दि. २१/०९/२०२६
प्रेस नोट
पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक/शिक्षक पदभरती सन २०२५
"शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५" नुसार प्राप्त जाहिरातीतील रिक्त पदांसाठी उमेदवारांच्या निवडीसाठीच्या रूपांतरित फेरीतील शिफारशीबाबत.
महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र पोर्टल या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षण सेवक/शिक्षक पदभरतीसाठी "शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५" चे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले होते.
सदर ऑनलाईन चाचणी दिनांक २७/०५/२०२५ ते ०५/०६/२०२५ या कालावधीमध्ये घेण्यात आली. या चाचणीसाठी एकूण २,२८,८०८ उमेदवारांनी नोंदणी केली होती, त्यापैकी २,११,३०८ उमेदवार चाचणीस प्रविष्ट झाले होते. त्यातील १,७०,१०८ उमेदवारांनी स्व-प्रमाणपत्र पूर्ण केले आहे.
दिनांक ०१/०५/२०२६ ते २०/०७/२०२६ या दरम्यान पवित्र पोर्टलवर मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन प्रकारांतील जाहिराती प्राप्त झाल्या आहेत.
त्यासाठी पात्र उमेदवारांकडून दिनांक ०६/०८/२०२६ ते १६/०८/२०२६ या कालावधीमध्ये प्राधान्यक्रम घेण्यात आलेले आहेत.
यापूर्वी मुलाखतीशिवाय या निवड प्रकारात स्थानिक स्वराज्य संस्थातील व मुलाखतीशिवाय हा पर्याय निवडलेल्या खाजगी व्यवस्थापनांच्या शाळांतील टप्पा-१ मधील नियमित फेरीतील १३,११९ रिक्त जागांवर सर्वसाधारण गुणवत्ता यादी दिनांक २७/०८/२०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती.
आता मुलाखतीशिवाय या निवड प्रकारात स्थानिक स्वराज्य संस्थातील व मुलाखतीशिवाय हा पर्याय निवडलेल्या खाजगी व्यवस्थापनांच्या शाळांतील समांतर आरक्षणाच्या रिक्त राहिलेल्या जागांसाठी निवडीसाठीची टप्पा-१ मधील रूपांतरित फेरीतील ४,३९० रिक्त जागांवर ऑनलाईन शिफारस होत असलेली उमेदवारांची रूपांतरित फेरी (Converted Round) सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे.
मुलाखतीशिवाय निवडप्रकारातील निवडीबाबत उमेदवारांना व व्यवस्थापनांना SMS द्वारेदेखील कळविण्यात येत आहे.
उमेदवारांना
https://tait२०२५.mahateacherrecruitment.org.in
या संकेतस्थळावर भेट देऊन आपल्या निवडीची स्थिती पाहता येणार आहे.
उमेदवारांच्या निवडीबाबतची स्थिती उमेदवारांच्या लॉगीनवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. व्यवस्थापननिहाय सर्वसाधारण गुणवत्ता यादी होम पेजवर Download या मेनूमध्ये देण्यात आली आहे.
उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी दिनांक २४/०९/२०२६ ते २८/०९/२०२६ या कालावधीत तर समुपदेशन पद्धतीने नियुक्ती देण्याबाबत शासन निर्णय दिनांक २१/०६/२०२३ मधील तरतुदीनुसार दिनांक ०५/१०/२०२६ ते ०९/१०/२०२६ या कालावधीमध्ये पूर्ण करण्याबाबत नियोजन करण्याबाबतचे निर्देश नियुक्ती प्राधिकारी यांना देण्यात आलेले आहेत.
निवडीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांनी पुढील प्रक्रियेसाठी संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांचेशी संपर्क साधावा.
पदभरतीबाबत उमेदवारांना याद्वारे आवाहन करण्यात येते की पवित्र पोर्टलवरील मुलाखतीशिवाय निवडप्रकारातील निवडीबाबत राज्यस्तरावर "तक्रार निवारण व दुरुस्ती समिती" स्थापन करण्यात आली आहे. edupavitra२०२५grcc@gmail.com या ईमेलवर दिनांक २७/०९/२०२६ अखेर पर्यंत विहित प्रपत्रामध्ये पाठवाव्यात, जेणेकरून त्याची योग्य ती दखल घेतली जाईल.
निवडीसाठी शिफारस झालेल्या सर्व उमेदवारांचे शालेय शिक्षण विभागातर्फे हार्दिक अभिनंदन व पुढील शैक्षणिक कार्यास शुभेच्छा.

दिनांक : २१/०९/२०२६
उमेदवारांसाठी सूचना
"शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५" नुसार प्राप्त जाहिरातीतील रिक्त पदांसाठी उमेदवारांच्या निवडीसाठीच्या रूपांतरित फेरीतील शिफारशीबाबत
१. दिनांक ०१/०५/२०२६ ते २०/०७/२०२६ या दरम्यान मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन प्रकारातील पवित्र पोर्टलवर जाहिराती प्राप्त झाल्या आहेत.
२. दिनांक ०६/०८/२०२६ ते १६/०८/२०२६ या कालावधीमध्ये पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५ नुसार मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन प्राप्त प्रकारातील जाहिरातीसाठी उमेदवारांकडून प्राधान्यक्रम घेण्यात आलेले आहेत.
३. मुलाखतीशिवाय या निवड प्रकारात एकूण १,४६,६५० उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक केले आहेत.
४. यापूर्वी मुलाखतीशिवाय या निवड प्रकारात स्थानिक स्वराज्य संस्थातील व मुलाखतीशिवाय हा पर्याय निवडलेल्या खाजगी व्यवस्थापनांच्या शाळांतील टप्पा-१ मधील नियमित फेरीतील १३,११९ रिक्त जागांवर सर्वसाधारण गुणवत्ता यादी दिनांक २७/०८/२०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती.
५. आता मुलाखतीशिवाय या निवड प्रकारात स्थानिक स्वराज्य संस्थातील व मुलाखतीशिवाय हा पर्याय निवडलेल्या खाजगी व्यवस्थापनांच्या शाळांतील समांतर आरक्षणाच्या रिक्त राहिलेल्या जागांसाठी निवडीसाठीची टप्पा-१ मधील रूपांतरित फेरीतील ४,३९० रिक्त जागांवर ऑनलाईन शिफारस होत असलेली उमेदवारांची रूपांतरित फेरी (Converted Round) सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे.
६. उमेदवारांनी पोर्टलवर लॉक केलेले प्राधान्यक्रम, आरक्षण, समांतर आरक्षण, विषयाचा गट, विषय तसेच विविध न्यायनिवाडे, शासन आदेश इत्यादी सर्व बाबी एकत्रित विचारात घेऊन गुणवत्तेनुसार उमेदवारांच्या उच्चतम प्राधान्यक्रमावर निवडीसाठी शिफारस झाली आहे.
७. उमेदवारांची निवड होण्यासाठी आरक्षण, समांतर आरक्षणासह यातील कटऑफ व विषयाचा कटऑफ या दोन्ही मध्ये कटऑफ पेक्षा अधिक असल्यास उमेदवाराची शिफारस होते, दोन्ही कोणत्याही एका प्रकारात कटऑफ पेक्षा कमी गुण असल्यास निवडीसाठी विचार होत नाही. यासाठी त्या त्या व्यवस्थापनाच्या सर्वसाधारण गुणवत्ता यादीमध्ये आरक्षण व विषयाचा कटऑफ दिलेला आहे त्यानुसार आपल्या निवडीबाबत खात्री करता येईल.
८. उमेदवारांच्या निवडीबाबतची स्थिती उमेदवारांच्या लॉगीनवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. व्यवस्थापननिहाय सर्वसाधारण गुणवत्ता यादी लवकरच होम पेजवर Download या मेनूमध्ये देण्यात आली आहे, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
९. मुलाखतीसह निवडप्रकारातील यादी यानंतर प्रसिद्ध करण्यात येईल.
१०.
प्राप्त जाहिरातींपैकी प्रशासकीय कारणास्तव मनपा अमरावती यांची सुधारित पदे विचारात घेण्यात आली आहेत, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
११. रूपांतरित फेरीतील सर्वसाधारण गुणवत्ता यादीमध्ये दर्शविण्यात आलेली पदे विचारात घेऊन उमेदवारांच्या शिफारशी करण्यात आलेल्या आहेत.
१२. ज्या उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक केले आहेत, त्यांना लॉगीन केल्यानंतर अप्लिकेशन फॉर्म (Application Form) या मेनू अंतर्गत अप्लिकेन्ट रिकमंडेड स्टेटस (Applicant Recommended status) यावर क्लिक केल्यावर सलेक्ट राऊंड (Select Round) या ड्रॉपडाऊन (Dropdown) मधून फेज-१ (Phase-१) यानंतर सलेक्ट इंटरव्हिव टाईप (Select Inteview Type) या ड्रॉपडाऊन (Dropdown) मधून विदाआऊट इंटरव्हिव (without Interview) मेनू निवडावा. त्यानंतर सबमिट (submit) वर क्लिक करावे. त्यानंतर व्हिव रिकमंडेड इन्स्टिटयूट लिस्ट (View Recommended Institute list) या मध्ये आपली निवडीसाठी शिफारस झाली असल्यास, सदर व्यवस्थापनाचे नाव व शिफारस झालेले पद दिसेल. व्हिव प्रेफरेन्स वाईज स्टेटस (View Preferencewise status) यावर क्लिक केल्यानंतर आपण लॉक केलेले प्राधान्यक्रम व त्यातील शिफारस झालेला प्राधान्यक्रम हिरव्या रंगामध्ये दिसेल.
१३. तसेच View Preferencewise status यावर क्लिक केल्यानंतर उमेदवारांच्या निवडीसाठी शिफारस न झालेल्या लॉक केलेल्या सर्व प्राधान्यक्रमावरील Subject Cutoff व Roster Cutoff (विषय व आरक्षणाचा कटऑफ) पाहता येणार आहे. व्यवस्थापननिहाय सर्वसाधारण गुणवत्ता यादी लवकरच होम पेजवर Download या मेनूमध्ये देण्यात येईल, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. उमेदवारांना या सुविधेचा वापर करून आपल्या निवडीबाबत पडताळणी करता येईल.
१४. नियुक्ती प्राधिकारी/व्यवस्थापन यांनादेखील पुढील कार्यवाहीबाबत स्वतंत्रपणे सूचना देण्यात येत आहेत.
१५. निवडीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांच्या आवश्यक कागदपत्रांची पडताळणी संबंधित व्यवस्थापनाची निवड समिती करेल, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. तसेच उमेदवार पात्रतेसंबंधीच्या कागदपत्रांची निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र आढल्यास उमेदवारांची निवड कोणत्याही टप्प्यावर रद्द होईल, तसेच अशा उमेदवारांवर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल.
१६. निवडीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांनी पुढील प्रक्रियेसाठी संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.
१७. उमेदवारांच्या निवडीबाबत उमेदवारांच्या काही अडचणी असल्यास राज्यस्तरावर "तक्रार निवारण व दुरुस्ती समिती" स्थापन करण्यात आली आहे. त्यासाठी आपणास edupavitra2025grcc@gmail.com या ईमेलवर सबळ पुराव्यांसहित विहित नमुन्यात अर्ज सादर करता येईल.
१८. उमेदवारांच्या निवडीसंदर्भातील तक्रारींबाबत वर दिलेल्या ई-मेल शिवाय अन्य मार्गाने आलेले अर्ज/निवेदने विचारात घेतली जाणार नाहीत, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
१९. उमेदवारांनी आपले तक्रार अर्ज दिनांक २७/०९/२०२६ अखेर पर्यंत edupavitra2025grcc@gmail.com या ई-मेल वर सादर करावेत, विहित कालावधीनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
२०. उमेदवारांना अन्य काही अडचणी edupavitra२०२५@gmail.com या email वर संपर्क साधता येईल. आल्यास
२१. निवडीसाठी शिफारस झालेल्या सर्व उमेदवारांचे शालेय शिक्षण विभागातर्फे हार्दिक अभिनंदन व पुढील शैक्षणिक कार्यास शुभेच्छा.
(सचिन्द्रप्रताप सिंह, भा.प्र.से.) आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य
-------------- ALSO READ ----------
पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक / शिक्षक पदभरतीबाबत उमेदवारांसाठी स्वप्रमाणपत्र नव्याने नोंद करणे / पूर्वीच्या
स्वप्रमाणपत्रामध्ये दुरुस्त्या
करण्याबाबतच्या सूचना ( दुसरा टप्पा )
(TAIT - २०२२)
दिनांक १०/०३/२०२५
━━━━━━━━━━━━━
━━━━━━━━━━━━━
१) पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक / शिक्षक पदभरतीबाबत उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्याबाबतच्या पवित्र पोर्टलवर यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या दिनांक १/०९/२०२३ च्या दोन सूचना तसेच ४/०९/२०२३, १४/०९/२०२३, १८/०९/२०२३, २१/०९/२०२३, २९/०९/२०२३, ०१/१०/२०२३ इत्यादी सूचनांचे अवलोकन करावे. सदर सूचना योग्य त्या फेरफारांसह दुसऱ्या टप्प्यातील (TAIT-२०२२) स्वप्रमाणपत्र नव्याने नोंद करणे / पूर्वीच्या स्वप्रमाणपत्रामध्ये दुरुस्त्या करण्यासाठी लागू राहतील.
२) शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२२ मधील प्राप्त गुणांच्या आधारे, शासन निर्णय ०७/०२/२०१९, १०/११/२०२२ व इतर आनुषंगिक शासन निर्णयांतील तरतुदींनुसार, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनांच्या शाळांतील शिक्षण सेवक / शिक्षक या रिक्त पदांवर टप्पा २ अंतर्गत भरती करण्यात येणार आहे.
३) शिक्षकांची सदर भरती ही त्या त्या व्यवस्थापनांमध्ये रिक्त असलेली पदे, इयत्तांचा गट, विषय, अध्यापनाचे माध्यम, आरक्षण (समांतर आरक्षणासह), उमेदवारांनी शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणीमध्ये प्राप्त केलेले गुण व त्यांनी पोर्टलवर लॉक केलेले प्राधान्यक्रम इत्यादी बाबी एकत्रित विचारात घेऊन गुणवत्तेनुसार पवित्र प्रणालीमार्फत शिफारस होणार आहे.
४) स्थानिक स्वराज्य संस्थांकडून रिक्त मुलाखतीशिवाय या पर्यायातील असतील. एका उमेदवाराची (११ या प्रमाणात पदांची भरती ही मुख्यत्वे यासाठी एका रिक्त पदासाठी नियुक्तीसाठी वरील क्रमांक 3 मध्ये नमूद बाबी विचारात घेऊन पवित्र प्रणालीमार्फत त्या त्या व्यवस्थापनाकडे शिफारस होणार आहे.
५) खाजगी शैक्षणिक संस्थांकडून रिक्त पदांच्या भरतीबाबत पवित्र पोर्टलवर प्रकाशित होणाऱ्या जाहिराती या मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन पर्यायातील असतील. यांपैकी कोणताही एक पर्याय निवडण्याचे स्वातंत्र्य खाजगी शैक्षणिक संस्थेस असेल. मुलाखतीशिवाय या पर्यायासाठी एका रिक्त पदासाठी एका उमेदवाराची (१:१ या प्रमाणात नियुक्तीसाठी पोर्टलमार्फत शिफारस होणार आहे. मुलाखतीसह या पर्यायासाठी एका रिक्त पदासाठी १० उमेदवारांची (उमेदवार उपलब्धतेनुसार 1:10 या प्रमाणात) मुलाखतीसाठी पोर्टलमार्फत शिफारस होणार आहे.
६) स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये नोंदणी केली नसल्यास संबंधित उमेदवारांनी स्वतःची नोंदणी (Registration) करणे आवश्यक आहे. ही नोंदणी करण्यासाठी 'Register Here' येथे क्लिक करून तेथे आपला टेट २०२२ चाचणीचा रोल नंबर व रजिस्ट्रेशन नंबर नोंद करावा. यासाठी टेट २०२२ परीक्षा अर्जामध्ये नोंद केलेला मोबाईल क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे. त्यानंतर उमेदवारांनी स्वतःचा पासवर्ड तयार करावा.. उमेदवारांचा टेट २०२२ चा रोल नंबर हाच त्यांचा लॉग-इन-आय-डी असेल.
७) पहिल्या टप्प्यामध्ये नोंदणी केलेल्या उमेदवारांनी लॉग-इन करिता यापूर्वी तयार केलेला पासवर्ड वापरावा. पासवर्ड विसरला असल्यास 'Forgot Password' या सुविधेचा वापर करून Password तयार करावा.
८) ज्या उमेदवारांना त्यांच्या मोबाईल क्रमांकामध्ये काही कारणांस्तव बदल करावयाचा असल्यास, नजीकच्या शिक्षणाधिकारी कार्यालयात जाऊन,
वैध ओळखपत्राच्या आधारे स्वतःची ओळख पटवून, मोबाईल क्रमांकामध्ये बदल करता येईल.
९) पवित्र पोर्टलवरील नोंदणी (रजिस्ट्रेशन) व स्वप्रमाणपत्र भरण्याची प्रक्रिया उमेदवाराने स्वतः करणे आवश्यक आहे.
१०) उमेदवारांनी पवित्र प्रणाली व पदभरतीशी निगडित असलेल्या विविध शासन निर्णयांचे काळजीपूर्वक वाचन करून, स्वप्रमाणपत्रातील माहिती भरावी.
११) उमेदवारांना स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी दिनांक ११.०३.२०२५ ते दिनांक २०.०३.२०२५ पर्यंत मुदत देण्यात येत आहे.
१२) स्वप्रमाणपत्र पूर्ण करताना महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) मधील उमेदवाराच्या नावामध्ये तफावत येत असल्यास उमेदवारांना त्यांच्या लॉग-इनवर 'Request for change in data' या मेन्यूअंतर्गत सुविधा देण्यात आलेली आहे. या सुविधेचा वापर करून उमेदवारांनी निवड केलेल्या शिक्षणाधिकारी कार्यालयात जाऊन योग्य तो बदल करून घेता येईल.
१३) नमूद केलेल्या मुदतीत जे उमेदवार स्वप्रमाणपत्र प्रमाणित करणार नाहीत, ते उमेदवार या दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या शिक्षण सेवक / शिक्षक पदभरतीच्या पुढील प्रक्रियेसाठी पात्र ठरणार नाहीत.
१४) शासन निर्णय दिनांक २७/०२/२०२४ अन्वये जारी करण्यात आलेल्या आदेशांच्या अनुषंगाने अराखीव (खुला) अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) यांतून स्वप्रमाणपत्र सादर केलेल्या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गातील (SEBC) आरक्षणाचा लाभ घ्यावयाचा असल्यास त्याबाबतचा योग्य तो बदल करणे आवश्यक राहील.
१५) काही उमेदवारांना त्यांच्याकडील कुणबी नोंदीच्या आधारे इतर मागासवर्गाचे जातप्रमाणपत्र मिळाले आहे, त्यास अनुसरून सामान्य प्रशासन विभागाचे पत्र दिनांक २८/०५/२०२४ अन्वये अराखीव (खुला) अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) यांतून स्वप्रमाणपत्र सादर केलेल्या उमेदवारांना इतर मागास वर्ग (OBC) या प्रवर्गातील आरक्षणाचा लाभघ्यावयाचा असल्यास त्याबाबतचा योग्य तो बदल करणे आवश्यक राहील.
१६) सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग (SEBC) या प्रवर्गात मोडणाऱ्या उमेदवारांना पूर्वी देय असलेला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) या प्रवर्गाचा लाभ यापूढे अनुज्ञेय नाही. सबब आरक्षण धोरणातील बदलांमुळे यापुढील नवीन जाहिरातींच्या वेळी उपरोक्त नमूद उमेदवारांना त्यांचा योग्य तो प्रवर्ग निवडण्यासाठी सुविधा देण्यात आलेली आहे. त्यामुळे वर नमूद अ.क्र. १४, १५ प्रमाणे योग्य तो बदल करावा, अन्यथा त्यास उमेदवार स्वतः जबाबदार राहील.
१७) स्वप्रमाणपत्रामधील माहिती नव्याने भरणे किंवा यापूर्वी भरलेली माहिती दुरुस्त करणे म्हणजे उमेदवारांना नियुक्तीच्या शिफारशीबाबतचा पूर्वलक्षी प्रभाव कोणत्याही परिस्थितीत मिळणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
१८) उमेदवारांनी स्वप्रमाणपत्रामध्ये यापूर्वी नोंदविलेल्या समांतर आरक्षणाच्या नोंदीमध्ये आता उमेदवारांना कोणताही बदल करता येणार नाही. कारण पहिल्या टप्प्यातील कट ऑफ गुण प्रसिद्ध झाले आहेत.
१९) उमेदवाराची यापूर्वी कोणत्याही आस्थापनेवर समांतर आरक्षणातील माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त यांमधून निवड झाली असल्यास, अशा उमेदवारांना पुनश्च या समांतर आरक्षणाचा लाभ अनुज्ञेय असणार नाही. त्यामुळे लाभ घेतलेल्या उमेदवारांनी संबंधित समांतर आरक्षणाच्या पर्यायासमोर 'NO' अशी नोंद करणे आवश्यक आहे. जेणेकरून संबंधित
Page 4 of 6
उमेदवाराचा त्याच्या स्वतःच्या सामाजिक प्रवर्गातून किंवा खुल्या प्रवर्गातून गुणवत्तेनुसार शिफारशीबाबत विचार होईल.
२०) अर्जात म्हणजेच स्वप्रमाणपत्रामध्ये खोटी माहिती देणे किंवा खरी माहिती दडवून ठेवणे किंवा त्यात अनधिकृतपणे खाडाखोड करणे किंवा खाडाखोड केलेले अथवा बनावट दाखले सादर करणे किंवा विहित केलेल्या अर्हतेच्या अटी पूर्ण न करणे किंवा विहित केलेल्या अर्हतेच्या अटी विहित कालावधीमध्ये पूर्ण न करणे किंवा विहित मुदतील अर्हता धारण करीत नसतानाही उत्तीर्णतेची चुकीची तारीख नमूद करणे अथवा गैरवर्तणूक करणारा उमेदवार कोणत्याही टप्प्यावर निवडीसाठी शिफारस होण्यास अथवा निवड होण्यास अपात्र ठरेल आणि किंवा फौजदारी कारवाईसह इतर योग्य त्या शिक्षेस पात्र ठरेल.
२१) नव्याने स्वप्रमाणपत्रामध्ये माहिती भरणाऱ्या उमेदवारांना सूचित करण्यात येते की, कोणत्याही कागदपत्रे / प्रमाणपत्र (वर सूचना क्रमांक १४ व १५ मध्ये नमूद प्रवर्ग वगळून) दिनांक ३०/०९/२०२३ पूर्वीचे असणे आवश्यक आहे.
२२) उमेदवारांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेची प्रमाणपत्रे टेट २०२२ साठी अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक म्हणजेच दिनांक १२/०२/२०२३ पूर्वीची असणे आवश्यक आहे.
२३) अध्यापक विद्यालयातील शिक्षक पदांकरिता व्यावसायिक अर्हतेमधील पदव्युत्तरपदवी परीक्षा (M.Ed.) उत्तीर्णतेची नोंद करण्याची सुविधा देण्यात येत आहे. सदरची व्यावसायिक अर्हता टेट २०२२ साठी अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक म्हणजेच दिनांक १२/०२/२०२३ पूर्वीची असणे आवश्यक आहे.
२४) टीईटी सीटीईटी या शिक्षक पात्रता परीक्षेतील (इयत्ता 1 ली ते 8 वी करिता) कमाल प्राप्त गुणांची नोंद उमेदवारांनी यापूर्वी स्वप्रमाणत्रात केली
नसल्यास अशा उमेदवारांना कमाल गुणांची नोंद स्वप्रमाणपत्रात करता येईल.
२५) पूर्वी स्वप्रमाणपत्र नोंद केलेल्या उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र दुरुस्तीसाठी अप्रमाणित (Uncertify) केले असल्यास, स्वप्रमाणपत्रामध्ये कोणताही बदल केला असो अथवा नसो अशा उमेदवारांनी त्यांचे स्वप्रमाणपत्र प्रमाणित (Self-certify) करणे अनिवार्य आहे, अन्यथा स्वप्रमाणपत्र प्रमाणित (Self-certify) न करणारे उमेदवार पोर्टलवरील कोणत्याही प्रक्रियेसाठी पात्र राहणार नाहीत, याची उमेदवारांनी गांभीर्याने नोंद घ्यावी.
Also Read 👇
दि. १९/०२/२०२५
प्रेस नोट
पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक/शिक्षक पदभरती दुसऱ्या टप्यातील जाहिरातीच्या कार्यवाहीस मुदतवाढीबाबत.
दुसऱ्या टप्प्यातील शिक्षकांच्या रिक्त पदांच्या जाहिरातीसाठी दिनांक २०/०१/२०२५ रोजी पोर्टलवर सर्वच व्यवस्थापनांना सुविधा देण्यात आली आहे.
आज अखेर राज्यातील १२१६ व्यवस्थापनांनी विविध माध्यमांसाठी एकूण १३३७ जाहिरातींची प्रक्रिया सुरू केली आहे.
दिनांक २०/०१/२०२५ ते २०/०२/२०२५ पर्यंत सुविधा देण्यात आलेली आहे. परंतु, अद्यापही बऱ्याच व्यवस्थापनांना जाहिरात देण्यास अजून काही कालावधीची आवश्यकता असल्याने पवित्र पोर्टलवर जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी दिनांक २८/०२/२०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.
राज्यातील सर्वच शैक्षणिक व्यवस्थापनांना आवाहन करण्यात येते की, आपल्या अधिनस्त शाळातील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्याची कार्यवाही करावी. पवित्र पोर्टलवर जाहिरात संकेतस्थळावर भेट द्यावी. देण्यासाठी
या
शैक्षणिक संस्थांना पदभरतीबाबत जाहिरात देण्यासाठी काही अडचणी असल्यास edupavitra2022@gmail.com या ईमेलवर संपर्क साधता येईल.
Also Read 👇
दि. ०६/०२/२०२५
प्रेस नोट
पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक/शिक्षक पदभरती दुसऱ्या टप्प्यातील जाहिरातीच्या कार्यवाही बाबत (TAIT २०२२)
महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र पोर्टल या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षण सेवक/शिक्षक पदभरतीसाठी "शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२२" चे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले होते.
सदर ऑनलाईन चाचणी दिनांक २२ फेब्रुवारी ते ३ मार्च २०२३ या कालावधीमध्ये घेण्यात आली. या चाचणीसाठी एकूण २,३९,७३० उमेदवारांनी नोंदणी केली होती, त्यापैकी २,१६,४४३ उमेदवार चाचणीस प्रविष्ट झाले. त्यापैकी १,६३,०६१ उमेदवारांनी स्व-प्रमाणपत्र पूर्ण केले आहेत.
"शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२२" मधील प्राप्त गुणांच्या आधारे राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांतील इयता १ ली ते १२ वीकरिता शिक्षण सेवक/शिक्षक या रिक्त पदांची भरती करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यातील जानेवारी २०२४ मध्ये प्राप्त जाहिरातीनुसार २१६७८ रिक्त पदांच्या पदभरतीची कार्यवाही पूर्ण झाली आहे.
आता टप्पा २ अंतर्गत शिक्षकांच्या रिक्त पदांच्या जाहिराती प्रसिद्ध (Publish) करण्यासाठी दिनांक २०/०१/२०२५ पासून पोर्टलवर सर्वच व्यवस्थापनांना सुविधा देण्यात आली आहे. याबाबत मा. आयुक्त शिक्षण, महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दिनांक ३१/०१/२०२५ रोजी पदभरतीबाबतचा आढावा घेतला असता, अद्यापही स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी शैक्षणिक व्यवस्थापनांकडून शिक्षकांच्या पदभरतीबाबत पोर्टलवर जाहिराती अल्प प्रमाणात प्राप्त झाल्या आहेत.
राज्यातील सर्वच शैक्षणिक व्यवस्थापनांना आवाहन करण्यात येते की, आपल्या अधिनस्त शाळातील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्याची कार्यवाही करावी. पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्यासाठी
संकेतस्थळावर भेट द्यावी. या सदर जाहिरातीसाठी पवित्र पोर्टलवर दिनांक २०/०२/२०२५ पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
शैक्षणिक संस्थांना पदभरतीबाबत जाहिरात देण्यासाठी काही अडचणी असल्यास edupavitra2022@gmail.com या ईमेलवर संपर्क साधावा.
पवित्र पोर्टल शिक्षक भरती महत्त्वपूर्ण सूचना
व्यवस्थापनांसाठी सूचना
स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शैक्षणिक संस्थांमधील रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवरील जाहिरातविषयक सूचना
दि २०/०१/२०२५ च्या अद्यावत सूचना वाचण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा
शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात २० जानेवारी २०२५ पासून पवित्र पोर्टल सुरू
शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात २० जानेवारी २०२५ पासून पवित्र पोर्टल सुरू
जाणून घ्या नोंदणी करण्याची प्रक्रिया
पवित्र पोर्टलवर नोंदणी करण्याची प्रक्रिया
Step-by-Step Guide
बीएड धारक आणि शिक्षक होण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी सरकारी नोकरीची आणखी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. शिक्षक भरतीच्या पहिल्या टप्प्यानंतर आता दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे.
दिनांक २० जानेवारी २०२५ पासून पवित्र पोर्टल पुन्हा सुरू* होत असून, पहिल्या टप्प्यात भरती होऊ न शकलेल्या उमेदवारांसाठी आता शिक्षक होण्याची आणखी एक संधी उपलब्ध आहे.
जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका शाळांसह खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरली जाणार आहेत. त्याचे नियोजन करण्यात आले असून दिनांक २० जानेवारी २०२५ पासून पवित्र पोर्टलवर रिक्त पदांच्या जाहिराती अपलोड करणे सुरु होईल. _म्हणजे आपण या भरतीस अर्ज करू शकणार आहात
पवित्र पोर्टलवर नोंदणी करण्याची प्रक्रिया Step-by-Step Guide
१. अधिकृत वेबसाइटला भेट द्या:
पवित्र पोर्टलच्या अधिकृत वेबसाइटवर जा: →
अधिकृत वेबसाईट ची लिंक खाली दिलेली आहे
२. नवीन खाते तयार करा (Register)
- होमपेजवर "नोंदणी करा" किंवा "Register" हा पर्याय निवडा.
- तुमचे संपूर्ण नाव, मोबाइल नंबर, आणि वैध ईमेल आयडी भरा.
- पासवर्ड तयार करा आणि तो सुरक्षित ठेवा.
- तुमचा मोबाइल नंबर आणि ईमेल आयडी सत्यापित करण्यासाठी आलेला ओटीपी (OTP) भरा.
३. लॉगिन करा:
- नोंदणी पूर्ण झाल्यावर तुमच्या क्रेडेन्शियल्सचा (ईमेल/मोबाइल आणि पासवर्ड) वापर करून पोर्टलवर लॉगिन करा.
४. प्रोफाईल भरा
- "माझी प्रोफाईल" किंवा "My Profile" या विभागात जा.
- आवश्यक माहिती भरा, जसे की,
- शैक्षणिक पात्रता (उदा. बीएड, डीएड इत्यादी).
- अनुभव (जर असेल तर).
- वैयक्तिक माहिती (जन्मतारीख, पत्ता, इ.).
- आवश्यक कागदपत्रे (उदा. आधार कार्ड, मार्कशीट, प्रमाणपत्रे) स्कॅन करून अपलोड करा.
५. शिक्षक भरतीसाठी अर्ज भरा:
- प्रोफाईल पूर्ण केल्यानंतर, "शिक्षक भरती अर्ज" किंवा "Recruitment Application" या पर्यायावर क्लिक करा.
- तुम्हाला ज्या जिल्ह्यासाठी अर्ज करायचा आहे, तो निवडा.
- इतर आवश्यक तपशील भरा.
६. फी भरून अर्ज सबमिट करा:
- अर्ज सबमिट करण्याआधी प्रक्रिया शुल्क भरावे लागेल.
- ऑनलाइन पेमेंटसाठी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI किंवा नेट बँकिंगचा वापर करा.
- यशस्वी पेमेंट झाल्यावर तुमचा अर्ज सबमिट करा.
७. अर्जाची प्रिंटआउट घ्या:
- अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंटआउट घ्या. भविष्यातील संदर्भासाठी हा अर्ज जपून ठेवा.
महत्त्वाच्या सूचना:
- फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची चूक होणार नाही याची खात्री करा.
- अर्ज भरण्याची शेवटची तारीख लक्षात ठेवा आणि वेळेत अर्ज सबमिट करा.
- आवश्यक कागदपत्रे स्कॅन करताना ती स्पष्ट असतील याची काळजी घ्या.
दि. १५/०१/२०२५
विषय: पवित्र पोर्टलमार्फत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पदभरतीसाठी करावयाच्या कार्यवाहीबाबत.
१. शासन पत्र क्र. संकीर्ण-२०२४/प्र.क्र.६६१/टिएनटि-१, दि.१०.०९.२०२४
२. या कार्यालयाचे पत्र जा.क्र.५६७१, दि.१३.०९.२०२४
३. शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०२३/प्र.क्र.२४२/टिएनटि-१, दि.१४.०१.२०२५
४. या कार्यालयाचे पत्र जा.क्र.७२९६, दि.२९.११.२०२३
उपरोक्त विषयाबाबत कळविण्यात येते की, शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी-२०२२ नुसार पवित्र पोर्टलद्वारे पहिल्या टप्प्यातील पदभरतीची कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यातील पदभरतीकरिता शासन निर्णय दि.१०.११.२०२२ नुसार पुढील कार्यवाही करावयाची आहे. संदर्भ क्र.३ येथील शासन निर्णय दि.१४.०१.२०२५ नुसार पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक पदभरतीसाठीच्या ऑनलाईन कामाकरीता प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी व्यवस्थापनांना पोर्टलवर जाहिरात नोंद करण्याची सुविधा दि. २० जानेवारी, २०२५ रोजी सुरु करण्यात येणार आहे.
शासन पत्र दि.१०.०९.२०२४ अन्वये दुसऱ्या टप्प्यातील जिल्हा परिषदेकडी उर्वरित १० टक्के रिक्त पदे, पहिल्या फेरीतील अपात्र, गैरहजर, रुजू न झालेले उमेदवार, तेसच अन्य व्यवस्थापनातील रिक्त जागा, इ.बाबी विचारात घेऊन जाहिरात द्यावयाची आहे. त्यानुसार आपणांस दुसऱ्या टप्यातील पदभरती करिता या कार्यालयाचे पत्र दि.१३.०९.२०२४ अन्वये पुढील आवश्यक कार्यवाहीच्या सविस्तर सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, जिल्हा परिषदांकडील बिंदुनामावली विषयक माहितीचे प्रमाणपत्र या कार्यालयास उपलब्ध करुन देण्याचे कळविण्यात आले आहे. सदर माहिती तात्काळ या कार्यालयास सादर करण्यात यावी.
शिक्षक पदभरतीसाठी आपल्या अधिनस्त सर्व खाजगी शैक्षणिक संस्थांना बिंदुनामावली प्रमाणित करण्याबाबत या कार्यालयाचे पत्र दि.२९.११.२०२३ नुसार यापूर्वीच सविस्तर सूचनांद्वारे कळविण्यात आले आहे. पदभरतीची कार्यवाही तात्काळ करावयाची असल्याने आपल्या अधिनस्त सर्व खाजगी संस्थांना याबाबत सविस्तर सूचना देण्यात याव्यात. याबाबत आपणांस दि.१०.०१.२०२५ रोजी संस्थांची विभाग निहाय Excel Sheet पाठविण्यात आली आहे. सदर Excel Sheet अद्ययावत करावी व ज्या संस्थांची बिंदुनामावली तपासलेली नसेल त्यांची तात्काळ बिंदुनामावली तपासणीची कार्यवाही करावी. बिंदुनामावली प्रमाणित करण्याकरिता नोडल अधिकारी यांनी आवश्यकतेनुसार तात्काळ विशेष शिबिरांचे आयोजन करुन सर्व खाजगी शैक्षणिक संस्थांची बिंदुनामावली अद्ययावत करुन रिक्त पदे भरण्याकरिता सत्वर कार्यवाही करावी.
१. विभागीय शिक्षण उपसंचालक, (सर्व) विभाग
२. शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), जिल्हा परिषदा सर्व
३. शिक्षणाधिकारी, महानगरपालिका (संबंधित)
४. शिक्षण निरिक्षक (पश्चिम/उत्तर/दक्षिण), बृहन्मुंबई
५. प्रशासन अधिकारी, म.न.पा./न.पा. (संबंधित)
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon