DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Teacher Recruitment At District Level GR

Teacher Recruitment At District Level GR

Recruitment of teachers at division or district level by eliminating the loopholes in the prevailing teacher recruitment process
शिक्षक भरती विभाग जिल्हा स्तरावर

दिनांक: २० ऑगस्ट, २०२४

प्रस्तावनाः

सद्यस्थितीत राज्यातील शिक्षक भरती ही राज्यस्तरावरून शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी मधील प्राप्त गुणांच्या आधारे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व सर्वच व्यवस्थापनासाठी गुणवत्तेनुसार पवित्र पोर्टलमार्फत करण्यात येत आहे. परंतु शिक्षक पदभरतीनंतर शिक्षकांना वर्षानुवर्ष स्वतःचा जिल्हा सोडून अन्य जिल्हयात काम करावे लागते. तसेच वारंवार आंतरजिल्हा बदलीची मागणी शिक्षकांकडून होत असते. तसेच बदली झाल्यानंतर नवीन जिल्ह्यात शुन्य सेवाजेष्ठतेवर शिक्षकांना यावे लागते. यास्तव शिक्षकांना स्वतः च्या जिल्ह्यात नोकरीची संधी प्राप्त करुन देणे आवश्यक आहे. जेणेकरुन, विद्यार्थ्यांना स्वतःच्या भागातील परिसरातील शिक्षक उपलब्ध होऊन, शिक्षक अधिक क्षमतेने काम करतील व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यामध्ये शिक्षकांची निश्चितच मदत होईल, या सर्व बाबींचा विचार करता प्रचलित शिक्षक भरतीमधील त्रुटी दूर करुन जिल्हा वा विभाग स्तरावर शिक्षक भरती प्रक्रियेबाबतचा अभ्यास करुन शिक्षक भरतीची उचित कार्यपध्दती सूचविण्याकरीता एक अभ्यास गट नेमण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्याअनुषंगाने शासन पुढीलप्रमाणे निर्णय घेत आहे:

शासन निर्णयः

राज्यात जिल्हा वा विभाग स्तरावर शिक्षक भरतीची कार्यपध्दती सुनिश्चित करण्यासाठी आयुक्त (शिक्षण) यांचे अध्यक्षतेखाली पुढीलप्रमाणे अभ्यास गट गठीत करण्यात येत आहे:-

१. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे : अध्यक्ष

२ . उपसचिव (शिक्षक व शिक्षकेत्तर), शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई :- सदस्य

३. संबधित उपसचिव, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई :- सदस्य

४. संबधित उपसचिव, विधि व न्याय विभाग, मंत्रालय, मुंबई :- सदस्य

५. संबधित उपसचिव, ग्राम विकास व पंचायत राज विभाग, मंत्रालय, मुंबई :- सदस्य

६. शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे :- सदस्य

७. शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे :- सदस्य सचिव 

आयुक्त, शिक्षण यांना सदर अभ्यासगटात कामकाजाच्या आवश्यकतेनुसार इतर सदस्यांचा समावेश करण्याचे अधिकार असतील.

०२. समितीची कार्यकक्षा:- प्रचलित शिक्षक भरती प्रक्रियेमधील त्रूटी दूर करुन विभाग वा जिल्हा स्तरावर शिक्षक भरतीकरीता आयुक्त (शिक्षण) यांनी सूचविलेल्या पर्यायांचा अभ्यास करुन सुयोग्य कार्यपध्दतीची शिफारस करणे.

०३. कालावधी :- अभ्यास गटाने आपला अहवाल १ महिन्यात शासनास सादर करावा.

०४ खर्चासाठी तरतूद :- सदर अभ्यास गटाच्या सदस्याला कराव्या लागणाऱ्या प्रवासाचा खर्च त्यांच्या आस्थापनेच्या तरतुदीतून भागवावा.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या 🌐 👉www.maharashtra.gov.in 👈 या संकेतस्थळावर उपलब्ध

०५. करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२४०८२०१६१०२६८६२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(तुषार महाजन) 

उप सचिव, महाराष्ट्र राज्य


राज्यात शिक्षक भरतीमध्ये सुधारणा करण्याच्या अनुषंगाने अभ्यासगट गठीत करणेबाबत.

महाराष्ट्र शासन 

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग 

शासन निर्णय क्रमांकः संकीर्ण-२०२४/प्र.क्र.६३१/टिएनटि-१ मुंबई

दिनांक: २० ऑगस्ट, २०२४

शासन अधिसुचना, शा.शि. व क्रि.वि., क्र.सीईटी.२०१५/(प्र.क्र.१४९)/टिएनटि-१, दि.२२.०६.२०१७

वाचाः

१. २. शासन निर्णय, शा.शि. व क्रि.वि., क्र.सीईटी-२०१५/प्र.क्र.१४९/टीएनटी-१, दि.२३.०६.२०१७.

३. शासन निर्णय, शा.शि. व क्रि.वि., क्र. सीईटी-२०१५/प्र.क्र.१४९/टीएनटी-१, दि.०७.०२.२०१९.

४. शासन निर्णय, शा.शि. व क्रि.वि., क्र. संकीर्ण-२०२२/प्र.क्र.१०६/टिएनटि-१, दि.१०.११.२०२२. 

५. शासन निर्णय, शा.शि.व क्रि.वि., क्र.संकीर्ण-२०२३/प्र.क्र.५०९/टिएनटि-१, दि.१३.१०.२०२३.

Recruitment of teachers at division or district level by eliminating the loopholes in the prevailing teacher recruitment process

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon