DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

New Update Process Of Class 11th Central Online Admission

New Update Process Of Class 11th Central Online Admission

शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ पासून इयत्ता ११ वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची व्याप्ती राज्यभर वाढविणेबाबत व अधिक सुसूत्रता आणण्याबाबत.

Class 11th Central Online Admission Process Extending Scope Streamlining

Regarding extending the scope of the Central Online Admission Process of Class 11th from the academic year 2025-2026 across the state and bringing more streamlining.

Improved Procedures

Improved Procedures of Class 11th Central Online Admission Process

शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ पासून इयत्ता ११ वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची व्याप्ती राज्यभर वाढविणेबाबत व अधिक सुसूत्रता आणण्याबाबत.

extending the scope streamlining


दिनांक: २५ फेब्रुवारी, २०२५. 

वाचा:-

१) शासन निर्णय, शालेय शिक्षण विभाग, क्रमांकः एचएससी १०९७/ (१४४४/९७) / उमाशि - १, दि. २६.०६.१९९७

२) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांकः एचएससी १७०९ / (४४/०९) / उमाशि - १, दि. २८.०५.२००९ 

३) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांकः एचएससी- १७०९/ (४४/०९) / उमाशि - १, दि. ०७.०६.२०१० 

४) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांकः एचएससी- १८११/(४४१/११) / उमाशि - १, दि. १६.०३.२०१२ 

५) शासन पत्र, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांकः संकीर्ण १०१३/प्र.क्र.२३६/१३/ एसडी-२, दि. ०३.०३.२०१४ 

६) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांकः व्यशि २०१४/प्र.क्र. ८२/१४/ एसडी-६, दि. २१.०८.२०१४ 

७) शासन पत्र, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांकः प्रवेश २०१४/प्र.क्र. १९२ / एसडी -२. दि. १४.०५.२०१५ 

८) शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे पत्र क्र. उच्च माध्य २४२/११ ऑनलाईन /६१३१, दि. २७.१०.२०१५ 

९) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांकः न्यायाप्र- २०१५/ (६१/१५)/एसडी-२. दि. २८.०३.२०१६ 

१०) शासन पत्र, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांकः प्रवेश २०१६/प्र.क्र. (१८०/१६)/एसडी-२, दि. ०७.०१.२०१७

११) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांकः प्रवेश ०४२२/प्र.क्र. ४१/एसडी-२, दि. ०९.०१.२०२२ 


प्रस्तावना:-

सन २००९-२०१० या शैक्षणिक वर्षापासून मुंबई, ठाणे व रायगड जिल्ह्यातील मुंबई महानगर विकास प्राधिकरण (MMRDA) क्षेत्रातील सर्व उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता ११ वीचे प्रवेश ऑनलाईन पध्दतीने करण्याबाबत संदर्भाधिन क्रमांक २ येथील दि. २८.०५.२००९ च्या 


शासन निर्णयान्वये आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. सदर आदेशामध्ये संदर्भाधिन क्रमांक ३ व ४ येथील शासन निर्णयान्वये वेळोवेळी सुधारणा करण्यात आल्या आहेत. 

त्याचप्रमाणे संदर्भाधिन क्रमांक ५ येथील दि. ०३.०३.२०१४ च्या शासन पत्रान्वये सन २०१४-१५ या शैक्षणिक वर्षापासून पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील इयत्ता ११ वीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रवेश पध्दतीने करण्याबाबत शासनाने मान्यता दिलेली आहे. मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी १२७/२०१४ या जनहित याचिका प्रकरणी दि.०५.०८.२०१५ रोजी दिलेल्या निर्देशानुसार इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रक्रीयेबाबत सन २०१६-१७ साठी धोरणनिश्चित करून प्रवेश प्रक्रियेमध्ये सुसूत्रता आणण्याच्यादृष्टीने संदर्भ क्रमांक ९ येथील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

सद्यःस्थितीत इयत्ता ११ वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश राज्यातील मुंबई (MMRDA), पुणे पिंपरी चिंचवड, अमरावती, नागपूर आणि नाशिक या महानगरपालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयात राबविण्यात येत आहेत. सदर ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची उपयोगीता व व्यवहार्यता लक्षात घेवून तसेच मा. मुख्यमंत्री महोदयांच्या सात कलमी कृती उद्दिष्टांमध्ये असलेल्या EASE OF LIVING या उद्दिष्टान्वये विद्यार्थी व पालकांचे जीवनमान सुखकर बनविणे व याकामी खर्च होणारा वेळ, पैसा व श्रम याचा अपव्यव टाळण्यासाठी शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ पासून इयत्ता ११ वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश पध्दती राज्यभर राबविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार पुढीलप्रमाणे शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे. 

शासन निर्णयः-

मुंबई (MMRDA), पुणे, पिंपरी-चिंचवड, अमरावती, नागपूर आणि नाशिक या महानगरपालिका सोबतच इयत्ता ११ वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश पध्दती राज्यभर राबविण्याबाबत शासन मान्यता देण्यात येत आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ पासून महाराष्ट्र राज्य क्षेत्रातील सर्व मान्यता प्राप्त उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता ११ वीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रवेश पध्दतीने करण्याबाबत खालीलप्रमाणे सुधारित कार्यपध्दती अवलंबिण्यात यावी :-

१) इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया मुंबई महानगर विकास प्राधिकरण क्षेत्र (MMRDA), पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, अमरावती, नाशिक महानगरपालिका क्षेत्रासोबतच सन २०२५-२०२६ या शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्र राज्य क्षेत्रातील सर्व मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांना लागू राहील. 

२) विभागीय शिक्षण उपसंचालक, मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती, नाशिक, औरंगाबाद, लातूर व कोल्हापूर हे उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांकडून नोंदणी अर्जामध्ये नमूद केलेली माहिती उदा. शाखानिहाय तुकड्या, अनुदानित, विना अनुदानित, कायम विना-अनुदानित (स्वयंअर्थसहाय्यित) वर्गनिहाय व शाखानिहाय विद्यार्थी प्रवेश क्षमता, कनिष्ठ महाविद्यालयामध्ये उपलब्ध असलेले विषय इत्यादी तपासन शिक्षण संचालक (माध्यमिक व 

उच्च माध्यमिक) यांनी निश्चित केलेल्या ऑनलाईन सेवा पुरवठादारास विहित कालावधीत उपलब्ध करुन देतील. 

३) शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ पासून इयत्ता ११ वी केंद्रिय ऑनलाईन प्रवेश प्रकीया राज्यस्तरावर राबविण्यासाठी आयुक्त (शिक्षण), पुणे यांनी नियंत्रण ठेवावे व या संपूर्ण प्रवेश प्रक्रियेची अंमलबजावणी शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) यांच्या स्तरावर करण्यात यावी.४) राज्यस्तरावर ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्याच्या दृष्टिने विद्यार्थी व पालकांना प्रवेश पध्दती विषयी माहीती उपलब्ध करुन द्यावी. व आवश्यकता असल्यास याविषयी प्रशिक्षणासाठी व्हिडिओ उपलब्ध करून द्यावे. 

५) इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राज्यस्तरावर राबविण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविणे व अन्य पुर्वतयारी शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) यांच्या स्तरावर करण्यात यावी. 

६) नियमित चार फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर इयत्ता अकरावीचे वर्ग सुरू करण्यात यावेत. तद्नंतर इयत्ता ११ वी चे प्रवेश उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर सर्वांसाठी खुले (OPEN TO ALL) ठेवावेत व सदरचे प्रवेश गुणवत्तेच्या आधारावर करण्यात यावेत. याबाबतचे आदेश संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांना देण्यात यावेत. 

७) इ.११ वी मध्ये प्रवेशित होणाऱ्या शेवटच्या विद्यार्थ्यांपर्यंत प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीनेच होईल. 

८) शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) यांनी इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राज्यस्तरावर राबविण्यासाठी आवश्यक मार्गदर्शक सुचना त्यांच्या स्तरावरुन निर्गमित कराव्यात.कराव्यात. 

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून, त्याचा सांकेतांक क्रमांक २०२५०२२८१८०२५४४९२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे. 

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

शासन निर्णय पीडीएफ मध्ये हवा असल्यास फक्त या ओळीला स्पर्श करा 

उप सचिव, महाराष्ट्र शासन.

महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांकः प्रवेश १२२५/प्र.क्र-१६/ एसडी - २ 

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२ 

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon