DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Mazi Shala Sundar Shala Student Selfie

Mukhymantri Mazi Shala Sundar Shala Student Selfie Upload Link
🏫 
🤳 
" मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा "  उपक्रमांतर्गत

Largest Online Photo Album Of " Handwritten Notes In 24 Hours"

FLOWCHART
🔗 LINK

👇👇👇👇👇

LINK

👆👆👆👆👆

विद्यार्थ्यांनी  24 तासात हा उपक्रम पूर्ण करावयाचा आहे


आयुक्त शिक्षण पुणे यांचे आजचे २५ फेब्रुवारी २०२४ चे महत्वपूर्ण परिपत्रक

उपक्रमाचे नाव : Largest online photo album of "Handwritten Notes in 24 hours".

 👁️👇👁️

कार्यपध्दती :

१) पालकांनी मा. मुख्यमंत्री महोदय यांचे पत्र मुलांना सोबत घेऊन वाचावयाचे आहे.

२) हे पत्र वाचून झाल्यावर त्यांनी छोटया वहीचे एक पान व एक बॉलपेन घ्यायचे आहे.

३) या पानावर मुलांनी बॉलपेनाने स्वतःच्या हस्ताक्षरात या पत्राविषयी त्यांचा शिक्षण विषयक अभिप्राय नमूद करणे अपेक्षित आहे. लहान वयोगटातील विद्यार्थ्यांना लेखन शक्य नसल्यास त्यांच्या पालकांच्या हस्ताक्षरात लेखन करता येईल. ज्या पालकांना लेखन करता येत नाही त्यांच्या वतीने अन्य व्यक्तींकडून लेखन करुन घेता येईल.

४) हा अभिप्राय ५ ते ६ ओळीमध्ये असावा.

५) अभिप्राय लिहून झाल्यावर पालकांनी अभिप्राय लिहिलेल्या पानाचा फोटो आपल्या मोबाईलच्या कॅमे-यात काढायचा आहे.

६) त्यानंतर शिक्षण विभागाच्या 

CLICK HERE 

    वेबसाईटवर जाऊन स्वत:च्या नावाने रजिस्ट्रेशन करणे अपेक्षित आहे.

७) त्यानंतर हस्ताक्षरातला अभिप्रायाचा फोटो अपलोड करावयाचा आहे.

*याबाबत करावयाच्या कृतीबाबत फ्लोचार्ट* सोबत जोडलेला असून त्याप्रमाणे सर्व शाळास्तरापर्यंत सर्व विद्यार्थ्यांना सूचना पोहोच होतील याची दक्षता घेण्यात यावी. सदर उपक्रमाचा 

दि. २६.०२.२०२४ वेळ सकाळी ०९.०० ते दि. २७.०२.२०२४ सकाळी ०८.५९ आहे.

 सदर दिवशी अभिप्राय लिहिलेल्या पानाचा फोटो अपलोड करावयाचा आहे. त्यानुसार उपरोक्त सूचना सर्व संबंधितांच्या निदर्शनास आणून कार्यवाही पूर्ण होईल याची दक्षता घ्यावी.

 फ्लोचार्ट (Flowchart)

स्टेप- 1

संकेतस्थळ CLICK HERE  

ला भेट द्यावी

स्टेप - II

Upload handwritten note photo या बटनावर क्लिक करावे

स्टेप - III

मोबाइल क्रमांक नमूद करावा,

पुनःश्व मोबाइल क्रमांक नमूद करावा,

Captcha दिलेल्या जागेत व्यवस्थित टाकावा

Continue बटनावर क्लिक करावे

स्टेप-IV

विद्यार्थ्यांचे संपूर्ण नाव, 

शाळेचे नाव, 

जिल्हा,

 तालुका निवडावा

Continue  बटनावर क्लिक करा

स्टेप -V 

मा. मुख्यमंत्री यांच्या पत्राविषयी / 

शिक्षण विषयक अभिप्रायांचा स्वतःच्या हस्ताक्षरातील फोटो अपलोड करावा

Submit वर क्लिक करावे

Congratulations  असा संदेश दिसेल, म्हणजे आपला प्रतिसाद यशस्वी नोंदविला गेला आहे

धन्यवाद !


हे ही वाचा 👇

महाराष्ट्र शासन 
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग 
शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती इमारत
डॉ. अॅनी बेझेंट रोड
पुणे ४११००१
दु.क्र. ०२०-२६१२०१४१
ईमेल-cmschoolpro@gmail.com
क्र. आशिका/मुमं अ/सुंदरशाळा/२०२३/ईगव्ह-१४३/१२५३

दि.१६/०२/२०२४

विषय : "मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा" अभियानाबाबत ....

वाचा : १. शासन निर्णय, क्रमांकः मुमंअ२०२३/प्र.क्र.११४/एसडी-६, दिनांक ३० नोव्हेंबर, २०२३
२. शिक्षण आयुक्तालयाचे पत्र जा.क्र. ००१८६ दि. ०७/०१/२०२४

 ३. शिक्षण आयुक्तालयाचे पत्र जा.क्र. ००२३ दि. ०१/०१/२०२४

रिपत्रक :

    राज्यामध्ये "मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा" या उपक्रमातंर्गत शासकीय व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला आहे. राज्यातील १ लाख १ हजार शाळांनी आजामितीस सहभाग नोंदविला असून शाळा, विदयार्थी, शिक्षक व पालकांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसत आहे. "मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा" या अभियानातंर्गत मा. मुख्यमंत्री महोदय यांनी विदयार्थ्यांना उद्देशून लिहिलेले संदेश पत्र हे सर्व शाळांमधील २ कोटी ११ लाख मुलांपर्यंत पोहचविण्यात आलेले आहे. या पत्रामध्ये मा. मुख्यमंत्री महोदय यांनी राज्यातील बालकांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर प्रकाश टाकला असून राज्यातील सर्व विदयार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून "मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा" या अभियानाचा प्रारंभ केला आहे. राज्य शासनाने या अभियानांतर्गत स्पर्श करा हे संकेतस्थळ विकसित केले आहे. या संकेतस्थळावर पुढीलप्रमाणे सहभाग विदयार्थ्यांना नोंदविण्याची सुविधा देण्यात आलेली आहे.

१. शैक्षणिक घोषवाक्य: अभियानाचा एक महत्वपूर्ण पैलू म्हणजे विदयाथ्यांच्या स्वहस्ताक्षरातील घोषवाक्य अपलोड करणे.

२. मा. मुख्यमंत्री महोदय यांचे संदेश पत्रासोबत पालक, विदयार्थी यांची सेल्फी: विदयाथ्यांचे पालकांसमवेत मा. मुख्यमंत्री महोदयांचे संदेश पत्रांचा सेल्फी संकेतस्थळावर अपलोड करणे.
या दोन स्वतंत्र उपक्रमामधील सहभागी विदयार्थ्यांमधून प्रत्येक जिल्हयातून प्रथम क्रमांकावरील पात्र विदयार्थ्यांला रोख बक्षीस त्याला आणि त्यांच्या कुटुंबातील अन्य तीन सदस्य व वर्गशिक्षक यांना मा. मुख्यमंत्री महोदय यांच्यासमवेत मुंबई येथे स्नेहभोजन कार्यक्रमाची संधी मिळणार आहे.

३. वाचन प्रतिज्ञा : प्रत्येक विदयार्थ्यांमध्ये वाचनाची सवय वृध्दींगत होण्यासाठी 'वाचन सवय प्रतिज्ञा' मुलांनी घ्यावयाची आहे. त्यामुळे प्रत्येक विदयाथ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण होईल तसेच विदयाथ्यांकरीता उपरोक्त नमूद संकेतस्थळावर विदयाथ्यांनी ऑनलाईन प्रतिज्ञा घ्यावयाची आहे.
याकरीता


या संकेतस्थळावर या दोन उपक्रमांपैकी एक उपक्रमाचा व्हिडीओ अपलोड करावयाचा आहे. त्याकरीता या सोबत जोडलेल्या मॅन्युअल/फ्लोचार्ट प्रमाणे शाळास्तरापर्यंत सर्व विदयाथ्यांना सूचना पोहच होतील याची दक्षता घेण्यात यावी. वरील एक ते तीन वरील उपक्रम संकेतस्थळावर दि. १७/०२/२०२४ ते दि.२५/०२/२०२४ या कालावधीमध्ये अपलोड करावयाचे आहेत. त्याप्रमाणे सोबत जोडलेला फ्लोचार्टनुसार अंतिम दिनांकापूर्वी उपक्रमाची माहिती अपलोड करण्याच्या सूचना सर्व संबंधितांच्या निदर्शनास आणून कार्यवाही पूर्ण होईल याची दक्षता घ्यावी.

(सूरज मांढरे, आ.प्र.से.) 
युक्त (शक्षण) महाराष्ट्र राज्य
पुणे

प्रत माहिती व पुढील कार्यवाहीसाठी
१. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.

"मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा" अभियानाबाबत

संपूर्ण परिपत्रक / शासन निर्णय

परिपत्रक / शासन निर्णय  ७ पीडीएफ स्वरूपात डाउनलोड साठी किंवा वाचण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा

परिपत्रक / शासन निर्णय  ८ पीडीएफ स्वरूपात डाउनलोड साठी किंवा वाचण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा

फ्लोचार्ट

संकेतस्थळ www.mahacmletter.in ला भेट दयावी

स्टेज।

Register बटणावर क्लिक करावे

मोबाईल क्रमांक नमूद करावा

पुन:श्च मोबाईल क्रमांक नमूद करावा

कॅपचा (captcha) दिलेल्या जागेत व्यवस्थित टाकावा

Continue बटणावर क्लिक करावे

स्टेज ॥  शिक्षणाविषयीच्या घोषवाक्याचा फोटो अपलोड करणे, तसेच सोबत दिलेल्या जागी मराठी/इंग्रजी मध्ये घोषवाक्य नमूद करावे

Continue बटणावर क्लिक करावे

स्टेज ॥              मा. मुख्यमंत्री महोदय यांनी विदयार्थ्यांना उददेशून लिहिलेल्या संदेश पत्रासमवेत सेल्फी
पालक विदयार्थी व पत्र यांचा सेल्फी अपलोड करावा

Continue बटणावर क्लिक करावे

वाचन सवय प्रतिज्ञेचे वाचन करावे

✅ सहमत आहे ची खुण करावी

Submit वर क्लिक करावे

Congratulations असा संदेश दिसेल म्हणजे आपला प्रतिसाद यशस्वी नोंदविला गेला आहे.

धन्यवाद














संपूर्ण परिपत्रक / शासन निर्णय फ्लोचार्ट युझर म्यान्यूअल पीडीएफ स्वरूपात डाउनलोड साठी किंवा वाचण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon