DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Direct Deposit of Sarpanch Vice Sarpanch honorarium and gram panchayat member meeting allowance through online mode to their bank account

Direct Deposit of Sarpanch Vice Sarpanch honorarium and gram panchayat member meeting allowance through online mode to their bank account

सरपंच, उपसरपंच यांचे मानधन व ग्रामपंचायत सदस्य बैठक भत्ता ऑनलाईन पध्दतीने थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करणेबाबत.

महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग शासन निर्णय

तारीखः १४ ऑगस्ट, २०१९

प्रस्तावना :-

मा. मंत्री (वित्त) महोदय यांनी महाराष्ट्र शासनाच्या २०१९-२०२० ग्रा वर्षाचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर करताना दिनांक १८ जून २०१९ रोजीच्या भाषणात सरपंच मानधानाबाबत खालीलप्रमाणे घोषणा केली आहे :-

"राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधून पंचायतराज व्यवस्थेचा पाया असलेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंचाचे मानधन लक्षणीय वाढ करण्याचे प्रस्तावित असून यासाठी सन २०१९-२०२० " या आर्थिक वर्षात रुपये २०० कोटी एवढा निधी राखून ठेवण्यात येत आहे."

त्यानुसार दिनांक ३० जुलै, २०१९ च्या शासन निर्णय क्रमांक व्हीपीएम २०१९/प्र.क्र. २५५/ पंरा-३, अन्वये सरपंचांच्या मानधनात वाढ करण्यात आली असून उपसरपंचानाही मानधन अनुज्ञेय केले आहे. ग्रामपंचायत कर्मचा-यांचे वेतन ऑनलाईन पध्दतीने थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येते त्याप्रमाणे सरपंचांचे, उपसरपंचाचे मानधन व ग्रामपंचायत सदस्य बैठक भत्ताही ऑनलाईन पध्दतीने त्यांच्या बैंक खात्यात जमा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय:-

ज्या पध्दतीने ग्रामपंचायत कर्मचा-यांचे वेतन ऑनलाईन पध्दतीने थेट त्यांच्या बैंक खात्यात जमा करण्यात येत आहे त्याच पध्दतीने व त्याच प्रणालीद्वारे सरपंच व उपसरपंच यांचे मानधन व सदस्य बैठक भत्ता यापूढे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल. सरपंच व उपसरपंच यांचे मानधन व सदस्य बैठक भत्ता ऑनलाईन प्रणालीतून करण्यात येणार असल्याने संचालक, राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान, पुणे यांच्या एचडीएफसी बँकेमधील खालील खाते क्रमांक मध्ये उपरोक्त मानधनाची रक्कम जमा करुन संबंधितांना अदा करण्यात येईल.

9) Account Title: STATE PROJECT DIRECTOR RGPSA/RGSA, PUNE

शासन निर्णय क्रमांकः झेडपीए २०१९/प्र.क्र.२५५/पंरा-३

२) Account No:- ५०१००२३१२६९०७८ ३) IFSC Code: HDFC००००३५५

२. यासाठी कार्यपध्दती, कर्तव्य व जबाबदाऱ्या ह्या संदर्भाधीन क्रमांक २ व्या शासन निर्णयाप्रमाणेच असतील. दर महिन्याला प्रत्येक ग्रामसेवकाने सरपंच, उपसरपंच व सदस्य यांचे LOG IN करून माहिती अद्ययावत करावी. सरपंच, उपसरपंच व सदस्य यात बदल झाला असेल तर दर महिन्याला ग्रामसेवकाने संबंधितांची माहिती अद्ययावत करावी. संदर्भाधीन क्रमांक २ च्या शासन निर्णयातील तरतुदीप्रमाणेच गट विकास अधिकारी, पंचायत समिती (सर्व) व उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व) यांनी संबंधित माहितीची खातरजमा करावी. तसेच सदर मानधन व सदस्य बैठक भत्ता संबंधितांच्या खाते क्रमांकावरती त्याच दिवशी अथवा दुसऱ्या कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी जमा करण्यात येईल याची खातरजमा संचालक, राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान, पुणे यांनी करावी. तसेच याबाबतचा अहवाल दर महिन्याला शासनाला सादर करावा.

हेही वाचाल 👇 
ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी ही दोन्ही पदे एकत्रित करुन सदर पदाचे नामाभिदान "ग्रामपंचायत अधिकारी" करणेबाबत. या ओळीला स्पर्श करून वाचा 

३. संदर्भाधीन क्रमांक २ च्या शासन निर्णय मध्ये नमूद केलेल्या कार्यपध्दतीनुसारच व संदर्भाधीन क्रमांक ३ च्या शासन निर्णय मध्ये नमूद केलेल्या लोकसंख्या वर्गवारी व शासन अनुदान नुसार सरपंच व उपसरपंच यांचे मानधन व संदर्भाधीन क्रमांक १ च्या शासन निर्णयामध्ये नमूद सदस्य बैठक भत्ता त्यांच्या बँक खात्यात ऑनलाईन पध्दतीने अदा करण्यात येईल.

हेही वाचाल 👇 
सरपंचांच्या व उपसरपंचांच्या मानधनात वाढ करण्याबाबत या ओळीला स्पर्श करून वाचा

४. सदर खर्च मागणी क्रमांक एल-२, प्रधानशिर्ष २०५३-जिल्हा प्रशासन, ०९३-जिल्हा आस्थापना-(०७) (०१)-ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य यांचे मानधन व इतर भत्ते आणि कर्मचा-यांचे किमान वेतन यासाठी अनुदाने (२०५३ १०४२)-३१-सहायक अनुदान याखाली खर्च करण्यात येईल. सदर शासन निर्णयातील तरतुद

दिनांक ०१ जुलै, २०१९ पासून लागू करण्यात येईल. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या 🌐 👉  www.maharashtra.gov.in 👈 या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०१९०७३०१५४३१२३३२० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

GR pdf Link

या ओळीला स्पर्श करून सदर शासन निर्णय पीडीएफ मध्ये डाऊनलोड करू शकता

प्रधान सचिव, 
महाराष्ट्र शासन

Regarding direct deposit of sarpanch, sub sarpanch's honorarium and gram panchayat member meeting allowance through online mode to their bank account
महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग
शासन निर्णय क्रमांकः व्हीपीएम २०१९/प्र.क्र. २५५/पंरा-३, मुंबई  

तारीखः १४ ऑगस्ट, २०१९

१) शासन निर्णय क्रमांकः व्हीपीएम २०११/प्र.क्र. ४०/पंरा-३ दि. ६ सप्टेंबर, २०१४
शासन निर्णय क्रमांकः व्हीपीएम २०१७/प्र.क्र. २७/पंरा-३ दि. ६ जानेवारी, २०१८
२) ३) शासन निर्णय क्रमांकः व्हीपीएम २०१९/प्र.क्र. २५५/पंरा-३ दिनांक ३० जुलै, २०१९.


Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon