DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Fifteen Percent Marks Concession In TET

Fifteen Percent Marks Concession In TET

राज्यातील माजी सैनिक, शहिद सैनिक पत्नी व कुटुंबियांना शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये १५ टक्के गुणांची सवलत देणेबाबत.

प्रस्तावना

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शैक्षणिक संस्थांमधील शिक्षक भरतीसाठी पवित्र प्रणालीमार्फत शिक्षक पात्रता परीक्षा (TET) घेण्यात येते. सदर परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी खुल्या प्रवर्गासाठी ६० टक्के गुण आवश्यक आहेत. तर, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त व भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व दिव्यांग यांच्यासाठी ५ टक्के गुणांची सवलत म्हणजे उत्तीर्ण होण्यासाठी ५५ टक्के गुण आवश्यक आहेत. संदर्भ क्र. १ येथील शासन निर्णयानुसार माजी सैनिक व शहिद सैनिकांचे कुटुंबिय यांना १५ टक्के समांतर आरक्षण विहित करण्यात आले आहे. माजी सैनिकांना सैन्यातील २० वर्षांची सेवा केल्यानंतर त्यांच्या वयाचा विचार करता इतर उमेदवारांप्रमाणे गुण प्राप्त करणे शक्य होत नाही. त्यामुळे सदर आरक्षणांतर्गत पर्याप्त उमेदवार उपलब्ध न झाल्याने पदे रिक्त राहतात. देशातील इतर राज्यांनी माजी सैनिक, शहिद सैनिक पत्नी व त्यांच्या कुटुंबियांना शिक्षक भरतीमध्ये गुणांची सवलत दिली आहे. या सर्व बाबींचा विचार करून महाराष्ट्र राज्यात देखील शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये सदर घटकास गुणांची सवलत देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णयः-

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शैक्षणिक संस्थांमधील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकांवी पदे भरण्यासाठी पवित्र प्रणालीमार्फत घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेत विहित आरक्षणानुसार (TET) माजी सैनिक, शहिद सैनिकांच्या पत्नी व त्यांचे कुटुंबिय यांना १५ टक्के गुणांची सवलत देण्यास मान्यता देण्यात येत आहे. म्हणजेच, सदर गटातील उमेदवारांना उत्तीर्ण होण्यासाठी ४५ टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील.

हेही वाचा 👉 यांना दिली जाते केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये (CTET EXAM) ५ टक्के गुणांची सवलत वाचण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा 👈 

सदर शासन निर्णयातील तरतूद नोव्हेंबर, २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेस (TET) व यापुढे घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षांना लागू राहील. यासाठी आवश्यक ती कार्यवाही महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषदेने करावी,

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या 
🌐 👉 www.maharashtra.gov.in 👈 या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२२०६३०१६४३०१३६२२ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(दत्तात्रय शिंदे) 
कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन

महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांकः बैठक-२०२१/प्र.क्र. १५३/टीएनटी-१ चौथा मजला, विस्तार इमारत, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-४०००३२ दिनांकः ३० जून, २०२२.

वाचा
१) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र. आरटीए-१०८२-३५०२-सीआर-१००-१६ अ. दिनांक २.९.१९८३
२) बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९,
३) राष्ट्रीय अध्यापक शिक्षा परिषद, नवी दिल्ली यांचे पत्र क्र. ७६/४/२०१०/एनसीटीई/एसीएडी,
दिनांक ११.२.२०११ सोबतच्या मार्गदर्शक सूचना, ४) शासन निर्णय क्रमांकः प्राशातु-१११२/प्र. क्र. (२५८/२०१२)/प्राशि-३. दिनांक १३.२.२०१३
५) शासन निर्णय क्रमांकः आरटीई-२०१३/प्र. क्र. ९१/प्राशि-१, दिनांक २३.८.२०१३
६) शिक्षण संचालक (प्राथमिक), पुणे यांचे पत्र क्र. प्राशिस/टीईटी-मा.से/६४३४/टे-५०२/२०२१/ २६००, दिनांक ६.८.२०२१
७) आयुक्त (शिक्षण) यांचे पत्र क्र. आस्था/प्राथ/१०६/पवित्र/२०२१/४४९०, दिनांक २९.१०.२०२१.
Ex-Servicemen, Martyred Servicemen's Wives and Family Members 15% discount in Teacher Eligibility Test
Concession of 15 percent marks in Teacher Eligibility Test to wife and family members
Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon