DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Rates of remuneration Election Duty


Rates of remuneration staff on Election Duty 
Rates of remuneration to be paid to the staff deployed on Election Duty


WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin Now

 

शासन निर्णय -

महाराष्ट्र राज्यात दिनांक १९ व २६ एप्रिल २०२४ व ७, १३ व २० मे, २०२४ अशा पाच टप्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ घेण्यात आली आहे. दिनांक १६ मार्च, २०२४ रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम घोषित केल्यापासून ते दिनांक ०६ जून, २०२४ ह्या निवडणूकीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंतच्या कालावधीमध्ये लोकसभा सार्वत्रिक निवडणूका संबंधीचे काम ठराविक मुदतीत पार पाडण्यासाठी मंत्रालयीन, विभागीय, जिल्हा व तालुका पातळीवरील निवडणूक शाखांमध्ये काम करणाऱ्या वर्गाला सुट्टीच्या दिवसांसह प्रत्येक दिवशी जादा काम करावे लागले. त्याकरिता सामान्य प्रशासन विभाग, विभागीय आयुक्तांची कार्यालये तसेच सर्व जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांची कार्यालये, तहसिल कार्यालये यामध्ये निवडणूकांचे काम करणाऱ्या, अराजपत्रित कर्मचारी वर्गाला तसेच मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयात व जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयात, इतर विभागातून / जिल्हा आस्थापनेतून निवडणूकीच्या कामासाठी घेतलेल्या अतिरिक्त अराजपत्रित कर्मचारी वर्गाला निम्ननिर्देशित शर्तीच्या अधीन राहून, खालील प्रमाणकानुसार अतिकालिक भत्ता देण्यास मंजूर देण्यात येत आहे. :-

१) अतिकालिक भत्त्याचा दर -

कोणत्याही कामाच्या दिवशी केलेल्या जादा कामाच्या प्रत्येक पूर्ण तासाला (अर्धा तास किंवा अर्ध्या तासांपेक्षा जास्त काम केल्यास तो पूर्ण तास धरण्यात येईल) प्रत्येक तासाच्या मूळ वेतन (Basic Pay) च्या प्रमाणात देण्यात येईल.

टिप दर ताशी वेतनाचा दर ठरविण्यासाठी महिना ३० दिवसांचा आणि गट "ब" - (अराजपत्रित) व गट "क" कर्मचाऱ्यांसाठी दिवस ८.३० तासांचा, वाहनचालकांसाठी दिवस ९.४५ तासांचा समजण्यात येईल. तर चतुर्थश्रेणी कर्मचारी वर्गाचे दैनंदिन कामाचे तास बृहन्मुंबईत ९ तास व इतर ठिकाणी देखील ९ तास समजण्यात येतील.

२) अटी व शर्ती -

(१) अतिकालिक भत्ता माहे एप्रिल-२०२४ च्या अनुज्ञेय मूळ वेतन (Basic Pay) च्या प्रमाणात तासाच्या दराने दिला जाईल. तसेच दैनंदिन वेतनाचा दर काढताना, त्यामध्ये इतर कुठल्याही भत्याचा (उदा. घरभाडे भत्ता, महागाई भत्ता, स्थानिक पूरक भत्ता इत्यादी) समावेश होणार नाही.

(२) सर्वसाधारण कार्यालयीन वेळेपेक्षा जास्त काम केलेल्या कामासाठी अतिकालिक भत्ता अनुज्ञेय असेल आणि तो फक्त दिनांक १६.०३.२०२४ पासून ते दिनांक ०६.०६.२०२४ (दोन्ही दिवस धरून) या कालावधीसाठी देय राहील.
(३) उपरोक्त कालावधीतील सुट्टीच्या दिवशी केलेल्या निवडणूकीसंबंधीच्या कोणत्याही कामासाठी अतिकालिक भत्ता दिला जाईल.

(४) मंत्रालय, विभागीय, जिल्हा व तहसिल पातळीवर निवडणूकीसाठी नेमण्यात आलेल्या शासकीय, निमशासकीय तसेच इतर संस्थांतील कर्मचाऱ्यांना वरील पध्दतीने अतिकालिक भत्ता देय राहील.

(५) अतिकालिक भत्याची कमाल मर्यादा त्यांच्या माहे एप्रिल २०२४ च्या देय होणाऱ्या मूळ वेतना (Basic Pay) एवढी राहील. त्यामध्ये इतर कुठल्याही भत्त्याचा (उदा. घरभाडे भत्ता, महागाई भत्ता, स्थानिक पूरक भत्ता इत्यादि) समावेश होणार नाही. तसेच सदर अतिकालिक भत्ता एका अराजपत्रित कर्मचाऱ्याला एकदाच देय राहील.

(६) जे कर्मचारी निवडणूकीच्या कामासाठी मुख्यालयाबाहेर प्रवास करतील त्यांना नियमानुसार मिळणाऱ्या प्रवास/दैनिक भत्याव्यतिरिक्त अतिकालिक भत्ता देय नाही. या दोन्ही भत्यांपैकी जो फायदेशीर असेल तो भत्ता घेण्याबाबत सदर कर्मचाऱ्यांना पर्याय राहील.

(७) निवडणूकीचे काम ज्या राजपत्रित अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली पार पाडले जाते ते अधिकारी, अतिकालिक भत्यासाठी कर्मचारी वर्गाने केलेल्या जादा कामाचा दैनंदिन कालावधी दैनंदिन हजेरीपटाच्या आधारे प्रमाणित करतील.

(८) जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडून सरकारी व निमसरकारी आणि इतर संस्थांकडून अधिग्रहित करण्यात आलेल्या वाहनांचे वाहनचालकांना अधिग्रहणाच्या कालावधीतील दिनांक १६.०३.२०२४ पासून ते दिनांक ०६.०६.२०२४ या कालावधीकरिता (दोन्ही दिवस धरून) अटी व शर्तीतील अनुक्रमांक १ व २ नुसार अतिकालिक भत्ता देय राहील.

(९) अधिग्रहित केलेल्या वाहनांच्या चालकांना वित्त विभाग, शासन निर्णय क्र. अकाभ- २०२२/प्र.क्र.०७/सेवा-६, दि.०७.०८.२०२३ नुसार त्यांच्या मूळ विभागातील/संस्थांतील दराने मिळणारा अतिकालिक भत्ता आणि या शासन निर्णयातील निवडणूक कर्तव्यार्थ नियुक्त कालावधीसाठी अट क्र. १ व २ नुसार मिळणारा अतिकालिक भत्ता यापैकी जो फायदेशीर असेल तो अतिकालिक भत्ता दिनांक दिनांक १६.०३.२०२४ पासून ते दिनांक ०६.०६.२०२४ या कालावधीकरिता घेण्याचा पर्याय राहील.

(१०) निवडणूकीच्या कालावधीत वाहनाचा वापर करणारे प्राधिकारी वाहन चालकांनी केलेले काम वाहनाच्या लॉग बुकवरुन प्रमाणित करतील. सदर प्रमाणपत्राच्या आधारे जिल्हा व जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी इतर शासकीय विभागाकडून अधिग्रहीत केलेल्या वाहनांच्या वाहनचालकांची अतिकालिक भत्त्याची देयके त्याच्या मूळ विभागाकडे न पाठविता संबंधित वाहन चालकांना निवडणूक निधीतून अदा करावीत.

(११) या शासन निर्णयातील अतिकालिक भत्त्याचा दर व शर्ती खाजगी वाहनांच्या वाहनचालकांना व रोजंदारीवर कार्यरत असलेल्या वाहनचालकांना लागू राहणार नाहीत.

(१२) निवडणूकीच्या कामासाठी दैनंदिन/कंत्राटी तत्वावर नेमलेल्या कर्मचारी वर्गाला अतिकालिक भत्ता देय नाही.

३. या बाबींवर होणारा खर्च "मागणी क्रमांक ए-२, प्रधानशीर्ष २०१५-निवडणूका, उपशीर्ष १०५- संसदेच्या निवडणूक घेण्यासाठी लागणारा खर्च, (००) (०१) संसदेच्या निवडणूक घेण्यासाठी लागणारा खर्च, १३-कार्यालयीन खर्च, (२०१५००५९) दत्तमत" या लेखाशीर्षाखालील सन २०२४-२०२५ या आर्थिक वर्षातील मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा.

४. हा शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौ. संदर्भ क्रमांक ११४/सेवा-६/२०२४, दि.२४.०६.२०२४ तसेच अनौ. संदर्भ क्रमांक ३८४/व्यय-४/२०२४, दि २४.०६.२०२४अन्वये दिलेल्या सहमतीनंतर निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२४०७०११६०८१२३४०७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,


(योगेश गोसावी) 
अवर सचिव व उप मुख्य निवडणूक अधिकारी, 

महाराष्ट्र राज्य
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ लोकसभा सार्वत्रिक निवडणूकांच्या कामासाठी नियुक्त केलेल्या विभागीय, जिल्हा व तहसिल पातळीवरील अराजपत्रित कर्मचाऱ्यांनी केलेल्या जादा कामासाठी अतिकालिक भत्ता देणेबाबत

महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रमांक: सीईएल-२०२४/प्र.क्र.६२५/२४/३३(२),

मादाम कामा रोड, राजगुरु हुतात्मा चौक, मंत्रालय, 
मुंबई ४०० ०३२.
दिनांक : ०१ जुलै, २०२४

हेही वाचाल 👇 

लोकसभा / विधानसभेच्या सार्वत्रिक/पोट निवडणुकीच्या वेळी मतदान / मतमोजणी कामासाठी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांना / कर्मचाऱ्यांना द्यावयाच्या निवडणूक भत्त्याबाबत.

महाराष्ट्र शासन 
सामान्य प्रशासन विभाग, 
शासन निर्णय क्रमांक: सीईएल-२०२४/प्र.क्र.१२७/२४/३३, 
मादाम कामा रोड, राजगुरु हुतात्मा चौक, मंत्रालय, 
मुंबई ४०० ०३२. 

दिनांक : १८ एप्रिल, २०२४

वाचा : 
१) सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र. सीईएल-२०१४/प्र.क्र.३०४/१४/३३, 
दिनांक १८ मार्च, २०१४

प्रस्तावना :-

भारत निवडणूक आयोगाच्या अखत्यारितीत लोकसभा/विधानसभा सार्वत्रिक/पोट निवडणुकांच्या कामासाठी नियुक्त करण्यात येणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना द्यावयाच्या निवडणूक भत्त्याचे दर शासनाच्या दिनांक १८.०३.२०१४ च्या संदर्भाधिन शासन निर्णयान्वये निश्चित केलेले आहेत. भारत निवडणूक आयोगाने त्यांचे पत्र क्रमांक ४६४/INST/EPS/२०२३/Remuneration & TA/DA, दिनांक ०६.०६.२०२३ व क्रमांक- ४६४/INST/EPS /२०२३/Remuneration & TA/DA, दिनांक १७.११.२०२३ अन्वये निवडणूक कर्तव्यार्थ नियुक्त करावयाच्या कर्मचाऱ्यांना द्यावयाच्या निवडणूक भत्त्याच्या दरामध्ये व काही बाबीमध्ये सुधारणा करण्याबाबत निर्देश दिले आहेत. भारत निवडणूक आयोगाच्या सदर पत्रातील सूचनांना अनुसरुन राज्यातील लोकसभा / विधानसभा निवडणुकांच्या कर्तव्यार्थ नियुक्त करण्यात येणाऱ्या निवडणूक कर्मचाऱ्यांना द्यावयाच्या निवडणूक भत्त्याच्या अनुषंगाने सुधारणा करण्याचे शासनाच्या विचाराधिन होते. त्यानुसार पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे.

शासन निर्णय :-

अंतिम मतदार यादी प्रकाशित झाली आहे. 

आजच आपलं नाव यादीत तपासून घ्या. 

अंतिम मतदार यादी पाहण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा  

General Elections 2024 Loksabha Nivadnuk voters list pdf download link 

⏫⏫⏫⏫⏫

लोकसभा / विधानसभा सार्वत्रिक / पोट निवडणुकींच्या वेळी मतदान / मतमोजणीच्या कामासाठी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांना / कर्मचाऱ्यांना देण्यात द्यावयाच्या निवडणूक भत्त्याबाबतचा दिनांक १८ मार्च, २०१४ रोजीचा संदर्भाधिन शासन निर्णय अधिक्रमित करुन भारत निवडणूक आयोगाच्या पत्र क्रमांक ४६४/INST/EPS/२०२३ /Remuneration & TA/DA, दिनांक ०६.०६.२०२३ व क्रमांक- ४६४/INST/EPS/२०२३/Remuneration & TA/DA, दिनांक १७.११.२०२३ अन्वये देण्यात आलेल्या सूचनांना अनुसरुन महाराष्ट्र राज्यातील लोकसभा / विधानसभा सार्वत्रिक/पोट निवडणुकांच्या मतदान / मतमोजणी कर्तव्यार्थ नियुक्त करण्यात येणाऱ्या अधिकारी / कर्मचारी यांना पुढीलप्रमाणे निवडणूक भत्ता मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे :-



अ.क्र.

अधिकारी व कर्मचारी यांचे पदनाम

निवडणूक भत्त्याचा दर (रुपये)

क्षेत्रिय दंडाधिकारी क्षेत्रिय अधिकारी व्यतिरिक्त तैनात असल्यास)

रु.१५००/- (एकत्रित एकदा)

मतदान केंद्राध्यक्ष / मतमोजणी पर्यवेक्षक

रु.३५०/- (प्रत्येक दिवसाकरीता किंवा दिवसाच्या भागाकरीता

मतदान अधिकारी / मतमोजणी सहायक

रु.२५०/- (प्रत्येक दिवसाकरीता किंवा दिवसाच्या भागाकरीता

चतुर्थश्रेणी कर्मचारी

रु.२००/- (प्रत्येक दिवसाकरीता किंवा दिवसाच्या भागाकरीता

फिरते व्हिडीओ पथक, व्हिडीओ निरिक्षण पथक,लेखा पथक, नियंत्रण कक्ष व कॉल सेंटर मधील कर्मचारी, प्रसार माध्यमांना प्रमाणपत्र देणारी व देखरेख करणारी यंत्रणा, फिरते पथक, स्थिर देखरेख पथक (Static Surveillance Team), खर्च नियंत्रण सेल

वर्ग-१/वर्ग-२ रु.१२००/- (एकत्रित एकदा)

वर्ग-३ रु.१०००/- (एकत्रित एकदा)

वर्ग-४, रु.२००/- (प्रत्येक दिवसाकरीता किया दिवसाच्या भागाकरीता)

आयकर निरिक्षक

रु.१२००/- (एकत्रित एकदा)

सूक्ष्म निरिक्षक

रु.१०००/- (एकत्रित एकदा)

आहार भत्ता

मतदान केंद्र / मतमोजणी केंद्रावर निवडणूक कर्तव्य नियुक्त अधिकारी कर्मचारी यांच्यासहीत पोलीस अधिकारी / कर्मचारी, मोबाईल पथके, होमगार्ड, वनरक्षक दल. ग्रामरक्षक दल, एनसीसी कॅडेटस, माजी सैनिक, स्वयंसेवक यांचे करीता भोजनाची पाकिटे किंवा सौम्य आहार

भोजनाची पाकीटे किंवा प्रत्येक दिवसाकरीता रु.१५०/- किंवा दिवसाच्या भागाकरीता

TA/DA

लाभार्थ्यांची श्रेणी

दर

निवडणूक कर्तव्य नियुक्त अधिकारी / कर्मचारी

 

 

 

१००% प्रवास भत्ता / दैनिक भत्ता रक्कम (TA/DA)

पद्धत-१: TA/DA च्या १००% रक्कम एकतर निवडणूक कर्तव्य पूर्ण केल्याच्या २४ तासांच्या आत किंवा आगाऊ.

पद्धत-२: TA/DA च्या ८०% रक्कम आगाऊ आणि २०% रक्कम निवडणूक पूर्ण झाल्यानंतर ३० दिवसांच्या आत.

www.dnyanyatritantrasnehi.com


(१) मतदान केंद्र / मतमोजणी केंद्रावर प्रत्यक्ष तैनात करण्यात आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनाही वरील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे भत्त्याचे दर लागू राहतील.

(२) प्रशिक्षणासाठी उपस्थित राहणाऱ्या, मतदानाचे साहित्य ताब्यात घेणाऱ्या तसेच मतदान व मतमोजणीच्या दिवशी प्रत्यक्ष मतदान / मतमोजणी कर्तव्यार्थ उपस्थित राहणाऱ्या कार्यरत व राखीव अधिकारी / कर्मचारी यांना वरील तक्त्यात नमूद केलेल्या दराप्रमाणे निवडणूक भत्ता अनुज्ञेय राहील.

(३) हा निवडणूक भत्ता सार्वत्रिक तसेच पोट निवडणुकांसाठी दिला जाईल.

(४) दूर्गम प्रदेशातील (difficult terrain) मतदान केंद्रांवर संबंधित मतदान पथकास (Polling official) ३ किंवा त्याच्यापेक्षा जास्त दिवस आगोदर निघावे लागते, त्या मतदान पथकातील अधिकारी व कर्मचारी यांना सामान्य दरा पेक्षा दुप्पट दराने निवडणूक भत्ता अनुज्ञेय राहील.

(५) निवडणूक भत्त्या व्यतिरिक्त, सर्व मतदान केंद्रांवर / मतमोजणी केंद्रांवर निवडणूक संबंधित कामासाठी तैनात मतदान कर्मचाऱ्यांसह पोलिस कर्मचारी, मोबाईल पार्टीमधील कर्मचारी, होमगार्ड, वनरक्षक ग्राम रक्षक दल, NCC कॅडेट्स, माजी सैनिक, स्वयंसेवक इत्यादींसाठी पॅक केलेले दुपारचे जेवण आणि/किंवा हलका अल्पोहार प्रदान केला जाईल.

(६) उपरोक्त पध्दतीनुसार मतदान कर्मचारी / पोलीस कर्मचारी आणि निवडणूक कामासाठी नियुक्त केलेले इतर अधिकारी / कर्मचारी याना TA/DA ची अदागयी करण्यासंदर्भात प्रकरणपरत्वे मूळ विभाग अथवा निवडणूक विभाग यांच्याकडून कार्यवाही करण्यात यावी.

(७) अधिकारी / कर्मचारी यांना प्रवास भत्ता / दैनिक भत्ता (TA/DA) देताना तो त्या-त्या वेळी अनुज्ञेय असलेल्या दराने देय होईल.

३. उपरोक्त बाबींवर होणारा खर्च प्रकरणपरत्वे मागणी क्र. ए-०२, २०१५-निवडणुका, १०५-संसदेच्या निवडणुका घेण्यासाठी लागणारा खर्च" किंवा "२०१५-निवडणुका, १०६-राज्य/संघराज्य क्षेत्र विधानमंडळ निवडणुका घेण्यासाठी लागणारा खर्च" किंवा "२०१५-निवडणुका, १०४-लोकसभा व राज्य संघराज्य क्षेत्र विधानसभा यांच्या एकास वेळेस घेतल्या जाणाऱ्या निवडणुकांचा खर्च" हया लेखाशीर्षाखालील मंजूर अनुदानातून भागविण्यात भागविण्यात यावा.

४. सदरचा शासन निर्णय, वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र.३२९/व्यय-४, दि.०८.०४.२०२४ अन्वये तसेच प्रधान सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या मान्यतेने निर्गमित करण्यात येत आहे. 
५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या


या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२४०४१९१२५१०२९३०७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने

साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्य पाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(योगेश गोसावी) अ
वर सचिव व उप मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य

१. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) / (लेखा परीक्षा), महाराष्ट्र-१, मुंबई

२. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) / (लेखा परीक्षा), महाराष्ट्र-२, नागपूर

३. विभागीय आयुक्त (सर्व)




कार्यालय, मुख्य चुनाव अधिकारी, दिल्ली

OFFICE OF THE CHIEF ELECTORAL OFFICER, DELHI
Old St. Stephen's College Building Kashmere Gate, 
Delhi-110006

F.No.CEO/B&A/109(48)/2008/1433 CD-000127700

Date: 22/3/24

ORDER

With the concurrence of the Finance Department, GNCTD, to the rates approved by the Election Commission of India,  vide U.O. No. 269 Dated 13.03.2024 The rates of remuneration to be paid to the staff deployed on Election Duty for the General Election to Lok Sabha-2024 are as under:-

Also   Read -






 

Sl

 

Designation of Officers/Officials

 

 

Minimum Rate of Remuneration

 

1

Sector Officer

Rs. 5000/-lump sum

2

Master Trainer

Rs. 2000/-lump sum

3

Presiding Officer/Counting Supervisor/Reception Supervisor

Rs. 350/- per day or part thereof

4

Polling Officers/Counting Assistant/ Reception Assistant

Rs. 250/- per day or part thereof

5

Class-IV/MTS

Rs. 200/- per day or part thereof

6

Packet for Light Refreshment

Rs. 150/- per day or part that

7

Video Surveiliante Team, Video Viewing Team, Accounting Team, Expenditure Monitoring Control Room and Call Center Staffs, Media Certification and Monitoring Committee, Flying Squads, Static Surveillance Team, Expenditure Monitoring Cell

Rates of remuneration staff on Election Duty

Class-1/11 (Rs.1200/-lump sum

 

Class-III (Rs. 1000/-lump sum)

Class-IV (Rs. 200/- per day)

8

Micro Observer

Rs. 1000/-lump sum

9

Assistant Expenditure Observer

Rs. 7500/- lump sum for full time duty and for partial duration on pro rata basis



Sl.Designation of Officers/Officials

1.Sector Officer
Minimum Rate of Remuneration = Rs. 5000/-lump sum

2. Master Trainer
Minimum Rate of Remuneration = Rs. 2000/-lump sum


3. Presiding Officer/Counting Supervisor/Reception Supervisor
Minimum Rate of Remuneration = Rs. 350/- per day or part thereof


4. Polling Officers/Counting Assistant/ Reception Assistant
Minimum Rate of Remuneration = Rs. 250/- per day or part thereof

5. Class-IV/MTS
Minimum Rate of Remuneration = Rs. 200/- per day or part thereof


6. Packet for Light Refreshment
Minimum Rate of Remuneration = Rs. 150/- per day or part that


7. Video Surveiliante Team, Video Viewing Team, Accounting Team, Expenditure Monitoring Control Room and Call Center Staffs, Media Certification and Monitoring Committee, Flying Squads, Static Surveillance Team, Expenditure Monitoring Cell
Minimum Rate of Remuneration =

Class-1/11 (Rs.1200/-lump su

Class-III (Rs. 1000/-lump sum)

Class-IV (Rs. 200/- per day)

8. Micro Observer
Minimum Rate of Remuneration =Rs. 1000/-lump sum


9. Assistant Expenditure Observer

Minimum Rate of Remuneration =Rs. 7500/- lump sum for full time duty and for partial duration on pro rata basis

The above mentioned rates are equally applicable to police personnel actually deployed on polling booths/counting centres.

The above rates are payable to the staff for attending training class, collecting polling material as well as attending duty on the polling day/counting day.

communicated vide this office letter

The letter of the Commission

No.CEO/Admn/104(2)/2013/Cir/16980-94 dated 20.03.2014 inter-alia direct that keeping in view

the long hours of duty, the day next to the day of polling is also to be treated as period on Election

Duty. Accordingly, polling staff shall be paid for maximum 4 days for training, collecting polling

materials etc. and 2 days for polling day, subject to the condition that such number of trainings are

actually attended and recorded.

The Reserve Staff shall be paid 4 days for training and only 1 day for polling day.

The Reception Duty Staff may be paid remuneration for 2 days i.e. 1 day for training and i day for attending the duty on reception counter on polling day.

The Voter Assistance Booth Staff may be paid remuneration equal to Polling Officers, i.e. Rs 250/- per day, for 2 days i.e. 1 day for training and 1 day for attending the duty on polling day.

The Counting Duty Staff (including statistical staff) may be paid remuneration for 2 days i.e. 1 day for training and 1 day for attending the duty on counting day.

The MTS/Class-IV/Volunteers deployed for assisting voters with disabilities will be paid remuneration @ Rs.200/- per day for 2 days i.e. 1 day for training and 1 day for attending the duty on polling day.

If some Micro-Observer is deployed for polling day as well as on counting day, it will be treated as separate duty and remuneration will be paid accordingly.

All the Assistant Expenditure Observers and Executive Magistrates (Team In-Charge) of Flying Squad deployed are to be reimbursed Rs. 500/- (Rupees Five Hundred Only) as a fixed amount on account of Mobile Recharge for whole election process.

The stafi deployed on polling stations/counting centres may be provided with packed lurch and/or light refrestanent @ Rs. 150/- per head per day. In case of difficulty in respect of providing packel lunch, a cash payment @ Rs. 150/- per head may be paid to poll/counting staff. Further Police Personnel deployed on Election work on poll/counting day including Mobile parties/Home Guards/Forest Guards/Gram Rakshak Dal/NCC Sr. Cadets/Ex-Army/Central Police Force may be rovided with packed lunch/refreshment or payment in hem eof as is being given to Polling/Counting personnel. No refreshment charge should be paid the reserve parties for polling day as they can be spared immediately, if they are not needed on that da
The above rates may be strictly adhered to and all personnel on election duty be well apprised of these rates during training etc.

Ail the DEOS/ROs are requested to ensure that the officers/staff deployed on Election Duty for the General Election to Lok Sabha-2024 are paid accordingly and following conditions are to be followed:-

i. All codal formalities be observed and provisions of GFR-2017 also be observed.

ii. Financial prudence and economi city of expenditure should be followed. Economies of scale shall be adhered invariably.

iv. Demand of goods or services or both shall not be divided into small quantities to make

V. piecemeal procurement to avoid applicability of relevant provision of GFR-2017. All instructions/guidelines/OMs issued by ECI, FD, Gol, GNCTD, CVC, etc from time to time be followed.

vi. DEO/CEO will ensure that no duplicate payment is made. Proper verification of bills against the work order, stock entry, etc shall be made in accordance with the extant rules/guidelines Payment to the vendor including advance, if any shall be governed by provisions of GFR-2017. vii. The instructions issued by FD's OM dated 07.09.2021shall be followed.

The actual expenditure booked on this account may be intimated to Audit Officer, CEO (HQ) the same is to be conveyed to Financement, as per the approval.

SATENDRARA

ASST. CHIEF ELECTORAL OFFICER (VIG)

F.No.CEO/B&A/109(48)/2008/1433

Copy for information and necessary action to:-

1. Dy. Secretary, Finance (Exp-III) Department, Govt. of NCT of Delhi, Delhi Sectt., Delhi-110002. 2. All District Election Officers/Returning Officers - with the request to submit expenditure booked

3. All SDMs(Election), all 11 Districts.

on this account within 7 days after completion of Election process.

Date: 22/03/24

4. All Nodal Officers of various Central / State Govt./Autonomous Bodies/Govt. Undertakings with the


request to upload on website of their Department for easy access to all concerned.

5. All Branch In-Charges of CEO (HO) Delhi

Rates of remuneration to be paid to the staff deployed on Election Duty

election duty remuneration 2024


Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon