DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Payment of Election Allowance

Payment of Election Allowance

Assembly General Election - 2024 Guidelines for payment of Election Allowance/Meal Allowance to Polling Officers and Staff through online mode to their personal bank account.


विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४
मतदान अधिकारी व कर्मचारी यांना निवडणूक भत्ता/आहार भत्ता त्यांच्या वैयक्तिक बँक खात्यावर ऑनलाईन पध्दतीने अदा करण्याबाबत मार्गदर्शक सूचना.

Assembly General Election - 2024 Guidelines for payment of Election Allowance/Meal Allowance to Polling Officers and Staff through online mode to their personal bank account.

WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin Now

Vidhan Sabha Election 2024 Today's Update 

मतदान अधिकारी आणि कर्मचारी यांना एवढे मिळते मानधन
👀 


विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४

महोदय/महोदया,
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार या कार्यालयाच्या दि.१८.०४.२०२४ च्या शासन निर्णयात नमूद दराप्रमाणे राज्यातील लोकसभा / विधानसभा सार्वत्रिक/पोट निवडणुकांच्या मतदान / मतमोजणी कर्तव्यार्थ नियुक्त केलेल्या अधिकारी व कर्मचारी यांना निवडणूक भत्ता, आहार भत्ता अदा करण्यात येतो. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ करीता नियुक्त मतदान अधिकारी व कर्मचारी यांना सदर निवडणूक भत्ता हा त्यांच्या वैयक्तिक बँक खात्यावर ऑनलाईन पध्दतीने अदा करावयाचा आहे.
२. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ करीता नियुक्त केलेल्या मतदान अधिकारी व कर्मचारी याना निवडणूक भत्ता ऑनलाईन पध्दतीने अदा करण्याच्या अनुषंगाने मागदर्शक सूचना पुढीलप्रमाणे आहेतः-
(१) निवडणूक कर्तव्यार्थ मतदान केंद्राध्यक्ष / मतदान अधिकारी इ. पदासाठी नेमण्यात आलेले अधिकारी/कर्मचारी यांच्या बँक खात्याबाबत माहिती NIC ने विकसित केलेल्या Polling Personnel Management System (PPMS) या Software मध्ये भरण्यात आलेली आहे.
(२) उपरोक्त अधिकारी / कर्मचारी यांचे Second Randomization झाल्यानंतर त्यांची विधानसभा मतदारसंघात निवडणूक कर्तव्यार्थ नेमणूक झाल्यानंतर संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मतदान अधिकारी व कर्मचारी यांच्या बँक खात्याची माहिती सदर सॉफ्टवेअर मध्ये उपलब्ध असल्याची खात्री करावी.
(३) उपरोक्त अधिकारी/कर्मचारी यांची पहिले व दुसऱ्या प्रशिक्षणाच्या दिवसाची हजेरी NIC च्या Software मध्ये नोंदविण्यात यावी. तसेच मतदान पथकांना मतदान केंद्रावर रवाना करते वेळी, मतदान अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती आणि त्यांची किती दिवसांसाठी नियुक्ती करण्यात आलेली आहे, याची नोंद सॉफ्टवेअर मध्ये करावी.
(४) Third Randomization झाल्यानंतर उपरोक्त नमूद अधिकारी/कर्मचारी यांना अदा करावयाच्या रक्कमेची परिगणना ही NIC च्या Software मधून करण्यात येईल व संपूर्ण मतदार संघासाठी एकत्र यादी सोबत दिलेल्या नमुन्यात तयार होईल. सदर नमुना Download करुन निवडणूक निर्णय अधिकारी / आहरण व संवितरण अधिकारी यांचे ज्या बँकत खाते आहे, त्या बँकेकडे सदरची यादी व रक्कम पाठविण्यात यावी.
(५) NIC च्या Software मध्ये नोंदवलेले बँक खाते हे योग्य आहे किंवा नाही याची तपासणी करण्याकरीता दिनांक १८/११/२०२४ रोजी प्रायोगिक तत्वावर प्रत्येक अधिकारी / कर्मचारी यांना त्यांच्या बँक खात्यावर १ रुपया निवडणूक निर्णय अधिकारी / आहरण व संवितरण अधिकारी यांच्या खात्यातून अदा करुन. संबंधितांची बँक खाते योग्य असल्याबाबत खात्री करण्यात यावी. बँक खाते चुकीचे आढळून आल्यास सॉफ्टवेअर मध्ये योग्य बँक खात्याची नोंद करण्यात यावी. तसेच मतदान पथकांना रवाना करतांना ज्या अधिकारी/कर्मचाऱ्यांना Trial Payment मिळालेले नाही, त्या अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या बँक खात्याची अचूक माहिती NIC च्या Software मध्ये अद्ययावत करावी. मतदान अधिकारी व कर्मचारी यांना करावयाचे Trial Payment ची SOP सोबत जोडली आहे.
(६) अशाप्रकारे सर्व मतदान अधिकारी व कर्मचारी यांच्या बँक खात्याबाबत खात्री करुन घेतल्यानंतर, दिनांक १९.११.२०२४ रोजी दुपारी ३.०० वाजेपर्यंत NIC Software मधून Automatic Generated Scroll ("Same Bank Scroll" व "NEFT Scroll") Download करुन सदर Scroll ची प्रिन्ट संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी/आहरण व संवितरण अधिकारी यांनी मतदान अधिकारी व कर्मचारी यांना रक्कम अदा करण्याबाबत पत्राद्वारे बँकेस कळवावे. सदर पत्रामध्ये संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना सदरची रक्कम दुपारी ०१.०० वाजता अदा होईल, अशी कार्यवाही करण्याबाबत बँकेस सूचना देण्यात
याव्यात.
४. उपरोक्त सूचनांचे पालन करुन त्यानुसार कार्यवाही करण्यात यावी, अशी आपणांस विनंती आहे. मात्र ज्या जिल्ह्यांना सदर सूचनेनुसार NIC च्या Software मार्फत निवडणूक भत्ता अदा करणे शक्य होणार नाही असे वाटत असेल, त्या जिल्ह्यांनी याबाबत सबळ कारणमिमांसा देऊन, उपरोक्त प्रक्रियेचे पालन न करण्याचा निर्णय जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या स्तरावर घ्यावा.


उप सचिव व सह मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - २०२४

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon