DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Sancha Manyata School portal 2024-25 Guideline


महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे

क्रमांक : प्राशिसं/सं.मा./आधार/२४/टे-५००/६१९४

दिनांक : २३.०९.२०२४

प्रति, विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व) शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) जिल्हा परिषद (सर्व) शिक्षण निरिक्षक, बृहन्मुंबई (पश्चिम/उत्तर/दक्षिण)

विषय : शाळेतील दिनांक ३०.०९.२०२३ रोजी पटावर असलेल्या परंतु आधार अवैध ठरलेल्या विद्याथ्यांची पडताळणी करुन संच मान्यतेसाठी विचारात घेण्याबाबत..

संदर्भ : मा. मंत्री महोदय शालेय शिक्षण यांनी दिनांक १९.०९.२०२४ रोजीच्या बैठकीमध्ये दिलेले निर्देश.

सरल प्रणालीतर्गत राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या संच मान्यता ऑनलाईन पध्दतीने करण्यात येतात. मा. मंत्री महोदय यांच्या समवेत दिनांक १९.०९.२०२४ रोजी झालेल्या बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार ३०.०९.२०२३ रोजी स्टुडंट पोर्टलवर असलेल्या विद्यार्थ्यांपैकी आधार वैध असलेली विद्यार्थी संख्या विचारात घेवून सन २०२३-२०२४ ची संच मान्यता अंतिम करण्यात आलेली आहे.

२/- तथापि, विद्यार्थाच्या नावातील तफावतीमुळे अथवा अन्य कोणत्याही कारणास्तव विद्यार्थी अवैध ठरत असतील अथवा काही विद्यार्थ्याकडे आधार कार्ड उपलब्ध नसतील व या विद्यार्थ्यामुळे शाळेतील सन २०२३-२०२४ च्या मंजुर पदावर विपरित परिणाम होत असेल तर अशा शाळा तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे या प्रकारच्या विद्यार्थ्यांच्या नावाचा यादीसह अर्ज करतील व शाळांच्या बाबतीत संबंधित गटशिक्षणाधिकारी हे अशा विद्यार्थ्यांपैकी जे विद्यार्थी वर्गात नियमित उपस्थित असतील तर अशा विद्यार्थ्यांची शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्र प्रमुख यांच्याकडून याबाबतची योग्य ती खात्री करतील व त्यांच्या पडताळणीमध्ये नियमित असलेले विद्यार्थी संच मान्यतेसाठी विचारात घेतले जातील. विद्यार्थ्यांची पडताळणी करताना खालील बाबींची खात्री करावी. (प्रमाणपत्र, पडताळणी प्रपत्र १ ते ३ सोबत जोडले आहे.)

१. नाव, लिंग किंवा जन्मतारीख जुळत नसलेल्या विद्यार्थ्याच्या बाबतीत अशा विद्यार्थ्यांची शाळेत असलेली नोंद व विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष शाळेत उपस्थित असल्याची खात्री करुन व सदर विद्यार्थी जवळपासच्या अन्य शाळांमध्ये दाखवले गेले नाहीत यांची शहानिशा करुन असे विद्यार्थी संबंधित शाळेच्या संच मान्यतेकरीता ग्राहय धरण्यात यावेत.

२. ज्या विद्यार्थ्याची आधार क्रमांकासाठी नोंद केली आहे अथवा आधार कार्ड उपलब्ध नाहीत असे विद्यार्थी संबंधित शाळेत नियमित येत असल्याची व सदर विद्यार्थी जवळपासच्या अन्य शाळांमध्ये दाखल केले नाहीत याची तसेच त्यांचे आधार कार्ड तयार होवू शकले नाहीत याची शहानिशा करुन असे विद्यार्थी संच मान्यतेत ग्राहय धरण्यात यावेत.

३. शाळेतील विद्यार्थी डुप्लिकेट (Duplicate) असल्याचे स्टुंडट पोर्टलवर दर्शवित असेल तर असा विद्यार्थी नेमका कोणत्या शाळेत शिकत आहे, याची क्षेत्रीय यंत्रणेकडून खात्री करुन योग्य त्या शाळेत सदर विद्यार्थ्यांची नोंद करणे.

४. शाळेकडून अर्ज प्राप्त झालेल्या प्रत्येक शाळेत संबंधित शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्र प्रमुख यांनी समक्ष भेट देवून अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची माहिती तपासण्यात यावी व मुख्याध्यापकांनी अर्ज केलेल प्रत्येक विद्यार्थी संच मान्यतेत धरण्यासाठी पात्र आहे किंवा नाही याची खात्री करावी.

५. ज्या शाळांची किमान ९० टक्के विद्यार्थी शाळांनी आधार वैध केलेले आहेत. त्याच शाळांतील उर्वरित विद्यार्थ्यांबाबतची त्यांच्या अडचणी लक्षात घेवून पडताळणी करण्यात यावी.

६. आधार इनव्हॅलीड/अनप्रोसेसड/आधार क्रमांक नसलेले विद्यार्थी शाळेत नियमित येत असल्याचे विविध बाबी लक्षात घेवून खात्री पटल्यानंतरच त्यास संच मान्यतेसाठी ग्राहय धरण्यात यावे.
७. सदर सुविधा दिनांक ०७.१०.२०२४ पर्यत उपलब्ध राहील. आवश्यक ती पडताळणी केल्यानंतर संबंधित शाळेच्या गटशिक्षणाधिकारी यांच्या लॉगिनवर सदर विद्यार्थ्यांना संच मान्यतेसाठी विचारात घेण्याबाबत योग्य ती सुविधा उपलब्ध करुन दिली जाईल अथवा सदर अहवालाच्या आधारे सदर विद्यार्थ्यांना विचारात घेवून संच मान्यता सन २०२३-२०२४ करण्यात येतील.

उक्त नमूद केल्यानुसार शालेय विद्यार्थ्यांपैकी ज्यांचे आधार अवैध ठरलेल्या व आधार कार्ड नसलेल्या विद्यार्थ्याच्या बाबतीत योग्य ती खात्री करुन पुढील आवश्यक ती कार्यवाही करावी.

(संपत सूर्यवंशी) शिक्षण संचालक 2 माध्यमिक व उच्च माध्यमिक म.रा.पुणे-१

(शरद गोसावी) शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय म.रा.पुणे


प्रमाणपत्र

आम्ही खाली स्वाक्षरी करणारे प्रमाणित करतो की, शाळेचे नांव.

केंद्र
तालुका.
जिल्हा
यु-डायस क्रमांक. या शाळेस दिनांक समक्ष भेट दिली असता आधार क्रमांक नसलेले/आधार क्रमांक इनव्हॅलिड ठरलेले/अनप्रोसेसड असलेले विद्यार्थी शाळेत उपस्थित असल्याचे व नियमित असल्याबाबत खात्री केली असून सदरचा तपशील खालील प्रमाणे आहे.

अ.क्र.
तपशील

१. दिनांक ३०.०९.२०२३ रोजीची पटसंख्या (स्टुडंट पोर्टलनुसार) विद्यार्थी संख्या

२. आधार क्रमांक व्हॅलीड विद्यार्थी संख्या

३. आधार क्रमांक इनव्हॅलीड विद्यार्थी संख्या.

४. आधार क्रमांक अनप्रोसेसड विद्यार्थी संख्या.

५. आधार क्रमांक नसणारे विद्यार्थी संख्या.

६. रकाना क्रमांक ३ ते ५ पैकी नियमित येणारे विद्यार्थी संख्या.

७. रकाना क्रमांक ३ ते ५ पैकी नियमित न येणारे विद्यार्थी संख्या.

८. रकाना क्रमांक २ व ६ नुसार एकूण संच मान्यतेसाठी पात्र विद्यार्थी संख्या

तरी एकूण ( एकूण अक्षरी. ....... विद्यार्थी संच मान्यतेसाठी ग्राहय धरण्यात यावेत. केंद्राअंतर्गत शाळेमध्ये दुबार नोंद नसल्याचे खात्री करण्यात आली आहे. सदरील विद्यार्थी संख्या चुकीची आढळून आल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आमची राहील व होणाऱ्या कारवाईस आम्ही पात्र राहील.

१. संबंधित बीटचे विस्तार अधिकारी

स्वाक्षरी

२. संबंधित केंद्र शाळेचे केंद्र प्रमुख

स्वाक्षरी

Also Read 👇 

संचमान्यता सन २०२४-२०२५ बाबत..

महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य,
पुणे
क्रमांक : प्राशिसं/संकीर्ण/२४/टे-५००/5653

दिनांक : .०८.२०२४ 
23 AUG 2024

विषय: संचमान्यता सन २०२४-२०२५ बाबत..

संदर्भ : शासन पत्र क्रमांक न्यायाप्र-२०२४/प्र.क्र.१६७/टिएनटी-२, दिनांक १२.०७.२०२४

    उपरोक्त विषयी मा. उच्च न्यायालय खंडपीठ, औरंगाबाद येथील रिट याचिका क्रमांक २८२२/२०२४ व रिट याचिका क्रमांक ५४७२/२०२४ मधील दिनांक १२.०६.२०२४ रोजीच्या आदेशान्वये मा. न्यायालयाने रिट याचिका क्रमांक २८९६/२०२४ मधील दिनांक १५.०३.२०२४ रोजीच्या आदेशातील परिच्छेद ५ मधील निर्देशाच्या अनुषंगाने संदर्भीय पत्रान्वये शासनाने निर्देश निर्गमित केलेले आहेत.

२/- शासन निर्णय दिनांक १५.०३.२०२४ अन्वये संचमान्यतेचे सुधारित निकष विहित करण्यात आले आहेत. तसेच शासन निर्णय दिनांक १५.०३.२०२४ अन्वये राज्यातील खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व अध्यापक विद्यालयातील व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेतील अतिरिक्त ठरणारे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजना संदर्भात निर्देश निर्गमित करण्यात आले आहेत. 

३/- सदरच्या शासन निर्णयान्वये दिनांक ३०.०९.२०२४ रोजीच्या आधार वैध पट विचारात घेवून संचमान्यता व समायोजन करण्याची कार्यवाही करण्यासाठी विहित कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. तरी, सन २०२४- २०२५ च्या संचमान्यता विहित कालावधीत करण्यासाठी 'सरल' प्रणालीतील आवश्यक माहिती दिनांक ३०.०९.२०२४ पुर्वी पुर्ण करुन घेण्याचे निर्देश सर्व शाळांना देण्यात यावेत. 'सरल' प्रणालीतील विद्यार्थी प्रमोशन शाळा प्रोफाईलची माहिती, कार्यरत पदांची माहिती, 'सरल' प्रणालीतील विद्यार्थी स्थलांतराची माहिती, विद्यार्थ्यांचे आधार वैधता व इतर आवश्यक कार्यवाही विहित कालावधीत पूर्ण करण्यात यावेत. यामध्ये विलंब झाल्यास संबंधित जबाबदार राहतील यांची नोंद घेण्यात यावी.


(शरद गोसावी) 
शिक्षण संचालक, 
प्राथमिक शिक्षण संचालनालय, 
महाराष्ट्र राज्य, पुणे
प्रति,
१. विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व)
२. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद (सर्व)

Also Read 👇 

Sancha Manyata School portal 2023-24 Guideline Circular


महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य, मध्यवर्ती इमारत,

पुणे 

क्रमांक : प्राशिस/२०२४/संच मा. सुधारणा/टे-५००/3594

दिनांक : १६.०५.२०२४ / 17 MAY 2024

विषय : सन २०२३-२०२४ ची संचमान्यता व शाळा प्रणाली (स्कूल पोर्टल) मध्ये कार्यवाही करणेबाबत.

Regarding the year 2023-2024 general recognition and action in the school system (School Portal).

    उपरोक्त विषयी सन २०२३-२०२४ ची ड्राफ्ट स्वरुपात संचमान्यता आपल्या लॉगीनवर उपलब्ध करुन देण्यात आलेल्या होत्या. सदर उपलब्ध करुन दिलेल्या संचमान्यतेची तपासणी करुन, ज्या संचमान्यता दुरुस्ती करावयाच्या आहेत त्याच्या नोंदी करुन ठेवण्याबाबत आपणास सुचना देण्यात आलेल्या होत्या. त्यानुसार आपल्यास्तरावर सदरची कार्यवाही पूर्ण झालेली असेल. सन २०२३-२०२४ च्या ड्राफ्ट संचमान्यता सरल प्रणालीतून सद्यःस्थिती रद्द करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे Change Management, Shifting of Post, Medium Change, Shifting of Student, Working Post, Change Category, Add Post यांच्या व इतर दुरुस्ती करण्याची सुविधा आपल्या लॉगिनवर उपलब्ध झालेली आहे.

हेही वाचाल -

👆👆👆👆👆

तरी ज्या शाळेचे विनाअनुदानित, अंशःता अनुदानित, अनुदानित Management मध्ये बदल करावयाचे आहे, Medium बदल करावयाचे आहेत, Class Category बदल करणे, शिक्षकांची मान्य पदे वेगवेगळ्या टप्पा अनुदानस्तरा मध्ये Shifting करावयाची आहेत, तसेच चुकीच्या माध्यमामध्ये विद्यार्थी भरले असल्यास सदर विद्यार्थ्यांना योग्य माध्यमा मध्ये शिफ्ट करणे, कनिष्ठ महाविद्यालय Add Post करणे या व इतर सुधारणा आपल्यास्तरावर दिनांक १८.०५.२०२४ ते २८.०५.२०२४ या कालावधी मध्ये पूर्ण करुन घ्याव्यात म्हणजे योग्य व अंतिम संचमान्यता देणे सोईचे होईल.

शिक्षणाधिकारी यांच्या स्कूल/शाळा प्रणालीत सुपर लॉगिन मध्ये Saral School Data Verification हा टेंब उपलब्ध करुन दिलेला आहे. सदर टॅब मध्ये आपल्या अंतर्गत सर्व शाळांची दिलेल्या मुद्याची तपासणी करुन योग्य माहिती असलेल्या शाळांना अंतिम मान्यता द्यायची आहे व ज्या शाळांची माहिती चुकीची/अयोग्य आहे त्या शाळाबाबत जी माहिती सुधारणा करावयाची आहे ती आपल्या लॉगिन मध्ये उपलब्ध असलेल्या सुविधेचा उपयोग्य करुन माहिती सुधारित करुन घेण्यात यावी व त्यानंतर अशा शाळांना अंतिम मान्याता द्यावी.

सरल प्रणाली मध्ये शिक्षणाधिकाऱ्यांच्या लॉगिनवर त्यांच्या अंतर्गत येत असलेल्या शाळांची यादी उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. त्यांचे अवलोकन केले असता इतर विभागाच्या (उदा. समाज कल्याण, अंपग कल्याण, आश्रम शाळा व इतर) शाळा दिसून येत आहेत. तसेच आपल्या विभागाच्या मान्यताप्राप्त शाळा इतर विभागाकडे असल्याबाबत वेगवेगळ्या जिल्हयातून पत्र प्राप्त झाले आहेत. त्यामुळे शाळेच्या सुपर लॉगिन मध्ये Transfer of School from or To another Department हा टॅब उपलब्ध करुन दिला असून त्यामध्ये आपल्या अंतर्गत इतर विभागाच्या शाळा असतील अथवा आपल्या विभागाच्या शाळा इतर विभागाकडे असतील तर या शाळांची माहिती मध्ये दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. या सुविधेचा उपयोग्य करुन आवश्यकती कार्यवाही उक्त कालावधी मध्ये पूर्ण करुन घेण्यात यावी.

परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा 

उपरोक्त कार्यवाही दिलेल्या कालावधी मध्ये तातडीने पूर्ण करुन घेण्यात यावी. अन्यथा आपणावर जबाबदारी निश्चित करण्यात येईल, याची नोंद घेण्यात यावी.

(संपत सूर्यवंशी) 
शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.

(शरद गोसावी) शिक्षण संचालक (प्राथमिक) शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.
प्रत : १. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय विस्तार भवन, मुंबई २.मा. आयुक्त (शिक्षण) शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य, पुणे यांना माहितीस्तव सनिव्य सादर.

प्रति,

१. सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक

२. सर्व शिक्षणाधिकारी (प्राथमिक/ माध्यमिक) जिल्हा परिषद,

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon