राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांकरिता 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' या अभियान राबविण्याबाबत जबाबदा-या
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती इमारत, डॉअॅनी बेझंट रोड, पुणे ४११००१
दु.क्र.०२०-२६१२०१४१
ईमेल-educommoffice@gmail.com
दिनांक : ०१/०१/२०२४
जा.क्र. आशिका / मुमंअ / सुंदरशाळा/२०२३
प्रति,
१. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
२. शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे
३. शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे
४. संचालक, बालभारती, पुणे.
५. विभागीय अध्यक्ष (सर्व)
६. विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व)
७. मुख्य कार्यकारी अधिकारी (सर्व)
८. शिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी (मनपा) (सर्व)
९. शिक्षणाधिकारी (प्राथमिक)/(माध्यमिक) जि.प. (सर्व)
विषय : राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांकरिता 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' या अभियान राबविण्याबाबत जबाबदा-या
संदर्भ : १. शासन निर्णय, क्रमांक: मुमंअ२०२३/प्र.क्र.११४/एसडी-६, दिनांक ३० नोव्हेंबर, २०२३ २. या कार्यालयाचे दिनांक २०/१२/२०२३ चे पत्र ३. दिनांक १३/१२/२०२३ च्या व्ही. सी. चे इतिवृत्त
राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमधील शिक्षक, पालक, विदयार्थी व माजी विदयार्थी यांच्या शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी व त्यायोगे स्पर्धात्मक वातावरणातून विदयार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातारवण मिळावे यासाठी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' हे अभियान राबविण्यात येत आहे. सदर अभियानाची उदिदष्टे, कालावधी, त्याचे स्वरुप, या सर्व बाबी हया संदर्भ क्र. १ वरील शासन निर्णयाव्दारे व या कार्यालयाच्या संदर्भ क्र. २ पत्रान्वये विशद करण्यात आलेल्या आहेत. त्याचे अवलोकन व्हावे.
२/- या संपूर्ण अभियानाच्या अनुषंगाने कार्याचे स्वरुप व त्यानुषंगाने जबाबदा-या शासन निर्णय, दि. ३०.११.२०२३ व या कार्यालयाचे पत्र दि.२०.१२.२०२३ मध्ये नमूद आहेत. याप्रमाणे सर्व समिती सदस्य सचिव यांनी जबाबदारी पार पाडावी.
३/- उपरोक्त नमूद पदनामावरील अधिकारी यांनी संपूर्ण अभियान कार्यकाळात समिती बैठका आयोजन, शासन निर्णयाची अंमलबजावणी, शासनाच्या वेळोवेळी येणाऱ्या सूचनांची अंमलबजावणी समिती अध्यक्षांच्या नेतृत्वात पूर्ण करणे व अनुषंगिक सर्व कामे विहित मुदतीत पूर्ण करण्याची जबाबदारी सदस्य सचिव यांची राहील. नजिकच्या नियंत्रण अधिकाऱ्यांनी या अभियानाच्या यशस्वीतेकरीता सर्वतोपरी प्रयत्न करणे अपेक्षित आहे.
४/- अभियानाकरीता मंजूर करण्यात आलेल्या निधी कोषागारातून आहरित करणे, सर्व क्षेत्रिय कार्यालयांना आवश्यकतेनुसार आयुक्त यांचे मान्यतेने वितरित करणे, निधीचा विनियोग योग्य पध्दतीने होत आहे याची शहानिशा करणे, शासनाकडून आवश्यक त्या निधीकरिता पाठपुरावा करणे या सर्व बाबींसाठी लेखाधिकारी, प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे यांनी संचालक (प्राथमिक) यांच्या संनियंत्रणाखाली सदर कामकाज विहित मुदतीत पूर्ण करावे.
५/- अभियानाची राज्य स्तरावरील व्यापक प्रचार प्रसिध्दी सर्व घटकांपर्यंत करण्याबाबतची जबाबदारी संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), पुणे यांच्याकडे देण्यात येत आहे.
६/- तालुका/जिल्हा/मनपा / विभाग स्तर व राज्य स्तरावरील कार्यालयांमध्ये अभियान कक्षाची निर्मिती करण्यात यावी. अनुक्रमे सदर जबाबदारी गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), प्रशासन अधिकारी (मनपा), विभागीय शिक्षण उपसंचालक व राज्य स्तरावर सहसंचालक यांची राहील.
७/- अभियानाकरिता आवश्यक असणारे मनुष्यबळ घेण्याची मुभा सर्व स्तरावरील कार्यालय प्रमुख यांना असेल.
८/- मूल्यांकन समितीने आवश्यकतेनुसार शाळा मूल्यांकनाची पध्दती प्रत्येक स्तरावर निश्चित करावी.
९/- 'सरल प्रणाली' मधील शाळा (संकेतस्थळ) पोर्टलवर मूल्यांकनाकरीता व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक शाळा स्तरावर शाळा लॉगिनमध्ये या अभियानाच्या मूल्यांकनाची प्रश्नावली समोर पीडीएफ / छायाचित्र व त्यासमोर शब्दांत विवरण नमूद करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. त्यासाठीचे सविस्तर युजर मॅन्युअल (User Manual) तयार करुन ते संकेतस्थाळावर उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. User Manual पाहण्यासाठी वाचण्यासाठी किंवा पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा १० वरीलप्रमाणे संपूर्ण उपक्रमाचे संनियंत्रण व उक्त घटकातील आपसातील समन्वय या बाबत दैनंदिन देखरेख ठेऊन हा कार्यक्रम क्षेत्रीय स्तरावर प्रभावीपणे राबविला जाईल याची दक्षता घेणे तसेच या बाबत सर्व टिप्पण्या / लेखे/सांख्यिकी माहिती संकलित करणे / जतन करणे व यासंदर्भात मा. मंत्री कार्यालय / मा. प्रधान सचिव व कार्यालय व आयुक्त यांना दैनंदिन अहवालाव्दारे अवगत करणेसाठी शिक्षण उपसंचालक (मुख्यालय) यांना कार्यक्रम समन्वय अधिकारी म्हणून पदनिर्देशित करणेत येत आहे.त्यानुसार त्यांनी नमुने विहित करण्याची कार्यवाही करावी.
वरीलप्रमाणे सोपविण्यात आलेल्या जबाबदारीनुसार व कार्यपध्दतीनुसार कामकाजाचे अचूक नियोजन करुन सदर अभियान हे यशस्वीरित्या पार पाडले जाईल याची सर्वांनी वैयक्तिकरित्या दक्षता घ्यावी.
परिपत्रक वाचण्यासाठी किंवा पीडीएफ मध्ये डाऊनलोड करण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा
(सूरज मांढरे, मा.प्र.से.)
आयुक्त (शिक्षण)
महाराष्ट्र राज्य, पुणे
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon