DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

इयत्ता बारावी अर्थातच HSC बोर्ड परीक्षेचा निकाल लिंक HSC Board Exam Result

HSC Board Exam





महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे ४११००४.

          प्रकटन

विषय : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या निकालाबाबत

मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपध्दतीनुसार जाहीर करण्यात येत आहे. त्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर शनिवार दिनांक ०२ मे, २०२६ रोजी दुपारी १२.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे. अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते खालीलप्रमाणे आहेत.


इयत्ता बारावी अर्थातच HSC बोर्ड परीक्षेचा निकाल आज 


राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी / मार्च  २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या / HSC निकालाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात 

प्रतीक्षा संपली..

बारावीचा निकाल आज  दिनांक  ०२/०५/२०२६ रोजी दुपारी १२.०० वाजता Online जाहीर

 होणार.......

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा मार्फत फेब्रुवारी / मार्च  २०२६   मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या (HSC) निकालाची प्रतीक्षा आता संपली आहे. आज  शनिवार दिनांक ०१/०५/२०२६ रोजी दुपारी १२.०० वाजता Online निकाल जाहीर करण्यात येईल, असे मंडळाच्या वतीने नुकतेच जाहीर करण्यात आले आहे.

HSC EXAMINATION RESULT 2026 

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा मार्फत फेब्रुवारी / मार्च  २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी अर्थातच HSC बोर्ड परीक्षेचा निकाल आज 

    अधिक माहितीसाठी व निकाल पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा   

CLICK HERE

परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवर उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल. त्याचप्रमाणे Digilocker App मध्ये Digital गुणपत्रिका संग्रहित करून ठेवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

तसेच


in college login या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना त्यांच्या कनिष्ठ महाविद्यालयाचा एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

सदर निकालाबाबतचा अन्य तपशील खालीलप्रमाणे -

१) ऑनलाईन निकालानंतर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांस स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळ https://mahahsscboard.in वरुन स्वतः किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत.

गुणपडताळणीसाठी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतीसाठी रविवार दिनांक ०३/०५/२०२६ ते रविवार दिनांक १७/०५/२०२६ पर्यंत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येईल. त्यासोबतच ऑनलाईन पध्दतीने शुल्क Debit Card/Credit Card/UPI/Net Banking याद्वारे भरता येईल.

२) फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे. छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपध्द्‌तीचा अवलंब करुन विहित नमुन्यात विहित शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्याथ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक राहील, ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.

३) फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेत सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या तीन संधी (जून-जुलै २०२६, फेब्रुवारी-मार्च २०२७ व जून-जुलै २०२७) श्रेणी/गुणसुधार (Class Improvement Scheme) योजनेअंतर्गत उपलब्ध राहतील.

४) जून-जुलै २०२६ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परिक्षार्थी, श्रेणीसुधार व खाजगीरित्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मंडळाच्या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने आवेदनपत्रे भरुन घेण्याच्या तारखांचे परिपत्रक स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येईल.

दिनांकः ३०/०४/२०२६
(डॉ. दिपक माळी)
सचिव
राज्य मंडळ, पुणे-०४



    अधिक माहितीसाठी व निकाल पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा   

CLICK HERE



निकाल पाहण्यासाठी स्वतःचा परीक्षेचा सीट नंबर/ रोल नंबर, आईचं नाव माहिती असणं आवश्यक आहे.
 बारावीच्या विद्यार्थ्यांना बारावीचा निकाल वरील वेबसाईटवर लाईव्ह पाहू शकतात निकाल कसा पाहायचा, त्याची सोपी पद्धत


बारावीचा निकाल जाहीर झाल्या नंतर या ठिकाणी तुम्हाला निकालाच्या लिंक उपलब्ध करून दिल्या जातील 
CLICK HERE
 
 

सर्व विद्यार्थ्यांना मनापासून शुभेच्छा!
१२  वी निकाल तारीख जाहीर होण्यापूर्वी  आपला १२ वी बोर्ड नंबर HSC Seat No कसा शोधावा ? 
मार्गदर्शक व्हिडिओ बघा

 

निकाल पाहण्यासाठी खालील सूचनांप्रमाणे पुढे जा.

#hscresult2021 #HSCResult #hsc #results





Click Here

वाचण्यासाठी खालिल ओळीला स्पर्श करा

बारावीनंतर विविध करीअर संधी कोणकोणत्या आहेत Academic Courses after Std.12 Compendium of academic courses after std-12

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र,पुणे मार्फत  इ १० वी व इ १२ वी च्या विद्यार्थ्यासाठी करिअर मार्गदर्शन सत्राचे आयोजन


 हे हि वाचा 

बारावी परीक्षा निकालाबाबत विद्यार्थ्यांना काही आक्षेप / तक्रार असल्यास त्या नोंदवण्यासाठी; त्यांचे निराकरण करण्यासाठी MSBSHSE कडून विभागीय स्तरावर तक्रार निवारण अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कृपया अधिक माहितीसाठी खालील प्रकटन पहा.

#hscresult2023 #HSCResult #hsc

SCERT,Maharashtra


Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon