DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Combining of Gram Sevak Gram Vikas Adhikari As Gram Panchayat Adhikari


New name of Gram Sevak Gram Vikas Adhikari - Gram Panchayat Adhikari

Regarding combining both the posts of Gram Sevak and Gram Vikas Adhikari and naming the said post as "Gram Panchayat Adhikari"

ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी ही दोन्ही पदे एकत्रित करुन सदर पदाचे नामाभिदान "ग्रामपंचायत अधिकारी" करणेबाबत.


दिनांक: २४ सप्टेंबर, २०२४

प्रस्तावना :-
ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी हे पद ग्रामीण भागातील सर्वांगीण व शाश्वत विकास साधण्यासाठी शासन व जनता यांना जोडणारे व प्रत्यक्ष अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेचे महत्वाचे पद व घटक आहे. ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी हे ग्रामपंचायतीचे सचिव व ग्रामसभेचे पदसिध्द सचिव म्हणून कामकाज पाहतात. ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी दोन्ही पदांच्या कामाचे स्वरूप एकच असल्याने सदर दोन्ही पदे एकत्रित करून एकच पद निर्माण करणेबाबत वाचा येथील शासन निर्णयान्वये तज्ञ समिती नेमण्यात आली होती. सदर समितीच्या अहवालाच्या अनुषंगाने ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी ही दोन्ही पदे एकत्रित करुन प्रशासनाच्या दृष्टीने सक्षम असे "ग्रामपंचायत अधिकारी" असे नामाभिदान करण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती.

शासन निर्णयः-

ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील ग्रामसेवक (एस-८) व ग्रामविकास अधिकारी (एस-१२) ही दोन्ही पदे एकत्रित करून एस-८ (२५५००-८११००) या वेतनश्रेणीतील ग्रामसेवक हे मूळ पद कायम ठेवून या पदाचे नामाभिदान "ग्रामपंचायत अधिकारी" असे करण्यात येत आहे.

२. सध्या अस्तित्वात असलेल्या ग्राम विकास अधिकारी या पदांचे वेतन संरक्षित करुन व ही पदे मृत संवर्गामध्ये वर्गीकृत करुन तद्नंतर रिक्त होणाऱ्या या पदांवर ग्रामपंचायत अधिकारी हे नामाभिदान असणाऱ्या एस-८ वेतन श्रेणीतील एकाच पदावर नवीन नियुक्त्या करण्यात याव्यात.

३. ग्रामपंचायत अधिकारी या पदास सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेंतर्गत १० वर्षाच्या सेवेनंतर पहिला लाभ विस्तार अधिकारी एस-१४ (३८६००-१२२८००), २० वर्षाच्या सेवेनंतर दुसरा लाभ सहायक गट विकास अधिकारी एस-१५ (४१८००-१३२३००) व ३० वर्षाच्या सेवेनंतर तिसरा लाभ गट विकास अधिकारी एस-२० (५६१००-१७७५००) असा अनुज्ञेय राहील.

हे ही वाचाल 

सरपंचांच्या व उपसरपंचांच्या मानधनात वाढ करण्याबाबत वाचण्यासाठी या ओळीला स्पर्श करा

४. ग्रामपंचायत अधिकारी या पदांच्या पदोन्नती साखळी सुधारित होत असल्याने सदर शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून त्या सुधारित पदोन्नती साखळी नुसार आश्वासित प्रगती योजनेचे लाभ अनुज्ञेय होतील. सदर शासन निर्णय निर्गमित होण्यापूर्वी सदर पदांवरील कर्मचाऱ्यांना सुधारित आश्वासित प्रगती योजनेंतर्गत लाभ अनुज्ञेय झालेला आहे, परंतु प्रत्यक्षात अदा करण्यात आलेला नाही अशा कर्मचाऱ्यांना सदर शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंत पूर्वीच्या अनुज्ञेय पदोन्नती साखळी प्रमाणे लाभ अनुज्ञेय करण्यात यावेत व तद्नंतरचे लाभ सदर शासन निर्णयाप्रमाणे सुधारित वेतन संरचनेमध्ये वेतन निश्चिती करुन अदा करण्यात यावेत.

५. सदर ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांची सध्या असलेली सेवाज्येष्ठता विचारात घेऊन त्यानुसार एकत्रित पदासाठी सेवाज्येष्ठता यादी नियुक्ती प्राधिकारी यांनी त्यांच्या स्तरावर तयार करावी. यामध्ये सध्या अस्तित्वात असलेल्या सेवाज्येष्ठतेमध्ये बदल होणार नाही याची दक्षता घ्यावी. 
६. ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी ही दोन्ही पदे एकत्रित करुन ग्रामपंचायत अधिकारी हे पद निर्माण केल्याने आवश्यकतेनुसार महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (सेवाप्रवेश) नियम १९६७ मध्ये यथावकाश सुधारणा करण्यात येईल.

७. सदरचा शासन निर्णय वित्त विभागाचा अनौपचारिक संदर्भ क्र.४९५/२०२४/व्यय-१५, दि.२६.७.२०२४

अन्वये प्राप्त अभिप्राय व त्यानुषंगाने दि. २३ सप्टेंबर २०२४ रोजीच्या मा. मंत्रीमंडळ बैठकीमध्ये झालेल्या

निर्णयानुसार निर्गमित करण्यात येत आहे.

८. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या 🌐 👉 www.maharashtra.gov.in 👈 या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक ८२०२४०९२४१४४८५३०५२० असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(सीमा जाधव) 
उप सचिव, महाराष्ट्र शासन

महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग शासन निर्णय क्रमांकः संकीर्ण-२०१९/प्र.क्र.७९६/आस्था-७
बांधकाम भवन, मंत्रालय, मुंबई
वाचा
१) ग्राम विकास विभाग शासन निर्णय क्रमांक. संकीर्ण-२०१९/ प्र.क्र.७९६/ आस्था-७, दिनांक ११ मे, २०२२


Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon