DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Local Holiday Declared in Maharashtra

 Local Holiday Declared in Maharashtra 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने स्थानिक सुट्टी जाहीर करणेबाबत...


महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्रमांकः स्थानिसु-१३२४/प्र.क्र. ३२/जपुक (२९) मंत्रालय,मुंबई


दिनांक: ०४ डिसेंबर, २०२४


शासन परिपत्रकः

शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग क्र. सार्वसु-११९६/प्र.क्र.५/९६/२९, दिनांक १८ सप्टेंबर, १९९६ अन्वये मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हयातील शासकीय / निमशासकीय कार्यालयांना प्रतिवर्षी "अनंत चतुर्दशी" या दिवशी आणि सन २००७ पासून गोपाळकाला (दहीहंडी) निमित्ताने मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यांसाठी स्थानिक सुट्टी (Local Holiday) जाहीर करण्यात आली आहे. आता सन २०२४ मध्ये मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालयांना याद्वारे खालीलप्रमाणे तिसरी स्थानिक सुट्टी (Local Holiday) जाहीर करण्यात येत आहे.


अ.क्र.

१ सुट्टीचा दिवस

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

महापरिनिर्वाण दिन

इंग्रजी तारीख

०६ डिसेंबर, २०२४

भारतीय सौर दिनांक

१५ मार्गशीर्ष शके १९४६

वार शुक्रवार


२. हे आदेश मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील राज्य शासकीय/निमशासकीय कार्यालयांना लागू राहतील.

३. वरील स्थानिक सुट्टी शासन निर्णय क्रमांक पी अॅन्ड एस.नंबर पी-१३/II/बी, दिनांक ५ नोव्हेंबर, १९५८ मधील

तरतूदीनुसार जाहीर करण्यात येत आहे.

४. सदर परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२४१२०४१११८२६७३०७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.


महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

🌐👉परिपत्रक पीडीएफ मध्ये डाउनलोड करण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा 👈

अवर सचिव, सामान्य प्रशासन विभाग


हे ही वाचा 👇 

महाराष्ट्र शासन

शिक्षण आयुक्तालय

महाराष्ट्र राज्य, मध्यवती इमारत,पुणे

क्र. आशिका/प्राथ/१०६/निवडणूक सुट्टी/

दिनांक/११/२०२४

परिपत्रक :

विषय : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मतदान दिनांक व पूर्व तारखांना सुट्टीबाबत

संदर्भ :

१. शालेय शिक्षण व क्रिडा विभागाचे पत्र क्र. संकीर्ण २०२४/प्र.क्र. ३३२/एसडी-४, दि. १४/११/२०२४

२. शिक्षण आयुक्तालयाचे पत्र क्रमांक आशिका/प्राथ/१०६/निवडणूक सुट्टी/६८६०, दि.१५११/२०२४

उपरोक्त संदर्भीय विषयान्वये क्षेत्रिय स्तरावर दिनांक १८/११/२०२४ व दिनांक: १९/११/२०२४ रोजी सुट्टी जाहीर करण्याबाबत काही संभ्रम निर्माण झाल्याचे दिसते.

२/- शासनाच्या संदर्भ क्रमांक १ मधील पत्रान्वये दिलेल्या सूचना अत्यंत स्पष्ट आहेत. याबाबतीत असे कळविण्यात येते की, दिनांक १८/११/२०२४ व दिनांक: १९/११/२०२४ रोजी शाळा सुरु राहतील. तसेच उक्त दिवशी कोणतीही सार्वत्रिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली नाही.

३/- केवळ ज्या शाळेतील सर्व शिक्षकांची नियुक्ती निवडणूक कामासाठी झाल्यामुळे एकही शिक्षक शाळेत उपलब्ध असणार नाही अशा शाळांबाबत स्थानिक स्तरावर मुख्याध्यापतक यांनी त्यांचे अधिकारात सुट्टी जाहीर करावी व अशा शाळा वगळता उर्वरित सर्व शाळा नियमितपणे सुरु राहतील.

४/- केवळ उपरोक्त परिस्थितीतील विशिष्ट शाळांना स्थानिक पातळीवर मुख्याध्यापक यांनी सुट्टी जाहीर करावी. तसेच ही सरसकट व सार्वजनिक सुट्टी नाही याची नोंद घ्यावी. तसेच कोणत्याही शाळा अनावश्यकरित्या बंद राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी.

 (सूरज मांढरे भा.प्र.से.)

अयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य, पुणे

हेही वाचाल 👇 

प्रति,

विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व विभाग) शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक) (सर्व)


प्रत : मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, मंत्रालय, मुंबई याना माहितीस्तव सादर


प्रत : संचालक, राज्य शैक्षणिक व संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे

प्रत : शिक्षण संचालक, शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक), (प्राथमिक), (योजना), पुणे



मत्रालयीन सेवा

महाराष्ट्र शासन

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,

मंत्रालय (विस्तार), दालन क्र. ४१५. मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई


क्रमांक :- संकीर्ण-२०२४/प्र.क्र.३३२/एसडी-४


दिनांक : १४ नोव्हेंबर, २०२४


प्रति.

आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे


विषय :- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने दिनांक १८, १९ व २० नोव्हेंबर, २०२४ रोजी शाळांना सुट्टी जाहीर करण्याबाबत.


संदर्भ :- आपले पत्र क्र. आशिका / प्राथ / १०६/ निवडणूक सुटी / ६८३१, दिनांक १३ नोव्हेंबर, २०२४.


महोदय,

उपरोक्त संदर्भीय पत्रान्वये विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने दिनांक १८,१९ व २० नोव्हेंबर, २०२४ रोजी शाळांना सुट्टी जाहीर करण्याबाबतचा प्रस्ताव आपण शासन मान्यतेसाठी सादर केला आहे. सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ राज्यात सुरळीतपणे पार पाडण्यासाठी शिक्षकांच्या निवडणूक कर्तव्यामुळे ज्या ठिकाणी शाळा भरवणे शक्य नसेल, त्या ठिकाणी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळा बंद ठेवण्याबाबतचा निर्णय घेणेबाबत आपण आपल्यास्तरावरून आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात, ही विनंती.

परिपत्रक पीडीएफ मध्ये हवे असल्यास फक्त या ओळीला स्पर्श करा 


आपला,

(तुषार महाजन)

उपसचिव, महाराष्ट्र शासन

हे ही वाचा 👇 


हाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग, 

पहिला मजला, विस्तार इमारत, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, 
मंत्रालय, मुंबई

क्रमांकः आविवि-२०२०/प्र.क्र.१००/का.०५

दिनांक :- ०८ ऑगस्ट, २०२४

प्रति,

१. विभागीय आयुक्त, नाशिक/अमरावती/नागपूर/औरंगाबाद/पुणे/कोकण 

२. जिल्हाधिकारी, नंदुरबार/नाशिक/धुळे/जळगाव/ठाणे/पालघर/रायगड/पुणे/नांदेड/हिंगोली/अमरावती/ नागपूर/गोंदिया/चंद्रपूर/गडचिरोली/यवतमाळ/भंडारा

विषय :- ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त स्थानिक सुट्टी जाहीर करणेबाबत.

संदर्भ :- 
१) शासन निर्णय राजकीय व सेवा विभाग क्र.पी-१३-दोन-बी, दिनांक १६/०१/१९५८

२) सामान्य प्रशासन विभाग पत्र क्र. सार्वसु-११२४/प्र.क्र.८९/जपुक (२९) दि.०७.०८.२०२४

महोदय,
    उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, दिनांक ९ ऑगस्ट या जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासीबहुल क्षेत्रात संबंधित विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी उपरोक्त शासन निर्णयाच्या अनुषंगाने स्थानिक सुट्टी देण्याबाबत निर्णय घ्यावा.

आपला,

(गोविंद साबने)
कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत,
उप सचिव (जपुक-२९), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई.


जागतिक आदिवासी दिनानिमित्त स्थानिक सुट्टी जाहीर



Also Read 👇 




जिल्हाधिकारी कार्यालय, 
वाशिम 
क्र. कक्ष-१/आस्था/प्र.रस/कावि/२०२३

दिनांक १/१२/२०२३

वाचा :-१. शासन निर्णय राजनैतिक विभाग क्र.पी. १३ दोन-यो, दि. १६.१.१९५८

आदेश

२. महाराष्ट्र शासन राजपत्र सामान्य प्रशासन विभाग अधिसुचना दि. ०५.११.२०२३

शासन निर्णय क्रमांक पी १३ दोन बी, राजनेतिक सेवा विभाग, दिनांक १६ जानेवारी १९५८ आणि दिनांक ०६ ऑगष्ट १९५८ च्या समक्रमांकाच्या शासन निर्णयानुसार प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन, मी, भुवनेश्वरी एस. जिल्हाधिकारी वाशिम, सन २०२४ या वर्षासाठी संपूर्ण वाशिम जिल्ह्याकरिता खालील नमुद तीन स्थानिक सुट्टया जाहीर करित आहे.

अ.क्र. कोणत्या कारणास्तव दिनांक दिवस सार्वजनिक सुट्टयांचे क्षेत्र

१ रक्षा बंधन १९.०८.२०२४ सोमवार

२ पोळा ०२.०९.२०२४ सोमवार

३ ज्येष्ठागौरी पुजन ११.०९.२०२४ बुधवार

संपूर्ण वाशिम जिल्हा
हा आदेश वाशिम जिल्ह्यातील दिवणी य फोजदारी न्यायालये आणि अधिकोष यांना लागू होणार नाही.
(बुधनेश्वरी एस. भा.प्र.से.)
जिल्हाधिकारी वाशिम
प्रत माहिती करिता सविनय सादर,
१. मा. प्रधान सचिव, महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय, मुंबई
२. मा. प्रधान सचिव, महाराष्ट्र शासन महसुल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई
३. मा. विभागीय आयुक्त, अमरावती विभाग, अमरावती



डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्ताने स्थानिक सुट्टी जाहीर करणेबाबत

महाराष्ट्र शासन

सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक

क्रमांकः सार्वसु-११२२/प्र.क्र.११७/२९ मंत्रालय,

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मुंबई - ४०००३२.

दिनांक : ०५ डिसेंबर, २०२३.

वाचा : सामान्य प्रशासन विभाग, शासन परिपत्रक क्र.सार्वसु-११२२/प्र.क्र.११७/२९,

दि.१२ डिसेंबर, २०२२.

शासन परिपत्रक:

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण दिन : प्रश्न मंजुषा  Mahaparinirvana Din Quiz

सामान्य प्रशासन विभाग, शासन परिपत्रक क्र.सार्वसु-११९६/प्र.क्र.५/९६/२९, दिनांक १८ सप्टेंबर, १९९६ अन्वये मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हयातील शासकीय / निमशासकीय कार्यालयांना प्रतिवर्षी "अनंत चतुर्दशी" या दिवशी आणि सन २००७ पासून गोपाळकाला (दहीहंडी) निमित्ताने मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यांसाठी स्थानिक सुट्टी (Local Holiday) जाहीर करण्यात आली आहे. आता सन २०२३ मध्ये मुंबई व मुंबई उपनगर जिल्हयातील सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालयांना याद्वारे खालीलप्रमाणे तिसरी स्थानिक सुट्टी (Local Holiday) जाहीर करण्यात येत आहे.

अ.क्र.

सुट्टीची बाब

इंग्रजी तारीख

भारतीय सौर दिनांक

 वार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन

०६ डिसेंबर, २०२३

१५ मार्गशीर्ष, शके १९४५

बुधवार

२. हे आदेश मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील राज्य शासकीय / निमशासकीय कार्यालयांना लागू राहतील.

३. वरील स्थानिक सुट्टी शासन निर्णय क्रमांक पी. अॅन्ड एस. नंबर पी-१३/॥/ बी, दिनांक ५ नोव्हेंबर, १९५८ मधील तरतूदीनुसार जाहीर करण्यात येत आहे.

४. सदर परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या या ओळीला स्पर्श करा   या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२३१२०५१५३३३५८६०७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

 (रो. दि. कदम-पाटील)

शासनाच्या उप सचिव

👇👇👇👇👇

वरील परिपत्रक पिडीफ मध्ये डाऊनलोड करण्यासाठी या ओळीला स्पर्श करा 


Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon