Ten Percent Reservation for Maratha Community In Medical Education
10% Reservation for Maratha Community In Medical Education
मराठा समाजाला वैद्यकीय शिक्षणात दहा टक्के आरक्षण
महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, गो.ते. रूग्णालय आवार, ९ वा मजला, लोकमान्य टिळक मार्ग, नवीन मंत्रालय, मुंबई
क्र.एमईडी-१०२४/प्र.क्र.१७८/२४/शि-२
दि.०६/०६/२०२४
प्रति,
आयुक्त,
वैद्यकीय शिक्षण, संशोधन व आयुष,
मुंबई.
विषयः-शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करीताच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये मराठा समाजातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या आरक्षणाबाबत
Regarding the reservation to be given to students belonging to the Maratha community in the admission process of Health Sciences University courses for the academic year 2024-25
संदर्भ:-आपले पत्र क्र. संवैशिवसं/मराठा आरक्षण/प्रवेश प्रक्रिया/१३७/२०२४, दि.०७/०५/२०२४
महोदय,
आपल्या विषयांकित संदर्भाधीन पत्राच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, शासकीय/शासन अनुदानित तसेच खाजगी विनाअनुदानित आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक संस्थांमधील/महाविद्यालयांतील शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिताच्या "महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरीता आरक्षण अधिनियम, २०२४" मधील तरतुदीनुसार राज्यस्तरीय कोट्याकरीता एकूण उपलब्ध जागांपैकी १० टक्के जागा सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग प्रवर्गासाठी आरक्षित ठेवण्यात याव्यात.
________________________________
🙋 Also Read 👇
महाराष्ट्र शासन शिक्षण संचालनालय, (उच्च शिक्षण)
दिनांक: 18 JUN 2024
परिपत्रक
विषय : महाराष्ट्र राज्य अधिनियम क्र. १६ दि. २६.२.२०२४ ची विद्यार्थी प्रवेशाबाबत अंमलबजावणी करण्याबाबत
ओळीला स्पर्श करून परिपत्रक वाचा किंवा पीडीएफ मध्ये डाऊनलोड करा
👆👆👆👆👆
________________________________
२. सदर आरक्षण हे मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे दाखल असलेल्या रिट याचिका क्र.३४६८/२०२४ व इतर मधील भविष्यातील निर्णयास अधीन राहील. प्रवेश प्रक्रियेच्या नियमपुस्तिकेत सदर बाब प्रवेशोच्छुक उमेदवारांच्या माहितीकरिता विवक्षितपणे नमूद करणे आवश्यक राहील.
आपला,
(नि. ब. महाडीक)
कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन
👉 सदर शासन परिपत्रक पीडीएफ मध्ये हवे असल्यास फक्त या ओळीला स्पर्श करा
प्रत- माहिती व आवश्यक कार्यवाहीसाठी
१. संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय, मुंबई
२. संचालक, आयुष संचालनालय, मुंबई ३. निवडनस्ती (शिक्षण-२ कार्यासन)
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon