DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Implementation of Act No 16 for SEBC Student Admission

https://www.dnyanyatritantrasnehi.com/2024/06/implementation-of-act-no-16-for-sebc.html



महाराष्ट्र शासन शिक्षण संचालनालय, 
(उच्च शिक्षण)

क्र.: उशिसं/मवि-१/परिपत्रक / २०२४/ ३२७०

दिनांक:  18 JUN 2024

परिपत्रक

विषय : महाराष्ट्र राज्य अधिनियम क्र. १६ दि. २६.२.२०२४ ची विद्यार्थी प्रवेशाबाबत अंमलबजावणी करण्याबाबत

Maharashtra State Act no 16 Date 26 February 2024 regarding implementation regarding student admission

संदर्भः महाराष्ट्र राज्य अधिनियम क्र. १६ दि. २६ फेब्रुवारी २०२४

महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग म्हणून विवक्षित समाज विनिर्दिष्ट करण्याकरिता आणि अशा सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागासवर्गाच्या उन्नतीसाठी राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशाकरिता जागांच्या आरक्षणासाठी आणि लोकसेवांमधील व पदांवरील नियुक्त्यांसाठी पदांच्या आरक्षणासाठी आणि तत्संबंधित किंवा तद्नुषंगिक बाबींसाठी तरतूद करण्याकरिता महाराष्ट्र अधिनियम क्र. १६ तयार करण्यात आलेला आहे. संदर्भाकित अधिनियमाची प्रत सोबत जोडली आहे, कृपया अवलोकनी घ्यावी.

🙋
हेही वाचाल 👇 

महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता अधिनियम २०२४ च्या अंमलबजावणीबाबत..

सह सचिव,महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षण अधिनियम, २०२४ च्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने द्यावयाचे जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र प्रदान करण्याबाबत मार्गदर्शक सूचना ...

मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकरीमध्ये १० टक्के आरक्षण
करणेबाबत


सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्गाकरिता आरक्षणाच्या तरतुदीनुसार सरळसेवा भरतीसाठी सुधारित बिंदुनामावली विहित करणेबाबत


👆👆👆👆👆

महाराष्ट्र अधिनियम क्र. १६ दि. २६.२.२०२४ मधील तरतूद क्र. ४ (२) पुढीलप्रमाणे - " हा अधिनियम, भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद ३० च्या खंड (१) मध्ये निर्दिष्ट केलेल्या अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांव्यतिरीक्त इतर शैक्षणिक संस्था तसेच खाजगी शैक्षणिक संस्था मग त्या राज्याकडून अनुदानप्राप्त असोत किंवा अनुदानप्राप्त नसोत, यांमधील प्रवेशास देखील लागू होईल."

उपरोक्त तरतूदीच्या अनुषंगाने राज्यातील सर्व विद्यापीठे तसेच सर्व संलग्नित महाविद्यालयांनी विद्यार्थी प्रवेशाबाबत, "महाराष्ट्र अधिनियम क्र. १६ दि. २६ फेब्रुवारी, २०२४ ची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी" याबाबत आपल्या स्तरावरुन सर्व संबंधितांस तात्काळ सूचित करण्यात यावे.

(डॉ. शैलेंद्र देवळाणकर)

शिक्षण संचालक 
(उच्च शिक्षण) 
महाराष्ट्र राज्य, पुणे
Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon