Mukhymantri Mazi Shala Sundar Shala
२. मा. मुख्यमंत्री महोदय यांचे संदेश पत्रासोबत पालक, विदयार्थी यांची सेल्फी: विदयाथ्यांचे पालकांसमवेत मा. मुख्यमंत्री महोदयांचे संदेश पत्रांचा सेल्फी संकेतस्थळावर अपलोड करणे.
या दोन स्वतंत्र उपक्रमामधील सहभागी विदयार्थ्यांमधून प्रत्येक जिल्हयातून प्रथम क्रमांकावरील पात्र विदयार्थ्यांला रोख बक्षीस त्याला आणि त्यांच्या कुटुंबातील अन्य तीन सदस्य व वर्गशिक्षक यांना मा. मुख्यमंत्री महोदय यांच्यासमवेत मुंबई येथे स्नेहभोजन कार्यक्रमाची संधी मिळणार आहे.
३. वाचन प्रतिज्ञा : प्रत्येक विदयार्थ्यांमध्ये वाचनाची सवय वृध्दींगत होण्यासाठी 'वाचन सवय प्रतिज्ञा' मुलांनी घ्यावयाची आहे. त्यामुळे प्रत्येक विदयाथ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण होईल तसेच विदयाथ्यांकरीता उपरोक्त नमूद संकेतस्थळावर विदयाथ्यांनी ऑनलाईन प्रतिज्ञा घ्यावयाची आहे.
याकरीता
“मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा" हे अभियान राबविण्यासाठी राज्यस्तरीय सुकाणू समिती व राज्यस्तरीय कार्यकारी समिती गठीत करणेबाबत.
महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांकः संकीर्ण २०२३/प्र.क्र.११३/एसडी-६
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२
दिनांक :- २१ नोव्हेंबर, २०२३
प्रस्तावना:-
राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमधील शिक्षक, पालक व विद्यार्थी यांच्यात शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी व त्यायोगे स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत “मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा” हे अभियान राबविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे. या अभियानाची रूपरेषा निश्चित करणे व त्यावरील देखरेख व नियंत्रण यासाठी राज्यस्तरीय सुकाणू समिती तर अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय कार्यकारी समिती गठीत करण्याची बाब देखील शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय:-
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत "मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा” या अभियानाची रूपरेषा निश्चित करणे व त्यावरील देखरेख व नियंत्रण यासाठी राज्यस्तरीय सुकाणू समिती तर अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय कार्यकारी समिती खालीलप्रमाणे गठीत करण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे.
अ) राज्यस्तरीय सुकाणू समिती
संपूर्ण शासन निर्णय पीडीएफ स्वरूपात डाउनलोड साठी किंवा वाचण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा
राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांकरिता 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' हे अभियान राबविणेबाबत.
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांकः मुमंअ २०२३/प्र.क्र.११४ / एसडी-६ मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक मंत्रालय,
मुंबई ४०० ०३२
दिनांक:- ३० नोव्हेंबर, २०२३
प्रस्तावना :-
राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमधील शिक्षक, पालक, विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्यात शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी व त्यायोगे स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे यासाठी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' हे अभियान राबविण्याचे प्रस्तावित आहे.
संपूर्ण शासन निर्णय पीडीएफ स्वरूपात डाउनलोड साठी किंवा वाचण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon