महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती इमारत, डॉअॅनी बेझंट रोड., पुणे ४११००१
ईमेल-cmschoolpro@gmail.com
दु.क्र.०२०-२६१२०१४१
क्र. आशिका/मुमंअ/सुंदरशाळा/२०२३/ईगव्ह-१४३/००१८६
दि.०६/०१/२०२४
प्रति,
१) संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.
२) शिक्षण संचालक, (माध्यमिक व उच्च माध्यमिक), शिक्षण संचालनालय, पुणे
३) शिक्षण संचालक, (प्राथमिक), शिक्षण संचालनालय, पुणे
४) शिक्षण संचालक, (योजना), शिक्षण संचालनालय, पुणे.
५) संचालक, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व संशोधन मंडळ, बालभारती, पुणे.
६) विभागीय शिक्षण उपसंचालक, विभाग (सर्व)
७) प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व)
८) महानगरपालिका प्रशासन अधिकारी (सर्व)
९) शिक्षणाधिकारी (प्राथ/माध्य/योजना) जिल्हा परिषद / शिक्षण निरीक्षक (सर्व)
विषय : 'मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा' अभियानासाठी कालदर्शिका...
वाचा : १. शासन निर्णय, क्रमांक: मुमंअ२०२३/प्र.क्र.११४/एसडी-६, दिनांक ३० नोव्हेंबर, २०२३
२. या कार्यालयाचे पत्र जा.क्र.७८४२ दिनांक २०/१२/२०२३
३. दिनांक १३/१२/२०२३ च्या व्ही.सी.चे इतिवृत्त
४. या कार्यालयाचे पत्र जा.क्र. ००२३ दिनांक ०१/०१/२०२४
५. या कार्यालयाचे पत्र जा.क्र. ००१५३, दिनांक ०५/०१/२०२४ (कामकाज जबाबदा-या ६. या कार्यालयाचे पत्र जा.क्र.००१५३, दिनांक ०५/०१/२०२४ (मार्गदर्शक सूचना)
राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमधील शिक्षक, पालक, विदयार्थी व माजी विदयार्थी यांच्या शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी व त्यायोगे स्पर्धात्मक वातावरणातून विदयार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातारवण मिळावे यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' हे अभियान राबविण्यासाठी दि. ३०.११.२०२३ अन्वये शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कार्यक्रमनिहाय जबाबदा-या, मार्गदर्शक सूचना या सर्व बाबी या कार्यालयाच्या वाचा येथील नमूद पत्रान्वये आपणांस कळविण्यात आलेल्या आहेत. त्याचे आपल्याकडून अवलोकन होऊन त्याप्रमाणे कार्यवाही होऊन त्या शाळांपर्यंत पोहचविण्यात आलेल्या असतील अशी अपेक्षा आहे.
२/- उक्त अभियान हे विहित कालावधीत पार पाडण्यासाठी करावयाच्या कार्यवाहीबाबत सुस्पष्टता येण्यासाठी दिनांकनिहाय कालदर्शिका तयार करुन ती सोबत जोडली आहे. त्यानुसार नमूद केलेल्या अधिकारी यांनी आपल्याकडील जबाबदारी योग्यरित्या पार पाडून अभियान यशस्वी होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत.
सोबत : अभियान कालदर्शिका
(सूरज मांढरे, भा.प्र.से.) आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य, पुणे
प्रत : मा.प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई ३२.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानासाठी कालदर्शिका वाचण्यासाठी किंवा पीडीएफ मध्ये डाऊनलोड करण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा
"मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा"
सर्व शासन निर्णय व परिपत्रके पीडीएफ मध्ये वाचण्यासाठी किंवा डाऊनलोड करण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा सर्व एकाच ठिकाणी उपलब्ध
👇👇👇👇👇👇
🏫 *'मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा'* अभियानासाठी *कालदर्शिका*
*दि ०६ जानेवारी २०२४*
पीडीएफ मध्ये डाऊनलोड करण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा
*मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानांतर्गत मार्गदर्शक सूचना*
*दि ०५ जानेवारी २०२४*
पीडीएफ मध्ये डाऊनलोड करण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा
राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळा करिता *मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा* या अभियान राबविण्याबाबत *जबाबदाऱ्या* दिनांक ०१ जानेवारी २०२४ च्या सूचना
पीडीएफ मध्ये डाऊनलोड करण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा
*मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा पोर्टल लिंक*
पीडीएफ मध्ये डाऊनलोड करण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा
*माझी शाळा सुंदर शाळा शासन निर्णय*
पीडीएफ मध्ये डाऊनलोड करण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा
1 comments:
Click here for commentsThis project is very useful to students and for nature we have to plant trees and clean everything in our surrounding it is our duty to clean the surrounding and keep atmosphere clean
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon