DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Duties of PRO FPO OPO in Election Polling Station

Duties of PRO FPO OPO in Election Polling Station

Duties and Functions of Polling Officers at Polling Station

Duties and Functions of Polling Officers at Polling Station
विधानसभा मतदान केंद्र अधिकारी क्रमांक १ ची  निवडणूक कर्तव्ये 
मतदान अधिका-यांची,मतदान केंद्र अध्यक्ष (PRO), प्रथम मतदान अधिकारी (FPO) व इतर मतदान अधिकारी (OPO यांची निवडणूक कर्तव्ये 

डिस्क्लेमर / Disclaimer
    लोकसभा /  विधानसभा मतदान केंद्राध्यक्षांचे मतदान केंद्र अधिकारी क्रमांक १,२,३, ची  निवडणूक कर्तव्ये  मतदान अधिका-यांची,मतदान केंद्र अध्यक्ष (PRO), प्रथम मतदान अधिकारी (FPO) व इतर मतदान अधिकारी (OPO यांची निवडणूक कर्तव्ये ही पुस्तिका फक्त आणि फक्त निवडणुकीचे कार्य पार पाडणाऱ्या मतदान केंद्राध्यक्ष तसेच मतदान अधिकारी१,२,३,यांच्या मदतीसाठी "कच्चे टिपण" म्हणून बनवली आहे. या मध्ये दिलेली सर्व माहीती मतदान केंद्राध्यक्षांसाठी निर्देशपुस्तक या मूळ पुस्तकाच्या आधारे तसेच इतर काही PPT च्या आधारे बनवली आहे. या पुस्तकात दिलेली सर्व माहिती पुर्णतः निर्दोष असेलच असे म्हणता येणार नाही. तरिही अधिक चांगल्या अभ्यासासाठी निवडणूक आयोगाने प्रशिक्षणादरम्यान दिलेले "मतदान केंद्राध्यक्षांसाठी निर्देशपुस्तक" हेच पुस्तक वापरावे हि नम्र विनंती.

मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय

क्रमांक: जीईएन (विस)-२०२४/प्र.क्र.९६/२४ (मतदान प्रतिनिधी)/नि-१

सामान्य प्रशासन विभाग,
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई

दिनांक: १५ नोव्हेंबर, २०२४.

प्रति,

१. आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, मुंबई शहर व मुंबई उपनगर.

२. सर्व जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी (मुंबई शहर व मुंबई उपनगर वगळता)

३. अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी, मुंबई शहर व मुंबई उपनगर.

४. विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी, सर्व. (जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्यामार्फत)

विषयः- विधानसभा सार्वत्रिक निवडणूका-२०२४ मतदान प्रतिनिधींच्या नियुक्तीबाबत.

संदर्भ :- भारत निवडणूक आयोगाचे पत्र क्र. ४६४/INST-PA/२०२३/EPS, दिनांक-१४.०६.२०२३.

महोदय/महोदया,

उपरोक्त विषयाबाबतच्या भारत निवडणूक आयोगाच्या संदर्भीय पत्रान्वये देण्यात आलेल्या सविस्तर सूचनांकडे आपले लक्ष वेधण्यात येत आहे. सदर पत्राची प्रत सुलभ संदर्भासाठी सोबत जोडली आहे.

आयोगाच्या सदर पत्रामध्ये मतदान प्रतिनिधींसाठी अर्हता, अनर्हता, नियुक्ती करणे किंवा नियुक्ती मागे घेणे/नविन नियुक्ती करणे, मतदान प्रतिनिधींनी मतदान प्रवेश करताना सोबत आणावयाचे साहित्य, मतदान प्रतिनिधींचे भूमिका व कर्तव्य, इ. बाबत सविस्तर सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्या मधील काही ठळक सूचना खालीलप्रमाणे आहे:-

• मतदान प्रतिनिधी सर्वसाधारणतः स्थानिक रहिवाशी असणे तसेच संबंधित मतदान केंद्राचा किंवा लगतच्या मतदान केंद्राचा मतदार असणे अभिप्रेत आहे. तथापि, भारत निवडणूक आयोगाने त्यामध्ये काही सवलत दिली असून वरीलप्रमाणे मतदान प्रतिनिधी नियुक्तीस अडचण येत असल्यास त्या विधानसभा मतदार संघातील कोणत्याही मतदाराला मतदान प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करता येईल.

• मतदान प्रतिनिधीकडे त्याचे मतदार ओळखपत्र किंवा भारत निवडणूक आयोगाने विहित केलेल्या पर्यायी कागदपत्र/ओळखपत्रापैकी एक कागदपत्र/ओळखपत्र असणे आवश्यक आहे.

ग्रामपंचायत सरपंच/पंचायत सदस्य/नगरसेवक/महानगरपालिका किंवा नगरपालिकेचे सदस्य किंवा स्थानिक व्यक्तिंना मतदान प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यास बंधन नाही.

राज्य किंवा केंद्र शासनाचे सध्याचे मंत्री, संसद सदस्य, विधानसभा/विधानमंडळाचे सदस्य, महानगरपालिकेचे महापौर, नगरपालिका/जिल्हा परिषद/पंचायत यांचे सभापती/अध्यक्ष, राज्य व केंद्राच्या सार्वजनिक उपक्रम/शासकीय संस्था/महामंडळे यांचे अध्यक्ष/सदस्य, शासनाकडून मानधन घेणाऱ्या व्यक्ति, शासन/शासन अनुदानित संस्थामध्ये अर्ध-वेळ काम करणाऱ्या व्यक्ति,शासन/शासन अनुदानित संस्थामध्ये कार्यरत अर्धवैद्यकीय/आरोग्य सेवा कर्मचारी, रास्त भाव दुकानाचे व्यापारी, इ. यांना मतदान प्रतिनिधी म्हणून नियुक्त करता येणार नाही.

• शासनाच्या सेवेत असलेल्या अधिकारी/कर्मचाऱ्यांना मतदान प्रतिनिधी म्हणून नियुक्त करता येणार नाही, असे केल्यास ही नियुक्ती लोकप्रतिनिधी अधिनियम, १९५१ च्या कलम १३४(अ) खाली गुन्हा असेल आणि अशा अधिकारी/कर्मचाऱ्यांना ०३ महिन्या पर्यंतचा तुरुंगवास, किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतील.

• सुरक्षा कवच असलेल्या एखाद्या व्यक्तीस त्याला मतदान प्रतिनिधी होण्याच्या कारणास्तव त्याचे सुरक्षा कवच परत करण्याची मुभा राहणार नाही.

• मतदान प्रतिनिधींची बैठक व्यवस्था आयोगाच्या पत्रातील परि. ५ (iii) मध्ये दर्शविल्याप्रमाणे करणे आवश्यक आहे.

• मतदान प्रतिनिधींना त्यांच्या कडील मतदार यादीची प्रत मतदान केंद्रात नेण्यास व त्यावर खुणा करण्यास मुभा राहील, मात्र कोणत्याही परिस्थितीत मतदानाच्या कालावधीत व मतदान संपेपर्यंत सदर मतदार यादीची प्रत पुन्हा बाहेर आणण्यास मुभा राहणार नाही. त्याच प्रमाणे ज्या मतदारांनी मतदान केले किंवा अद्याप केलेले नाही याबाबतची चिट्ठी त्यांना बाहेर पाठविता येणार नाही.

• गैरहजर/स्थलांतरित/मृत (ASD) मतदारांची तोतयागिरी टाळण्यासाठी, अशा मतदारांची यादी प्रत्येक मतदान केंद्र निहाय तयार करणे व ती प्रत्येक मतदान केंद्राध्यक्षाकडे उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. सदर यादीतील मतदार संबंधित मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी आल्यास त्याची ओळख त्याच्या मतदार ओळखपत्रावरुन /आयोगाने विहित केलेल्या पर्यायी कागदपत्रावरुन संबंधित मतदान केंद्राध्यक्षाने व्यक्तिशः करणे आवश्यक आहे व. त्या प्रमाणे संबंधित मतदान अधिकाऱ्याने याबाबतचे तपशिल मतदारांच्या नोंदवहीमध्ये (फॉर्म १७-ए) मध्ये अचूकरित्या भरले आहे, याची तपासणी करणे आवश्यक आहे.

• निवडणूक संचालन नियम, १९६१ च्या नियम ४९-एस नुसार मतदान संपल्यानंतर मतदान केंद्राध्यक्षाने मतदानाची नोंद असलेल्या फॉर्म-१७सी ची साक्षांकित सत्य प्रतः सर्व उपस्थित मतदान प्रतिनिधींना त्याबाबतची पोच घेऊन उपलब्ध करुन देणे अनिवार्य आहे.

वरील सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. त्याच प्रमाणे सदर पत्रातील अन्य सूचनांचे सुद्धा अनुपालन सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी करणे आवश्यक आहे. तसेच, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना/त्यांच्या निवडणूक प्रतिनिधींना/मतदान प्रतिनिधींना याबाबत पूर्व सूचना देण्यात याव्यात.

आपला,

(म.रा. पारकर)
उप सचिव व सह मुख्य निवडणूक अधिकारी,

महाराष्ट्र राज्य

प्रतः-
सर्व उप जिल्हाधिकारी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी.

Also Read 👇 

मतदान अधिकारी कामे व कर्तव्य - 
मतदान केंद्राध्यक्ष
    • मतदार यादीची चिन्हांकित प्रत
    • प्रदत्त मतपत्रिका
    सर्व नमुने व लिफाफे
    मतदान प्रक्रियेचे नियंत्रण

पहिला मतदान अधिकारी First Polling Officer
मतदार यादीच्या चिन्हांकित प्रतीचा प्रभारी
• मतदाराची ओळख पटविण्याची जबाबदारी

दुसरा मतदान अधिकारी Second Polling Officer
पक्क्या शाईचा प्रभारी.
नमुना 17-अ मधील मतदार नोंदवहीचा प्रभारी.
मतदाराची सही अथवा अंगठयाच ठसा घेईल.
मतदार नोंदवहीमध्ये मतदाराचा ओळख पुरावा नमुद करेल. उदा. EPIC नंबर
प्रत्येक मतदाराला मतदार चिठी देणे

तिसरा मतदान अधिकारी Third Polling Officer
• कंट्रोल युनिटचा प्रभारी
• मतदार चिट्ठी जमा करुन घेणे.
• कंट्रोल युनिटवरील Ballot बटण दाबून मतदान युनिट सुरु करेल
विधानसभा मतदान केंद्र अधिकारी क्रमांक १ ची  निवडणूक कर्तव्ये मतदान अधिका-यांची मतदान अधिकार्यांची मतदान केंद्रावरील कर्तव्ये व कामे

पहिला मतदान अधिकारी यांचे कार्य सविस्तर माहिती - 

०१) पहिला मतदान अधिकारी कोणते दस्तावेज असतील? मतदार यादीच्या चिन्हांकित यादीचा प्रभारी

पहिल्या मतदान अधिकाऱ्याकडे मतदार यादीची चिन्हांकीत प्रत, जोडपत्र 13A नुसार ASD मतदार यादी, स्त्री, पुरुष, तृतीयपंथी यांच्या मतदानाच्या आकडेवारीची नोंद करणारा व दर दोन तासांनी टक्केवारी काढायचा सारणी पेपर असेल

मतदानास सुरुवात करताना मतदार नोंदवही नमुना 17 अ/17A मध्ये पहिल्या मतदाराने स्वाक्षरी करण्यापूर्वी मतदान अधिकारी -1 व मतदान केंद्राध्यक्ष यांनी (मतदान अधिकारी-2 यांच्याकडील) मतदार नोंदवही नमुना 17 अ/17A मध्ये तपासणी करुन सही करावी व " नियंत्रण युनिट तपासणी केली आहे व एकूण "0" असल्याचे आढळले आहे" अशी नोंद करावी / शेरा लिहावा (मतदार नोंदवही म्हणजे नमुना 173 / 17A)

१] मतदाराची ओळख पटवणे

मतदाराची ओळख पटवणे. मोठ्याने नाव व अनुक्रमांक वाचून दाखवणे व निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या ओळखपत्रांच्या यादीतील कोणत्याही एका ओळखपत्राच्या आधारे मतदाराची ओळख पटवणे

२] स्त्री, पुरुष व तृतीयपंथी मतदारांची वेगवेगळी गणना करणे-:

मतदाराची ओळख पटल्यावर मतदार यादीच्या चिन्हांकित यादीवर मतदाराच्या चौकोनात लाल शाईने तिरकी रेषा मारावी. स्त्री, पुरुष व तृतीयपंथी यांची सुलभ पडताळणी व गणना करण्यासाठी.

अ] पुरुष मतदाराच्या चिन्हांकित यादितील चौकोनात फक्त तिरकी रेषा मारावी

ब] स्त्री मतदाराच्या चिन्हांकित यादितील चौकोनात तिरकी रेषा + अनुक्रमांकाभोवती गोल करावे

क] तृतीयपंथी मतदाराच्या चिन्हांकित यादितील चौकोनात तिरकी रेषा + अनुक्रमांका जवळ चांदणी ची खूण करावी.

Duties of PRO FPO OPO in Election Polling Station

३] मतदानाची टक्केवारी तयार करणे -
स्त्री, पुरुष व तृतिय पंथी मतदाराची मतदान आकडेवारीच्या तक्त्यात अचूक नोंद घेईल व दर दोन तासांनी झालेल्या मतदानाची स्त्री, पुरुष व तृतीयपंथी या श्रेणीनिहाय व तिघांची एकत्रित टक्केवारी तयार करेल.

४] EDC इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेट / निवडणूक कर्तव्य प्रमाणपत्र मतदाराची नोंद ठेवणे
    1] ज्या निवडणूक कर्मचाऱ्यांना स्वतःच्या मतदार संघात म्हणजे जेथे मतदार म्हणून ज्यांचे नाव मतदार यादीत नोंदवण्यात आले आहे अशा ठिकाणी नियुक्ती दिली असेल त्याच्या व्यतिरिक्त इतरत्र म्हणजे त्यांची नेमणूक ज्या मतदार केंद्रावर झाली आहे त्या मतदान केंद्रावर ते मतदान करू शकतात
    2] अशा मतदारांचे मतदान हे मतदान यंत्रावर घेण्यात यावे.
    3] असे EDC मतदार आले तर अशा मतदारांकडून EDC चे मूळ प्रमाणपत्र मतदान अधिकारी-1 यांच्याकडे जमा करावेत. नमुना 12B निवडणुक कार्य प्रमाणपत्र
    4] मतदार यादीच्या चिन्हांकित यादीमध्ये शेवटच्या अनुक्रमांकानंतर अशा मतदारांची नोंद घ्यावी.
    5] अशा मतदारांनी शक्यतो मतदान प्रतिनिधी उपस्थित असताना मतदान करावे.
    6] मतदारांची नोंदवही 17A मध्ये सदर मतदाराचा त्याचा मूळ मतदार यादीतील अनुक्रमांक / भाग क्रमांक / मतदारसंघाचा क्रमांक व नाव अशा रितीने नोंद करावी.
उदा. 997/176/141 ------------- (या ठिकाणी प्रत्यक्ष मतदान केंद्राचे नाव लिहा)
    7] मतदारांची नोंदवही 17A च्या शेवटाच्या रकान्यात EDC मतदार अशी नोंद करतील
    8] मतदान केंद्राध्यक्षाने सर्व EDC प्रमाणपत्र स्वतंत्र पाकिटात टाकून साहित्य स्विकृती कक्षात जमा करावेत.
    9] मतदान केंद्राध्यक्षांनी केंद्राध्यक्ष दैनंदिनी मध्ये अनुक्रमांक 13 मध्ये किती जणांनी EDC द्वारे मतदान केले आहे याची नंद ठेवावी.
    10] नमुना 17C : भाग 1 अनुक्रमांक 1 मध्ये त्या मतदार यादी भागातील मतदार + EDC द्वारे मतदान केलेले मतदार अशी एकूण मतदारांची संख्या दाखवावी. उदा.

फॉर्म 17C नोंदवलेल्या मतांचा हिशोब

1] मतदार केंद्राशी सलग्न मतदारांची एकूण संख्या

715 [710 + EDC 5]


5] PB नोंद असलेल्या मतदारांना मतदान केंद्रात परवानगी नाकारणे-:
ज्या मतदारांना टपाली मतपत्रिका देण्यात आलेल्या आहेत AVSC / AVPD / AVES / AVCO / मतदार बाबत चिन्हांकीत मतदार यादीत PB म्हणून चिन्हांकीत केले असेल तर मतदान केंद्रात मतदान करण्यास परवानगी देता येणार नाही.

6] ASD मधिल मतदार आल्यास काय करावे? (सदर मतदाराला केंद्राध्यक्षांकडे पाठवावे)
    1] मतदार यादीच्या चिन्हांकीत यादीसोबत जोडपत्र 13A नुसार ASD मतदार यादी (Absent, Shifted, Dead अनुपस्थित, स्थलांतरीत, मयत) मतदार यादी पुरवण्यात येते. अशा मतदारांची निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे ओळखिच्या पुराव्याच्या आधारे कसून तपासणी करुन ओळख पटवावी.
    2] अशा मतदारांचे मतदान केंद्राध्यक्षाने जोडपत्र 14 मध्ये घोषणापत्र भरुन घ्यावे. अशा मतदाराबाबत दुसरा मतदान अधिकारी कडील मतदार नोंदवही 171 / 17A मध्ये सही सोबत अंगठ्याचा ठसा घेण्यात यावा.
    3] जर असा मतदार अंध अपंग असेल तर सोबती घेण्याची परवानगी द्यावी. व अंध व दिव्यांग मतदाराच्या सोबत्याचे प्रतिज्ञापत्र जोडपत्र 18 भरुन घ्यावे. सोबत्याला उजव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावावी. उजव्या हाताच्या तर्जनीवर आधिपासून शाई लावली असेल तर त्याला सोबती म्हणून काम करण्याची परवानगी दिली जाणार नाही.
    4] जर सोबती मतदान कक्षापर्यंत गेला असेल तर त्याची नोंद नमुना 14A मध्ये घेवू नये. पण जर मतदाराने सोबत्याच्या मदतीने मतदान केले तर त्याची नोंद नमुना 14A मध्ये करावी.

7] अंध अपंग मतदारांच्या बाबतीत-: (सदर मतदाराला केंद्राध्यक्षांकडे पाठवावे)
जर असा मतदार अंध अपंग असेल तर सोबती घेण्याची परवानगी द्यावी. व अंध व दिव्यांग मतदाराच्या सोबत्याचे प्रतिज्ञापत्र जोडपत्र 18 भरुन घ्यावे. सोबत्याला उजव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावावी. उजव्या हाताच्या तर्जनीवर आधिपासून शाई लावली असेल तर त्याला सोबती म्हणून काम करण्याची परवानगी दिली जाणार नाही.
जर सोबती मतदान कक्षापर्यंत गेला असेल तर त्याची नोंद नमुना 14A मध्ये घेवू नये. पण जर मतदाराने सोबत्याच्या मदतीने मतदान केले तर त्याची नोंद नमुना 14A मध्ये करावी.

8] आक्षेपित मत / Challenge Vote मतदारांच्या बाबतीत : (सदर मतदाराला केंद्राध्यक्षांकडे पाठवावे)
    1] मतदान प्रतिनिधिने मतदाराच्या ओळखीला आव्हान दिले तर....
    2] सदर मतदान प्रतिनिधि कडून रु.2/- अनामत रक्कम भरून घ्यावी
    3] मतदान केंद्राध्यक्षाने आव्हान दिलेल्या मतदाराला त्याच्या ओळखीचा योग्य तो पुरावा देवून स्वतःला मी तोच आहे हे सिध्द करण्यास सांगावे
    4] चौकशीनंतर मतदार खरा असल्याचे निष्पन्न झाल्यास मतदाराला मतदान करू द्यावे व मतदान प्रतिनिधिची अनामत रक्कम जप्त करावी
    5] आक्षेप जर खरा झाला व सदर मतदार तोतया मतदार असल्याचे सिध्द झाले तर सदर व्यक्तीस मतदान करू देवू नये दिलेल्या नमुन्यात त्या मतदाराची लेखी तक्रार देवून पोलिसाच्या स्वाधिन करावे. मतदान प्रतिनिधिची अनामत रक्कम परत करावी

    ९] प्रदत्त मत /Tender Vote (सदर मतदाराला केंद्राध्यक्षांकडे पाठवावे)
    1] जर एखादी व्यक्ती मतदानासाठी मतदान केंद्रावर आली आहे व त्या व्यक्तीच्या नावावर अगोदरच कोणत्यातरी दुसऱ्याच व्यक्तीने मतदान करून गेल्याचे लक्षात आल्यास सदर मतदाराला त्याच्या ओळखीचा पुरावा सादर करण्यास सांगावे. जर त्याने सादर केलेला पुरावा योग्य असेल तर त्याला मतदान करू द्यावे पण सदर मतदान प्रदत्त मतपत्रिकेवर करु द्यावे मतदार यंत्रावर नाही
    2] दुसरा मतदान अधिकारी या प्रदत्त मताची नोंद नोंदवही नमुना 17A मध्ये करणार नाही
    3] अशा प्रदत्त मताची नोंद नमुना 17B मध्ये प्रदत्त मतपत्रिका दिलेल्या मतदारांची यादी मध्ये ठेवावी व त्यातील रकाना 5 मध्ये मतदारांची स्वाक्षरी किंवा अंगठा घ्यावा.
    4] मतदान केंद्रावर तुम्हाला पुरवलेल्या प्रदत्त मतपत्रिकेवर मागील बाजूस "प्रदत्त मतपत्रिका" असा शिक्का मारलेला नसेल तर केंद्राध्यक्षाने स्वतःच्या हस्ताक्षरात प्रदत्त मतपत्रिका असे लिहावे.
    5] सदर मतदाराला प्रदत्त मतपत्रिका देतेवेळी शाई लावलेला बाणाकृती रबरी स्टॅप द्यावा सदर मतदार मतदान कक्षात जावून त्याच्या पसंतीच्या उमेदवारच्या निशाणी समोर बाणफुलीचा रबरी शिक्का मारण्यास सांगावे. त्यानंतर मतदाराने दिलेले मत कोणाला दिसणार नाही अशा रितीने मतपत्रिकेची घडी करेल व केंद्राध्यक्ष यांच्याकडे देईल
    6] सदर प्रदत्त मतपत्रिका मतदान केंद्राध्यक्षाने प्रदत्त मतपत्रिकांची यादी फॉर्म 17B च्या पाकीटात घाला [ प्रदत्त मतपत्रिका उघडून पाहू नका] मतदान पूर्ण झाल्यावर पाकीट सीलबंद करा
    7] नमुना 17क / 17C च्या भाग-1 मध्ये नोंदवलेल्या मतांचा हिशोब : अनुक्रमांक 9 मध्ये घ्यावी
10] सांख्यिकीय प्रपत्रे भरणे -:
मतदान संपल्यानंतर सांख्यिकीय प्रपत्रे भरण्यासाठी मतदान केंद्राध्यक्ष याला मदत करावी
Notes
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

मतदान अधिकारी यांचे कार्य
दुसरा मतदान अधिकारी यांचे कार्य

2] दुसरा मतदान अधिकारी - नमुना 171 / 17A मतदार नोंदवहीचा प्रभारी कोणते दस्तावेज असतील?
नमुना 173 / 17A मतदार नोंदवही, पक्की शाई, मतदार चिट्ठी

    1] प्रमाणित करणे - : प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया सुरु होण्यापूर्वी मतदान यंत्रात शुन्य मते आहेत असे प्रमाणित करावे
    2] अनुक्रमांकची नोंद करणे -: पहिल्या मतदान अधिकाऱ्याने मतदाराचे नाव व यादीतील अनुक्रमांक उच्चारत्यानंतर दुसऱ्या मतदान अधिकाऱ्याने सदरचा अनुक्रमांक मतदार नोंदवहीत 1731 / 17A दुसऱ्या रकान्यामध्ये नोंदवावा

    अ] EDC- निवडणूक कर्तव्य प्रमाणपत्र ची नोंद पुढील प्रमाणे करावी - EDC ची मतदार यादीच्या अनुक्रमांक कॉलम मध्ये नोंद करताना पुढिलप्रमाणे नोंद करावी मतदार यादीतील अनुक्रमांक / भाग क्रमांक / मतदारसंघाचा क्रमांक- येथे नोंदवा

    ब] प्रॉक्सी मतदार -:
जर प्रॉक्सी मतदार असेल तर मतदाराचा मतदार यादीतील अनुक्रमांक लिहावा व त्यापुढे कंसात 'PV' किंवा 'बम' (बदली मतदार) असे लिहा उदा. 111 [PV] / 111 [बम]

3] शाई लावणे - :
    अ] मतदाराच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावावी
    ब] अंध अपंग मतदारास व त्याच्या सोबत्यास देखील शाई लावावी. सोबत्याच्या उजव्या तर्जनीवर शाई लावावी. उजव्या हाताच्या तर्जनीवर आधिपासून शाई लावली असेल तर त्याला सोबती म्हणून काम करण्याची परवानगी दिली जाणार नाही.
    क] प्रॉक्सी / बदली मतदार असेल तर त्याच्या डाव्या हाताच्या मधल्या बोटावर शाई लावावी. नसेल तर इतर कोणत्याही बोटाला. डावा हात नसेल तर उजव्या हाताच्या तर्जनिला. उजवी तर्जनी नसेल तर कोणत्याही बोटाला. दोन्ही हात नसेल तर जे बोटाचे पेर असेल त्याला पक्की शाई लावावी

6] ओळखीच्या पुराव्याची नोंद करणे -: आलेल्या मतदाराचा ओळखीचा पुरावा तपासेल व नमुना 171 / 17A मध्ये त्याची नोंद करेल
    अ] जर मतदाराने EPIC दाखवले तर EP व शेवटचे चार अंक लिहावे उदा. EP 1234
    ब] जर मतदाराने EPIC ऐवजी मान्य असलेले इतर कोणातेही पुरावे दाखवले तर त्या पुराव्याचा प्रकार व शेवटचे चार अंक लिहावेत/उदा आधार कार्ड 1234, पॅन कार्ड 1234, शासकिय ओळख पत्र 1234, पासपोर्ट 1234

7] मतदाराची सही / अंगठा कॉलम क्र.- 4 मध्ये नोंदवणे - मतदार नोंदवही 1731 / 17A च्या कॉलम क्र. - 4 मध्ये मतदाराचःइ सही किंवा अंगठा घ्यावा. जर ASD यादीतील मतदार असेल तर त्या मतदाराची सही व अंगठा दोन्ही घ्यावा.

8] मतदाराने सही / अंगठा देण्यास नकार दिला तर जर एखाद्या मतदाराने सही देण्यास किंवा अंगठा उमटवण्यास नकार दिला तर अशा मतदाराला मतदान करण्याची परवानगी देवू नये. शेरा रकान्यात "स्वाक्षरी / अंगठ्याचा ठसा देण्यास नकार - मतदानास परवानगी दिली नाही." अशी नोंद करुन मतदान केंद्राध्यक्षाने सही करावी. फॉर्म 17C मध्ये नोंदवलेल्या मतांचा हिशोब भाग 1 नियम 49-5/49-D अंतर्गत "मतदान करण्याची परवानगी न दिलेल्या मतदारांची संख्या" यात नोंद करावी

9] मतदाराने मतदानास नकार दिल्यास काय करावे - ?
    1] ओळख पटवून फॉर्म 17-A मध्ये स्वाक्षरी केल्यावर मतदाराने मतदानास नकार दिल्यास
    2] मतदाराला मत देण्यास प्रवृत्त करावे-नोटा बद्दल माहिती द्यावी
  3] मतदाराचा नकार कायम राहिल्यास मतदार नोंदवही मध्ये 'मतदानास नकार' असा शेरा लिहून   केंद्राध्यक्षाने सही करावी
    4] जर मतदार कंट्रोल युनिटवरील उत्चीत बटन दाबुन मतदान युनिट सुरू केल्यावर जर मतदानास नकार देत असेल तर अशा वेळेस वरील प्रक्रिया पुर्ण करुन त्या मतदारास जावू द्यावे व युनिट
वरील उत्चीत बटन दाबुन मतदान युनिट तसेच ठेवून ते पुढील मतदारासाठी वापरावे 
    5] शेवटचा मतदार अशा रितिने मतदानास नकार देणार नाही याची मात्र काळजी घ्यावी कारण एकदा दिलेली कमांड फ़क्त CU चे बटण ऑन-ऑफ करुनच निष्क्रिय करता येते पण जर CU चे बटण ऑन-ऑफ केले तर VV PAT ची स्वयंनिर्मित 7 पेपर स्लीप लगेच ड्रॉपबॉक्स मध्ये तयार होतात त्यामुळे शेवटच्च्या मतदाराचे मत इ. व्ही. एम मशिन मध्येच झाले पाहिजे याची काळजी घ्यावी
(तरीही असा प्रसंग घडलाच तर CU चे बटण बंद करा. VVPAT ला लावलेली CU ची केबल VVPAT पासून अलग करा. BU ला लावलेली VVPAT ची केबल BU पासून अलग करा. CU चे बटण चालू करा. आता तुम्हाला लाल रंगाचा Busy दिवा दिसणार नाही. मतदानास नकार देणारा हा शेवटचा मतदार असल्याने तुमची मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे त्यामुळे CLOSE बटण दाबून मतदान बंद करा व पुढिल कामे करायला घ्या.
    6] फॉर्म 17C मध्ये नोंदवलेल्या मतांचा हिशोब Part-1 मध्ये नियम 49-ण अंतर्गत "मत न नोंदवण्याचे ठरवलेल्या मतदारांची संख्या यात नोंद करावी.

10] प्रदत्त मत/Tender Vote - दुसरा मतदान अधिकारी या प्रदत्त मताची नोंद नोंदवही नमुना 17A मध्ये करणार नाही

11] चाचणी मत : मतदाराने VVPAT पेपर स्लीप चुकीची आल्याची तक्रार केल्यास : नियम 49MA
    1] संबंधित मतदाराचे लेखी प्रतिज्ञापत्र जोडपत्र 17 भरुन घ्यावे. त्याअगोदर अशा मतदारास चूकीचे प्रतिज्ञापत्र केल्यास होणाऱ्या परीणामांबाबत सूचना द्यावी
    2] मतदान केंद्राध्यक्षाने मतदार नोंदवही फॉर्म 17A मध्ये (मतदान अधिकारी-2 याच्याकडील नोंदवही 1731/ 17A) संबंधित मतदाराची दुबार नोंदणी करावी

3] दुबार नोंदणी कशी करावी?

क्र

मतदाराचा मतदार यादीतील अनुक्रमांक

मतदाराने ओळखिचा पुरावा म्हणून सादर केलेल्या कागदपत्रांचा तपशील

मतदाराची स्वाक्षरी किंवा अंगठ्याचा ठसा

शेरा

10

585

आधार कार्ड 1234 5678 8910

 

स्वाक्षरी

चाचणी मत (Test Vote) उमेदवाराचा अनुक्रमांक..........नाव साठी चाचणी मतदान घेण्यात आले. चाचणी मताशी विशिष्ट कागदी पावती जुळते मतदाराची स्वाक्षरी

11

585

आधार कार्ड 1234 5678 8910

स्वाक्षरी


    3] मतदान केंद्राध्यक्ष व मतदान प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत संबंधित मतदाराला चाचणी मत -
Test Vote नोंदवण्यास सांगावे.
    4] मतदाराचा आक्षेप खरा असेल तर मतदान थांबवावे व झोनल ऑफिसर शी संपर्क साधावा
    5] मतदाराचा आक्षेप खोटा सिध्द झाला तर मतदार नोंदवही फॉर्म 17A मध्ये Test Vote नोंदवलेल्या उमेदवाराचा नाव व मतदाराचे नाव व त्याचा अनुक्रमांक यांची नोंद घ्यावी
    6] संबंधित मतदाराची शेरा रकान्यात सही घ्यावी
    7] फॉर्म 17C मध्ये नोंदवलेल्या मताचा हिशोब भाग-1 मधील अनुक्रमांक 5ब मध्ये Test Vote ची नोंद घ्यावी
    8] संबंधित मतदाराला पोलिसाच्या स्वाधिन करावे.

12] शेऱ्याची नोंद करणे -: मतदार नोंदवही फॉर्म 17A मध्ये पाचव्या रकान्यात आवश्यकतेनुसार मतदानास नकार, गोपनियता भंग, EDC मतदार, Test Vote अशा नोंदी आवश्यकतेनुसार करेल.

13] मतदारांना मतदार चिट्ठी देणे -: मतदाराला डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावल्यावर,
ओळखीच्यापुराव्याची नोंद केल्यावर, योग्य तो शेरा लिहील्यावर दुसरा मतदान अधिकारी मतदाराला
मतदानासाठी मतदार चिट्ठी देईल व तिसऱ्या मतदान अधिकाऱ्याकदे मतदारास जाण्याचा निर्देश देईल. 

14] मतदान प्रक्रिया संपल्यानंतर द्यायचा शेरा मतदान प्रक्रिया संपल्यानंतर शेवटचे मतदान नोंदीखाली लाल शाईने आडवी रेघ ओढून त्याखाली "नमुना 17अ मधील शेवटच्या नोंदीचा अनुक्रमांक
असा आहे" अशी नोंद करुन मतदान प्रतिनिधी यांनी स्वाक्षरी करावी.
नमुना 17अ : मतदान अधिकारी - 2 यांच्याकडील नोंदवही

अ.क्र.

मतदाराचा मतदार यादीतील अनुक्रमांक

मतदाराने स्वतःची ओळख पटवण्यासाठी सादर केलेला पुरावा

मतदाराची सही / अंगठा

शेरा

 

प्रत्यक्ष मतदान सूरू होण्यापूर्वी मतदान यंत्रात (0) मते असल्याची खात्री करण्यात आली

१४५

आधार कार्ड क्र- 1236

स्वाक्षरी

 

१७९

पासपोर्ट क्र - ABCDE2KS

स्वाक्षरी

दिव्यांग मतदार

२२५

शासकिय ओळख पत्र क्र-1234

स्वाक्षरी

ASD मतदार

२६५

पासपोर्ट क्र - ABCDE2KS

 

सही/अंगठा करण्यास नकार दिल्याने मतदान करू दिले नाही [ म. केंद्राध्यक्षाची सही]

१४३

EP 1234

सही व अंगठा दोन्ही

मतदाराने मतदान करण्यास नकार दिला मतदाराची सही - म. केंद्राध्यक्षाची सही

१६५

आधार कार्ड क्र- 1236

स्वाक्षरी

 

४५५

आधार कार्ड क्र- 1236

स्वाक्षरी

मतदान गोपनियतेचा भंग मतदान करू दिले नाही

३८८

EP 1234

स्वाक्षरी

EDC मतदार

४०२

शासकिय ओळख पत्र क्र-1234

स्वाक्षरी

मतदाराने VV PAT बद्दल तक्रार केली म. केंद्राध्यक्षाची सही

१०

५२२

EP 1234

स्वाक्षरी

चाचणी मत (Test Vote) उमेदवाराचा अनुक्रमांक........... नाव. साठी चाचणी मतदान घेण्यात आले. चाचणी मताशी विशिष्ट कागदी पावती जुळते मतदाराची स्वाक्षरी

११

१५५

शासकिय ओळख पत्र क्र-1234

स्वाक्षरी

प्रॉक्सी मतदार

"नमुना 17अ मधील शेवटच्या नोंदीचा अनुक्रमांक ......७२०... असा आहे"

मतदान केंद्राध्यक्षाची सही                                              मतदान प्रतिनिधीची सही


तिसरा मतदान अधिकारी यांचे कार्य

तिसरा मतदान अधिकारी कंट्रोल युनिट चा प्रभारी कोणते दस्तावेज असतील? - कंट्रोल युनिट, मतदाराच्या मतदार चिठ्या
1] मतदाराने आणलेली [दुसऱ्या मतदान अधिकाऱ्याकडून] चिठ्ठी जमा करुन घ्यावी ज्या क्रमाने मतदान अधिकारी 2 यांनी मतदार चिट्ठी दिली आहे त्याच क्रमाने मतदाराला मतदान कक्षात प्रवेश द्यावा. मतदाराने आणलेली [दुसऱ्या मतदान अधिकाऱ्याकडून] चिठ्ठी जमा करुन घ्यावी
2] कंट्रोल युनिटवरील उचीत बटन दाबुन मतदान युनिट सुरू करेल
3] मतदाराच्या तर्जनिवरील शाई तपासुन मतदान कक्षात जाण्याची परवानगी देईल
4] 'बीप' आवाजाकडे लक्ष ठेवेल. 'बीप' आवाज आल्यावर व कंट्रोल युनिटवरील लाल दिवा बंद झाला आहे याची खात्री करून नंतरच मतदाराला बाहेर जाऊ देईल.
5] कोणताही मतदार मत न नोंदवता परस्पर निघून जाणार नाही याकडे बारकाईने लक्ष ठेवायचे आहे. बीप आवाज येणे व लाल दिवा बंद होणे आवश्यक आहे. त्याशिवाय मतदार बाहेर जाणार नाही याची खूप काळजी घ्यावी.
6] मतदाराने आणलेल्या मतदान चिठ्या निट सांभाळून एका प्लॅस्टीक च्या बॅग मध्ये ठेवेल व पन्नास पन्नास चिठ्ठयांचे व्यवस्थित बंच बनवून त्याला स्टॅपलर ने पीन करुन / बर लावून ठेवेल

7] मतदान करायला नकार दिलेले मतदार याबाबतीत करायची कारवाई 
    1] एखादा मतदार मतदान चिट्ठी मतदान अधिकारी -3 यांच्याकडे देईल पण मतदान करायला नकार देईल. अशा वेळेस त्याला मतदान करण्यासाठी विनंती करावी पण तरिही जर तो मतदान करायला तयार नसेल तर ही बाब मतदान केंद्राध्यक्ष व अमतदान अधिकारी-2 याच्या लक्षातआणून द्यावी.
    2] मतदाराला मत देण्यास प्रवृत्त करावे-नोटा बद्दल माहिती द्यावी
    31 मतदाराचा नकार कायम राहिल्यास मतदार नोंदवही 17 अ / 17A मध्ये 'मतदानास नकार' असा शेरा लिहून केंद्राध्यक्षाने सही करावी
    4] जर मतदार कंट्रोल युनिटवरील उचीत बटन दाबुन मतदान युनिट सुरू केल्यावर जर मतदानास नकार देत असेल तर अशा वेळेस वरील प्रक्रिया पुर्ण करुन त्या मतदारास जावू द्यावे व युनिट वरील उचीत बटन दाबुन मतदान युनिट तसेच ठेवून ते पुढील मतदारासाठी वापरावे
    5] शेवटचा मतदार अशा रितिने मतदानास नकार देणार नाही याची मात्र काळजी घ्यावी कारण एकदा दिलेली कमांड फ़क्त CU चे बटण ऑन-ऑफ करुनच निष्क्रिय करता येते पण जर CU चे बटण ऑन-ऑफ केले तर VV PAT ची स्वयंनिर्मित 7 पेपर स्लीप लगेच ड्रॉपबॉक्स मध्ये तयार होतात त्यामुळे शेवटच्या मतदाराचे मत इ. व्ही. एम मशिन मध्येच झाले पाहिजे याची काळजी घ्यावी (तरीही असा प्रसंग घडलाच तर CU चे बटण बंद करा. VVPAT ला लावलेली CU ची केबल VVPAT पासून अलग करा. BU ला लावलेली VVPAT ची केबल BU पासून अलग करा. CU चे बटण चालू करा. आता तुम्हाला लाल रंगाचा Busy दिवा दिसणार नाही. मतदानास नकार देणारा हा शेवटचा मतदार असल्याने तुमची मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे त्यामुळे CLOSE बटण दाबून मतदान बंद करा व पुढिल कामे करायला घ्या.
    6] फॉर्म 17C मध्ये नोंदवलेल्या मतांचा हिशोब Part-1 मध्ये नियम 49-ण अंतर्गत "मत न नोंदवण्याचे ठरवलेल्या मतदारांची संख्या यात नोंद करावी.



क्रमशः लवकरच भेटू यात याच ठिकाणी ......

Legislative Assembly Polling Officer No 1 Vidhansabha Election Duties of Booth Polling Officer No 1 Duties and Functions of Polling Officers at Polling Station Training PRO, FPO & OPO  Duty of PRO FPO OPO in Election  Polling Officer Functions and Duties Presiding Officer of Polling Station
Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon