DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Vidhan Sabha Election 2024 Update

Vidhan Sabha Election 2024 Update

Vidhan Sabha General Election 2024 Update
Elections Legislative Assembly 2024 Update Information

Vidhan Sabha General Election 2024 Update Elections Legislative Assembly 2024 Update Information

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now


मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय

व्हिडीओ कॉन्फरन्स (VC) दिनांक १३ सप्टेंबर, २०२४

क्रमांक : जीईएन-२०२४/प्र.क्र. ३०/२४/३३ निवडणूक (१) सामान्य प्रशासन विभाग, कक्ष क्र. ६११, ६वा मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय विस्तार, मुंबई

दिनांक : ०६ सप्टेंबर, २०२४.

प्रति,
१. आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, मुंबई शहर व मुंबई उपनगर.
२. सर्व जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी (मुंबई शहर व मुंबई उपनगर वगळता)
३. अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी, मुंबई शहर व मुंबई उपनगर.

विषय :- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ निवडणूक तयारी व्हिडीओ कॉन्फरन्स (VC).

महोदय/महोदया,
भारत निवडणूक आयोगाकडून विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ चा कार्यक्रम नजीकच्या काळात जाहीर होणार आहे. सदर निवडणूकीच्या पूर्वतयारीचा मा. मुख्य निवडणूक अधिकारी व्हिडीओ कॉन्फरन्स (VC) द्वारा आढावा घेणार आहेत. सदरची VC मंगळवार दिनांक १३ सप्टेंबर, २०२४ रोजी खाली दर्शविलेल्या वेळापत्रकानुसार पार पडणार आहे.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४

सदर VC मध्ये प्रामुख्याने पुढील कामकाजाचा आढावा घेण्यात येणार आहे-
१.मतदान कर्मचारी वर्गाची निश्चिती इत्यादी
२.कायदा-सुव्यवस्थेबाबत आढावा (Vulnerability mapping, सेक्टर ऑफीसर, सेक्टर पोलीस ऑफिसरची नियुक्ती, पोलीस कर्मचारी आवश्यकता इत्यादी)
३. मतदान केंद्राची तपासणी

ALSO Read 👇 

ELECTION COMMISSION OF INDIA

Nirvachan Sadan, Ashoka Road, New Delhi-110001

16.08.2024

Media Invitation

Dear Sir/Madam

You are cordially invited to cover the following event:

Event - 
Press Conference by Election Commission of India to announce the schedule for General Election to Legislative Assemblies
Press Conference Date & Time
August 16, 2024 (Friday) 3 PM onwards

Venue -
Plenary Hall, Vigyan Bhawan, New Delhi.

• Entry from 2 pm onwards through the East gate. All are requested to be seated by 2:45 pm

Yours Sincerely

Anuj Chandak Joint Director

GENERAL ELECTION TO LEGISLATIVE ASSEMBLY OF J&K, 2024
POLL EVENTS

PHASE 1 (24 ACS)
Date of issue of Gazette Notification 20.08.2024 (Tuesday)
Last Date Of Making Nominations 27.08.2024 (Tuesday)
Date for Scrutiny of nominations 28.08.2024 (Wednesday)
Last Date For Withdrawal Of Candidatures 30.08.2024 (Friday)
Date Of Poll 18.09.2024 (Wednesday)
Date Of Counting 04.10.2024 (Friday)
Date Before Which Election Shall Be Completed 06.10.2024 (Sunday)

PHASE 2 (26 ACs)
Date of issue of Gazette Notification  29.08.2024 (Thursday)
Last Date Of Making Nominations 05.09.2024 (Thursday)
Date for Scrutiny of nominations 06.09.2024 (Friday)
Last Date For Withdrawal Of Candidatures 09.09.2024 (Monday)
Date Of Poll 25.09.2024 (Wednesday)
Date Of Counting 04.10.2024 (Friday)
Date Before Which Election Shall Be Completed 06.10.2024 (Sunday)

PHASE 3 (40 ACS)
Date of issue of Gazette Notification 05.09.2024 (Thursday)
Last Date Of Making Nominations 12.09.2024 (Thursday)
Date for Scrutiny of nominations 13.09.2024 (Friday)
Last Date For Withdrawal Of Candidatures 17.09.2024 (Tuesday)
Date Of Poll 01.10.2024 (Tuesday)
Date Of Counting 04.10.2024 (Friday)
Date Before Which Election Shall Be Completed 06.10.2024 (Sunday)

GENERAL ELECTION TO LEGISLATIVE ASSEMBLY OF HARYANA, 2024

POLL EVENTS
HARYANA (ALL 90 ACS)
Date of issue of Gazette Notification 05.09.2024 (Thursday)
Last Date Of Making Nominations 12.09.2024 (Thursday)
Date For Scrutiny Of Nominations 13.09.2024 (Friday)
Last Date For Withdrawal Of Candidatures 16.09.2024 (Monday)
Date Of Poll 01.10.2024 (Tuesday)
Date Of Counting 04.10.2024 (Friday)
Date Before Which Election Shall Be Completed 06.10.2024 (Thursday)


निवडणूक आयोगानं जम्मू काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा
 यावेळी त्यांना महाराष्ट्राबाबत प्रश्न विचारण्यात आले.
भारतीय निवडणूक आयोगानं विधानसभा निवडणुकांची घोषणा करण्यासाठी पत्रकार परिषद घेणार असल्याचं जाहीर केल्यानंतर महाराष्ट्रात देखील तर्क वितर्क सुरु झाले होते. महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका आज जाहीर होतील अशा चर्चा सुरु झाल्या होत्या, याबाबत काही माध्यमांनी देखील बातम्या दिल्या होत्या. मात्र, निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सुरु झाल्यानंतर आज महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा केली जाणार नाही हे स्पष्ट झालं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी त्यांच्या संबोधनात जम्मू काश्मीर आणि हरियाणा या दोन राज्यांबाबत माहिती दिली. यामुळं महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक आज जाहीर होणार नाही हे स्पष्ट झालं आहे.  मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक जाहीर न करण्यामागील कारण सांगितलं.

महाराष्ट्राच्या प्रश्नावर मुख्य निवडणूक आयुक्त काय म्हणाले...

महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक आज जाहीर करण्यात आलेली नाही. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यकाळ 26 नोव्हेंबरला संपत आहे, निवडणूक का जाहीर केली जात नाही, असं राजीव कुमार यांना विचारण्यात आलं. यावर त्यांनी असा प्रश्न विचारणं सोपं आहे, असं म्हटलं.

महाराष्ट्र आणि हरियाणाची निवडणूक सोबत झाली होती. हरियाणाची मुदत 3 नोव्हेंबर होती तर महाराष्ट्राची 26 नोव्हेंबर आहे. त्यावेळी जम्मू काश्मीरचा मुद्दा नव्हता. यावेळी पाच निवडणुकांचा मुद्दा आहे. महाराष्ट्र, हरियाणा, जम्मू काश्मीर, झारखंड आणि दिल्लीची निवडणूक आहे. सुरक्षा बलांचा मुद्दा आहे. महाराष्ट्रात पाऊस झाला होता त्यामुळं बीएलओची कामं झालेली नाहीत.अनेक सण आहेत, गणेशोत्सव,पितृपक्ष, नवरात्री, दिवाळी आहे. या सर्व गोष्टींचा विचार करुन दोन राज्यांच्या निवडणुका सोबत घेण्याचा निर्णय घेतला, असं राजीव कुमार म्हणाले.   

हरियाणा आणि जम्मू काश्मीर विधानसभेची निवडणूक जाहीर
हरियाणा विधानसभेतील सदस्यसंख्या 90 इतकी आहे. हरियाणा विधानसभेचा कार्यकाळ 3 नोव्हेंबरला संपणार आहे. गेल्यावेळी विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप आणि जेजेपीनं सत्ता  स्थापन केली होती. हरियाणात एनडीएकडे 43 आणि इंडिया आघाडीकडे 42 आमदारांचं संख्याबळ आहे. जम्मू काश्मीरमध्ये दहा वर्षानंतर विधानसभा निवडणूक होणार आहे.

जम्मू काश्मीरमधील निवडणूक कार्यक्रम

जम्मू काश्मीर विधानसभेची निवडणूक तीन टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यात 24, दुसऱ्या टप्प्यात 26 आणि तिसऱ्या टप्प्यात 40 मतदारसंघात मतदान पार पडले. पहिल्या टप्प्यातील मतदान 18 सप्टेंबर, दुसऱ्या टप्प्यातील मतदान 29 सप्टेंबर तर तिसऱ्या टप्प्यातील मतदान 1 ऑक्टोबरला होईल. तर जम्मू काश्मीर विधानसभेचा निकाल 4  ऑक्टोबरला जाहीर होईल. 

हरियाणात एका टप्प्यात निवडणूक

हरियाणातील 90 जागांसाठी एका टप्प्यात मतदान पार पडेल. मतदान  1  ऑक्टोबरला होईल. तर, मतमोजणी 4 ऑक्टोबरला होणार आहे.

महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणूक 2019 मध्ये सोबतच जाहीर झाली होती. मात्र, यावेळी हरियाणा आणि जम्मू काश्मीर या दोन्ही राज्यांची निवडणूक आज जाहीर होणार आहे. त्यामुळं आगामी काळात महाराष्ट्र आणि झारखंड राज्यातील विधानसभा निवडणूक सोबत जाहीर होऊ शकते.

Also Read 👇 

महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग बांधकाम भवन, २५ मर्झबान पथ, फोर्ट, मुंबई

क्रमांक :-मविसे-१०२४/प्र.क्र.२३८/२०२४/आस्था-३/पत्र-१

प्रति,
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी,
(सर्व)

दिनांक :- ८ ऑगस्ट, २०२४

विषय :- विधानसभा सार्वत्रिक निवडणूका-२०२४ च्या अनुषंगाने करावयाच्या बदल्या/पदस्थापनांवावत.

संदर्भ:- १. निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांचे पत्र क्र.४३७/६/१/आयएनएसटी/ईसीआय/एफयुएनसीटी/एमसीसी/२०२४, दि.३१.०७.२०२४ २. मा. मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य कार्यालय पत्र क्र. जीईएन- २०२४/प्र.क.०६/२४/निवडणूक, दि.०५.०८.२०२४.

महोदय,

मा. भारत निवडणूक आयोगाने उपरोक्त संदर्भ क्र. १ येथील दि.३१.०७.२०२४ रोजीच्या पत्रान्वये विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने करावयाच्या बदल्या/पदस्थापनांबाबत सुचना निर्गमित केल्या आहेत. त्यानुसार विभागांतर्गत निवडणूकीशी संबंधित असलेल्या सर्व अधिकाऱ्यांच्या बदल्या/ पदस्थापना करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडुन तपशिल उपलब्ध करुन घेण्याबाबतच्या सूचना मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांचे उपरोक्त संदर्भ क्र.२ येथील दि.०५.०८.२०२४ रोजीच्या पत्रान्वये देण्यात आलेल्या आहेत.

२. त्यानुषंगाने आपल्या जिल्ह्यामध्ये कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्र विकास सेवा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (निवडश्रेणी), अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी/प्रकल्प संचालक, उप मुख्य कार्यकारी अधिकारी, गट विकास अधिकारी, गट-अ व सहायक गट विकास अधिकारी, गट-ब संवर्गातील अधिकाऱ्यांना महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने सोपविण्यात आलेल्या निवडणूक विषयक कामकाजाचा तपशील तात्काळ उपलब्ध करुन देण्यात यावा.

३. यासंदर्भात नमूद करण्यात येते की, ग्रामविकास विभागाच्या अधिनस्त महाराष्ट्र विकास सेवा संवर्गातील उपरोक्त अधिकाऱ्यांपैकी काही अधिकाऱ्यांच्या बाबतीत सार्वत्रिक लोकसभा निवडणूक - २०२४ साठी सोपविण्यात आलेल्या निवडणूक विषयक कामकाजामध्ये काही कालावधी नंतर / वारंवार बदल केल्याचे तसेच रद्द केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे विभागाने सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने मा. भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार केलेल्या बदल्यांबाबत न्यायालयीन प्रकरणांना सामोरे जावे लागले आहे. ही याव विचारात घेवून, आपल्या जिल्ह्यांमध्ये कार्यरत असणाऱ्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (निवडश्रेणी), अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी/प्रकल्प संचालक, उप मुख्य कार्यकारी अधिकारी, गट विकास अधिकारी, गट-अ व सहायक गट विकास अधिकारी, गट-ब संवर्गातील अधिकाऱ्यांना सोपविण्यात येणारे निवडणूक विषयक कामकाज कालपरत्वे बदलण्यात येणार नाही, याबाबत खातरजमा करावी, तसेच अपरिहार्य कारणास्तव संबंधित अधिकाऱ्यांच्या निवडणूक विषयक कामकाजामध्ये बदल केल्यास विभागास तातडीने अवगत करावे, ही विनंती.

पं.ख. जाधव
उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत :-
१. उप सचिव व सह मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय, मुंबई,
२ . उपायुक्त आस्थापना, विभागीय आयुक्त कार्यालये, सर्व.
३. निवड नस्ती (आस्था-३), ग्रामविकास विभाग, बांधकाम भवन, मुंबई-०१.

Also Read 👇 

मुख्य निवडणूक अधिकारी, 
महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय जीईएन-२०२४/प्र.क्र. ०६/२४/निवडणूक सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, 
मुंबई

दिनांक : ०५ ऑगस्ट, २०२४.

प्रति.
१. अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव, सर्व मंत्रालयीन विभाग, मंत्रालय, मुंबई
२. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य,

विषय : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने अधिकाऱ्यांच्या बदली / पदस्थापनेवावत,
संदर्भ: भारत निवडणूक आयोगाचे दिनांक ३१ जुलै, २०२४ रोजीचे पत्र.

महोदय,

मा. भारत निवडणूक आयोगाने त्यांच्या दिनांक ३१ जुलै, २०२४ रोजीच्या पत्रान्वये, विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने अधिकाऱ्यांच्या बदली / पदस्थापनेबाबत सविस्तर सूचना दिलेल्या आहेत. सदर पत्राची प्रत सोबत जोडली आहे.

०२. उक्त पत्रान्वये मा. भारत निवडणूक आयोगाने पत्रातील बदल्या / पदस्थापना संबंधीच्या सूचना लागू होतील वा होणार नाहीत अशा अधिकाऱ्यांची पदनामे निश्चित केली आहेत. आपल्या विभागांतर्गत निवडणूकीशी संबंधित असलेल्या अशा सर्व अधिकाऱ्यांच्या बदल्या / पदस्थापना करण्यासाठी जिल्हाधिकारी यांचेकडून तपशील उपलब्ध करून घेण्यात यावा. मा. भारत निवडणूक आयोगाच्या दि. ३१ जुलै, २०२४ रोजीच्या पत्रामध्ये नमूद केलेल्या सर्व बाबीची बदल्या / पदस्थापना करतांना विशेष दक्षता घेण्यात यावी. 

०३. मा. भारत निवडणूक आयोगाला यासंदर्भात दिनांक २० ऑगस्ट, २०२४ पर्यंत अहवाल सादर करावयाचा असल्याने या सर्व बदल्या / पदस्थापनांबाबतची कार्यवाही दिनांक १६ ऑगस्ट, २०२४ पूर्वी करण्यात येऊन सदरचा अहवाल दिनांक १९ ऑगस्ट, २०२४ पर्यंत मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयास सादर करण्यात यावा, तसेच त्याची एक प्रत या कार्यालयास सादर करण्यात यावी.

Also Read- 

मतदार ओळखपत्रासाठी आता कार्यालयात जाण्याची गरज नाही घरबसल्या करा असा अर्ज त्यासाठी या ओळीला स्पर्श करा

०४. मतदार यादींचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम दिनांक ०६.०८.२०२४ ते ३०.०८.२०२४ या कालावधीत पार पडणार असल्याने मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी व सदर पुनरिक्षण कार्यक्रमाशी संबंधीत अधिकारी कर्मचारी यांच्या बदल्या करतांना मा. भारत निवडणूक आयोगाच्या दि. ३१ जुलै, २०२४ रोजीच्या पत्रामध्ये नमूद केलेल्या परि. ७ चे काटेकोरपणे पालन व्हावे. 

०५. भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांची त्वरीत अंमलबजावणी व्हावी यासाठी आपण स्वतः लक्ष घालावे, ही विनंती.

आपला
(एस. चोक्कलिंगम)
प्रधान सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य


Transfer Posting of officers in connection with the Vidhan Sabha General Election 2024

ELECTION COMMISSION OF INDIA
NIRVACHAN SADAN, ASHOKA ROAD, NEW DELHI

No.437/6/1/INST/ECI/FUNCT/MCC/2024

Dated: 31st July, 2024

To
1. The Chief Secretary to the Government of
a.) Haryana, Chandigarh;
b.) Jharkhand, Ranchi;
c.) Maharashtra, Mumbai;
d.) UT of Jammu and Kashmir, Srinagar.
2. The Chief Electoral Officer of
a.) Haryana, Chandigarh;
b.) Jharkhand, Ranchi;
c.) Maharashtra, Mumbai;
d.) UT of Jammu and Kashmir, Srinagar.

Subject:- General Elections to Legislative Assemblies in the States of Haryana, Jharkhand & Maharashtra and UT of Jammu and Kashmir due in the year 2024 -Transfer/Posting of officers - regarding.

Sir/Madam,
I am directed to state that the terms of existing State Legislative Assemblies of Haryana, Jharkhand & Maharashtra are upto 3rd November, 2024, 5th January, 2025 and 26th November, 2024, respectively and election are due in the year 2024. Further, the election to Legislative Assembly of UT of Jammu and Kashmir is also due in near future.

2. The Commission has been following a consistent policy that officers directly connected with conduct of elections in an election going State/UT are not posted in their home districts or places where they have served for considerably long period.

3. Hence, the Commission has decided that no officer connected directly with elections shall be allowed to continue in the present district (revenue district) of posting:-

(i) if she/he is posted in her/his home district.

(ii) if she/he has completed three years in that district during last four 
(4) years or would be completing 3 years on or before 30th September, 2024 for UT of Jammu and Kashmir, 31st October, 2024 for Haryana, 30th November, 2024 for Maharashtra and 31st December, 2024 for Jharkhand;

Circular pdf copy link

भारत निवडणूक आयोग
NIRVACHAN SADAN, 
NEW DELHI

क्र.437/6/1/INST/ECI/FUNCT/MCC/2024

दिनांक: ३१ जुलै २०२४

1. सरकारचे मुख्य सचिव
a.) हरियाणा, चंदीगड;
b.) झारखंड, रांची;
c.) महाराष्ट्र, मुंबई;
d.) जम्मू आणि काश्मीरचे UT, श्रीनगर.

2. चे मुख्य निवडणूक अधिकारी
अ.) हरियाणा, चंदीगड;
b.) झारखंड, रांची;
c.) महाराष्ट्र, मुंबई;
d.) जम्मू आणि काश्मीरचे UT, श्रीनगर.

विषय:- हरियाणा, झारखंड आणि महाराष्ट्र आणि जम्मू आणि काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशातील विधानसभेच्या 2024 साली होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका - अधिकाऱ्यांच्या बदल्या/पोस्टिंग - संबंधित.

सर/मॅडम,
मला हे सांगण्याचे निर्देश देण्यात आले आहे की, हरियाणा, झारखंड आणि महाराष्ट्राच्या विद्यमान विधानसभांच्या कार्यकाळ अनुक्रमे ३ नोव्हेंबर २०२४, ५ जानेवारी २०२५ आणि २६ नोव्हेंबर २०२४ पर्यंत आहेत आणि निवडणूक २०२४ मध्ये होणार आहे. पुढे, निवडणूक नजीकच्या भविष्यात जम्मू आणि काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभेतही प्रवेश होणार आहे.

2. आयोग एक सातत्यपूर्ण धोरण अवलंबत आहे की राज्य/केंद्रशासित प्रदेशातील निवडणुकीच्या संचालनाशी थेट संबंध असलेले अधिकारी त्यांच्या गृहजिल्ह्यांमध्ये किंवा त्यांनी बऱ्याच कालावधीसाठी काम केलेल्या ठिकाणी नियुक्त केले जात नाहीत.

3. त्यामुळे, आयोगाने निर्णय घेतला आहे की निवडणुकीशी थेट संबंध असलेल्या कोणत्याही अधिकाऱ्याला सध्याच्या जिल्ह्यात (महसूल जिल्हा) पोस्टिंग चालू ठेवण्याची परवानगी दिली जाणार नाही:-

(i) जर ती/ती तिच्या/त्याच्या गृह जिल्ह्यात तैनात असेल.

(ii) जर तिने/त्याने गेल्या चार (4) वर्षांमध्ये त्या जिल्ह्यात तीन वर्षे पूर्ण केली असतील किंवा जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशासाठी 30 सप्टेंबर, 2024 किंवा त्यापूर्वी 3 वर्षे पूर्ण करत असतील, तर हरियाणासाठी 31 ऑक्टोबर 2024, 30 नोव्हेंबर , महाराष्ट्रासाठी 2024 आणि झारखंडसाठी 31 डिसेंबर 2024
Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon