DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Class 9th 10th 11th 12th Jal Suraksha

Class 9th 10th 11th 12th Jal Suraksha

Class 10thJal Suraksha pdf

Class 9th 10th 11th 12th  Jal Suraksha Water Security Textbook Workbook Activity / Project book pdf


जलसुरक्षा हा विषय इयत्ता नववी,दहावी,अकरावी आणि बारावीसाठी अनिवार्य श्रेणी विषय म्हणून निर्धारीत करण्यात आलेला आहे. या विषयाची मांडणी ही पाठ्यपुस्तक व कार्यपुस्तिका (उपक्रम व प्रकल्प नोंदवही) अशा स्वरूपात करण्यात आलेली आहे.
Compulsory Grade Textbook and Workbook Activity and Project book for Class IX,X,XI,XII on Water Security Subject Project Notebook
Jal Suraksha Class 10th Answer in Marathi pdf download Std 10th Jal Suraksha Textbook Workbook Project Activity Notebook  pdf जलसुरक्षा कार्यपुस्तिका उपक्रम व प्रकल्प नोंदवही उत्तरे pdf

इयत्ता ९ वी व १० वी आणि इयत्ता ११ वी व १२ वी Iytta Navavi Dahavi Akravi BaraviJalsuraksha

जा.क्र/ राशैसंप्रपम/अविवि / विषय योजना परिपत्रक / २०२०-२१/६२५ दि.१०.०२.२०२१

परिपत्रक

विषय - इयत्ता ९ वी व १० वी आणि इयत्ता ११ वी व १२ वी सुधारित विषय योजना व मूल्यमापन योजना

संदर्भ १) शासन निर्णय क्र. संकीर्ण २०१९/प्र.क्र. (२४३-१९) एसडी-४, दि.०८ ऑगस्ट, २०१९ २) शासन निर्णय क्र. संकीर्ण २०१९/प्र.क्र.(२४३-१९) एसडी-४, दि.०८ ऑगस्ट, २०१९ ३) शासन निर्णय दि.०८.०८.२०१९ चे शुद्धिपत्रक, दि.११.११.२०१९.

    या परिपत्रकान्वये आपणास कळविण्यात येते की, संदर्भ क्र.१ शासन निर्णयानुसार सन २०१९-२० पासून इयत्ता ९ वी व इयत्ता १० वी साठी तसेच संदर्भ क्र. २ शासन निर्णयानुसार सन २०१९- २० पासून इयत्ता ११ वी साठी व सन २०२०-२१ पासून १२ वी साठी सुधारित विषय योजना व मूल्यमापन योजना निश्चित करण्यात आलेली आहे.
    सदर शासन निर्णयानुसार निर्धारित केलेल्या इयत्ता ९ वी व इयत्ता १० वी साठी जलसुरक्षा,
    कार्यशिक्षण, समाजसेवा व व्होकेशनल V1, V2, V3 इ., विशेष गरजा असणा-या (दिव्यांग)
विद्यार्थ्यांसाठी कार्यशिक्षण, शरीरशास्र, आरोग्यशास्र व गृहशास्र तसेच इयत्ता ११ वी व इयत्ता १२ वी साठी निर्धारित केलेल्या कलेचा इतिहास व रसग्रहण आणि भारतीय संगीताचा इतिहास व विकास या विषयांच्या अंमलबजावणीबाबत माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांना काही साशंकता असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याचे निराकरण करणेसाठी स्पष्टता करण्यात येत आहे.

🚰 हे ही वाचाल 🚰 


१) "जलसुरक्षा" हा विषय "स्व-विकास व कला रसास्वाद" या श्रेणी विषयाऐवजी अनिवार्य श्रेणी विषय म्हणून समाविष्ट करण्यात आला आहे. सदर विषयाची अंमलबजावणी इ.९ वी साठी सन २०२०-२०२१ या शैक्षणिक वर्षापासून व इ.१० वी साठी सन २०२१-२०२२ या शैक्षणिक वर्षापासून करण्यात येत आहे.

२) विशेष गरजा असणा-या (दिव्यांग) विद्यार्थ्यांसाठी कार्यशिक्षण, शरीरशास्र, आरोग्यशास्र व गृहशास्र या विषयाच्या पुनर्रचित पाठ्यपुस्तकांची निर्मिती बालभारती, पुणे या कार्यालयाकडून पूर्ण झाली असून त्यानुसार सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता ९ वी साठी व सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता १० वी साठी अंमलबजावणी करण्यात येत आहे.

३) श्रेणी विषयातील वैकल्पिक गटात "संरक्षणशास्त्र" या विषयाला सद्यस्थितीत एम.सी.सी (इयत्ता ९वी साठी) स्काऊट गाईड, नागरी संरक्षण व वाहतूक सुरक्षा, एन.सी.सी हे विषय सुरू आहेत. कार्यशिक्षण, समाजसेवा व व्होकेशनल V१, ४२, ४३ इ. व्यवसाय विषयांचे पर्याय शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ पासून इयत्ता ९ वी साठी आणि शैक्षणिक वर्ष २०२१- २२ पासून इ.१० वी साठी उपलब्ध राहतील.

४) कलेचा इतिहास व रसग्रहण आणि भारतीय संगीताचा इतिहास व विकास या विषयासाठी तयार करण्यात आलेल्या सुधारित पाठ्यपुस्तकांची अंमलबजावणी सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता ११ वी साठी व सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता १२ वी साठी करण्यात येत आहे.

    तरी उपरोक्त क्रमांक १ ते ४ प्रमाणे संबंधित विषयांच्या इयत्तानिहाय अंमलबजावणीबाबत कार्यवाही करण्यात यावी व अशा सूचना आपल्या अखत्यारीतील सर्व माध्यमिक शाळा व उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयातील मुख्याध्यापक / प्राचार्य, सर्व शिक्षक, विद्यार्थी व पालक यांच्या निदर्शनास आणून द्याव्यात.

संचालक,
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

अधिक माहितीसाठी खालील व्हिडिओ नक्की पाहा 


उपरोक्त परिपत्रकांच्या सुलभ संदर्भानुसार 

    विद्यार्थी मित्रांनो,राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा सन २०२० व महाराष्ट्र राज्य अभ्यासक्रम आराखडा २०२४-२५ महाराष्ट्र  राज्य माध्यमिक शिक्षण अभ्यासक्रम आणि पुनर्रचित माध्यमिक शिक्षण अभ्यासक्रम २०१६ नुसार तुम्ही इयत्ता नववीच्या वर्गात विविध विषयांचे अध्ययन करत आहात. माध्यमिक शिक्षण पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार शासन निर्णय क्र. संकीर्ण 2019/ प्र.क्र. (243/19) एस.डी 4 दिनांक 8 ऑगस्ट 2019 नुसार या संबंधी अधिक जाणून घेण्यासाठी या ओळीला स्पर्श करा माध्यमिक शिक्षण स्तरासाठी जलसुरक्षा हा अनिवार्य श्रेणी विषय सन 2020-21 या शालेय वर्षापासून निर्धारीत करण्यात आला आहे. प्राथमिक स्तरापासून ते आतापर्यंत विविध विषयांच्या अध्ययनातून तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये विविध क्षमतांचा विकास झालेला आहे.
या संबंधी अधिक जाणून घेण्यासाठी या ओळीला स्पर्श करा 

या संबंधी अधिक जाणून घेण्यासाठी या ओळीला स्पर्श करा 

या संबंधी अधिक जाणून घेण्यासाठी या ओळीला स्पर्श करा 

तुम्हा सर्वांना माहीतच आहे की सभोवताली, पर्यावरणामध्ये विविध प्रकारच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. त्या विविध घटकांवर आधारीत आहेत. शालेय स्तरावर विद्यार्थ्यांनी या समस्यांचा अभ्यास करून त्यावर उपाययोजना सुचविणे व त्यादृष्टीने वर्तन करणे हा मुख्य उद्देश सुद्धा अभ्यासक्रमाने निश्चित केलेला आहे. तोच उद्देश समोर ठेवून जलसुरक्षा या विषयाची मांडणी करण्यात आलेली आहे. 

जलसुरक्षा विषय प्रमुख घटक -
जलसुरक्षा या विषयाचे अध्ययन करताना तुम्हाला तुमच्या आजूबाजूची परिस्थिती, संबंधित घटक यांचे काळजीपूर्वक निरीक्षण करावे लागेल.या विषयातील विविध संकल्पना, संबोध, तत्त्वे सिद्धांत तत्वे समजून घ्या व त्यांची दैनंदिन व्यवहाराशी सांगड झाला. जलशिक्षण, जलसंधारण, जलव्यवस्थापन व जलगुणवत्ता या प्रमुख घटकांचा समावेश या विषयामध्ये करण्यात आला आहे. 

जलसुरक्षा विषयाची मांडणी -
जलसुरक्षा विषयाची मांडणी करताना पाठ्यपुस्तक व कार्यपुस्तिका अशी रचना करण्यात आली आहे.पाठ्यपुस्तक हे विषयाच्या संपूर्ण माहितीचे असणार आहे तर कार्यपुस्तिका ही तुम्ही करावयाच्या सर्व कृती व उपक्रम यांची म्हणजे उपयोजनाची आहे.

जलसुरक्षा विषयाची कार्यपुस्तिका - 
कार्यपुस्तिका ही प्रामुख्याने पाठ्यपुस्तकावर आधारित करावयाच्या कृतींसाठी देण्यात आलेली. जलसुरक्षेतील विविध संकल्पना, संबोध, सिद्धांत व तत्त्वे समजून घेत असताना कृती, प्रयोग, उपक्रम व प्रकल्प काळजीपूर्वक करा. निरीक्षणे घ्या, माहितीचे संकलन करा. या सर्वांवर चर्चा करून तुम्ही केलेल्या सर्व कृती, उपक्रम व प्रकल्पांच्या नोंदी काळजीपूर्वक तुमच्या शिक्षकांच्या, पालकांच्या मार्गदर्शनाखाली या पुस्तिकेत नोंदवा. तुम्ही अभ्यासलेल्या आणि प्रत्यक्ष केलेल्या कार्याचे एक उत्तम असे शैक्षणिक साहित्य तयार होणार आहे. यामुळे तुमच्यामध्ये संशोधक वृत्ती विकसित होण्यास निश्चितच मदत होईल.
आजच्या तंत्रज्ञानाच्या वेगवान युगात संगणक, स्मार्टफोन हे तर तुमच्या परिचयाचे आहेत. त्यामुळे जलसुरक्षा भाग एक या पाठ्यपुस्तकातून अध्ययन करताना माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाच्या साधनांचा सुयोग्य वापर करा. कृती व प्रयोग करताना विविध उपकरणे, महत्त्वाचे साहित्य हाताळताना काळजी घ्या व इतरांनाही काळजी घ्यायला सांगा. कृती, निरीक्षणे करताना पर्यावरण संवर्धनाचा ही प्रयत्न करा. वनस्पती, प्राणी यांना इजा त्यांची हानी होणार नाही याची काळजी घ्या. हे वेबपेज वाचताना, अभ्यासताना आणि समजून घेताना तुम्हाला त्यातील आवडलेला भाग तसेच अभ्यास करताना येणाऱ्या अडचणी, पडणारे प्रश्न आम्हाला जरूर कळवा. तुम्हाला तुमच्या शैक्षणिक प्रगतीसाठी हार्दिक शुभेच्छा..

इयत्ता नववी जलसुरक्षा मूल्यमापन योजना :
जलसुरक्षा विषय इयत्ता नववीसाठी अनिवार्य श्रेणी विषय

जलसुरक्षा हा विषय इयत्ता नववीसाठी अनिवार्य श्रेणी विषय म्हणून निर्धारीत करण्यात आलेला आहे. या विषयाची मांडणी ही पाठ्यपुस्तक व कार्यपुस्तिका (उपक्रम व प्रकल्प नोंदवही) अशा स्वरूपात करण्यात आलेली आहे. त्यानुसार पाठ्यपुस्तकामध्ये जलसुरक्षा, जलसंधारण, जल व्यवस्थापन व जल गुणवत्ता या घटकांचा समावेश करण्यात आलेला आहे. तर कार्यपुस्तिकेमध्ये चार प्रमुख घटकांवर आधारीत करावयाच्या सर्व कृती, उपक्रम आणि प्रकल्पांचा समावेश आहे. करावयाचे उपक्रम आणि प्रकल्प यांची निश्चिती करून देण्यात आलेली आहे. त्याविषयी सुचना आणि मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. या विषयाच्या संपूर्ण अध्ययनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी केलेल्या विविध कृती, उपक्रम आणि प्रकल्प यांचे मूल्यमापन करण्यासाठी पुढीलप्रमाणे मूल्यमापन योजना निश्चित करण्यात येत आहे.

अ.क्र

तपशील

प्रथम सत्र           

द्वितीय सत्र

गुण

१  

उपक्रम

घटक 1 मधील कोणतेही २

घटक ३ मधील कोणतेही २  

 

 

 

 

४०

घटक २ मधील कोणतेही २

घटक ४ मधील कोणतेही २

प्रत्येकी 5 गुण प्रमाणे एकूण गुण २०

प्रत्येकी ५ गुण प्रमाणे एकूण गुण २०

प्रकल्प

घटक १ व २ मधील कोणताही १

गुण १५

घटक 34 मधील

 कोणताही 1 गुण १५

 

३०

तोंडी/लेखी परीक्षा

घटक १ व २ च्या आशयावर आधारीत प्रश्नांचा समावेश १० गुण

घटक ३ व ४ च्या आशयावर आधारीत आधारीत प्रश्नांचा समावेश 10 गुण

 

२०

उपक्रम व प्रकल्प नोंदवही

घटक १, , ३ व ४ वर आधारीत उपक्रम व प्रकल्प अहवाल लेखन- जलसुरक्षा कार्यपुस्तिका गुण १०

 

 

१०

जलसुरक्षा विषयाचे एकूण मूल्यमापन

१००

श्रेणी


१.सत्रनिहाय जलसुरक्षा विषयाच्या मूल्यमापन नोंदी कराव्यात.
२.उपक्रम व प्रकल्प नोंदवही मूल्यमापन संदर्भात महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने निर्धारीत केलेली जलसुरक्षा कार्यपुस्तिका (उपक्रम व प्रकल्प नोंदवही) शैक्षणिक वर्षाच्या शेवटी जमा करून घ्यावी.
३.उपरोक्तप्रमाणे एकूण 100 गुणांपैकी प्राप्त गुणांचे श्रेणीत रूपांतर करण्यात येईल.
४.अ,ब, क श्रेणी उत्तीर्णता तर ड श्रेणी अनुत्तीर्णता दर्शवेल.
विद्यार्थी मित्रांनो, आम्ही आपल्यासाठी एक आदर्श उपक्रम व प्रकल्प नोंदवही pdf च्या माध्यमातून देत आहोत. या pdf चा उपयोग आपल्याला जलसुरक्षा कार्यपुस्तिका सोडवताना तसेच उपक्रम व प्रकल्प तयार करताना निश्चित मार्गदर्शक ठरेल. असा आम्हाला विश्वास आहे

इयत्ता : नववी
जलसुरक्षा पाठ्यपुस्तक 👉 Download pdf 

नमुना सोडवलेली जलसुरक्षा (उपक्रम व प्रकल्प कार्यपुस्तिका) 👉 Download pdf

जलसुरक्षा नमुना उपक्रम 👉 Download pdf

जलसुरक्षा गुणदान तक्ता 👉 Download pdf

दहावी जलसुरक्षा  Iytta Dahavi Jalsuraksha
इयत्ता दहावी जलसुरक्षा मूल्यमापन योजना :

इयत्ता दहावीसाठी सन 2021-22 या सालापासून ‘जलसुरक्षा’ हा ‘अनिवार्य श्रेणी विषय’ करण्यात आलेला आहे. सदरच्या विषयासाठी पाठयपुस्तक आणि कार्यपुस्तिका (उपक्रम व प्रकल्प नोंदवही) अशी दोन पुस्तके तयार केलेली आहेत. ही दोन्ही पुस्तके महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने (बालभारती) निर्धारित केलेल्या आहेत. विद्यार्थ्यांनी त्यांचा वापर करावयाचा आहे. या पाठयपुस्तकात जलशिक्षण, जलसंधारण, जलव्यवस्थापन व जलगुणवत्ता या घटकांचा समावेश आहे. या घटकावर आधारित विविध कृती, उपक्रम आणि प्रकल्प पूर्ण करावयाचे आहेत. कार्यपुस्तिकेमध्ये प्रकल्प आणि उपक्रम यांच्या नोंदी करावयाच्या आहेत.
विद्यार्थ्यांनी प्रत्येक घटकावर तीन उपक्रम आणि एक प्रकल्प असे एकूण 12 उपक्रम आणि 4 प्रकल्प वर्षभरात पूर्ण करावयाचे आहेत. मूल्यमापनासाठी खालील तक्त्यात दाखवल्याप्रमाणे, उपक्रम आणि प्रकल्प यांची निवड करून त्यांना गुण दयावयाचे आहेत. हे सर्व मूल्यमापन प्रात्यक्षिक परीक्षेच्या वेळी तपासले जाणार आहे. तसेच कार्यपुस्तिका (उपक्रम व प्रकल्प नोंदवही ) शैक्षणिक वर्षाच्या शेवटी जमा करून घेतले जाणार आहेत. जलसुरक्षा विषयाच्या मूल्यमापन विषयक नोंदी सत्रनिहाय (प्रथम सत्र आणि द्वितीय सत्र ) कराव्यात.

अ.क्र

तपशील

प्रथम सत्र           

द्वितीय सत्र

गुण

१  

उपक्रम

घटक १ मधील कोणताही १

घटक ३ मधील कोणतेही १  

 

 

 

 

४०

घटक २ मधील कोणताही १

घटक ४ मधील कोणतेही १

प्रत्येकी१० गुण प्रमाणे एकूण गुण २०

प्रत्येकी ५ गुण प्रमाणे एकूण गुण २०

प्रकल्प

घटक १ व २ मधील कोणताही १

गुण १५

घटक ३ व ४ मधील

 कोणताही १ गुण १५

 

३०

तोंडी/लेखी परीक्षा

घटक १ व २ च्या आशयावर आधारीत प्रश्नांचा समावेश १० गुण

घटक ३ व ४ च्या आशयावर आधारीत आधारीत प्रश्नांचा समावेश १० गुण

 

२०

उपक्रम व प्रकल्प नोंदवही

घटक १, , ३ व ४ वर आधारीत उपक्रम व अहवाल लेखन व पाठ्यपुस्तक बालभारतीच्या कार्यपुस्तिकेची पूर्तता करावी गुण १०

 

१०

               जलसुरक्षा विषयाचे एकूण मूल्यमापन

१००

प्राप्त श्रेणी अ/ब/क/ड पैकी एक


सत्रनिहाय जलसुरक्षा विषयाच्या मूल्यमापन नोंदी कराव्यात.
उपक्रम व प्रकल्प नोंदवही मूल्यमापन संदर्भात महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने निर्धारित केलेली जलसुरक्षा कार्यपुस्तिका (उपक्रम व प्रकल्प नोंदवही) शैक्षणिक वर्षाच्या शेवटी जमा करून घ्यावी.
उपरोक्तप्रमाणे एकूण १०० गुणांपैकी प्राप्त गुणांचे श्रेणीत रुपांतर करण्यात येईल.
अ, ब, क श्रेणी उत्तीर्णता तर ड श्रेणी अनुत्तीर्णता दर्शवेल.

श्रेणी तक्ता

प्राप्त गुण

श्रेणी

६० ते १००

४५ ते ५९

35 ते ४४

० ते ३४

'' श्रेणी प्राप्त विद्यार्थी अनुतीर्ण समजला जाईल.


इयत्ता दहावी जलसुरक्षा

जलसुरक्षा पाठ्यपुस्तक 👉 Download pdf 

नमुना सोडवलेली जलसुरक्षा (उपक्रम व प्रकल्प कार्यपुस्तिका) 👉 Download pdf

जलसुरक्षा नमुना उपक्रम 👉 Download pdf

जलसुरक्षा गुणदान तक्ता 👉 Download pdf


इयत्ता अकरावी जलसुरक्षा

जलसुरक्षा पाठ्यपुस्तक 👉 Download pdf 

नमुना सोडवलेली जलसुरक्षा (उपक्रम व प्रकल्प कार्यपुस्तिका) 👉 Download pdf

जलसुरक्षा नमुना उपक्रम 👉 Download pdf

जलसुरक्षा गुणदान तक्ता 👉 Download pdf

इयत्ता बारावी जलसुरक्षा

जलसुरक्षा पाठ्यपुस्तक 👉 Download pdf 

नमुना सोडवलेली जलसुरक्षा (उपक्रम व प्रकल्प कार्यपुस्तिका) 👉 Download pdf

जलसुरक्षा नमुना उपक्रम 👉 Download pdf

जलसुरक्षा गुणदान तक्ता 👉 Download pdf

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon