DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

U Dise Plus Students Aadhaar Validation


Student portal बाबत
  • स्टुडन्ट सरल पोर्टल वरील ट्रान्सफर टॅब पुन्हा ऍक्टिव्हेट झालेला आहे.

  • त्याबरोबरच, Aadhaar Invalid Students (Reason Entry) ही Tab सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे. यामध्ये आधार invalid असलेल्या मुलांचे कारण नोंदवता येत आहे.

हेही वाचाल 

महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे

जा.क्र. प्रागिरां/आधार/२०२४/०५१४२ प्रत्ति,

दिनांक ३०/०१/२०२४

१. विभागीय शिक्षण उपसंचालक, मुंबई
२. शिक्षण अधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई
३. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद सर्व

विषयः- राज्यातील विद्यार्थ्यांचे आधार नोंदणी व अद्ययावतीकरण करण्याची कार्यवाही करणेबाबत.

: १. शासन पत्र (शालेय शिक्षण विभाग) क. संकिर्ण-२०२२/प्र.क्र.२५५-अ/एस.डी.१. दि. १५/१२/२०२२.

संदर्भ

२. मे. आयटीआय लिमिटेड यांचेसोबत करण्यात आलेला करारनामा दि. २१/०७/२०२२.

३. प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडील निर्देश पत्र क. २४२६ दि. २२/१२/२०२२.

४. प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडील निर्देश पत्र क. २४७६ दि. ३०/१२/२०२२.

५. मा. आयुक्त (शिक्षण महाराष्ट्र राज्य यांचे निर्देश दि. २६/०७/२०२४.

राज्यातील १ ली ते १२ मधील विद्यार्थ्यांचे आधार नोंदणी आणि अद्ययावतीकरणाचे काम करण्यासाठी गटसाधन केंद्र (ORC) ०२ प्रमाणे एकूण ८१६, आधार नोंदणी संघ (Aadhar Enrolment Kit) महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेमार्फत (MPSP) गटसाधन केंद्रावर उपलब्ध करून देण्यात येऊन सदरचे कामकाज सुरु करण्यात आले होते. शासनाने गटस्तरावर उपलब्ध करून दिलेल्या आधार नोंदणी संच (Aadhar Enrollment Ka) द्वारे विद्यार्थ्यांची आधार नोंदणी व अद्ययावतीकरण कामकाज करण्यासाठी ८१६ आधार ऑपरेटरची सेवा उपलब्ध करून घेण्यात आलेली असून, आयटीआय लिमिटेड, मुंबई व बेसिल लिमिटेड या दोन संस्थांना आधार संच हाताळणीकरीता मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.

राज्यामाध्ये अद्यापही अनेक विद्यार्थी आधार नोंदणीकृत नसल्याचे निदर्शनास येत आहे तसेब सरल प्रणालीमध्ये आधार नोदीमध्ये त्रुटी असल्यामुळे मिसमैच होत आहेत. राज्यातील प्रत्येक गटस्तरावर प्रत्येकी दोन आधार नोंदणी संच (Aadhar Enrollment Kit) उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. उक्त आधार नोंदणी संघ (Aadhar Enrollment Ka) यांचा उचित उपयोग करणेकरीता खालील प्रमाणे सूचना देण्यात येत आहेत.

१. शाळानिहाय आधारबाबतबी संख्यात्मक माहिती प्राप्त करुन घेणेत यावीत उदा. आधार नोदंगी न झालेली विद्यार्थी संख्या, आधार माध्ये दुरुस्ती करावयाची विद्यार्थी संख्या इत्यादी प्रकारची माहिती प्राप्त झाल्यानंतर कामाच्या व्याप्तीनुसार आधार नोदणी व अद्ययावतीकरणाचे केंद्र निश्चित करण्यात यावे,

२. सदर केंद्र निवडतेवेळी पुढील बाबी विचारात घेण्यात याव्यात. भौतीक सुविधा, सदर शाळेमध्ये विद्यार्थ्यांना येण्याकरीता पक्का रस्ता, शाळेच्या परिसरामध्ये इंटरनेटचे नेटवर्क असणे इत्यादी बाबी विचारात घेऊन शाळेची निवड करण्यात यावी

३. तसेच सदर केंद्रावर नजीकच्या कोणकोणत्या शाळेमधील विद्यार्थी आपार नोदणी व येणार आहेत अशा शाळा निक्षित करणे आवश्यक आहे.

*. शासनाच्या विद्यार्थी लाभाच्या योजनांचा लाभ सर्व विद्यार्थ्यांना मिळणे आवश्यक आहे, आधार बाबतची कार्यवाही प्रलकित राहिल्यामुळे कोणताही विद्यार्थी शिक्षण विभागाकडील योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही, याकरीता उक्त मुद्दा क्रमांक १ ते ३ मध्ये नमूद केलेनुसार उचित कार्यवाही करुन त्वरीत आधार विषयक सर्व प्रलंबित आणि दुरुस्तीविषयक कामकाज पूर्ण करुन घेण्यात यावे.

५. सोबत तालुकानिहाय आधार ऑपरेटर यांची यादी व संपर्क क्रमांकाची माहिती उपलब्ध करून देण्यात येत आहे. यानुसार सद्यस्थितीमध्ये कार्यरत आधार ऑपरेटर यांना आधार प्रलंबित आणि दुरुस्तीचे काम असणाऱ्या शाळांचे पुढील १५ दिवसांचे अचूक नियोजन करुन देण्यात यावे तसेच याबाबत संबंधित शाळा आणि पालकांना देखील अवगत करणेबाबत सर्व गटशिक्षणाधिकारी यांना देण्यात यावेत.

६. दि. ३१ ऑगस्ट, २०२४ पूर्वी शाळेतील सर्व विद्याथ्यांच्या आधार विषयक नोंदी अद्यावत करून सर्व विद्यार्थी सरल प्रणालीमध्ये नोंदणीकृत असल्याची खात्री मुख्याध्यापकांची करणे आवश्यक आहे. याबाबत सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळा प्रमुखांना लेखी निर्देश निर्गमित करण्यात यावेत.

७. विद्यार्थ्यांचे आधार नोंदणी व अद्यावतीकरणाबाबत संचालनालय स्तरावरुन वेळोवेळी मार्गदर्शक सुचना व आदेश निर्गमित

केले जातील, त्याप्रमाणे कार्यवाही करणे सर्व क्षेत्रीय अधिका-यांवर बंधनकारक आहे.

(शरद गोसावी)

शिक्षण संचालक (प्राथमिक),
महाराष्ट्र राज्य, पुणे




U Dise Plus Students Portal Aadhaar Validation 

U Dise Plus Students Portal Drop Box Aadhaar Validation 
Session 2023-24

महाराष्ट्र शासन 
शालेय शिक्षण व किला विभाग 
समग्र शिक्षा
निपुण भारत

महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, 
मुंबई

जा.क्र.मप्राशिप/संगणक/U-DISE Plus/२०२४-२५/1492

प्रति,

दिनांक 15 MAY 2024

शिक्षण संचालक (प्राथमिक),

शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे

विषय : U-DISE+ सन २०२३-२४ Student Portal मधील विद्यार्थ्यांची माहिती दुरुस्त करणेबाबत.

हे महत्वपूर्ण परिपत्रक नक्की वाचा 👇

 👆

उपरोक्त विषयान्वये कळविण्यात येते की, दि.१५/०५/२०२४ रोजीच्या U-DISE+ प्रणालीमधील अहवालानुसार Student Portal मध्ये काही विद्यार्थ्यांच्या माहितीमध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत. त्यात विद्यार्थ्यांचे जन्मदिनांक अचूक नोंदविलेली नाही व काही विद्यार्थ्यांचे लिंग अचूक नोंदविलेले नाही. या दोन्ही बाबींची दुरुस्ती संबंधित शाळांकडून करुन घेणे आवश्यक आहे. तसेच Drop Box मधील विद्यार्थी प्रवेश घेतलेल्या शाळांमध्ये नोंदविणे व विद्यार्थ्यांचे आधार Validation पूर्ण करणे महत्वाचे आहे. यासाठी U-DISE प्रणालीच्या Student Portal मध्ये माहिती अद्ययावत करण्याची सुविधा दि.१८/०५/२०२४ पर्यंत उपलब्ध करून देण्यात आली आहे. तरी केंद्र शासनाला विद्यार्थ्यांची माहिती अचूक उपलब्ध करुन देण्यासाठी आपल्या स्तरावरुन आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी.

👇👇👇👇👇

सोबत : U-DISE प्रणालीमधील शाळानिहाय अहवाल.

(प्रदीपकुमार डॉगे, मा.प्र.से.) राज्य पक्रल्प संचालक म.प्रा.शि.प. मुंबई

प्रत माहितीस्तव सविनय सादर :

१) मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई

२) मा. आयुक्त शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे

प्रत कार्यवाहीस्तव :

१) शिक्षण उपसंचालक, सर्व विभाग

२) शिक्षणाधिकारी (प्राथ), जिल्हा परिषद, सर्व

३) प्रशासनाधिकारी / शिक्षणाधिकारी, महानगरपालिका, सर्व

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon