महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती इमारत, डॉअॅनी बेझंट रोड, पुणे ४११००१
दु.क्र.०२०-२६१२०१४१
ईमेल- cmschoolpro@gmail.com
क्र. आशिका/मुमंअ / सुंदरशाळा/२०२३/ईगव्ह-१४३/००१५७
दि. ५/०१/२०२४
प्रति,
१) संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.
२) शिक्षण संचालक, (माध्यमिक व उच्च माध्यमिक), शिक्षण संचालनालय, पुणे
३) शिक्षण संचालक, (प्राथमिक), शिक्षण संचालनालय, पुणे ४) शिक्षण संचालक, (योजना), शिक्षण संचालनालय, पुणे.
५) संचालक, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व संशोधन मंडळ, बालभारती, पुणे.
६) विभागीय शिक्षण उपसंचालक, विभाग (सर्व)
७) महानगरपालिका प्रशासन अधिकारी (सर्व)
८) शिक्षणाधिकारी (प्राथ / माध्य) जिल्हा परिषद, (सर्व)
९) शिक्षण निरीक्षक (सर्व)
विषय : 'मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा' अभियानांतर्गत मार्गदर्शक सूचना...
संदर्भ : १. शासन निर्णय, क्रमांक: मुमंअ२०२३/प्र.क्र. ११४/एसडी-६, दिनांक ३० नोव्हेंबर. २०२३
२. या कार्यालयाचे पत्र दिनांक २०/१२/२०२३
३. दिनांक १३/१२/२०२३ च्या व्ही. सी. चे इतिवृत्त
४. या कार्यालयाचे पत्र दिनांक ०१/०९/२०२४
दिनांक ३० नोव्हेंबर २०२३ रोजी राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये 'मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा' हे अभियान राज्यात राबविण्यासंदर्भात सविस्तर सूचना निर्गमित केलेल्या आहेत. याअनुषंगाने दिनांक १३ डिसेंबर २०२३ रोजी राज्यातील सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण निरीक्षक, मनपा प्रशासन अधिकारी व सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक यांना व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे सूचना निर्गमित केलेल्या आहेत. दिनांक २० डिसेंबर २०२३ व दिनांक १ जानेवारी २०२४ रोजी शिक्षणाधिकारी स्तरावरून अभियान यशस्वी होण्याच्या अनुषंगाने सविस्तर सूचना देण्यात आल्या आहेत.
उक्त नमूद कार्यपद्धतीचा अवलंब करुन सर्व शाळांमध्ये 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' अभियान राबविण्यास सुरुवात केलेली आहे. या अभियानास अधिक गती येण्यासाठी पुढीलप्रमाणे कार्यवाहीचे निर्देश देण्यात येत आहेत.
"मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा" मुद्देसूद १००० शब्दात टाईप करायची नमुना माहिती वर्ड फाईल मध्ये डाऊनलोड करा
मित्रांनो Click to Download टिचकी मारा १५ सेकंद थांबा त्यानंतर Download File वर टिचकी मारा
१. जिल्हा शिक्षणाधिकारी, प्राथमिक सर्व / माध्यमिक शिक्षण निरीक्षक सर्व प्रशासन अधिकारी (महानगरपालिका) यांनी आपल्या जिल्ह्यातील शाळांमध्ये सुरू झालेल्या अभियानाचा सविस्तर आढावा घ्यावा. सर्व शाळांमध्ये अभियान यशस्वी होण्यासाठी आवश्यक कार्यवाही आपल्या स्तरावरून करावी. या अभियानामध्ये सहभागी झालेल्या शाळांची माहिती सर्व जिल्हास्तरावरील / मनपा स्तरावरील अधिकारी यांनी त्यांचे अधिनस्त पर्यवेक्षीय
यंत्रणेकडून दर आठवड्याला अचूक संकलित करावी. ती माहिती दर शुक्रवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत संबंधित
विभागीय शिक्षण उपसंचालक यांना सोबत जोडलेल्या प्रपत्रात सादर करावी. विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी सदर
संकलित झालेली माहिती शिक्षण आयुक्तालयास दर शनिवारी ११ वाजेपर्यंत सोबत जोडलेल्या
प्रपत्र अ मध्ये cmschoolpro@gmail.com या ईमेलवर सादर करावी.

२. या अभियानाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी
जिल्हास्तरावरील सर्व अधिकारी यांनी आकाशवाणी, एफएम, स्थानिक प्रसार वाहिन्या, स्थानिक इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमे, सोशल मिडिया, प्रिंट
मिडिया आणि होर्डिंग्ज तसेच जिल्हा माहिती अधिकारी यांच्या माध्यमातून या
अभियानाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा स्तर ते विभाग स्तरावरील संबंधित कार्यालय प्रमुख
तथा समितीचे अध्यक्ष व सदस्य-सचिव यांनी कार्यवाही करावी व या अभियानाच्या
प्रसिद्धी व प्रचाराच्या पुष्ट्यर्थ बातम्यांची कात्रणे/टी. व्ही. वरील
बातम्यांच्या URL लिंक्स अथवा व्हिडिओ/ सोशल मिडियावरील
https://drive.google.com/drive/folders/1SLpCMNhoiOAlfeJZ6rYzSVaD9IVXTzHn?usp=sharing
या drive वर
वेळोवेळी अपलोड करावेत.
३. मा. मुख्यमंत्री महोदयांनी विद्यार्थ्यांना
उददेशून लिहीलेले पत्र प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोच झाल्याची खातरजमा करावी
व त्याचा प्रगती अहवाल 'प्रपत्र ब' मध्ये दर आठवड्याला सादर करावा. मा.
मुख्यमंत्री यांच्या पत्राचे वाचन करतानाची सेल्फी, तसेच
या संदर्भातील १० शब्दांत घोषवाक्य व शैक्षणिक गुणवत्ता वाढीसंदर्भात ५० शब्दांत
अभिप्राय अपलोड करण्याची सुविधा पोर्टलवर उपलब्ध करून दिली जाणार आहे. सेल्फी व
घोषवाक्य यांचा गुणात्मक दृष्टीने विचार करून प्रत्येक जिल्ह्यातून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक घोषित करण्यात येणार
असून, त्यांपैकी प्रथम पारिताषिक विजेता
विद्यार्थी, त्याचे पालक व वर्गशिक्षक यांना मा.
मुख्यमंत्री महोदयांच्या समवेत भेटीसाठी व भोजनासाठी आमंत्रित करण्यात येणार आहे.
या बाबीस व्यापक प्रसिद्धी द्यावी.

४. प्रत्येक शिक्षणाधिकारी शिक्षण
निरीक्षक/मनपा स्तरावरील प्रशासन अधिकारी यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील तसेच
विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी आपल्या
विभागातील शाळांमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी व मंत्री महोदय यांना
सहभागी होण्यासाठी विविध उपक्रम आयोजित करावेत.
या अभियानातील उपक्रमांच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने बाल संसद, वाचन अभियान, परसबाग, माजी विद्यार्थी शिबिरे इत्यादी
कार्यक्रम आयोजित करावेत.
५. सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी व विभागीय
उपसंचालक यांनी दररोज किमान दोन शाळांमध्ये जाऊन मा.मुख्यमंत्री महोदयांच्या
पत्राचे वाचन विदयार्थ्यांसमक्ष करावे.
६. दर आठवड्याला किमान दोन शाळांमध्ये
जिल्ह्याच्या पालकमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये उपक्रमांचे आयोजन करून त्यास
विविध प्रसारमाध्यमाद्वारे व्यापक प्रसिद्धी द्यावी.
७. या कार्यक्रमांतर्गत महावाचन चळवळीची
अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने दर शनिवारी प्रत्येक विद्यार्थी किमान पाच पाने
वाचेल, याकरीताउपक्रम
आयोजित करावेत. सकाळ सत्रातील शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी सकाळी .९ वाजता व दुपार
सत्रातील शाळेतील विदयार्थ्यांसाठी दुपारी १ वाजता वाचन उपक्रम घ्यावा. याबाबतचा
अहवाल दर शनिवारी सहभागी विद्यार्थीसंख्येसह वरिष्ठांकडे सादर करावा.
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon