARS प्रकल्प अंतर्गत नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत पायाभूत चाचणी २०२४-२५ आयोजनाबाबत....
सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी तीन नियतकालिक मूल्यांकन चाचण्याचे (PAT) आयोजन करण्यात येत आहे. यास अनुसरून पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी १ व संकलित मूल्यमापन चाचणी-२ अशा तीन नियतकालिक चाचण्यांचे नियोजन करण्यात आलेले आहे. त्यापैकी नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत पायाभूत चाचणी दि. १० ते १२ जुलै २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात आली होती.

सदर चाचणी अंतर्गत प्रथम भाषा, गणित, व तृतीय भाषा (इंग्रजी) या विषयांच्या इयत्ता ३ री ते ९ वीतील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शाळा तसेच खाजगी अनुदानित सर्व शाळातील विद्यार्थ्यांची पायाभूत चाचणी विहित कालावधीत घेण्यात आली आहे सदर नियतकालिक मूल्यांकन चाचणीचे (PAT) गुण आपल्याला ऑनलाइन भरावयाचे असून गुण नोंदविण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.

➤ गुण नोंदविण्याची सुविधा उपलब्ध


⏬⏬⏬⏬⏬⏬


गुण भरण्यासाठी लिंक LINK

यु-ट्यूब लिंक :

PAT चाटबॉट मार्गदर्शिका LINK 

चाटबॉटवर पायाभूत चाचणीचे गुण शिक्षकांनी कसे नोंदवावेत याच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना व याबाबतच्या व्हिडीओची यु-ट्यूब लिंक सोबत देण्यात येत आहे यु-ट्यूब लिंक आणि PAT चाटबॉट मार्गदर्शिकासाठी फक्त ओळीला स्पर्श करा / वर टिचकी मारा

PAT(Periodic Assesment Test) परीक्षेचे गुण चॅटबॉटवर भरत असताना येणाऱ्या काही तांत्रिक अडचणी आणि त्यावरील उपाय फक्त ओळीला स्पर्श करा / वर टिचकी मारा


विद्या समीक्षा केंद्र,
SCERT, महाराष्ट्र, पुणे


पायाभूत चाचणी (PAT 1) जुलै 2024 च्या इयत्तानिहाय, माध्यमनिहाय व विषयनिहाय शिक्षक सूचना व उत्तरसूची परिषदेच्या संकेत स्थळावर उपलब्ध करून दिलेबाबत

खालील लिंक वर उत्तर सूची उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आपण पीडीएफ स्वरूपामध्ये ती डाऊनलोड करू शकता लिंक 

👉 LINK

         ( राहूल रेखावार, भाप्रसे)
                  संचालक
       राज्य शैक्षणिक संशोधन व     
    प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे


पायाभूत चाचणी (PAT 1) जुलै 2024 च्या इयत्तानिहाय, माध्यमनिहाय व विषयनिहाय विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या गुणांची नोंद करण्यासाठी गुण नोंद तक्ते खालील लिंक वर उपलब्ध करून देण्यात येत आहेत 

इयत्ता तिसरी इयत्ता चौथी इयत्ता पाचवी इयत्ता सहावी इयत्ता सातवी इयत्ता आठवी इयत्ता नववी हव्या असलेल्या इयत्तेच्या विषयनिहाय गुण नोंद तक्त्यावर टिचकी मारून डाऊनलोड करून घ्या 


Gun Nond Chart pdf LINK



STARS PROJECT PAT 2024-25 SCERT PUNE CIRCULAR 

पायाभूत चाचणी (PAT 1) जुलै 2024 च्या इयत्तानिहाय, माध्यमनिहाय व विषयनिहाय शिक्षक सूचना व उत्तरसूची परिषदेच्या संकेत स्थळावर उपलब्ध करून दिलेबाबत

प्रति,
१) विभागीय शिक्षण उपसंचालक(सर्व)
२) उपसंचालक, प्रादेशिक 
     विद्याप्रधिकरण (सर्व)
३) प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण    
      संस्था(सर्व)
४) शिक्षणाधिकारी (प्राथमिक,   
      माध्यमिक),सर्व
५) शिक्षण निरीक्षक मुंबई उत्तर/   
      दक्षिण/ पश्चिम
६) प्रशासन अधिकारी (म.न. पा., न.  
     पा.,न. प.),सर्व

विषय- पायाभूत चाचणी (PAT 1) जुलै 2024 च्या इयत्तानिहाय, माध्यमनिहाय व विषयनिहाय शिक्षक सूचना व उत्तरसूची परिषदेच्या संकेत स्थळावर उपलब्ध करून दिलेबाबत

 उपरोक्त विषयान्वये कळविण्यात येते की, शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित शाळा यांमधील इ ३ री ते ९ वी या वर्गातील विद्यार्थांची प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा या विषयांसाठीची पायाभूत चाचणी दि १० ते १२ जुलै २०२४ या कालावधित होणार आहे . सदर चाचणी साठीच्या प्रश्नपत्रिका शाळास्तरांपर्यंत पोहोच झालेल्या आहेत शिक्षक सूचना व उत्तरसूची या परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. संकेतस्थळावरील किंवा सोबत दिलेल्या लिंकवर जावून आपण शिक्षक सूचना व उत्तरसूची डाऊनलोड करून घेऊ शकता .याची माहिती आपले स्तरावरून आपल्या अधिनस्थ शाळांपर्यंत व शिक्षकांपर्यंत देण्यात यावी 

शिक्षक सूचना पाहण्यासाठी लिं 

👉  LINK


         ( राहूल रेखावार, भाप्रसे)
                  संचालक
       राज्य शैक्षणिक संशोधन व     
    प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

Also Read 👇 

Foundation Test 2024-25 School Visits under Periodic Assessment Test (PAT) under STARS project

महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे ७०८ सदाशिव पेठ, कुमठेकर मार्ग, पुणे 

जा.क्र. राशैसंप्रपम/PAT-१/शाळाभेट /२०२४-२५/०३३०४ 

प्रति,

दि. ८/०७/२०२४

१) विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व),

२) विभागीय विद्याप्राधिकरण (सर्व),

३) प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व),

४) शिक्षणाधिकारी (प्राथ / माध्य. व योजना) जि.प. (सर्व),

५) शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई, मनपा,

६) शिक्षण निरीक्षक, मुंबई (उत्तर, दक्षिण, पश्चिम),

७) प्रशासन अधिकारी, म.न.पा./न.पा./न. प. (सर्व),

विषयः - STARS प्रकल्प अंतर्गत नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत पायाभूत चाचणी २०२४-२५ शाळा भेटीबाबत

संदर्भ : १. राज्यातील शिक्षणपध्दतीचे अध्यापन, अध्ययन व परिणाम यांचे बळकटीकरण (Strengthening Teaching-Learning And Results for States) केंद्रपुरस्कृत प्रकल्प मान्यता देण्याबाबत शासन निर्णय, दिनांक ११ फेब्रुवारी २०२१.

२. राज्यातील शिक्षण पध्दतीचे अध्यापन, अध्ययन व परिणाम यांचे बळकटीकरण (Strengthening Teaching-Learnig And Results for States) केंद्र पुरस्कृत प्रकल्प राज्य अनुदान वितरण वित्तीय नियमावली मार्गदर्शक तत्वे.

३. STAR प्रकल्प अतर्गत मंजूर PAB मिटिंगचे इतिवृत्त, दि. ३१ मार्च २०२४ ४. मा. संचालक, रा.शै.सं.प्र.प.म.पुणे, यांचे पत्र जा.क्र. राशैसंवप्रपम/मूल्यमापन/पा.चा. जिल्हा पत्र २०२४-२५/०२९२६ 
दि.३१-०५-२०२४

उपरोक्त संदर्भीय विषयान्वये सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी खालील तीन नियतकालिक मूल्यांकन चाचण्याचे (PAT) आयोजन करण्यात येत आहे. यास अनुसरून पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी १ व संकलित मूल्यमापन चाचणी-२ अशा तीन नियतकालिक चाचण्यांचे नियोजन करण्यात आलेले आहे. नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत पायाभूत चाचणी दि. १० ते १२ जुलै २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे.

सदर चाचणी अंतर्गत प्रथम भाषा, गणित, व तृतीय भाषा (इंग्रजी) या विषयांच्या इयत्ता ३ री ते ९ वीतील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शाळा तसेच खाजगी अनुदानित सर्व शाळातील विद्यार्थ्यांची पायाभूत चाचणी होणार आहे.

पायाभूत चाचणी वेळापत्रक कालावधी - दि. १० ते १२ जुलै २०२४
STARS प्रकल्प अंतर्गत नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत पायाभूत चाचणी २०२४-२५ शाळा भेटीबाबत

शालेय वेळापत्रकानुसार सकाळ सत्र / दुपार सत्र नुसार उपरोक्तप्रमाणे आपल्या स्तरावरून वेळेचे नियोजन करण्याचे स्वातंत्र्य देण्यात येत आहे. तसेच प्रथम भाषा (सर्व माध्यम), गणित (सर्व माध्यम) व तृतीय भाषा इंग्रजी या विषयांची तोंडी परीक्षा ही त्या त्या दिवशी लेखी परीक्षेनंतर वैयक्तिक स्वरुपात घेण्यात यावी. तसेच विद्यार्थी संख्या जास्त असेल तर दुसऱ्या दिवशी आपल्या उपलब्ध वेळेनुसार घ्यावी. याबाबत सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. तरी सदर कालावधीत आपण व आपल्या अधिनस्थ असणाऱ्या अधिकाऱ्यांनी दि.१० ते १२ जुलै या कालावधीत शाळाभेटी कराव्यात व सदर भेटी संदर्भातील माहिती सोबत दिलेल्या लिंकमध्ये त्याच दिवशी भरण्यात यावी.

* चाचणी कालावधीत करावयाच्या शाळा भेटीबाबत -

१) जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांच्या शाळानिहाय भेटीचे दिनांकासहित नियोजन प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, व शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक) यांनी एकत्रितरित्या बैठक घेऊन करावे.

२) जिल्हास्तरावरून केलेले नियोजन संबधित तालुक्यांना कळवावे. प्रत्येक तालुक्यांनी जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांना दिलेल्या भेटीच्या शाळा वगळून उर्वरित शाळांसाठी शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, विषय साधन व्यक्ती व विशेष तज्ज्ञ यांच्या भेटीचे नियोजन करावे.

३) चाचणी कालावधीत राज्यातील १०० टक्के शाळाभेटी होतील यासाठी संबंधित जिल्ह्यातील प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, व शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक) व पर्यवेक्षीय यंत्रणेतील सर्व अधिकारी/कर्मचारी यांनी दक्षता घ्यावी.

४) चाचणी नंतर तपासणी केलेल्या १०% उत्तरपत्रिकांची रॅडमली तपासणी करण्याचे नियोजन शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक व प्राचार्य जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था यांनी करावे.

पायाभूत चाचणीचे गुण हे विद्या समीक्षा केंद्र (VSK) येथे नोंदवण्यात येणार आहे. त्याकरिता संबंधित शाळेच्या शिक्षकांनी चाचणी तपासून त्याचे गुण विद्या समीक्षा केंद्र (VSK) यांचे मार्फत उपलब्ध पोर्टलवर भरायचे असून याबाबतच्या सविस्तर सूचना यथावकाश देण्यात येतील याची नोंद घेण्यात यावी.

सोबत - शाळाभेट लिंक


🌐👉परिपत्रक पीडीएफ मध्ये हवे असल्यास फक्त या ओळीला स्पर्श करा 👈


संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

Also Read 👇 

महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग 
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे

जा.क्र. राशैसंप्रपम / मूल्यमापन / पा.चा. जिल्हा पत्र/२०२४-२५/०२९२६

दि. १९/०६/२०२४

प्रति,

१) विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व),
२) विभागीय विद्याप्राधिकरण (सर्व),
३) प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व),
४) शिक्षणाधिकारी (प्राथ/माध्य. व योजना) जि.प. (सर्व),
५) शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई, मनपा,
६) शिक्षण निरीक्षक, मुंबई (उत्तर, दक्षिण, पश्चिम),
७) प्रशासन अधिकारी, म.न.पा./न.पा./न. प. (सर्व),

विषय : STARS प्रकल्प अंतर्गत नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत पायाभूत चाचणी २०२४-२५ आयोजनाबाबत....


संदर्भ : १. राज्यातील शिक्षणपध्दतीचे अध्यापन, अध्ययन व परिणाम यांचे बळकटीकरण (Strengthening Teaching-Learning And Results for States) केंद्रपुरस्कृत प्रकल्प मान्यता देण्याबाबत शासन निर्णय, 
दिनांक ११ फेब्रुवारी २०२१.

२. राज्यातील शिक्षण पध्दतीचे अध्यापन, अध्ययन व परिणाम यांचे बळकटीकरण (Strengthening Teaching - Learning And Results for States) केंद्र पुरस्कृत प्रकल्प राज्य अनुदान वितरण वित्तीय नियमावली मार्गदर्शक तत्वे.

३. STAR प्रकल्प अतर्गत मंजूर PAB मिटिंगचे इतिवृत्त, दि. ३१ मार्च २०२४

उपरोक्त विषयान्वये या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी खालील तीन नियतकालिक मूल्यांकन चाचण्याचे (PAT) आयोजन करण्यात येत आहे. यास अनुसरून २०२४- २५ या शैक्षणिक वर्षात पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी १ व संकलित मूल्यमापन चाचणी-२ अशा तीन नियतकालिक चाचण्यांचे नियोजन करण्यात आलेले आहे. नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत पायाभूत चाचणी दि. १० ते १२ जुलै २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे.

सदर चाचणी अंतर्गत प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या विषयांच्या इयत्ता तिसरी ते नववीतील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शाळा तसेच खाजगी अनुदानित शाळातील विद्यार्थ्यांची चाचणी होणार आहे.

प्रत्येक विद्यार्थ्याने इयत्तानिहाय अपेक्षित अध्ययन संपादणूक प्राप्त केली आहे किंवा नाही याची पडताळणी होऊन अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ होण्यास या चाचणीमुळे शिक्षकांना मदत होईल. सदर चाचण्या इयत्ता १० वी व १२ वी बोर्ड परीक्षेप्रमाणे नाहीत, यामुळे विद्यार्थ्यांना याचा अतिरिक्त ताण देऊ नये. चाचण्यांचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांनी अध्ययन निष्पत्ती किती प्रमाणात प्राप्त केलेल्या आहेत हे शिक्षकांनी लक्षात घेऊन गरजेनुरूप अध्ययन अध्यापन प्रक्रियेत मुलभूत सुधारणा करणे व कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे हा आहे.

 पायाभूत चाचणी उद्देश/उपयोग/फायदे :-

१) विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पती संपादणूक पडताळणे व त्यामध्ये वाढ करणे.

२) अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ होण्यास मदत करणारी चाचणी असेल.

३) राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (NAS) मधील संपादणूक वाढविण्याच्या दृष्टीकोनातून मदत होईल.

४) अध्ययनात मागे असणा-या विद्यार्थ्यांना पुढे नेण्याच्या दृष्टीकोनातून कृतिकार्यक्रम तयार करणे व अंमलबजावणीस दिशा प्राप्त होईल.

५) इयत्ता व विषयनिहाय अध्ययन निष्पत्तीमधील राज्याची संपादणूक स्थिती समजण्यास मदत

• तीन नियतकालिक मूल्यांकन चाचण्या (PAT) संभाव्य कालावधी

https://www.dnyanyatritantrasnehi.com/2024/06/stars-project-pat-2024-25-scert-circular.html

* पायाभूत चाचण्यांचे माध्यम व विषय :

सदर चाचणी ही एकूण दहा माध्यमात होईल. प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या तीन विषयांची इयत्ता ३ री ते ९ वी च्या विद्यार्थ्यांसाठी चाचण्यांचे आयोजन करण्यात येणार आहे.

* चाचणीचा अभ्यासक्रम :

मागील इयत्तेच्या अभ्यासक्रम / अध्ययन निष्पत्ती / मुलभूत क्षमता यावर आधारित असेल.

* पायाभूत चाचणी वेळापत्रक (कालावधी - दि. १० ते १२ जुलै २०२४)

https://www.dnyanyatritantrasnehi.com/2024/06/stars-project-pat-2024-25-scert-circular.html

शालेय वेळापत्रकानुसार सकाळ सत्र / दुपार सत्र नुसार उपरोक्तप्रमाणे आपल्या स्तरावरून वेळेचे नियोजन करण्याचे स्वातंत्र्य देण्यात येत आहे. तसेच प्रथम भाषा (सर्व माध्यम), गणित (सर्व माध्यम) व तृतीय भाषा इंग्रजी या विषयांची तोंडी परीक्षा ही त्या त्या दिवशी लेखी परीक्षेनंतर वैयक्तिक स्वरुपात घेण्यात यावी. तसेच विद्यार्थी संख्या जास्त असेल तर दुसऱ्या दिवशी आपल्या उपलब्ध वेळेनुसार घ्यावी.

* पायाभूत चाचणी अंमलबजावणीबाबत सूचना :

१. पायाभूत चाचणी ही शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व शाळा तसेच खाजगी अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यासाठी चाचणीचे आयोजन करण्यात येणार आहे.

२. पायाभूत चाचणीकरीता प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या विषयांच्या चाचण्या राज्य स्तरावरून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचे मार्फत विद्यार्थीनिहाय पुरविण्यात येणार आहेत.

. सदर वेळापत्रक हे संबंधित सर्व शाळांच्या निदर्शनास येईल याची दक्षता घ्यावी. ३

. पायाभूत चाचणीच्या प्रश्नपत्रिका प्रत्येक जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी (प्राथ/माध्य) यांच्या स्वाक्षरीने

४ प्राप्त झालेल्या अंतिम विद्यार्थी संख्येनुसार प्रत्येक विषय व वर्गासाठी आपल्या तालुक्यामध्ये समक्ष पोहोच करण्यात येत आहेत.

५. तालुकास्तरावर पोहचविण्यात येणाऱ्या सर्व प्रश्नपत्रिका सुरक्षित राहतील याची दक्षता घ्यावी. त्यासाठी तालुकास्तरावर एक सुरक्षित व स्वतंत्र खोली ताब्यात घ्यावी. या खोलीमध्ये प्राप्त

प्रश्नपत्रिका ठेवाव्यात, तसेच प्रश्नपत्रिका फाटणार नाहीत किंवा पावसाने भिजणार नाहीत व सुरक्षित राहतील याची दक्षता घ्यावी.

६. तालुका स्तरावर साहित्य प्राप्त होताच संबंधित गटशिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी यांनी त्यांचे स्तरावर थेट शाळास्तरावर पोहचवाव्यात.

७. प्रश्नपत्रिका वितरणा संदर्भात पुढील सूचनांचे गांभीर्याने पालन करावे.

अ. गटशिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी व तालुका समन्वयकांनी यांनी इयत्ता ३ री ते ९ वी च्या विद्यार्थी संख्येनुसार पुरवठा होताना स्वतः उपस्थित राहून पुरवठा झाला असल्याची खातरजमा करूनच पोहोच द्यावी.

आ. तालुका समन्वयकांनी सदर प्रश्नपत्रिका समक्ष मोजूनच आवश्यक तेवढ्या मुख्याध्यापकांच्या ताब्यात द्यावयाच्या आहेत. तसेच झेरॉक्ससाठी तालुका समन्वयकांनी कोणत्याही प्रश्नपत्रिका

अथवा इतर साहित्य बाहेर जाणार नाही याची दक्षता घ्यावी. इ. शाळा स्तरावरील प्रश्नपत्रिका वेळापत्रकाप्रमाणे त्या दिवशी वापरल्या जातील याची दक्षता घ्यावी,

८. प्रश्नपत्रिकांचा मोबाईल मधून फोटो काढणे, समाजमाध्यमाद्वारे इतरांना पाठविणे असे गैरप्रकार होणार नाहीत याची दक्षता घेण्यात यावी. प्रश्नपत्रिकांची गोपनियता काटेकोरपणे पाळण्यात यावी. . तालुका स्तरावर प्रश्नपत्रिका ताब्यात घेणे, सुरक्षित ठिकाणी ठेवणे व त्याचे शाळानिहाय वाटप

९ करणे तसेच चाचणीचे कामकाज सुरळीतपणे होण्याची सर्वस्वी जबाबदारी तालुका समन्वयकाबरोबरच गटशिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी यांची राहील.

१०. जिल्हास्तरावर प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक) जिल्हा परिषद (सर्व) यांची चाचणी आयोजनाबाबत सर्वस्वी जबाबदारी असेल.

११. शिक्षणाधिकारी यांचेकडून दि.११ जून २०२४ पर्यंत प्राप्त सांख्यिकीय माहितीच्या आधारे प्रश्नपत्रिका वितरीत करण्यात येत आहेत. त्यामुळे प्रश्नपत्रिका कमी पडल्यास अथवा XEROX काढण्यात येणाऱ्या प्रश्नपत्रिकांचे देयक कोणत्याही परिस्थितीत अदा करण्यात येणार नाही त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित शिक्षणाधिकारी (प्राथ/माध्य.) / शिक्षण निरीक्षक / प्रशासन अधिकारी (मनपा/नपा) यांची असेल याची नोंद घ्यावी. तसेच सर्व विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका मिळतील याची जबाबदारी शिक्षणाधिकारी यांची वैयक्तिकरित्या राहील.

१२. चाचणी कालावधीत सर्व विद्यार्थी उपस्थित राहतील याची दक्षता घ्यावी. एखादा विद्यार्थी गैरहजर असल्यास तो शाळेत हजर झालेल्या दिवशी त्याची परीक्षा घेण्यात यावी. १३

. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या बाबतीत सदर परीक्षा घेण्याबाबतचा निर्णय संबधित विद्यार्थ्यांच्या दिव्यांग प्रकारावरून शाळा मुख्याध्यापक व शिक्षक यांनी घ्यावा. आवश्यकतेनुसार विशेष तज्ज्ञ किंवा विशेष शिक्षक यांची मदत घ्यावी.

१४. प्रस्तुत पायाभूत चाचणी कशी घ्यावी, याबाबत शिक्षकांना आवश्यक सर्वसाधारण सूचना शिक्षक सूचनापत्रात देण्यात आलेल्या आहेत. शिक्षकांनी सदर सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करून अनुषंगिक कार्यवाही करावी. तसेच या शिक्षक सूचना
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या 
 या वेबसाईटवर परीक्षेपूर्वी उपलब्ध असेल उत्तरसूची परीक्षेदिवशी संध्याकाळी वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात येईल. त्यानुसार उत्तरपत्रिका तपासण्यात याव्यात.

१५. शिक्षक सूचना व उत्तरसूची ही फक्त शिक्षकासाठी आहे ती विद्यार्थ्यांना देऊ नये. विद्यार्थ्यांना फक्त प्रश्नपत्रिका देण्यात याव्यात.

१६. पायाभूत चाचणीची गुण नोंद प्रश्नपत्रिकेच्या पहिल्या पानावर दिलेल्या अध्ययन निष्पत्तीनिहाय रकान्यात भरावी.

१७. पायाभूत चाचणीमधील गुणांच्या आधारे शिक्षकांनी विद्यार्थीनिहाय कृतिकार्यक्रम तयार करून अंमलबजावणी करावी, जेणेकरून संकलित मूल्यमापन चाचणी १ व २ मध्ये अध्ययन निष्पत्तीनिहाय संपादणूक वाढण्यास मदत होईल.

* चाचणी कालावधीत करावयाच्या शाळा भेटीबाबत -

१) जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांच्या शाळानिहाय भेटीचे दिनांकासहित नियोजन प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, व शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक) यांनी एकत्रितरित्या बैठक घेऊन करावे.

२) जिल्हास्तरावरून केलेले नियोजन संबधित तालुक्यांना कळवावे. प्रत्येक तालुक्यांनी जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांना दिलेल्या भेटीच्या शाळा वगळून उर्वरित शाळांसाठी शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, विषय साधन व्यक्ती व विशेष तज्ज्ञ यांच्या भेटीचे नियोजन करावे.

३) चाचणी कालावधीत राज्यातील १०० टक्के शाळाभेटी होतील यासाठी संबंधित जिल्ह्यातील प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, व शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक) व पर्यवेक्षीय यंत्रणेतील सर्व अधिकारी/कर्मचारी यांनी दक्षता घ्यावी.

४) तपासणी केलेल्या १०% उत्तरपत्रिकांची रॅडमली तपासणी करण्याचे नियोजन शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक व प्राचार्य जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था यांनी करावे.

उपरोक्त नियोजनानुसार दिलेल्या वेळेत सर्व नमूद इयत्तांची चाचणी होईल याप्रमाणे नियोजन करण्याची जबाबदारी शाळेच्या मुख्याध्यापकांची असेल. तथापि स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन काही बदल करायचे असल्यास संबधित शिक्षणाधिकारी यांनी वेळापत्रकात बदल करावा व तसे या कार्यालयास अवगत करावे.

वरीलप्रमाणे आपल्या अधिनस्त शाळा मुख्याध्यापक, शिक्षक यांचेपर्यंत पायाभूत चाचणीच्या अनुषंगाने योग्य त्या कार्यवाहीसाठी सूचना द्याव्यात.

पायाभूत चाचणीचे गुण हे विद्या समीक्षा केंद्र (VSK) येथे नोंदवण्यात येणार आहे. त्याकरिता संबंधित शाळेच्या शिक्षकांनी चाचणी तपासून त्याचे गुण विद्या समीक्षा केंद्र (VSK) यांचे मार्फत उपलब्ध पोर्टलवर भरायचे असून याबाबतच्या सविस्तर सूचना यथावकाश देण्यात येतील याची नोंद घेण्यात यावी.

 (राहूल रेखाकर भा.प्र.से.)



संचालक 
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

Also Read 👇 

'STARS' PAT
Summative Evaluation 1 Instructions for Teacher and Answer Key
All Class 3rd to 8th All Subjects

संकलित मूल्यमापन चाचणी- १

विषय इयत्ता तिसरी ते आठवी संकलित मूल्यमापन चाचणी-1 प्रथम भाषा मराठी गणित तृतीय भाषा इंग्रजी इयत्ता तिसरी ते आठवीच्या शिक्षकांसाठी मार्गदर्शिका उपलब्ध करून देण्यात येत आहेत हव्या त्या इयत्तेच्या व विषयांच्या मार्गदर्शिका पीडीएफमध्ये उपलब्ध करून देण्यात येत आहेत



इयत्ता तिसरी ते आठवी च्या मराठी विषयाच्या शिक्षक मार्गदर्शिका सूचना उत्तर सूची व गुणदाना बाबत सूचना पीडीएफ मध्ये डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर उपलब्ध करून देण्यात येत आहे


इयत्ता तिसरी ते आठवी च्या गणित विषयाच्या शिक्षक मार्गदर्शिका सूचना उत्तर सूची व गुणदाना बाबत सूचना पीडीएफ मध्ये डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर उपलब्ध करून देण्यात येत आहे


इयत्ता तिसरी ते आठवी च्या इंग्रजी विषयाच्या शिक्षक मार्गदर्शिका सूचना उत्तर सूची व गुणदाना बाबत सूचना पीडीएफ मध्ये डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर उपलब्ध करून देण्यात येत आहे



मागील इयत्तेच्या अभ्यासक्रम / अध्ययन निष्पत्ती / मुलभूत क्षमता यावर आधारित विद्यार्थ्यांना ऊपयोगी आशा ऑनलाईन प्रश्न मंजुषा आदर्श उत्तरासह सोडविण्यासाठी हवे असेल त्या इयत्तेवर टिचकी मारा फक्त ओळीला स्पर्श करा 

गुण भरण्यासाठी लिंक LINK
यु-ट्यूब लिंक:
PAT चाटबॉट मार्गदर्शिका 
चाटबॉटवर पायाभूत चाचणीचे गुण शिक्षकांनी कसे नोंदवावेत याच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना व याबाबतच्या व्हिडीओची यु-ट्यूब लिंक सोबत देण्यात येत आहे यु-ट्यूब लिंक आणि PAT चाटबॉट मार्गदर्शिकासाठी फक्त ओळीला स्पर्श करा / वर टिचकी मारा

PAT(Periodic Assesment Test) परीक्षेचे गुण चॅटबॉटवर भरत असताना येणाऱ्या काही तांत्रिक अडचणी आणि त्यावरील उपाय फक्त ओळीला स्पर्श करा / वर टिचकी मारा
Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon