DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Pavitra Portal Shikshak Bharti Update


Pavitra Portal Shikshak Bharti Update

पवित्र पोर्टल शिक्षक भरती महत्त्वपूर्ण सूचना
दि २०/०१/२०२५
व्यवस्थापनांसाठी सूचना
स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शैक्षणिक संस्थांमधील रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवरील जाहिरातविषयक सूचना

 ....... पुढे सविस्तर वाचण्यासाठी खालील ओळीला स्पर्श करा 👇



सूचना पत्र

सदर सूचना पत्र फक्त पवित्र पोर्टल शिक्षक पदभरती २०२२ अंतर्गत शिफारस झालेल्या उमेदवारांसाठी आहे. आस्थापना बदलून इतर ठिकाणी रिक्त पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचेच समायोजन केले जाईल.  

खुलासा

 ....... पुढे सविस्तर वाचण्यासाठी खालील ओळीला स्पर्श करा 👇

प्रेस नोट

दि.१४/०९/२०२४

पवित्र प्रणालीमार्फत निवडलेल्या सर्वच शिक्षण सेवक/शिक्षक यांना शिक्षण सेवक कालावधीमध्ये परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक असल्याच्या बातमीबाबत खुलासा

 ....... पुढे सविस्तर वाचण्यासाठी खालील ओळीला स्पर्श करा 👇



दिनांक ०७/०९/२०२४
व्यवस्थापनासाठी व उमेदवारासाठी महत्त्वपूर्ण सूचना
 ....... पुढे सविस्तर वाचण्यासाठी खालील ओळीला स्पर्श करा 👇


दिनांक ०१/०९/२०२४

शैक्षणिक संस्था/व्यवस्थापनांसाठी सूचना 'मुलाखतीसह' हा पर्याय निवडलेल्या खाजगी शैक्षणिक संस्थांच्या जाहिरातीतील रिक्त जागांसाठी उमेदवारांच्या मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठीथ शिफारशीबाबत ....... पुढे सविस्तर वाचण्यासाठी खालील ओळीला स्पर्श करा 👇

😊 हेही वाचाल

शिक्षक भरती होणारा आता जिल्हास्तरावर वाचण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा

Also Read 

शैक्षणिक संस्था/व्यवस्थापनांसाठी सूचना 'मुलाखतीसह' हा पर्याय निवडलेल्या खाजगी शैक्षणिक संस्थांच्या जाहिरातीतील रिक्त जागांसाठी उमेदवारांच्या मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारशीबाबत.

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२२ नुसार पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभरतीची कार्यवाही करण्यात येत आहे. मुलाखतीसह पदभरतीचा पर्याय दिलेल्या शैक्षणिक संस्थांना उमेदवारांचे मुलाखत व अध्यापन कौशल्य यांसाठी चाचणी परीक्षेतील गुणवत्तेनुसार सर्वसाधारण गुणवत्ता यादी दिनांक ०७/०८/२०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

"मुलाखत अध्यापन कौशल्य" यांसाठीची कार्यवाही व्यवस्थापनांकडून करण्यास दिनांक ०९/०८/२०२४ ते ३१/०८/२०२४ असा देण्यात आलेला कालावधी संपुष्टात आला आहे.

सदर मुलाखत व अध्यापन कौशल्यनंतर निवडलेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश निर्गमित करण्यापूर्वी, निवड प्रक्रियेतील प्रशासकीय कार्यवाही करण्यासाठी पोर्टलवरील आवश्यक नोंदी पूर्ण करणे आवश्यक आहे. यासाठी शैक्षणिक संस्था/व्यवस्थापनस्तरावरील मुलाखत व अध्यापन कौशल्यनंतर पोर्टलवर गुणदान, निवड, प्रतीक्षाधीन इत्यादी आवश्यक नोंदी करण्यासाठी दिनांक ०७/०९/२०२४ पर्यंत पोर्टलवर सुविधा सुरू राहील.

पवित्र पोर्टल वरील निवड प्रक्रियेची पूर्ण माहिती नोंद केल्यानंतरच, निवड केलेल्या उमेदवारांना संस्थास्तरावरून प्रत्यक्ष नियुक्त आदेश निर्गमित करता येतील.

"मुलाखतीसह" या प्रकारातील "मुलाखत व अध्यापन कौशल्य यांसाठीच्या नोंदी दिनांक ०७/०९/२०२४ नंतर व्यवस्थापनस्तरावरून करता येणार नाहीत याची नोंद घ्यावी.


दिनांक : १९/०८/२०२४

"मुलाखतीसह" पर्याय निवडलेल्या शैक्षणिक संस्था / व्यवस्थापन व संबंधित शाळेचे मुख्याध्यापक यांच्यासाठी सूचना

अ) शैक्षणिक संस्था/व्यवस्थापन यांचेसाठी सूचना

ब) शाळा मुख्याध्यापक यांचेसाठी सूचना



पुढील  Update माहितीसाठी समुहात सामील व्हा 



दिनांक १०/०८/२०२४

शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक

संपूर्ण शिक्षक पदभरती बाबत प्रसिद्धी पत्रक 

👇👇👇👇👇👇👇👇


👆👆👆👆👆👆👆👆

खाजगी शाळा व्यवस्थापनासाठी व उमेदवारासाठी सूचना 


Also Read 


दिनांक ०७/०८/२०२४

शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक

संपूर्ण शिक्षक पदभरती बाबत प्रसिद्धी पत्रक 

👇👇👇👇👇👇👇👇


👆👆👆👆👆👆👆👆

Also Read 

दिनांक ३०/०७/२०२४

शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक

संपूर्ण शिक्षक पदभरती बाबत प्रसिद्धी पत्रक 

👇👇👇👇👇👇👇👇


👆👆👆👆👆👆👆👆

Also Read 

उमेदवारांसाठी सूचना
दिनांक ३०/०७/२०२४

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) २०२२ नुसार पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीतील उर्वरित रिक्त पदांसाठी 'मुलाखतीशिवाय' या प्रकारातील उर्दू माध्यमातील रूपांतरित फेरीतील (Urdu Conversion Round) उमेदवारांच्या निवडीच्या शिफारशीबाबत सूचना.

Also Read 
महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय,
महाराष्ट्र राज्य, मध्यवती इमारत,पुणे

जा.क्र.आस्था-क/प्राथ १०६/पदभरती-उर्दू-रु.फे. / २०२४/4653

दि. ३०/०७/२०२४

प्रति,
१. आयुक्त, महानगरपालिका, (संबंधित), २. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदा (संबंधित),
३. शिक्षणाधिकारी (प्राथ/माध्य) (सर्व)/शिक्षण निरीक्षक (द/उ/प) बृहन्मुंबई ४. मुख्याधिकारी (संबंधित), (नगरपालिका/नगर परिषदा)

विषय :- शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT)-२०२२ "मुलाखतीशिवाय" शिक्षक पदभरतीचा विकल्प दिलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये "पवित्र प्रणाली" अंतर्गत उर्वरित उर्दू माध्यमाच्या रिक्त पदांच्या रुपांतरित फेरीतील (Converted Round) निवडयादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांच्या पडताळणीबाबत व पुढील आवश्यक कार्यवाहीबाबत.

Also Read 


दिनांक १२/०७/२०२४
शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक

"मुलाखतीसह" पदभरती हा पर्याय निवडलेल्या खाजगी शैक्षणिक संस्थांनी पोर्टलवर जाहिराती दिलेल्या आहेत, अशा संस्थांना जाहिरातीतील विषय व आरक्षण विचारात घेऊन मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी गुणवत्तेनुसार पात्र उमेदवार उपलब्ध होणार आहेत. Read more  पुढे अधिक वाचण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा

दिनांक १२/०७/२०२४ 
उमेदवारांसाठी प्राधान्यक्रमाबाबत सर्वसाधारण सूचना  

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२२ नुसार पवित्र पोर्टलमार्फत मुलाखतीशिवाय या प्रकाराच्या उर्दू माध्यमातील शिक्षक पदभरतीसाठीच्या जाहिरातीमधील रिक्त राहिलेल्या जागांसाठी प्राधान्यक्रम जनरेट व लॉक करण्याबाबत. Read more  पुढे अधिक वाचण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा

दिनांक ११/०७/२०२४

शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक

संपूर्ण शिक्षक पदभरती बाबत प्रसिद्धी पत्रक 

👇👇👇👇👇👇👇👇


👆👆👆👆👆👆👆👆

Also Read 

दिनांक २५/०६/२०२४

शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक

संपूर्ण शिक्षक पदभरती बाबत प्रसिद्धी पत्रक 

👇👇👇👇👇👇👇👇


👆👆👆👆👆👆👆👆

Also Read 


दिनांक २१/०६/२०२४

शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक

संपूर्ण शिक्षक पदभरती बाबत प्रसिद्धी पत्रक 

👇👇👇👇👇👇👇👇


👆👆👆👆👆👆👆👆

Also Read 

दिनांक १८ जून २०२४ 

शिक्षक पद भरती बाबत प्रसिद्धि पत्रक

संपूर्ण शिक्षक पदभरती बाबत प्रसिद्धी पत्रक 

👇👇👇👇👇👇👇👇


👆👆👆👆👆👆👆👆


Also Read 


दिनांक १७ जून २०२४ 

शिक्षक पद भरती बाबत प्रसिद्धि पत्रक

संपूर्ण शिक्षक पदभरती बाबत प्रसिद्धी पत्रक 

👇👇👇👇👇👇👇👇


👆👆👆👆👆👆👆👆


Also Read 

दिनांक १० जून २०२४ 

शिक्षक पदभरती बाबत महत्त्वपूर्ण प्रसिद्धीपत्रक
👇👇👇👇👇👇👇👇


👆👆👆👆👆👆👆👆

Also Read 
 

दिनांक ०७/०६/२०२४

शिक्षक पद भरतीबाबत प्रसिद्धीपत्रक

शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक

👇👇👇👇👇👇👇👇




Also Read 

दिनांक २६/०५/२०२४

उमेदवारांसाठी सूचना


शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक

👇👇👇👇👇👇👇👇




Also Read 




दिनांक २०/०५/२०२४

उमेदवारांसाठी सूचना

१.उमेदवारांना आपली माहिती

स्वप्रमाणित करण्यासाठी  स्पर्श करा  या संकेतस्थळावर भेट द्यावी लागेल. संकेत स्थलाला जोडले जाण्यासाठी 

फक्त या ओळीला स्पर्श करा


शिक्षक पद भरतीबाबत प्रसिद्धीपत्रक

शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक

👇👇👇👇👇👇👇👇




Also Read 


दिनांक १४/०५/२०२४

शिक्षक पद भरतीबाबत प्रसिद्धीपत्रक

शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक

👇👇👇👇👇👇👇👇




Also Read 

दिनांक २६/०४/२०२४

शिक्षक पद भरतीबाबत प्रसिद्धीपत्रक

दिनांक २५/०४/२०२४

शिक्षक पद भरतीबाबत प्रसिद्धीपत्रक


शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक

👇👇👇👇👇👇👇👇


Also Read 

दिनांक १९/०४/२०२४

शिक्षक पद भरतीबाबत प्रसिद्धीपत्रक
शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक

👇👇👇👇👇👇👇👇


Also Read 


दिनांक ०५/०४/२०२४

शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक

👇👇👇👇👇👇👇👇


Also Read 


हे ही वाचा 

दिनांक १४/०३/२०२४

शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक

👇👇👇👇👇👇👇👇


Also Read 

दिनांक २८/०२/२०२४

शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक

पवित्र पोर्टल शिक्षक भरतीसठी लागणारे कागदपत्रे खालील प्रमाणे

टिप :-पात्र उमेदवारांनी पुढिलप्रमाणे मूळ कागदपत्रे पडताळणीसाठी उपल्बध करून दयावी व एक संच झेरॉक्स आपल्या पासपोर्ट साईज फोटोसह सादर करणे आवश्यक राहील.

चेक लिस्ट

कागदपत्रांचा तपशिल



दिनांक २७/०२/२०२४

शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक

      पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2022 
मुलाखत व डेमो संदर्भात महत्वपूर्ण माहिती
👇👇👇👇👇👇👇👇


Also Read 👇

दिनांक १८/०२/२०२४

शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक

शंका समाधान

• शिक्षक पदभरतीसाठी उमेदवारांकडून प्राधान्यक्रम लॉक करून घेतल्यानंतर यंत्रणेकडील काम प्रगतीपथावर सुरू आहे. अनेक उमेदवारांना समान गुण असल्यामुळे समान गुण असल्यास प्राधान्यक्रम ठरविण्याच्या तरतुदी विचारात घेवून उमेदवारांचे योग्यक्रम तपासण्याची कार्यवाही पूर्ण झाली आहे.

• शिक्षक पदभरती प्रकरणी मा. न्यायालयाकडून एकतर्फी अंतरिम आदेश होणार नाहीत, याबाबत उचित दक्षता घेणेबाबतची विनंती मा. उच्च न्यायालयातील सर्व शासकीय अभियोक्ता यांना लेखी पत्राद्वारे करण्यात आलेली आहे.

• शिक्षक भरती आता महत्वाच्या टप्यावर पोहोचली असून पात्र अभियोग्यताधारकांना संस्था/जिल्हा परिषदेमधील नियुक्ती संदर्भात याद्या तयार करण्याचे संगणकीय कामकाज सध्या सुरू आहे. ही पूर्णपणे पारदर्शक व संगणकावर आधारित प्रक्रिया असून त्यामध्ये कोणताही मानवी हस्तक्षेप होणार नाही याची दक्षता घेण्यात आलेली आहे.

• असे असतानाही अभियोग्यताधारकांमधील काही स्वयंघोषित खोडसाळ व्यक्ती तसेच काही दलाल या प्रक्रियेबाबत अभियोग्यताधारकांमध्ये संभ्रम निर्माण करून त्यांची फसवणूक करण्याची शक्यता नाकारता येत नाही. अमुक जिल्हा परिषदेमध्ये नोकरी लावून देतो, अमुक संस्थेत भरती करुन देतो जवळच्या संस्थेत नोकरी देतो इत्यादी प्रकारे खोटी आश्वासने देवून फसवणूक होण्याची शक्यता काही अभियोग्यताधारकांनी व्यक्त केली आहे. याबाबींकडे सर्व अभियोग्यताधारकांनी दुर्लक्ष करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

• संगणकीय प्रणालीद्वारे आपोआप होणाऱ्या प्रक्रियेचे श्रेय घेवून काही मंडळी अशा प्रकारे फसवणूक करु शकतात. या सर्व बाबींना पायबंद घालण्याचा कसोशीने प्रयत्न करण्यात येत आहे. असे दलाल अथवा अन्य मंडळी कृत्य करीत असतील तर त्याचे टेलीफोन संभाषण अथवा फोटो इत्यादी पुरावे जतन करून ठेवावेत व अशा प्रकारे कोणी फसवणूक करत असेल तर संबंधित पोलीस ठाण्याकडे तातडीने फिर्याद दाखल करावी. अशी फिर्याद दाखल केल्यास प्रशासनाकडून देखील अशा तक्रारदारास पूर्ण सहकार्य केले जाईल.

• दरम्यान असा खोडसाळपणा करणाऱ्या व्यक्ती तसेच त्यांच्या संपर्कात असलेल्या व्यक्ती यांचेवर पोलीस विभागामार्फत स्वतंत्रपणे निगरणी ठेवणेत येत आहे.

• सदरची प्रक्रिया अत्यंत पारदर्शीपणे सुरू असून उमेदवारांनी शासनाच्या या पदभरती प्रक्रियेत कोणत्याही अफवांना बळी न पडता प्रशासनास सहकार्य करावे.

🔴शिक्षक भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे :-
TAIT 2022🔴

01) मो.न.
02) ईमेल आयडी
03) सही,पत्ता,जन्मतारीख
04) ओळख पत्र (आधार कार्ड/पॅनकार्ड/मतदान कार्ड/ड्रायव्हिंग लायसन्स)
05) निवड यादीतील- अनु क्रमांक
06) उमेदवाराच्या अर्जाची स्वप्रमाणित प्रत
07) जन्म दाखला/शाळा सोडल्याचा दाखला
08) SSC गुणपत्रक व प्रमाणपत्र
09) HSC गुणपत्रक व प्रमाणपत्र
10) पदवी गुणपत्रक व प्रमाणपत्र
11) पदव्युत्तर पदवी गुणपत्रक व प्रमाणपत्र
12) D.Ed/D.T.Ed गुणपत्रक व प्रमाणपत्र
13) B.Ed गुणपत्रक व प्रमाणपत्र
14) TET / CTET गुण व प्रमाणपत्र
15) TAIT 2022 परीक्षा गुणपत्रक किंवा TAIT 2022  merit list मधील आपले नाव असलेले page ची प्रिंट.
16) जात प्रमाणपत्र (Cast certificate)
17) जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity)
18) अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
19) लहान कुटुंब प्रतिज्ञापत्र/प्रमाणपत्र (Small Family Declaration)
20) MS-CIT प्रमाणपत्र
21) नावात बदल असल्यास (Marriage certificate/Affidavit/Gazette.)
22) महिला आरक्षण प्रमाणपत्र लागू असल्यास.
23) नॉन क्रिमीलिअर लागू असल्यास.
24) पेसा क्षेत्रातील असल्यास (ST फक्त) मुळ अधिवास ठिकाण प्रमाणपत्र
25) उमेदवार - खेळाडू,अनाथ,दिव्यांग, प्रकल्पग्रस्त/भूकंपग्रस्त, माजी सैनिक, अंशकालीन लागू असल्यास प्रमाणपत्र.

➡️तसेच निवड यादी लागल्यावर नाव असलेले page ची प्रिंट व लॉगिन ला संबंधित ZP/NP/MNP/संस्था यांचे recommendation letter असेल तर त्याची ही प्रिंट लागेल.


दिनांक १५/०२/२०२४

शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक

शंका समाधान

• पवित्र पोर्टलमार्फत करण्यात येत असलेली शिक्षक पदभरती ही शासनाच्या प्रचलित तरतुदीनुसार करण्यात येत आहे. याबाबत मा. न्यायालयामध्ये दाखल विविध याचिकांमध्ये देखील पदभरती शासनाच्या प्रचलित धोरणानुसार असल्यामुळे ती सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

• पात्र अभियोग्यताधारकाने पवित्र पोर्टलवर मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह अशा दोन प्रकारांपैकी कोणत्याही एका प्रकाराचे प्राधान्यक्रम लॉक केले असतील, तर उमेदवार पदभरतीसाठी त्या त्या लॉक केलेल्या प्राधान्यक्रमासाठी विचारात घेतला जाईल.

• काही अभियोग्यताधारक शिक्षक पदभरतीबाबत समाजमाध्यमातून वेगवेगळ्या प्रकारची चुकीची माहिती पसरवत आहेत, पात्र अभियोग्यताधारकांनी अशा चुकीच्या माहितीकडे दुर्लक्ष करावे. पवित्र पोर्टलवरील न्युज बुलेटिनच्या माध्यमातून पदभरतीबाबत योग्य ती माहिती प्रशासनाकडून देण्यात येत आहे.

• समाजमाध्यमावर (उदा., टेलीग्राम, व्हॉटसअॅप, युटयुब, इन्स्टाग्राम इत्यादी) चुकीची माहिती, स्वतःचे चुकीचे मत प्रदर्शित करुन पात्र अभियोग्यताधारकांमध्ये प्रक्षोभक/संभ्रम निर्माण/चिथावणी देणारे / उमेदवारांमध्ये नैराश्याची भावना निर्माण करणाऱ्या व त्यांचे समर्थन करणा-याविरुद्ध पोलीस विभागास निगराणी ठेवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

• पवित्र पोर्टलमार्फत होत असलेली शिक्षक पदभरती पारदर्शी पद्धतीने करण्यात येत आहे. सदरची पदभरती भविष्यात होऊ घातलेल्या सन २०२४ मधील लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी करण्याचा प्रशासन कसोशीने प्रयत्न करीत आहे.

• काही अपरिहार्य कारणास्तव सदरची पदभरती लोकसभा निवडणुकीपूर्वी पूर्ण न झाल्यास प्रचलित कार्यपद्धतीनुसार तो पुढे पूर्ण करण्यात येईल, यास्तव पात्र अभियोग्यताधारकांनी याबाबत अनावश्यक चिंता करू नये.

• तथापि, शासन निर्णय दिनांक १०/११/२०२२ मध्ये नमूद केल्यानुसार शिक्षक पदभरती विविध टण्यांमध्ये होत आहे. सध्या दिनांक १६ ऑक्टोबर, २०२३ ते २२ जानेवारी, २०२४ या कालावधीमध्ये पोर्टलवर आलेल्या जाहिरातीची कार्यवाही करण्यात येत आहे.

• दुसऱ्या टप्यामध्ये येणाऱ्या जाहिरातींवरील कार्यवाही भविष्यात करण्यात येईल. यास्तव पहिल्या टप्प्यामध्ये ज्या उमेदवारांनी स्वप्रमाणपत्रामध्ये चुकीची माहिती नोंद केल्यामुळे/स्वप्रमाणपत्र अपूर्ण ठेवल्यामुळे/विहित मुदतीत स्वप्रमाणपत्र प्रमाणित न केल्यामुळे अशा विविध प्रकारच्या कारणांमुळे या सध्याच्या पदभरती प्रक्रियेत सहभागी होता येत नाही, अशा अभियोग्यताधारकांना नव्याने येणाऱ्या जाहिरातीच्या दुसऱ्या टण्यासाठी स्वप्रमाणपत्र पूर्ण/दुरुस्त करण्याची संधी दिली जाईल, याची संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी,

• अभियोग्यताधारकांनी edupavitra2022@gmail.com या मदतकक्षाच्या ईमेलवर एकाच प्रकारचा मेल वारंवार अथवा एकाच विषयाचा ईमेल अनेक अभियोग्यताधारक करतात. यामुळे अभियोग्यताधारकांना योग्यवेळी मदत करता येत नाही. अभियोग्यताधारकांचे सर्वसाधारण मुढे असल्यास तसे कळवावे, जेणेकरून त्याचा न्युज बुलेटिनच्या माध्यमातून आवश्यक ती कार्यवाही करता येईल.

स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्याच्या कालावधीमध्ये तसेच प्राधान्यक्रम लॉक करण्याच्या कालावधीमध्ये मदतीची आवश्यकता असल्याने परिस्थितीनुरूप विविध समाजमाध्यमांवर आलेल्या संदेशास योग्य तो प्रतिसाद देण्यात आला आहे. तथापि, आता अधियोग्यताधारकांच्या स्तरावरील कार्यवाही पूर्ण झाल्यामुळे वैयक्तिक स्वरूपाचे संदेश पाठवू नयेत, अशा संदेशांची दखल घेतली जाणार नाही.

दिनांक 13/02/2024

शिक्षक पदभरतीबाबत तातडीची सूचना 

पवित्र पोर्टलवर दिनांक 05/02/2024 पासून प्रचलित शासन धोरण व निर्देशानुसार प्राधान्यक्रम नोंदवण्याची प्रक्रिया सुरळीतपणे सुरू असून आजपर्यंत 1,41,806 अभियोग्यताधारकांनी प्राधान्यक्रम जनरेट केले असून त्यापैकी 1,37,063 लॉक देखील केले आहेत.

दरम्यान मा. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे रीट याचिका क्र. 1606/2024 मध्ये आज सुनावणी झाली. त्यानंतर मा न्यायालयाने प्रचलित शासन धोरण व तरतुदीनुसारच कार्यवाही सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत तसेच प्राधान्यक्रम लॉक करण्याची प्रक्रिया दि. 14/02/2024 पर्यंत सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात येत आहे याची सर्व उमेदवारांनी व संबंधितांनी नोंद घ्यावी.

भरती प्रक्रियेला कोणताही विलंब होऊ नये, याकरता प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत.


दिनांक ११/०२/२०२४

शंका समाधान

शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक

• इ. ६ वी ते ८ वी व इ ९ वी ते १० वी या गटातील केवळ बी. कॉम. अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांना पदवीस्तरावर प्रचलित तरतुदीतील मुख्य विषय घेवून उत्तीर्ण नसल्याने असे उमेदवार पात्र ठरत नाहीत. बी.कॉम. सह अन्य अर्हता धारण करीत असतील तर त्या त्या अर्हतेनुसार पात्र प्राधान्यक्रम उपलब्ध होतील. उदा. १. बी.कॉम. अर्हतेनंतर एम.कॉम अर्हता धारण करीत असल्यास त्यांना पात्रतेनुसार इ ११ वी ते १२ वी चे प्राधान्यक्रम उपलब्ध होतील. २. असा उमेदवार बी. कॉम. अर्हतेसह डी.एड. असेल व टिईटी-१/सिटीईटी- १ असेल तर इ १ ली ते ५ वी चे प्राधान्यक्रम उपलब्ध होतील.

• इ. ६ वी ते ८ वी या गटातील पात्र उमेदवारांना इतिहास, भूगोल व सामाजिकशास्त्र यापैकी कोणत्याही विषयाचे प्राधान्यक्रम उपलब्ध होण्यासाठी पदवीस्तरावर मुख्य विषय म्हणून इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र व लोकप्रशासन हे मुख्य विषय असणारे उमेदवार पात्र राहतील.

• काही उमेदवारांना शासन निर्णय दिनांक २८/०३/२००६ नंतर जन्मलेल्या हयात अपत्यांची संख्या २ पेक्षा

अधिक (अपवाद दुसऱ्या अपत्याचे वेळी जुळे अथवा तिळे जन्म असल्यास) असल्याने असे उमेदवार

नोकरीसाठी पात्र नाहीत, यास्तव या प्रकारच्या उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट होत नाहीत. 
• स्थानिक स्वराज्य संस्था (इ.१ ली ते १२ वी) व खाजगी संस्थातील (इ.१ ली ते ८ वी) पदभरतीसाठी शासन निर्णय दि.०१/०१/२०१९, ०७/०२/२०१९, २५/०२/२०१९, १६/५/२०१९, १२/०६/२०१९, १०/११/२०२२ मधील तरतुदीनुसार गट व गटातील विषयासाठी व वयासाठी विचारात

घेण्यात आलेले आहे.

इ.१ ली ते इ ५

वी -इ.१२ मध्ये खुला प्रवर्ग-किमान ४५ टक्के / आरक्षित ४० टक्के

इ.६ वी ते

इ ८ वी- पदवीमध्ये खुला प्रवर्ग-किमान ४५ टक्के / आरक्षित ४० टक्के

इ. ९ वी ते १० वी -

पदवीमध्ये खुला व आरक्षित प्रवर्ग- किमान ५० टक्के

इ.११ वी ते १२ वी -पदव्युत्तर पदवीमध्ये खुला व आरक्षीत प्रवर्ग किमान ५० टक्के

वयोमर्यादा-शासन निर्णय दिनांक १०/११/२०२२ मधील तरतुदीनुसार जाहिरातीच्या दिनांकास म्हणजेच जाहिरात देण्याची सुविधा पोर्टलवर दिनांक १६/१०/२०२३ रोजी दिली आहे. यास्तव उमेदवाराचे वय दिनांक २३/१०/२०२३ रोजीचे विचारात घेण्यात आले आहे.

• खाजगी संस्थातील रिक्त पदासाठी ३.९ वी ते १० वी साठी पदवीस्तरावर उत्तीर्ण श्रेणी व इ ११ वी ते १२ वी साठी पदव्युत्तर पदवी स्तरावर किमान द्वितीय श्रेणी आवश्यक आहे, तसेच कमाल वयोमर्यादा लागू करण्यात आलेली नाही.

• उमेदवारास त्यांच्या स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केल्यानुसार मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन प्रकारचे प्राधान्यक्रम जनरेट होत आहेत. उमेदवार त्यांच्या सोईनुसार पसंतीक्रम नमूद करुन प्राधान्यक्रम लॉक करणार आहे. तथापि, उमेदवारास बंधनकारक सर्व प्राधान्यक्रम लॉक करणे बंधनकारक नाही. तसेच उमेदवार त्यांच्या सोईनुसार प्राधान्यक्रम लॉक करु शकतात.

• उमेदवारास सध्या आलेल्या जाहिरातीनुसार त्याच्या सोईचे पदे नसल्यास उमेदवार आता आलेले प्राधान्यक्रम लॉक केले नाही तरी उमेदवार यानंतर नव्याने जाहिराती आल्यास त्यास तो पात्र राहणार आहे.

• उमेदवाराने ज्या क्रमाने प्राधान्यक्रम नोंद केले त्या क्रमाने गुणवत्तेनुसार शिफारस केली जाते. उमेदवाराची ज्या प्राधान्यक्रमावर शिफारस होईल त्यानंतरच्या प्राधान्यक्रम विचारात घेतले जात नाही.

• उमेदवाराची मुलाखतीशिवाय या प्रकारातील ज्या गटात निवड झाली असेल तर तो गट वगळून त्यापेक्षा वरच्या गटासाठी खाजगी संस्थांना विचारात घेतले जाणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी दोन्ही प्रकारातील प्राधान्यक्रम लॉक केल्यास ते उमेदवाराच्या सोईचे होणार आहे.

• उमेदवारांना जनरेट झालेले प्राधान्यक्रम त्यांच्या स्वप्रमाणात नोंद केलेले माहितीनुसार होत आहेत, यास्तव उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट होत नसल्यास अथवा कमी/अधिक होत असल्यास उमेदवारांनी सर्वप्रथम नोंद केलेली माहिती तपासावी,

Also read 

Pavitra Portal Shikshak Bharti Update Preferences Generation And Lock

• पवित्र पोर्टलवर जाहिरातीतील रिक्त पदांचा तपशील 

• उमेदवारांनी पदनिहाय पसंतीक्रम नमूद करून दिलेल्या मुदतीत लॉक करणे आवश्यक आहे.

दि. ०५/०२/२०२४

प्रेस नोट 

पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक/शिक्षक पदभरती सन २०२२

• महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र पोर्टल या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षण सेवक/शिक्षक पदभरतीसाठी "शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२२" चे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले होते.

• सदर ऑनलाईन चाचणी दिनांक २२ फेब्रुवारी ते ३ मार्च २०२३ या कालावधीमध्ये घेण्यात आली. या चाचणीसाठी एकूण २,३९,७३० उमेदवारांनी नोंदणी केली होती, त्यापैकी २,१६,४४३ उमेदवार चाचणीस प्रविष्ट झाले.

पवित्र पोर्टलवर जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत एकत्रित जाहिराती 
लिंक :-👉  Link  या लिंकवरडाउनलोड करता येतील


"शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२२" मधील प्राप्त गुणांच्या आधारे राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांतील इयता १ ली ते १२ वीकरिता शिक्षण सेवक/शिक्षक या रिक्त पदांची भरती करण्यात येत आहे. सदर भरती ही त्या त्या व्यवस्थापनामध्ये रिक्त असलेली पदे व त्यासाठीचे शिल्लक आरक्षण इत्यादी बाबी विचारात घेऊन ८० टक्के पदांसाठी करण्याचे शासनादेशानुसार नियोजित आहे.

• या कामी माहे जून, २०२३ ते नोव्हेंबर, २०२३ या कालावधीमध्ये संपूर्ण राज्यभर आरक्षणविषयक बिंदुनामावलीची तपासणी करण्यात आली. त्यानंतर बिंदुनामावली संदर्भात प्रश्न विधिमंडळामध्ये उपस्थित झाला होता. यास्तव जिल्हा परिषदेच्या १० टक्के रिक्त जागा राखून ठेवण्याचा निर्णय

घेण्यात आला. जिल्हा परिषदांमध्ये सध्या ७० टक्के रिक्त जागांवर पदभरती करण्यात येत आहे.

सर्व आरक्षणाच्या बिंदू नामावली मागास वर्ग कक्षाकडून तपासून घेतलेल्या आहेत. जर आधीच जास्त प्रमाणात त्या प्रवर्गाची भरती झाली असेल तर अर्थात या भरती त्या प्रवर्गासाठी जागा कमी येतील. तरीही १० टक्के जागा राखून ठेवलेल्या आहेत त्यावर यथावकाश निर्णय घेतला जाईल.

खाजगी शैक्षणिक संस्थातील रिक्त पदे पोर्टलमार्फत भरण्यासाठी वेळोवेळी Video Conference तसेच लेखी पत्र २७/१०/२०२३,२९/११/२०२३, ९/१/२०२४,१६/०१/२०२४ नुसार जास्तीतजास्त पदे जाहिरातीमध्ये येण्यासाठी कार्यवाही करण्यात आली आहे.

• शासन पत्र दि.२५.०१.२०२४ व शिक्षण आयुक्तालयाचे पत्र दि.२८.०१.२०२४ नुसार सेमी इंग्रजी शाळांकरिता आवश्यक असणाऱ्या शिक्षकांसाठी मागणी घेण्यात आली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इंग्रजीच्या बळकटीकरणाकरीता साधन व्यक्ती नियुक्त करण्याच्या विषयासंदर्भात शासनाने निर्देशित गेल्याप्रमाणे समिती गठित करून समितीच्या अहवालानंतर कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्र शाळेस एक या प्रमाणात परंतु त्यातून उपलब्ध पदे वजा करून माफक प्रमाणात पदे राखून ठेवली आहेत.

• एकंदरीतच या भरतीप्रक्रियेमध्ये माध्यम, बिंदुनामावली अथवा विविध शिक्षक प्रवर्ग या सर्वच विषयांबाबत एकमेकांविरुद्ध विरोधाभासी मागण्या प्रशासनाकडे वारंवार सादर होत होत्या. समाज
माध्यमांवर काही वेळा चुकीची माहिती प्रसारित करून अभियोग्यता धारकांमध्ये संभ्रम निर्माण केला जात होता. परंतु अशा कोणत्याही दबाव अथवा खोडसाळपणाचा जराही परिणाम होऊ न देता प्रचलित शासन निर्णय व शासनाचे विविध विषयांवरचे धोरण याचे तंतोतंत पालन करून ही भरतीप्रक्रिया राबवली जात आहे.

• यादरम्यान अयोग्य भाषेचा वापर अथवा खोडसाळपणाचे संदेश पाठवणाऱ्या व्यक्तींचे संदेश दुर्लक्षण्यात आले आहेत. सोशल मिडियाच्या माध्यमातून प्राप्त विविध प्रकारच्या सुयोग्य संदेशांना स्वतः आयुक्त तसेच अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मार्गदर्शनपर उत्तरे दिली आहेत.

• पवित्र पोर्टलवर जाहिरातीची कार्यवाही पूर्ण केल्यानंतर ३४ जिल्हा परिषदांच्या १२५२२,१८ मनपाच्या- २९५१, ८२ नगर पालिका/परिषदाच्या-४७७ व ११२३ खाजगी शैक्षणिक संस्थांच्या-५७२८ अशा एकूण २१६७८ रिक्त पदांच्या भरतीची मागणी नोंदविण्यात आली आहे.

• पवित्र पोर्टलवर जाहिरातीतील रिक्त पदांचा तपशील पुढील प्रमाणे:

१) आरक्षण निहाय रिक्त पदे- अनुसूचित जाती-३१४७, अनुसूचित जमाती-३५४२, विमुक्त जाती (अ)- ८६२, भटक्या जमाती (ब)-४०४, भटक्या जमाती (क)-५८२, भटक्या जमाती (ड)-४९३, विशेष मागास प्रवर्ग-२९०, इतर मागास प्रवर्ग-४०२४, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक-२३२४, खुला-६१७० याप्रमाणे आहेत. तथापि, काही व्यवस्थापनांनी जाहिरातीमध्ये आरक्षणापेक्षा विषयाची पदे कमी नोंद केली आहेत त्यामुळे आरक्षणनिहाय रिक्त पदे जास्त दिसून येतात.

२) गट निहाय रिक्त पदे- इ. १ ते ५ वी-१०२४०, इ. ६ ते ८ वी ८१२७, इ. ९ ते १० वी-२१७६, इ. ११ ते १२ वी - ११३५ याप्रमाणे आहेत.

३) माध्यमनिहाय रिक्त पदे- मराठी-१८३७३, इंग्रजी-९३१, उर्दू-१८५०, हिन्दी-४१०, गुजराथी-१२, कन्नड-८८, तामिळ-८, बंगाली-४, तेलुगू-२ याप्रमाणे आहेत.

४) पदभरती प्रकारनिहाय रिक्त पदे- मुलाखतीशिवाय-१६७९९, मुलाखतीसह-४८७९ याप्रमाणे आहेत.

• पदभरतीबाबत उमेदवारांना पोर्टलवर प्राधान्यक्रम नमूद करण्यासाठी आवश्यक सूचना व User Manual देण्यात आलेले आहे. तसेच उमेदवारांना SMS द्वारेदेखील कळविण्यात येत आहे.

• उमेदवारांनी लॉगिन करण्यासाठी CLICK HERE  या संकेत स्थळावर भेट देऊन प्राधान्यक्रम जनरेट करून घ्यावेत. त्यानंतर पदनिहाय पसंतीक्रम नमूद करण्याची सुविधा दिनांक ०८/०२/२०२४ रोजी दिली जाईल.

• उमेदवारांनी पदनिहाय पसंतीक्रम नमूद करून दिनांक ०९/०२/२०२४ पर्यंत दिलेल्या मुदतीत लॉक करणे आवश्यक आहे.

• सन २०१७ मधील अपात्र, गैरहजर व रुजू न झालेल्या रिक्त पदांसाठी दिनांक २९/११/२०२३ व ३०/११/२०२३ रोजी शिफारस यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. याबाबत मा. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे याचिका दाखल असून नियुक्ती आदेशाबाबत स्थगिती आदेश आहेत. दिनांक २९/११/२०२३ व ३०/११/२०२३ रोजी यादी प्रसिद्ध केल्यानंतर रिक्त राहिलेल्या माजी सैनिक व इतर समांतर आरक्षणाच्या जागा त्या त्या प्रवर्गातील समांतर आरक्षणाव्यतिरिक्त मधून भरण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे. शासन मान्यतेनंतर कार्यवाही करण्यात येणार आहे.

पदभरतीसाठी उमेदवारांची प्राधान्यक्रमाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल त्याचे संभाव्य वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल.

पदभरतीबाबत उमेदवारांना याद्वारे सूचित करण्यात येते की यापुढे कोणत्याही कारणासाठी अधिकारी कर्मचारी यांना व्यक्तिगत संदेश पाठवू नये. पवित्र पोर्टलवरील पदभरतीशी संबंधित सर्व बाबींसाठी CLICK HERE  या ईमेलवर पत्रव्यवहार करावा. या ईमेलवर सुद्धा ग्रुप संदेश न पाठवता तसेच ज्या बाबींचा उलगडा शासन निर्णयाचे वाचन केल्याने किंवा सहकाऱ्यांशी चर्चा केल्याने होऊ शकतो अशा बाबींवर अनावश्यक ई-मेल न पाठवता केवळ अत्यंत महत्त्वाच्या बाबींवर पत्र व्यवहार करावा जेणेकरून त्यास प्रतिसाद देणे शक्य होईल.

ही प्रक्रिया क्लिष्ट स्वरूपाची असून त्यामध्ये तंत्रज्ञानाचा देखील मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. त्यामुळे काही टप्प्यावर काही तात्पुरत्या अडचणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु त्याचे निराकरण करण्याची प्रशासकीय व तांत्रिक व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे प्रतिक्रिया देताना संयत मार्गांचा वापर करावा.

सर्व अभियोग्यताधारकांना शासन व प्रशासनाच्या वतीने शुभेच्छा देण्यात येत आहेत.

सूरज मांढरे, 
भाप्रसे आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य
पुढील  Update माहितीसाठी समुहात सामील व्हा 


Pavitra Portal Shikshak Bharti 2024 Preferences Generation And Lock
Dear Candidate, The preferences generation facility is available on PAVITRA portal. TAIT 2022 Self certified candidates can generate the preferences from 05/02/2024. The interested candidates are required to register lock their preferences on or before 09/02/2024. For more details visit the websit

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon