DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Iyatta Chauthi Satvi Shishyvrytti Parisha Interim Nikal Ghoshit

Iyatta Chauthi Satvi Shishyvrytti Parisha Interim Nikal Ghoshit

प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ४ थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ७ वी) अंतरिम (तात्पुरता) निकाल घोषित
55

55

Std 4th 7th Antarim Result Link

Class 4th 7th Antarim Result Declared 

Iyatta chauthi Satvi Interim Nikal Ghoshit


महाराष्ट्र राज्य

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे 

    प्रसिद्धीपत्रक

प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ४ थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ७ वी) अंतरिम (तात्पुरता) निकाल घोषित

दि. २६ एप्रिल, २०२६

    अंतरिम निकाल

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक २६ एप्रिल, २०२६ रोजी घेण्यात आलेल्या प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ४ थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ७ वी) चा अंतरिम (तात्पुरता) निकाल शनिवार, दि. २५ जुलै, २०२६ रोजी

 https://www.mscepune.in 

व 

https://2026-2.puppssmsce.in


 या परिषदेच्या संकेतस्थळावर घोषित करण्यात येत आहे. शाळांना आपल्या विद्यार्थ्यांचा निकाल त्यांच्या लॉगीनमधून तसेच पालकांना आपल्या पाल्यांचा निकाल संकेतस्थळावर पाहता येईल.

विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करुन घ्यावयाची असल्यास संबंधित शाळांच्या लॉगीनमध्ये दि. २५/०७/२०२६ ते ०२/०८/२०२६ या कालावधीत ऑनलाईन अर्ज उपलब्ध करुन देण्यात येत आहे. गुणांच्या पडताळणीसाठी प्रत्येक पेपरकरीता रु. ५०/- याप्रमाणे शुल्काची रक्कम ऑनलाईन पेमेंटद्वारे भरणे आवश्यक आहे.

विद्यार्थ्याचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, इत्यादीमध्ये दुरूस्तीसाठी दि. ०२/०८/२०२६ पर्यंत संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. सदर अर्ज ऑनलाईन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पध्दतीने पाठविल्यास स्वीकारले जाणार नाहीत. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. तसेच शाळा माहिती प्रपत्रात शाळेचे क्षेत्र (शहरी/ ग्रामीण) व अभ्यासक्रमात दुरूस्ती करावयाची असल्यास शाळा मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीचे विनंती पत्र पूर्ण माहिती नमूद करून सदरचे पत्र puppsshelpdesk@gmail.com या ईमेलवर दि. ०२/०८/२०२६ रोजीपर्यंत पाठविण्यात यावे.

विहित मुदतीत आवश्यक शुल्कासह ऑनलाईन प्राप्त झालेल्या अर्जानुसार गुणपडताळणीचा निर्णय संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये अर्ज प्राप्त झाल्यानंतर ३० दिवसांपर्यंत कळविण्यात येईल. विहित मुदतीत ऑनलाईन आलेले गुणपडताळणी अर्ज निकाली काढल्यानंतर अंतिम निकाल व गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल.

(महेश चोथे)

आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे - ०४.

दिनांक :- २५/०७/२०२६,

ठिकाण :- पुणे. 


Newest
Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon