DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

इ ९ वी व १० वी आणि ११ वी व १२वी सुधारित विषय योजना व मूल्यमापन योजनेचा अंमलबजावणी बाबत

इ ९ वी व १० वी आणि ११ वी व १२ वी सुधारित विषय योजना व मूल्यमापन योजनेचा अंमलबजावणी बाबत

कला रसास्वाद हा विषय अनिवार्य होता ,त्याऐवजी जलसुरक्षा हा विषय अनिवार्य झाला व कला रसास्वाद हा विषय वैकल्पिक विषयांच्या गटात गेला ,वैकल्पिक विषय गटात आता संरक्षण शास्त्र ,स्काऊट/गाईड ,एन सी सी ,याबरोबरच कला रसास्वाद या विषयाची भर पडलेली आहे

    जलसुरक्षा हा विषय इ ९ वी ला २०२०/२१ या शैक्षणिक वर्षांपासून तर इ१० वी ला २०२१/२२ या शैक्षणिक वर्षांपासून लागू राहील
मार्गदर्शक व्हिडिओ पाहा

 

मित्रांनो खालिल दोन प्रश्न मंजुषा जलसुरक्षा,कार्यशिक्षण, समाजसेवा या विषया साठी नक्कीच दिशादर्शक ठरतील त्या आपल्या विद्यार्थ्या पर्यंत पाठवा
CLICK HERE
 


माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणमंडळ,
पुणे
क्र. रा.मं./संशोधन, पापुअ-ई/१०९९ पुणे-४११ ००४
दि. ०१/०३/२०२१
प्रति,
विभागीय सचिव, सर्व विभागीय मंडळे, सर्व विभाग.

विषय - इयत्ता ९वी ३ १०वी आणि इयत्ता ११वी व १२वी सुधारित विषय योजना व मूल्यमापन योजनेच्या अंमलबजावणीबाबत......

संदर्भ-१) शासन निर्णय क्र. सक्रीर्ण २०१९/प्र.क्र. (२४३-१९) एसडी-४, दि.०८ ऑगस्ट २०१९चे इ. ९वी, १०वी आणि इ.११वी, १२वी संदर्भातील दोन शासन निर्णय.
२) बालभारती कार्यालयाचे ह-/भाषा-भाशेतर/४०२०, दि.३०/१२/२०२०,
३) बालभारती कार्यालयाचे ह- / भाषा-भाशेतर/४०२१, दि.३१/१२/२०२०, ४) SCERT, पुणे कार्यालयाचे राशैसप्रपम/अविवि/दिव्यांग मूल्यमापन योजना/२०२०-२१/०९, दि.०१/०१/२०२१,
५) या कार्यालयाचे परिपत्रक क्र.रा.मं./संशोधन/पुनर्रचित अभ्यासक्रमः २०२०-२१/ दिव्यांग विद्यार्थी इ. ९वी व १०वी/४८८, दि.०९/०२/२०२१,
६) SCERT, पुणे कार्यालयाचे राशैलप्रपम/अविवि/विषय योजना परिपत्रक /२०२०- २१/६२५दि.१०/०२/२०२१,


आणि

महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,

पुणे ४११०३०

दि.१०.०२.२०२१

जा.क्र/ राशैसंप्रपम/अविवि / विषय योजना परिपत्रक / २०२०-२१/६२५ परिपन्नक

प्रति,

५. विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व),

२. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, (सर्व),

३. शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद (सर्व),

४. शिक्षण निरीक्षक (दक्षिण / उत्तर/पश्चिम) बृहन्मुंबई,

५. शिक्षण प्रमुख / शिक्षणाधिकारी / प्रशासनाधिकारी / महानगरपालिका (सर्व)

विषय - इयत्ता ९ वी व १० वी आणि इयत्ता ११ वी व १२ वी सुधारित विषय योजना व मूल्यमापन योजना

संदर्भ १) शासन निर्णय क्र. संकीर्ण २०१९/प्र.क्र. (२४३-१९) एसडी-४, दि.०८ ऑगस्ट, २०१९

२) शासन निर्णय क्र. संकीर्ण २०१९/प्र.क्र. (२४३-१९) एसडी-४, दि.०८ ऑगस्ट, २०१९

३) शासन निर्णय दि.०८.०८.२०१९ चे शुद्धिपत्रक, दि.११.११.२०१९.

या परिपत्रकान्वये आपणास कळविण्यात येते की, संदर्भ क्र.१ शासन निर्णयानुसार सन

२०११-२० पासून इयत्ता ९ र्व' व इयत्ता १० वी साठी तसेच संदर्भ क्र.२ शासन निर्णयानुसार सन २०१९- २० पासून इयत्ता ११ वी साठी व सन २०२०-२१ पासून १२ वी साठी सुधारित विषय योजना व मूल्यमापन योजना निश्चित करण्यात आलेली आहे.

 

जलसुरक्षा,कार्यशिक्षण, समाजसेवा व व्होकेशनल, दिव्यांग बाबत परिपत्रक 



CLICK HERE
 

ई ९ वी जल सुरक्षा मराठी माध्यम पुस्तक Download साठी या ओळीला स्पर्श करा 

हे हि वाचा 
इयत्ता दहावी साठी मूल्यमापन कार्यपद्धती बाबत SSC Board EXAM 20-21 Evaluation Result
SSC Board EXAM 20-21 Evaluation Result
इयत्ता दहावी साठी मूल्यमापन कार्यपद्धती बाबत

विषय निहाय गुणतक्ता नियमित विद्यार्थ्यांसाठी

विषय निहाय गुणतक्ता खाजगी विद्यार्थ्यासाठी

विद्यार्थी  निहाय तपशील/ गुण काही विषयासाठी प्रविष्ट पुनपरीक्षार्थी नियमित / खाजगी

विद्यार्थी निहाय तपशील गुण तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी


इ 10वी मूल्यमापन पद्धतीसाठी Excel सॉफ्टवेअर Software 

SSC  Examination Evaluation Excel sheet 2021 

वैशिष्ट्ये -

 SSC बोर्ड च्या डॅश बोर्ड मध्ये भरण्यासाठी उपयुक्त Excel शीट!
 9 वीच्या 100 गुणांचे रूपांतर 50 मध्ये आपोआप होते
 10 वी लेखी परीक्षेचे 80 गुणांचे रूपांतर 30 मध्ये आपोआप होते
 एकूण गुण आपोआप बेरीज होते
श्रेणी विषयांचे सुद्धा गुण भरून श्रेणी आपोआप निघते 
 एकूण गुण ,पास नापास,टक्केवारी रिझल्ट  आपोआप तयार होतो

Excel शीट Download करण्यासाठी खालील Click Here वर क्लीक करा.
डाउनलोड excel Sheet 

हे ही वाचा 

इयत्ता १० वी  च्या विद्यार्थ्यांना सरल प्रणालीत इ ९ वी मध्ये किती गुण भरले / मिळाले ते कसे चेक करावे ?

इयत्ता १० च्या परीक्षा – २०२१  कोरोना-१९ च्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आलेल्या आहेत इयत्तादहावीचे मूल्यमापन करण्यासाठी दहावी विधागीय मंडळाने एक संगणकीय प्रणाली विकसित केली आहे त्यामध्ये आपल्याला इयत्ता दहावीच्या  विद्यार्थ्यांचे गुण भरायचे आहेत इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कशा प्रकारे करायचे याचे परिपत्रक अगोदरच  बोर्डाकडून आपल्याला प्राप्त झाले आहे तुम्ही सदरील परिपत्रक वाचले नसतील तर खाली दिलेल्या लिंक वरून ते परिपत्रक वाचू शकता 

इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांचे ‘असे’ होणार मूल्यांकन

इ. ९ वीचा विषयनिहाय अंतिम निकाल १००  गुणांचे - ५० गुणात रूपांतर

इ. १० वीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन १०० गुणांचे – ३० गुणात रूपांतर

इ. १० वी चे अंतिम तोंडी/ प्रात्यक्षिक परीक्षाअंतर्गत - २० गुण 

या प्रमाणे आपल्याला गुणांचे मूल्यमापन करायचे आहे

     नववीचे १००  गुणाचे रूपांतर ५०  गुणांमध्ये करतेवेळेस सरल प्रणाली मध्ये नोंदवलेले गुण आणि आपण संगणक प्रणाली मध्ये  भरणार असलेले गुण हे दोन्ही सारखेच असले पाहिजे असे परिपत्रकात म्हंटले आहेआणि त्याची पडताळणी विविध पथकांद्वारे केली जाणार आहे.त्या मुळे गुण काळजीपूर्वक भरावे .

        लक्षात घ्या सरल प्रणालीत फक्त एकूण गुण बघता येतात आपल्याला विषयनिहाय गुण भरायचे आहेत. विषय निहाय गुण आपल्याला मागील वर्षीच्या निकाला वरून भरायचे आहेतसरल प्रणालीत भरलेले एकूण गुण व आपल्या वार्षिक निकालातील एकूण गुण सारखेच असले पाहिजे.कारण आपण भरलेले गुण हे सरल प्राणलीतील गुणांद्वारे पडताळणी केली जाणार आहे परिपत्रकानुसार !

त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम स्टुडंट पोर्टल वर जाऊन लॉगिन करायचे आहे 

लॉगिन करण्यासाठी Click Here 

अधिक माहिती साठी खालील व्हिडिओ बघा



हे ही वाचा 

'१७ नंबर ' च्या  निकालाचे काय ?  विद्यार्थ्याच्या अंतर्गत मूल्यमापनचा प्रश्न कायम ?

'१७ नंबर ' च्या निकालाचे काय ? 
विद्यार्थ्याच्या अंतर्गत मूल्यमापनचा प्रश्न कायम ?
    राज्य सरकारने दहावीची परीक्षा रद्द करून अंतर्गत मूल्यमापनावर परीक्षेचा निकाल जाहीर करण्याचा निर्णय घेतला असला तरी सतरा नंबरचा अर्ज भरून खाजगीरित्या परीक्षा देणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांच्या निकालाचे काय करणार हा प्रश्न निर्माण होणार आहे कोरोणाच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद असल्याने या विद्यार्थ्याचे कोणत्याही प्रकारचे अंतर्गत मूल्यमापन झाले नसल्याचे सांगितले जात आहे राज्य माध्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा दर वर्षी शेकडो  विद्यार्थी 17 नंबर चा अर्ज भरून परीक्षा देतात यंदा दहावी साठी पंचेवीस हजारच्या वर  तर बारावीसाठी बावीस हजार च्या वर विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे कोरोणाच्या संसर्गामुळे २०२०-२१ मध्ये शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय बहुतांश काळ बंद होती त्यामुळे सतरा नंबरचा अर्ज भरून परीक्षेसाठी प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचा निकाल कसा जाहीर करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे यंदा 17 नंबर चा अर्ज भरण्याची मुदत अनेकदा वाढविण्यात आली होती त्यामुळे खाजगीरीत्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत आणखी वाढ झाली असण्याची शक्यता आहे आर्थिक आणि इतर अडचणींमुळे नियमित शाळेत जाऊन शकणाऱ्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारे खासगी स्वरूपात परीक्षा देता येते परंतु यंदा त्यांची प्रात्यक्षिक परीक्षा झालेली नाही त्यामुळे त्यांचे कोणत्याच प्रकारचे मूल्यमापन झाले नसल्याचे त्याच्या निकालाचा प्रश्न सोडविण्यासाठी अशा विद्यार्थ्यांची कोणत्यातरी स्वरूपात त्यांना परीक्षा द्यावीच लागणार आहे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा होऊ शकते असे अभ्यासकांचे मत व्यक्त केले आहे सतरा नंबरचा अर्ज भरून खाजगीरित्या दहावी किंवा बारावी परीक्षा देण्यासाठी हे विद्यार्थी शाळेची निवड करतात या विद्यार्थ्यांचे शाळेतील इतर विद्यार्थ्यांप्रमाणे अंतर्गत मूल्यमापन किंवा प्रात्यक्षिक परीक्षांचे गुण ग्राह्य धरले जातात मात्र कोरोणाच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद होत्या अशा परिस्थितीत या विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनाच्या प्रक्रियेत सरकारने काही विचार केला आहे का कोणते पर्याय असतील हे सांगणे कठीण आहे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने याबाबत बोलणे योग्य ठरणार नाही बारावीसाठी खाजगीरित्या प्रविष्ट होणारे विद्यार्थी राज्य सरकारने बारावी परीक्षेबाबत अजून कोणताही निर्णय घेतला नसून केवळ परीक्षा पुढे ढकलली आहे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून जूनच्या पहिल्या आठवड्यात याबाबत निर्णय घेण्यात येईल त्यानंतर राज्य सरकार या निर्णयाचे अनुकरण करून बारावीच्या परीक्षा बाबत निर्णय घेईल हा निर्णय घेताना दहावी प्रमाणे बारावीच्या परीक्षेला सुमारे बावीस हजार विद्यार्थी सतरा नंबरचा अर्ज भरून खाजगीरित्या प्रविष्ट होतात ही संख्या महाराष्ट्रातून सी बी एस ई परीक्षा बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी एवढी आहे त्यामुळे या विद्यार्थ्याकडे सरकारने दुर्लक्ष करू नये अशी मागणी सर्व स्तरातून पुढे आली आहे

हे ही वाचा 
राज्यातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातील उन्हाळी सुट्ट्या बाबत सन २०२१-२२ वाचण्यासाठी या ओळीला स्पर्श करा 

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon