Training of Presiding Officer and Polling Officer through IGOT KARMAYOGI Portal Registration Link
मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांना IGOT KARMAYOGI पोर्टलद्वारे प्रशिक्षण देणेबाबत
विषय :- मतदान केंद्राध्यक्ष (Presiding Officer) वं मतदान अधिकारी (Polling Officer) यांना
IGOT KARMAYOGI पोर्टलद्वारे प्रशिक्षण देणेबाबत.
महोदय/महोदया,
आगामी महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने मतदान केंद्राध्यक्ष (PRO) व मतदान अधिकारी (PO) यांना विहीत प्रशिक्षण देण्यापूर्वी ऑनलाईन कोर्स द्वारे प्रशिक्षण झाल्यास सदर अधिकाऱ्यांची निवडणूकीसंबंधी कामकाजासाठी चांगली पार्श्वभूमी तयार होवू शकते. ही बाब विचारात घेवून सदर अधिकाऱ्यांना Physica! Training पुर्वी IGOT KARMAYOGI पोर्टलच्या माध्यमातून ध्वनीचित्रफितीच्याद्वारे (Audio-Visual) प्रशिक्षण देण्याची योजना राबवण्याचा उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे.
हेही वाचा 👇
विधानसभा निवडणूक- 2024
आपण आपला EPIC नंबर टाकून यादी भाग (Part No.) व अनुक्रमांक (Sr.No.) कसे शोधावे.
याकरिता या portal लिंकचा link आधार घ्यावा.
लिंक LinK
२. IGOT KARMAYOGI पोर्टलवर तयार करण्यात आलेल्या ध्वनीचित्रफिती या Handbook For Presiding officer-२०२३ मधील प्रकरणानुसार राज्यातील उत्कृष्ट NLMT व SLMTs यांच्या सहाय्याने तयार करण्यात आलेल्या आहेत. अशा एकूण मराठी भाषेतील १४ ध्वनीचित्रफितीचा समावेश असलेला ऑनलाईन कोर्स दोन भागात IGOT KARMAYOGI पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सदर कोर्स पूर्ण केल्यानंतर त्याबाबतचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. सदर ऑनलाईन कोर्स आयोगाच्या सूचनांनुसार घेण्यात येणाऱ्या विहीत प्रशिक्षणाला पर्याय नसून निवडणूक कामकाजाशी संबंधीत विहीत केलेले प्रशिक्षण प्रत्यक्षरित्या घेणे अनिवार्य आहे. सदर ऑनलाईन कोर्सचा हेतू केवळ विहित प्रशिक्षणाआधी विषयाची पार्श्वभूमी तयार होणे असा आहे. तसेच निवडणूक कामकाजाच्या दृष्टीने Handbook For Presiding officer- २०२३ मधील तरतुदी अंतिम असतील ही बाब लक्षात घ्यावी,
👇
निवडणुकीच्या कामातून यांना मिळू शकते सूट
👆
३. सबब आपल्या अधिपत्याखालील सर्व मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांना तसेच या कामासाठी Election duty लागण्याची शक्यता असलेल्या सर्वांना वरील बाब निदर्शनास आणून द्यावी. तसेच निवडणूक कामकाजाशी संबंधीत ज्ञान व कौशल्य वाढविण्याच्या दृष्टीने सदर ध्वनीचित्रफिती पाहण्याबाबत आपल्यास्तरावरूनं सुचना देण्यात याव्यात.
मतदान अधिकारी आणि कर्मचारी यांना एवढे मिळते मानधन
⏬👀
VIDHANSABHA ELECTION UPDATES विधानसभा अपडेट्स साठी या ओळीला स्पर्श करा
४. सदर ध्वनीचित्रफिती भारत सरकारच्या IGOT KARMAYOGI PRTAL LINK पोर्टलवर पाहता येणार आहेत. त्यासाठी नोंदणीकरीता सोबतच्या Flow Chart चा अवलंब करावा. सदर पोर्टलवर लॉगिन होण्यासाठी gov.in किंवा nic.in यापैकी एक ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे. ज्या अधिकारी/ कर्मचारी यांच्याकडे gov.in किंवा nic.in चा ई-मेल आयडी आहेत त्यांनी IGOT KARMAYOGI पोर्टलवर वर सदर कोर्स पुर्ण करावा. तसेच ज्या अधिकारी/ कर्मचारी यांच्याकडे gov.in किंवा nic.in चा ई-मेल आयडी नाहीत त्यांच्यासाठी पर्याय उपलब्ध करून देण्यात येईल.
Circular pdf Copy Link
आपला,
(शरद दळवी)
अवर सचिव तथा उप मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य
उपजिल्हाधिकारी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी (सर्व)
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय
क्र. संकीर्ण २०२४/ प्र.क्र. ८७७/निवडणूक-८/३३ सामान्य प्रशासन विभाग, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई-०३२. दिनांक : १८ ऑक्टोबर, २०२४
प्रति, जिल्हाधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी (सर्व)
KARMAYOGI SAPTAH NATIONAL LEARNING WEEK
19 To 25 October 2024
कर्मयोगी सप्ताह राष्ट्रीय शिक्षण सप्ताह मिशन कर्मयोगी
KARMAYOGI SAPTAH National Learning Week Mission Karmayogi
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon