पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक / शिक्षक पदभरतीबाबत उमेदवारांसाठी स्वप्रमाणपत्र नव्याने नोंद करणे / पूर्वीच्या
स्वप्रमाणपत्रामध्ये दुरुस्त्या
करण्याबाबतच्या सूचना ( दुसरा टप्पा )
(TAIT - २०२२)
दिनांक १०/०३/२०२५
━━━━━━━━━━━━━
━━━━━━━━━━━━━
१) पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक / शिक्षक पदभरतीबाबत उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्याबाबतच्या पवित्र पोर्टलवर यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या दिनांक १/०९/२०२३ च्या दोन सूचना तसेच ४/०९/२०२३, १४/०९/२०२३, १८/०९/२०२३, २१/०९/२०२३, २९/०९/२०२३, ०१/१०/२०२३ इत्यादी सूचनांचे अवलोकन करावे. सदर सूचना योग्य त्या फेरफारांसह दुसऱ्या टप्प्यातील (TAIT-२०२२) स्वप्रमाणपत्र नव्याने नोंद करणे / पूर्वीच्या स्वप्रमाणपत्रामध्ये दुरुस्त्या करण्यासाठी लागू राहतील.
२) शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२२ मधील प्राप्त गुणांच्या आधारे, शासन निर्णय ०७/०२/२०१९, १०/११/२०२२ व इतर आनुषंगिक शासन निर्णयांतील तरतुदींनुसार, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनांच्या शाळांतील शिक्षण सेवक / शिक्षक या रिक्त पदांवर टप्पा २ अंतर्गत भरती करण्यात येणार आहे.
३) शिक्षकांची सदर भरती ही त्या त्या व्यवस्थापनांमध्ये रिक्त असलेली पदे, इयत्तांचा गट, विषय, अध्यापनाचे माध्यम, आरक्षण (समांतर आरक्षणासह), उमेदवारांनी शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणीमध्ये प्राप्त केलेले गुण व त्यांनी पोर्टलवर लॉक केलेले प्राधान्यक्रम इत्यादी बाबी एकत्रित विचारात घेऊन गुणवत्तेनुसार पवित्र प्रणालीमार्फत शिफारस होणार आहे.
४) स्थानिक स्वराज्य संस्थांकडून रिक्त मुलाखतीशिवाय या पर्यायातील असतील. एका उमेदवाराची (११ या प्रमाणात पदांची भरती ही मुख्यत्वे यासाठी एका रिक्त पदासाठी नियुक्तीसाठी वरील क्रमांक 3 मध्ये नमूद बाबी विचारात घेऊन पवित्र प्रणालीमार्फत त्या त्या व्यवस्थापनाकडे शिफारस होणार आहे.
५) खाजगी शैक्षणिक संस्थांकडून रिक्त पदांच्या भरतीबाबत पवित्र पोर्टलवर प्रकाशित होणाऱ्या जाहिराती या मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन पर्यायातील असतील. यांपैकी कोणताही एक पर्याय निवडण्याचे स्वातंत्र्य खाजगी शैक्षणिक संस्थेस असेल. मुलाखतीशिवाय या पर्यायासाठी एका रिक्त पदासाठी एका उमेदवाराची (१:१ या प्रमाणात नियुक्तीसाठी पोर्टलमार्फत शिफारस होणार आहे. मुलाखतीसह या पर्यायासाठी एका रिक्त पदासाठी १० उमेदवारांची (उमेदवार उपलब्धतेनुसार 1:10 या प्रमाणात) मुलाखतीसाठी पोर्टलमार्फत शिफारस होणार आहे.
६) स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये नोंदणी केली नसल्यास संबंधित उमेदवारांनी स्वतःची नोंदणी (Registration) करणे आवश्यक आहे. ही नोंदणी करण्यासाठी 'Register Here' येथे क्लिक करून तेथे आपला टेट २०२२ चाचणीचा रोल नंबर व रजिस्ट्रेशन नंबर नोंद करावा. यासाठी टेट २०२२ परीक्षा अर्जामध्ये नोंद केलेला मोबाईल क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे. त्यानंतर उमेदवारांनी स्वतःचा पासवर्ड तयार करावा.. उमेदवारांचा टेट २०२२ चा रोल नंबर हाच त्यांचा लॉग-इन-आय-डी असेल.
७) पहिल्या टप्प्यामध्ये नोंदणी केलेल्या उमेदवारांनी लॉग-इन करिता यापूर्वी तयार केलेला पासवर्ड वापरावा. पासवर्ड विसरला असल्यास 'Forgot Password' या सुविधेचा वापर करून Password तयार करावा.
८) ज्या उमेदवारांना त्यांच्या मोबाईल क्रमांकामध्ये काही कारणांस्तव बदल करावयाचा असल्यास, नजीकच्या शिक्षणाधिकारी कार्यालयात जाऊन,
वैध ओळखपत्राच्या आधारे स्वतःची ओळख पटवून, मोबाईल क्रमांकामध्ये बदल करता येईल.
९) पवित्र पोर्टलवरील नोंदणी (रजिस्ट्रेशन) व स्वप्रमाणपत्र भरण्याची प्रक्रिया उमेदवाराने स्वतः करणे आवश्यक आहे.
१०) उमेदवारांनी पवित्र प्रणाली व पदभरतीशी निगडित असलेल्या विविध शासन निर्णयांचे काळजीपूर्वक वाचन करून, स्वप्रमाणपत्रातील माहिती भरावी.
११) उमेदवारांना स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी दिनांक ११.०३.२०२५ ते दिनांक २०.०३.२०२५ पर्यंत मुदत देण्यात येत आहे.
१२) स्वप्रमाणपत्र पूर्ण करताना महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) मधील उमेदवाराच्या नावामध्ये तफावत येत असल्यास उमेदवारांना त्यांच्या लॉग-इनवर 'Request for change in data' या मेन्यूअंतर्गत सुविधा देण्यात आलेली आहे. या सुविधेचा वापर करून उमेदवारांनी निवड केलेल्या शिक्षणाधिकारी कार्यालयात जाऊन योग्य तो बदल करून घेता येईल.
१३) नमूद केलेल्या मुदतीत जे उमेदवार स्वप्रमाणपत्र प्रमाणित करणार नाहीत, ते उमेदवार या दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या शिक्षण सेवक / शिक्षक पदभरतीच्या पुढील प्रक्रियेसाठी पात्र ठरणार नाहीत.
१४) शासन निर्णय दिनांक २७/०२/२०२४ अन्वये जारी करण्यात आलेल्या आदेशांच्या अनुषंगाने अराखीव (खुला) अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) यांतून स्वप्रमाणपत्र सादर केलेल्या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गातील (SEBC) आरक्षणाचा लाभ घ्यावयाचा असल्यास त्याबाबतचा योग्य तो बदल करणे आवश्यक राहील.
१५) काही उमेदवारांना त्यांच्याकडील कुणबी नोंदीच्या आधारे इतर मागासवर्गाचे जातप्रमाणपत्र मिळाले आहे, त्यास अनुसरून सामान्य प्रशासन विभागाचे पत्र दिनांक २८/०५/२०२४ अन्वये अराखीव (खुला) अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) यांतून स्वप्रमाणपत्र सादर केलेल्या उमेदवारांना इतर मागास वर्ग (OBC) या प्रवर्गातील आरक्षणाचा लाभघ्यावयाचा असल्यास त्याबाबतचा योग्य तो बदल करणे आवश्यक राहील.
१६) सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग (SEBC) या प्रवर्गात मोडणाऱ्या उमेदवारांना पूर्वी देय असलेला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) या प्रवर्गाचा लाभ यापूढे अनुज्ञेय नाही. सबब आरक्षण धोरणातील बदलांमुळे यापुढील नवीन जाहिरातींच्या वेळी उपरोक्त नमूद उमेदवारांना त्यांचा योग्य तो प्रवर्ग निवडण्यासाठी सुविधा देण्यात आलेली आहे. त्यामुळे वर नमूद अ.क्र. १४, १५ प्रमाणे योग्य तो बदल करावा, अन्यथा त्यास उमेदवार स्वतः जबाबदार राहील.
१७) स्वप्रमाणपत्रामधील माहिती नव्याने भरणे किंवा यापूर्वी भरलेली माहिती दुरुस्त करणे म्हणजे उमेदवारांना नियुक्तीच्या शिफारशीबाबतचा पूर्वलक्षी प्रभाव कोणत्याही परिस्थितीत मिळणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
१८) उमेदवारांनी स्वप्रमाणपत्रामध्ये यापूर्वी नोंदविलेल्या समांतर आरक्षणाच्या नोंदीमध्ये आता उमेदवारांना कोणताही बदल करता येणार नाही. कारण पहिल्या टप्प्यातील कट ऑफ गुण प्रसिद्ध झाले आहेत.
१९) उमेदवाराची यापूर्वी कोणत्याही आस्थापनेवर समांतर आरक्षणातील माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त यांमधून निवड झाली असल्यास, अशा उमेदवारांना पुनश्च या समांतर आरक्षणाचा लाभ अनुज्ञेय असणार नाही. त्यामुळे लाभ घेतलेल्या उमेदवारांनी संबंधित समांतर आरक्षणाच्या पर्यायासमोर 'NO' अशी नोंद करणे आवश्यक आहे. जेणेकरून संबंधित
Page 4 of 6
उमेदवाराचा त्याच्या स्वतःच्या सामाजिक प्रवर्गातून किंवा खुल्या प्रवर्गातून गुणवत्तेनुसार शिफारशीबाबत विचार होईल.
२०) अर्जात म्हणजेच स्वप्रमाणपत्रामध्ये खोटी माहिती देणे किंवा खरी माहिती दडवून ठेवणे किंवा त्यात अनधिकृतपणे खाडाखोड करणे किंवा खाडाखोड केलेले अथवा बनावट दाखले सादर करणे किंवा विहित केलेल्या अर्हतेच्या अटी पूर्ण न करणे किंवा विहित केलेल्या अर्हतेच्या अटी विहित कालावधीमध्ये पूर्ण न करणे किंवा विहित मुदतील अर्हता धारण करीत नसतानाही उत्तीर्णतेची चुकीची तारीख नमूद करणे अथवा गैरवर्तणूक करणारा उमेदवार कोणत्याही टप्प्यावर निवडीसाठी शिफारस होण्यास अथवा निवड होण्यास अपात्र ठरेल आणि किंवा फौजदारी कारवाईसह इतर योग्य त्या शिक्षेस पात्र ठरेल.
२१) नव्याने स्वप्रमाणपत्रामध्ये माहिती भरणाऱ्या उमेदवारांना सूचित करण्यात येते की, कोणत्याही कागदपत्रे / प्रमाणपत्र (वर सूचना क्रमांक १४ व १५ मध्ये नमूद प्रवर्ग वगळून) दिनांक ३०/०९/२०२३ पूर्वीचे असणे आवश्यक आहे.
२२) उमेदवारांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेची प्रमाणपत्रे टेट २०२२ साठी अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक म्हणजेच दिनांक १२/०२/२०२३ पूर्वीची असणे आवश्यक आहे.
२३) अध्यापक विद्यालयातील शिक्षक पदांकरिता व्यावसायिक अर्हतेमधील पदव्युत्तरपदवी परीक्षा (M.Ed.) उत्तीर्णतेची नोंद करण्याची सुविधा देण्यात येत आहे. सदरची व्यावसायिक अर्हता टेट २०२२ साठी अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक म्हणजेच दिनांक १२/०२/२०२३ पूर्वीची असणे आवश्यक आहे.
२४) टीईटी सीटीईटी या शिक्षक पात्रता परीक्षेतील (इयत्ता 1 ली ते 8 वी करिता) कमाल प्राप्त गुणांची नोंद उमेदवारांनी यापूर्वी स्वप्रमाणत्रात केली
नसल्यास अशा उमेदवारांना कमाल गुणांची नोंद स्वप्रमाणपत्रात करता येईल.
२५) पूर्वी स्वप्रमाणपत्र नोंद केलेल्या उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र दुरुस्तीसाठी अप्रमाणित (Uncertify) केले असल्यास, स्वप्रमाणपत्रामध्ये कोणताही बदल केला असो अथवा नसो अशा उमेदवारांनी त्यांचे स्वप्रमाणपत्र प्रमाणित (Self-certify) करणे अनिवार्य आहे, अन्यथा स्वप्रमाणपत्र प्रमाणित (Self-certify) न करणारे उमेदवार पोर्टलवरील कोणत्याही प्रक्रियेसाठी पात्र राहणार नाहीत, याची उमेदवारांनी गांभीर्याने नोंद घ्यावी.
Also Read 👇
दि. १९/०२/२०२५
प्रेस नोट
पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक/शिक्षक पदभरती दुसऱ्या टप्यातील जाहिरातीच्या कार्यवाहीस मुदतवाढीबाबत.
दुसऱ्या टप्प्यातील शिक्षकांच्या रिक्त पदांच्या जाहिरातीसाठी दिनांक २०/०१/२०२५ रोजी पोर्टलवर सर्वच व्यवस्थापनांना सुविधा देण्यात आली आहे.
आज अखेर राज्यातील १२१६ व्यवस्थापनांनी विविध माध्यमांसाठी एकूण १३३७ जाहिरातींची प्रक्रिया सुरू केली आहे.
दिनांक २०/०१/२०२५ ते २०/०२/२०२५ पर्यंत सुविधा देण्यात आलेली आहे. परंतु, अद्यापही बऱ्याच व्यवस्थापनांना जाहिरात देण्यास अजून काही कालावधीची आवश्यकता असल्याने पवित्र पोर्टलवर जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी दिनांक २८/०२/२०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.
राज्यातील सर्वच शैक्षणिक व्यवस्थापनांना आवाहन करण्यात येते की, आपल्या अधिनस्त शाळातील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्याची कार्यवाही करावी. पवित्र पोर्टलवर जाहिरात संकेतस्थळावर भेट द्यावी. देण्यासाठी
LINK
या
शैक्षणिक संस्थांना पदभरतीबाबत जाहिरात देण्यासाठी काही अडचणी असल्यास edupavitra2022@gmail.com या ईमेलवर संपर्क साधता येईल.
Also Read 👇
दि. ०६/०२/२०२५
प्रेस नोट
पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक/शिक्षक पदभरती दुसऱ्या टप्प्यातील जाहिरातीच्या कार्यवाही बाबत (TAIT २०२२)
महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र पोर्टल या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षण सेवक/शिक्षक पदभरतीसाठी "शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२२" चे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले होते.
सदर ऑनलाईन चाचणी दिनांक २२ फेब्रुवारी ते ३ मार्च २०२३ या कालावधीमध्ये घेण्यात आली. या चाचणीसाठी एकूण २,३९,७३० उमेदवारांनी नोंदणी केली होती, त्यापैकी २,१६,४४३ उमेदवार चाचणीस प्रविष्ट झाले. त्यापैकी १,६३,०६१ उमेदवारांनी स्व-प्रमाणपत्र पूर्ण केले आहेत.
"शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२२" मधील प्राप्त गुणांच्या आधारे राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांतील इयता १ ली ते १२ वीकरिता शिक्षण सेवक/शिक्षक या रिक्त पदांची भरती करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यातील जानेवारी २०२४ मध्ये प्राप्त जाहिरातीनुसार २१६७८ रिक्त पदांच्या पदभरतीची कार्यवाही पूर्ण झाली आहे.
आता टप्पा २ अंतर्गत शिक्षकांच्या रिक्त पदांच्या जाहिराती प्रसिद्ध (Publish) करण्यासाठी दिनांक २०/०१/२०२५ पासून पोर्टलवर सर्वच व्यवस्थापनांना सुविधा देण्यात आली आहे. याबाबत मा. आयुक्त शिक्षण, महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दिनांक ३१/०१/२०२५ रोजी पदभरतीबाबतचा आढावा घेतला असता, अद्यापही स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी शैक्षणिक व्यवस्थापनांकडून शिक्षकांच्या पदभरतीबाबत पोर्टलवर जाहिराती अल्प प्रमाणात प्राप्त झाल्या आहेत.
राज्यातील सर्वच शैक्षणिक व्यवस्थापनांना आवाहन करण्यात येते की, आपल्या अधिनस्त शाळातील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्याची कार्यवाही करावी. पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्यासाठी
LINK
संकेतस्थळावर भेट द्यावी. या सदर जाहिरातीसाठी पवित्र पोर्टलवर दिनांक २०/०२/२०२५ पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
शैक्षणिक संस्थांना पदभरतीबाबत जाहिरात देण्यासाठी काही अडचणी असल्यास edupavitra2022@gmail.com या ईमेलवर संपर्क साधावा.
पवित्र पोर्टल शिक्षक भरती महत्त्वपूर्ण सूचना
व्यवस्थापनांसाठी सूचना
स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शैक्षणिक संस्थांमधील रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवरील जाहिरातविषयक सूचना
दि २०/०१/२०२५ च्या अद्यावत सूचना वाचण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा
शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात २० जानेवारी २०२५ पासून पवित्र पोर्टल सुरू
शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात २० जानेवारी २०२५ पासून पवित्र पोर्टल सुरू
जाणून घ्या नोंदणी करण्याची प्रक्रिया
पवित्र पोर्टलवर नोंदणी करण्याची प्रक्रिया
Step-by-Step Guide
बीएड धारक आणि शिक्षक होण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी सरकारी नोकरीची आणखी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. शिक्षक भरतीच्या पहिल्या टप्प्यानंतर आता दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे.
दिनांक २० जानेवारी २०२५ पासून पवित्र पोर्टल पुन्हा सुरू* होत असून, पहिल्या टप्प्यात भरती होऊ न शकलेल्या उमेदवारांसाठी आता शिक्षक होण्याची आणखी एक संधी उपलब्ध आहे.
जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका शाळांसह खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरली जाणार आहेत. त्याचे नियोजन करण्यात आले असून दिनांक २० जानेवारी २०२५ पासून पवित्र पोर्टलवर रिक्त पदांच्या जाहिराती अपलोड करणे सुरु होईल. _म्हणजे आपण या भरतीस अर्ज करू शकणार आहात
पवित्र पोर्टलवर नोंदणी करण्याची प्रक्रिया Step-by-Step Guide
१. अधिकृत वेबसाइटला भेट द्या:
पवित्र पोर्टलच्या अधिकृत वेबसाइटवर जा: →
अधिकृत वेबसाईट ची लिंक खाली दिलेली आहे
२. नवीन खाते तयार करा (Register)
- होमपेजवर "नोंदणी करा" किंवा "Register" हा पर्याय निवडा.
- तुमचे संपूर्ण नाव, मोबाइल नंबर, आणि वैध ईमेल आयडी भरा.
- पासवर्ड तयार करा आणि तो सुरक्षित ठेवा.
- तुमचा मोबाइल नंबर आणि ईमेल आयडी सत्यापित करण्यासाठी आलेला ओटीपी (OTP) भरा.
३. लॉगिन करा:
- नोंदणी पूर्ण झाल्यावर तुमच्या क्रेडेन्शियल्सचा (ईमेल/मोबाइल आणि पासवर्ड) वापर करून पोर्टलवर लॉगिन करा.
४. प्रोफाईल भरा
- "माझी प्रोफाईल" किंवा "My Profile" या विभागात जा.
- आवश्यक माहिती भरा, जसे की,
- शैक्षणिक पात्रता (उदा. बीएड, डीएड इत्यादी).
- अनुभव (जर असेल तर).
- वैयक्तिक माहिती (जन्मतारीख, पत्ता, इ.).
- आवश्यक कागदपत्रे (उदा. आधार कार्ड, मार्कशीट, प्रमाणपत्रे) स्कॅन करून अपलोड करा.
५. शिक्षक भरतीसाठी अर्ज भरा:
- प्रोफाईल पूर्ण केल्यानंतर, "शिक्षक भरती अर्ज" किंवा "Recruitment Application" या पर्यायावर क्लिक करा.
- तुम्हाला ज्या जिल्ह्यासाठी अर्ज करायचा आहे, तो निवडा.
- इतर आवश्यक तपशील भरा.
६. फी भरून अर्ज सबमिट करा:
- अर्ज सबमिट करण्याआधी प्रक्रिया शुल्क भरावे लागेल.
- ऑनलाइन पेमेंटसाठी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI किंवा नेट बँकिंगचा वापर करा.
- यशस्वी पेमेंट झाल्यावर तुमचा अर्ज सबमिट करा.
७. अर्जाची प्रिंटआउट घ्या:
- अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंटआउट घ्या. भविष्यातील संदर्भासाठी हा अर्ज जपून ठेवा.
महत्त्वाच्या सूचना:
- फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची चूक होणार नाही याची खात्री करा.
- अर्ज भरण्याची शेवटची तारीख लक्षात ठेवा आणि वेळेत अर्ज सबमिट करा.
- आवश्यक कागदपत्रे स्कॅन करताना ती स्पष्ट असतील याची काळजी घ्या.
👉 शिक्षक भरती पवित्र पोर्टल दुसरा टप्पा नाव नोंदणीसाठी अर्ज करण्यासाठी लिंक या ओळीला स्पर्श करा 👈
हेही वाचाल 👇
महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय,
महाराष्ट्र राज्य,पुणे
जा.क्र.आस्था-क/प्राथ १०६/पदभरती-दु.ट./२०२५/242
दि. १५/०१/२०२५
विषय: पवित्र पोर्टलमार्फत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पदभरतीसाठी करावयाच्या कार्यवाहीबाबत.
संदर्भ :
१. शासन पत्र क्र. संकीर्ण-२०२४/प्र.क्र.६६१/टिएनटि-१, दि.१०.०९.२०२४
२. या कार्यालयाचे पत्र जा.क्र.५६७१, दि.१३.०९.२०२४
३. शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०२३/प्र.क्र.२४२/टिएनटि-१, दि.१४.०१.२०२५
४. या कार्यालयाचे पत्र जा.क्र.७२९६, दि.२९.११.२०२३
उपरोक्त विषयाबाबत कळविण्यात येते की, शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी-२०२२ नुसार पवित्र पोर्टलद्वारे पहिल्या टप्प्यातील पदभरतीची कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यातील पदभरतीकरिता शासन निर्णय दि.१०.११.२०२२ नुसार पुढील कार्यवाही करावयाची आहे. संदर्भ क्र.३ येथील शासन निर्णय दि.१४.०१.२०२५ नुसार पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक पदभरतीसाठीच्या ऑनलाईन कामाकरीता प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी व्यवस्थापनांना पोर्टलवर जाहिरात नोंद करण्याची सुविधा दि. २० जानेवारी, २०२५ रोजी सुरु करण्यात येणार आहे.
शासन पत्र दि.१०.०९.२०२४ अन्वये दुसऱ्या टप्प्यातील जिल्हा परिषदेकडी उर्वरित १० टक्के रिक्त पदे, पहिल्या फेरीतील अपात्र, गैरहजर, रुजू न झालेले उमेदवार, तेसच अन्य व्यवस्थापनातील रिक्त जागा, इ.बाबी विचारात घेऊन जाहिरात द्यावयाची आहे. त्यानुसार आपणांस दुसऱ्या टप्यातील पदभरती करिता या कार्यालयाचे पत्र दि.१३.०९.२०२४ अन्वये पुढील आवश्यक कार्यवाहीच्या सविस्तर सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, जिल्हा परिषदांकडील बिंदुनामावली विषयक माहितीचे प्रमाणपत्र या कार्यालयास उपलब्ध करुन देण्याचे कळविण्यात आले आहे. सदर माहिती तात्काळ या कार्यालयास सादर करण्यात यावी.
शिक्षक पदभरतीसाठी आपल्या अधिनस्त सर्व खाजगी शैक्षणिक संस्थांना बिंदुनामावली प्रमाणित करण्याबाबत या कार्यालयाचे पत्र दि.२९.११.२०२३ नुसार यापूर्वीच सविस्तर सूचनांद्वारे कळविण्यात आले आहे. पदभरतीची कार्यवाही तात्काळ करावयाची असल्याने आपल्या अधिनस्त सर्व खाजगी संस्थांना याबाबत सविस्तर सूचना देण्यात याव्यात. याबाबत आपणांस दि.१०.०१.२०२५ रोजी संस्थांची विभाग निहाय Excel Sheet पाठविण्यात आली आहे. सदर Excel Sheet अद्ययावत करावी व ज्या संस्थांची बिंदुनामावली तपासलेली नसेल त्यांची तात्काळ बिंदुनामावली तपासणीची कार्यवाही करावी. बिंदुनामावली प्रमाणित करण्याकरिता नोडल अधिकारी यांनी आवश्यकतेनुसार तात्काळ विशेष शिबिरांचे आयोजन करुन सर्व खाजगी शैक्षणिक संस्थांची बिंदुनामावली अद्ययावत करुन रिक्त पदे भरण्याकरिता सत्वर कार्यवाही करावी.
Circular pdf copy link
(सचिन्द्र प्रताप सिंह, भा.प्र.से.)
आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य, पुणे
प्रति,
१. विभागीय शिक्षण उपसंचालक, (सर्व) विभाग
२. शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), जिल्हा परिषदा सर्व
३. शिक्षणाधिकारी, महानगरपालिका (संबंधित)
४. शिक्षण निरिक्षक (पश्चिम/उत्तर/दक्षिण), बृहन्मुंबई
५. प्रशासन अधिकारी, म.न.पा./न.पा. (संबंधित)
Pavitra Portal Update
पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीसाठीच्या ऑनलाईन कामाकरीता प्रशासकीय मान्यता.
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांकः संकीर्ण- २०२३/प्र.क्र.२४२/टिएनटि-१ मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई
दिनांक: १४ जानेवारी, २०२५.
प्रस्तावना:-
संदर्भ क्र. २ येथील शासन पत्रान्वये पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक पदभरतीबाबतच्या ऑनलाईन कामासाठी किमान एक वर्ष कालावधीसाठी निविदा मागवून संस्थेची निवड करण्यास मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार आयुक्त (शिक्षण) यांचे कार्यालयाने संदर्भ क्र. ३ अन्वये सदर कामासाठी Anthology International Private Ltd. या सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या संस्थेची निवड करण्यात आली असून, या संस्थेशी करार करण्यास मान्यता देण्याबाबतचा तसेच संस्थेने नोंदविलेला दर रु. ७४.३४ लक्ष इतक्या खर्चास मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव शासनास सादर केला होता. पदभरतीची तातडी असल्याने आयुक्त (शिक्षण) कार्यालयाने Anthology International Private Ltd. या संस्थेशी एक वर्ष कालावधीचा करार केला व कामकाजास सुरुवात केली. या रकमेत पोर्टलचे विकसन, निर्मिती , बदल, कार्यान्वयन, देखभाल, मदत कक्ष, परवाना शुल्क इ. सर्व बाबींचा समावेश होता. दरम्यानच्या कालावधीत Anthology International Pvt. Ltd व Talisma Corporation Private Limited या दोन संस्थांमध्ये Assignment and Employee Transfer Agreement हा करार करण्यात आला व जून २०२४ पासून पवित्र पोर्टलचे सर्व ऑनलाईन कामकाज मनुष्यबळासह Talisma Corporation Private Limited या संस्थेकडे हस्तांतरित करण्यात आले. पदभरतीच्या एकूण कामकाजाच्या २० टक्के कामकाज Anthology International Pvt. Ltd या संस्थेने तर उर्वरित ८० टक्के कामकाज Talisma Corporation Private Limited या कंपनीने पूर्ण केले आहे. Anthology International Pvt. Ltd या कंपनीने त्यांनी केलेल्या कामापोटी रु. १८,५८,५००/- इतक्या रकमेचे देयक आयुक्त (शिक्षण) कार्यालयास सादर केले आहे. उर्वरित रु. ५५,७५,५००/- इतक्या रकमेचे देयक Talisma Corporation Private Limited यांचेकडून सादर होणे अपेक्षित आहे. कंपनीने पहिल्या टप्प्यातील भरतीचे काम अचुकपणे, वेळेवर व कोणत्याही तांत्रिक अडथळ्याशिवाय पूर्ण केल्यामुळे पहिल्या टप्प्यात १९,९८६ इतक्या उमेदवारांची नियुक्तीसाठी शिफारस करता आली. पहिल्या टप्प्यातील कामाच्या अनुषंगाने कंपनीने केलेले काम, कंपनीशी झालेला करारनामा व यासाठी झालेला खर्च यास कार्योत्तर प्रशासकीय मान्यता देणे आवश्यक असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे.
पहिल्या टप्प्यातील पदभरतीनंतरही शिक्षक संवर्गातील मोठ्या प्रमाणावर रिक्त असलेल्या जागा विचारात घेऊन संदर्भ क्र. ४ अन्वये शिक्षक पदभरतीचा दूसरा टप्पा राबविण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात आली आहे. यासाठी विविध शिक्षक संघटना व लोकप्रतिनिधी यांचेमार्फत सातत्याने विचारणा होत आहे. त्यामुळे पदभरतीची तातडी असल्याने व पहिल्या टप्प्यात Talisma Corporation Private Limited या कंपनीने उत्कृष्टरित्या पार पाडलेले कामकाज विचारात घेऊन याच कंपनीस एक वर्ष अथवा मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन प्रकारातील किमान एक जाहीरात यापैकी जे नंतर घडेल त्या कालावधीसाठी मुदतवाढ देणेबाबतचा प्रस्ताव संदर्भ क्र. ५ अन्वये शासनास सादर केला आहे. तसेच या कंपनीने वाटाघाटी अंती पहिल्या टप्प्यापेक्षा कमी खर्चात म्हणजे रु. ६८,८४,१२०/- (१८ टक्के जीएसटी सह) इतक्या रकमेत काम करण्यास सहमती दर्शविली असल्याचे देखील सदर पत्रान्वये स्पष्ट करण्यात आले आहे.
उपरोक्त दोन प्रस्तावांवर चर्चा करुन निर्णय घेण्याकरीता ई-गव्हर्नंस धोरणांतर्गत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने गठीत केलेल्या प्रकल्प अंमलबजावणी समितीची बैठक दि.२६.१२.२०२४ रोजी संपन्न झाली. सदर बैठकीत या दोन्ही प्रस्तावांवर सविस्तर चर्चा करण्यात येऊन त्यास मान्यता देण्याबाबतचा निर्णय एकमताने घेण्यात आला. प्रकल्प अंमलबजावणी समितीच्या निर्णयाच्या अनुषंगाने प्रस्तावांतर्गत कामासाठी प्रशासकीय मान्यतेचे आदेश निर्गमित करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.
शासन निर्णयः-
पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीच्या पहिल्या टप्प्याच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या ऑनलाईन कामकाजाच्या अनुषंगाने खालील बाबींना कार्योत्तर प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात येत आहे:-
अ) Anthology International Pvt. Ltd या संस्थेशी आयुक्त (शिक्षण) कार्यालयाने एक वर्ष कालावधीचा केलेला करार
ब) Anthology International Pvt. Ltd या संस्थेने पूर्ण केलेल्या २० टक्के कामकाजाच्या अनुषंगाने रु. १८,५८,५००/- (अक्षरी रुपये अठरा लक्ष अठ्ठावन्न हजार पाचशे फक्त) इतका खर्च.
क) Talisma Corporation Private Limited या संस्थेने पूर्ण केलेल्या ८० टक्के कामकाजाच्या अनुषंगाने रु. ५५,७५,५००/- (अक्षरी रुपये पंचावन्न लक्ष पंचाहत्तर हजार पाचशे फक्त) इतका खर्च.
०२. पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीच्या दूसऱ्या टप्प्याच्या ऑनलाईन कामकाजासाठी Talisma Corporation Private Limited या संस्थेस एक वर्ष अथवा मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन प्रकारातील किमान एक जाहीरात यापैकी जे नंतर घडेल त्या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यास मान्यता प्रदान करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे यासाठीचा खर्च रु. ६८,८४,१२०/- (अक्षरी रुपये अडूसष्ठ लाख चौऱ्याऐंशी हजार एकशे वीस फक्त) यास देखील मान्यता प्रदान करण्यात येत आहे. या मान्यतेच्या अनुषंगाने आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी सदर संस्थेशी उपरोक्त कालावधीसाठीचा करारनामा करावा. यात देखभाल, परवाना शुल्क, मदत कक्ष, आवश्यकतेनुसार करावयाचे बदल या बाबींचा व इतर सर्व अनुषंगिक बाबींचा समावेश असेल याची दक्षता घ्यावी.
०३. या प्रित्यर्थ झालेला व होणारा खर्च मागणी क्रमांक ई-२, २२०२ सर्वसाधारण शिक्षण, ८०- सर्वसाधारण पंचवार्षिक योजनांतर्गत योजना (०२) (५१) ई-गव्हर्नन्स कार्यक्रम (२२०२ एच४५४) ३१ सहाय्यक अनुदाने या लेखाशिर्षाखालील संबंधित वित्तीय वर्षात उपलब्ध तरतूदीमधून भागविण्यात यावा. यासाठी आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे यांना नियंत्रक अधिकारी व सहाय्यक संचालक, (लेखा) माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय, पुणे यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे.
०४. प्रस्तावांतर्गत कामाच्या अनुषंगाने सादर करण्यात आलेल्या व येणाऱ्या देयकांची छाननी करुन त्यास मान्यता देण्यासाठी आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे हे सक्षम प्राधिकारी असतील. अशी देयके मान्यतेसाठी शासनास सादर करण्यात येऊ नयेत.
०५. सदर शासन निर्णय संदर्भ क्र. १ येथील शासन निर्णयान्वये शालेय शिक्षण व क्रीडा विभागांतर्गत गठीत करण्यात आलेल्या प्रकल्प अंमलबजावणी समितीस प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार व संदर्भ क्र. ६ अन्वये सदर समितीने घेतलेल्या निर्णयानुसार निर्गमित करण्यात येत आहे.
०२. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२५०११४१५०७१७१२२१ असा आहे. सदरचा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
उप सचिव, महाराष्ट्र राज्य
Shikshak Bharti Second Phase
राज्यात होणार १५ हजार शिक्षकांची भरती
शालेय शिक्षण विभागाकडून दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरतीचा सरकारला प्रस्ताव
शासन निर्णयानुसार शालेय शिक्षण विभागातर्फे खासगी अनुदानित व जिल्हा परिषदांच्या शाळांमधील एकूण रिक्तपदांपैकी ८० टक्के शिक्षकांची दुसऱ्या टप्प्यातील पदभरती ३० जूनपूर्वी केली जाणार आहे. त्यादृष्टीने शालेय शिक्षण विभागाने जवळपास १४ ते १५ हजार शिक्षकांच्या भरतीसाठी परवानगी मागितली असून तसा प्रस्ताव सरकारकडे पाठविण्यात आला आहे.
झेडपी शाळांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांची संख्या पुरेशी आवश्यक असून आगामी काळात सेमी इंग्रजीचे वर्ग देखील या शाळांमध्ये सुरू करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे जिल्हा परिषदांमधील एकूण रिक्त पदांच्या ८० टक्के शिक्षकांची भरती आता दुसऱ्या टप्प्यात केली जाणार आहे.
दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू
सध्या पवित्र पोर्टलच्या दुसऱ्या टप्प्याचे काम सुरूअसून त्यासाठी देखील निविदा काढून नव्याने मान्यता किंवा पूर्वीच्याच मक्तेदाराला मुदतवाढ आवश्यक आहे. त्यासाठी शालेय शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला सरकारची मान्यता आवश्यक आहे.
'खासगी'तील भरतीवेळी 'शिक्षण'चा असेल प्रतिनिधी
खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलवरूनच एका पदासाठी दहा उमेदवार दिले जाणार आहेत. त्यांच्या मुलाखती घेऊन त्यातील एकाची निवड करण्याचा अधिकार संबंधित संस्थेला असणार आहे. पण, या मुलाखतीवेळी शिक्षण विभागाचा प्रतिनिधी उपस्थिती राहील, असे माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले.
कंत्राटी शिक्षक भरतीवर प्रश्नचिन्ह
राज्यातील जिल्हा परिषदांच्या १५ हजारांहून अधिक शाळांची पटसंख्या १ ते २० पर्यंत असून त्यातील पाच हजार शाळांची पटसंख्या १० पेक्षाही कमी आहे. त्या शाळांमध्ये डीएड, बीएडधारक तरुण-तरुणांना कंत्राटी तत्त्वावर घेण्यासंबंधीचा शासन निर्णय तत्कालीन सरकारने घेतला आहे. पण, आता हा निर्णय रद्द होण्याची शक्यता असल्याचे शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
Also Read
महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
दालन क्र. ४३९, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय,
मुंबई
क्रमांकः- संकीर्ण-२०२४/प्र.क्र. २१९८/टि.एन.टि-१
दिनांक:- २७ डिसेंबर, २०२४.
प्रति.
आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे
विषय :
२०२२ च्या शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्यामध्ये पहिल्या टप्प्याच्या अपात्र, गैरहजर, माजी सैनिक, आणि दहा टक्के कपात ही बाकी राहीलेली सर्व जागा दुसऱ्या टप्प्यामध्ये येणार असून दिनांक २३.१०.२०२३ पर्यत पहिल्या टप्प्यातील वयास पात्र (कोरोना काळातील २ वर्षाची शिथिलता सोबत) असलेले अभियोग्यता धारकांना दुसऱ्या टप्प्यामध्ये समाविष्ट करुन घेणेबाबत
Also read
हेही नक्की वाचा
संदर्भ :
१) श्रीम. मधुबाला महेंद्रकुमार यादव, युवा विद्यार्थी असोसिएशन, महाराष्ट्र राज्य यांचे दि. २०.१२.२०२४ चे निवेदन,
२) सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय क्रमांकः एसआरव्ही-
२०२४/प्र.क्र.३९/का. १२ (सेवा) दि. २०.१२.२०२४
उपरोक्त विषयाबाबतचे संदर्भ क्र.१ येथील निवेदन यासोबत जोडले आहे.
२. प्रस्तुत प्रकरणी उपरोक्त निवेदनान्वये केलेल्या मागणीच्या अनुषंगाने संदर्भ क्र.२ येथील शासन निर्णयातील तरतूदी विचारात घेऊन आपले स्वयंस्पष्ट अभिप्राय शासनास तात्काळ सादर करण्याची आपणास विनंती आहे.
सोबतः - वरीलप्रमाणे
Circular pdf download link
खालील शासन निर्णय नक्की वाचा
(शरद श्री. माकणे)
कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन
Also Read 👇
महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय,
मुंबई
क्रमांकः संकीर्ण २०२४/प्र.क्र.६६१/टिएनटि-१.
दिनांकः १० सप्टेंबर, २०२४.
प्रति,
आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे.
विषय : - पवित्र पोर्टलमार्फत खाजगी संस्थांसाठी मार्गदर्शक सूचना तसेच दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पदभरती करण्यासाठी नव्याने येणाऱ्या जाहिरातींसाठी एसईबीसी/इमाव या प्रवर्गातील आरक्षणाच्या लाभ तसेच १० टक्के रिक्त पदांकरीता कार्यवाही करणेबाबत..
संदर्भ - आपले पत्र क्र. आस्था-क/प्राथ-१०६/पदभरती/स्वप्रमाणपत्र / जाहिराती/ २०२४/४६३९, दि.२९.०७.२०२४.
महोदय,
उपरोक्त विषयाबाबतच्या आपल्या संदर्भीय पत्रास अनुसरुन आपणास पुढीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेतः-
१. बिंदुनामावलीतील त्रुटींबाबत सर्वच जिल्हा परिषदांकडून शहानिशा करणेबाबत मा. मंत्री महोदयांनी दिलेल्या निर्देशानुसार १० टक्के जागा राखून ठेवण्यात आल्या होत्या. याअनुषंगाने जिल्हा परिषदांचे नियुक्ती प्राधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडून बिंदुनामावली अद्ययावत असल्याबाबत तसेच यामध्ये कोणत्याही त्रूटी नसल्याबाबत शहानिशा करून १० टक्के रिक्त पदभरतीबाबत प्रमाणपत्र घेऊन दूसऱ्या टप्प्यातील भरतीमध्ये रिक्त १० टक्के पदभरतीचा समावेश करण्यात यावा.
२. भरतीप्रक्रियेमधील अपात्र, गैरहजर व रुजू न झालेल्या उमेदवारांमुळे रिक्त राहिलेली पदे उर्वरित उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार भरणे हा भरतीप्रक्रियेचा एक भाग आहे. यानुसार यापुढील सर्व भरती प्रक्रियेमध्ये अपात्र गैरहजर व रुजू न झालेल्या उमेदवारांमुळे रिक्त राहिलेली पदे उर्वरित उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार भरण्यात याव्यात. तसेच शासन निर्णय दि.१०.११.२०२२ अन्वये शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणीनंतर पदभरतीसाठी आवश्यकतेनुसार तीन महिन्यातून एकदा व्यवस्थापनाकडून पोर्टलवर जाहीराती घेण्यात येतील, अशी तरतूद करण्यात आलेली आहे. यानुसार आपण प्रस्तावित केल्यानुसार खाजगी शैक्षणिक संस्थांना जाहिरात देण्याची सुविधा देण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी. वाचा - खाजगी शाळा निवड प्रक्रिया या ओळीला स्पर्श करा
३. महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरीता अधिनियम, २०२४ राज्यात दि. २६.०२.२०२४ पासून लागू करण्यात आला आहे. ⏪ हा शासन निर्णय वाचण्या साठी या ओळीला स्पर्श करा याअनुषंगाने सामान्य प्रशासन विभागाने विविध शासन निर्णय व पत्रांद्वारे वेळोवळी दिलेले निर्देश व सूचना विचारात घेऊन, नवीन येणाऱ्या जाहिरातीमध्ये सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागास (एसईबीसी) या प्रवर्गाकरीता विहीत आरक्षण विचारात घेऊन पवित्र पोर्टलवर जाहिराती देणेबाबत सर्व नियुक्ती प्राधिकाऱ्यांना सूचना देण्यात याव्यात.
४. शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी, २०२२ अनुसार चालू शिक्षक भरतीमध्ये उमेदवारांनी त्यांच्या स्वप्रमाणपत्रामध्ये खुला व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असा प्रवर्ग नमूद केलेले उमेदवारांना सद्यस्थितीत सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागास (एसईबीसी) वर्गाकरीता असलेले आरक्षण व कुणबी नोंदीच्या आधारे इतर मागास प्रवर्गात येणारे आरक्षण प्राप्त होत आहे. यास्तव सदर उमेदवारांना यापुढील येणाऱ्या जाहीरातीमध्ये प्राप्त होणारे आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी स्वप्रमाणपत्रामध्ये बदल करण्याची संधी देण्यात यावी. तसेच शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी २०२२ च्या आधारे यापूर्वी स्वप्रमाणपत्रामध्ये शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेबाबतची माहिती उमेदवारांनी नोंद न केल्याने केवळ तांत्रिक चूकीमूळे उमेदवारांना त्यांनी अर्हता प्राप्त करुनही अशा उमेदवारांना विचारात घेण्यात आले नाही. यास्तव दि.१२.०२.२०२३ पूर्वी विहीत अर्हता प्राप्त असणाऱ्या सर्व उमेदवारांना यापुढील जाहीरातीमध्ये भाग घेण्याची संधी देण्याकरीता स्वप्रमाणपत्रामध्ये दुरुस्ती करण्याची संधी देण्यात यावी.
(द.छ.शिंदे)
कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन
Also Read 👇
महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय,
महाराष्ट्र राज्य,पुणे
जा.क्र.आस्था-क/प्राथ-१०६/पदभरती/२०२४ 5671
पदभरती प्राधान्य
दि.१३.०९.२०२४
विषय: पवित्र पोर्टलमार्फत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पदभरतीसाठी करावयाच्या कार्यवाहीबाबत
संदर्भ शासन पत्र क्रमांक संकीर्ण-२०२४/प्रक्र ६६१/टिएनटी-१ दिनांक १०/०९/२०२४
संदर्भीय पत्रान्वये पवित्र पोर्टलमार्फत दुसऱ्या टप्यातील शिक्षक पदभरतीबाबत शासनाकडून निर्देश प्राप्त आहेत, त्यानुसार शिक्षक पदभरतीबाबतची कार्यवाही करावयाची आहे. (प्रत संलग्न)
१. बिंदुनामावलीतील त्रुटीबाबत सर्वच जिल्हा परिषदांकडून शहानिशा करणेबाबत मा. मंत्री महोदयांनी दिलेल्या निर्देशानुसार १० टक्के जागा राखून ठेवण्यात आल्या होत्या. त्याअनुषंगाने जिल्हा परिषदांचे नियुक्ती प्राधिकारी यांनी बिंदुनामावली अद्ययावत असल्याबाबत तसेच यामध्ये कोणत्याही त्रुटी नसल्याबाबत शहानिशा करून तसे प्रमाणित करून १० टक्के रिक्त पदभरतीबाबत कार्यवाही करावयाची आहे. (प्रमाणपत्राचा नमुना सोबत जोडला आहे)
२. भरतीप्रक्रियेमधील अपात्र, गैरहजर व रूजू न झालेल्या उमेदवारांमुळे रिक्त राहिलेली पदे उर्वरित पात्र उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार भरणे हा भरतीप्रक्रियेचाच एक भाग आहे. यानुसार यापुढील सर्व भरती प्रक्रियेमध्ये अपात्र, गैरहजर व रूजू न झालेल्या उमेदवारांमुळे रिक्त राहिलेली पदे उर्वरित उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार भरण्यात येणार आहेत, त्यामुळे या पदांची देखील माहिती तयार ठेवावी, जेणेकरून सदर रिक्त पदे नव्याने येणा-या जाहिरातीच्या वेळी विचारात घेता येतील.
३. शासन निर्णय दि.१०/११/२०२२ मधील तरतुदीनुसार पोर्टलवर जाहिराती घेण्यात येणार आहेत. दुसऱ्या टप्यातील जाहिराती घेवून पदभरतीची कार्यवाही येणार असल्याने आपल्या अधिनस्थ शैक्षणिक संस्थांना याबाबत अद्ययावत बिंदुनामावलीनुसार रिक्त पदे तसेच गट व विषयनिहाय रिक्त पदांची माहिती तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात याव्यात. जाहिरातीची सुविधा दिल्यानंतर पोर्टलवर जाहिरात देण्याबाबत कळविण्यात सर्व शैक्षणिक संस्थांना कळविण्यात यावे.
अशी आहे निवडप्रक्रिया वाचा या ओळीला स्पर्श करा
४. महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गाकरीता अधिनियम, २०२४ राज्यात दिनांक २६/०२/२०२४ पासून लागू करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने सामान्य प्रशासन विभागाने विविध शासन निर्णय व पत्राद्वारे वेळोवेळी निर्देश दिलेले निर्देश व सूचना विचारात घेवून नवीन येणाऱ्या जाहिरातीमध्ये सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागास (एसईबीसी) या प्रवर्गाकरीता आरक्षण विचारात घेवून पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्याची कार्यवाही करण्यात यावी.
पवित्र पोर्टलमार्फत दुसऱ्या टप्प्यातील जाहिरातीची कार्यवाही करावयाची असल्याने, सदरची कार्यवाही तात्काळ पूर्ण करण्यात यावी व पवित्र पोर्टलवर जाहिरातीची सुविधा दिल्यानंतर तात्काळ त्यानुसार यापूर्वी जाहिरातीसाठी दिलेल्या निर्देशाप्रमाणे कार्यवाही करावी.
पुढील माहिती सर्वात अगोदर तुमच्या पर्यंत येण्यासाठी
⏬⏬⏬⏬⏬
आयुक्त (शिक्षण)
महाराष्ट्र राज्य, पुणे
प्रति,
१. विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व विभाग,
२. शिक्षणाधिकारी (प्राथमिक/ माध्यमिक), जिल्हा परिषद (सर्व)
३. शिक्षणाधिकारी, महानगरपालिका (संबंधित)
४. शिक्षण निरिक्षक, (पश्चिम/उतर/दक्षिण), बृहन्मुंबई
५. प्रशासन अधिकारी, मनपा/नप (संबंधित)
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon