Gyanjyoti Savitribai Phule Puraskar Circular
Dnyanjyoti Savitribai Phule Award
'कै. सावित्रीबाई फुले पुरस्कार' आता “ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार” या नावाने दिला जाणार आहे.
"ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार"
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार संपूर्ण माहिती
महाराष्ट्र शासनाकडून सन १९८१ पासून कै.सावित्रीबाई फुले पुरस्काराची सुरुवात करण्यात आलेली होती शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या महाराष्ट्र राज्यांमधील एकूण सहा विभागातील सहा महिलांची निवड करून हा पुरस्कार दिला जात होता परंतु सन २०१३ पासून ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार बंद करण्यात आलेला होता
महाराष्ट्र शासनाने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून महार्स्त्रातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर असे एकूण सहा विभाग आहेत या सहा विभागातील सहा महिलांना हा सन्मान मिळणार आहे.
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार असे नामकरण या पुरस्काराचे आता करण्यात आलेले आहे
पुरस्काराची रक्कम वाढवून एक लाख रुपये करण्यात आलेली आहे सहा विभागातील सहा कर्तबगार महिलांना हा पुरस्कार मिळणार आहे
कै सावित्रीबाई फुले पुरस्कार या पुरस्काराचे नाव आता बदलण्यात आलेले असून ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार असे करण्यात आलेले आहे तसेच पुरस्काराची रक्कम वाढवून रुपये एक लाख करण्यात आलेली आहे जी पूर्वी पुरस्काराची रक्कम केवळ पंचेवीस हजार रुपये होती
पुरस्कारासाठी कोण पात्र आहे ?
सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिला सामाजिक समता स्त्री शिक्षण कमकुवत गटातील मुला-मुलींचे शिक्षण या क्षेत्रामध्ये सेवा वृत्तीने कार्य करणाऱ्या महिलांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार दिला जातो
🙋 हे आपण वाचलत का ? मग हे हि वाचा
हे हि वाचा
क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार
Krantijyoti Savitrimai Phule State Teacher Honor Award
Dnyanjyoti Savitribai Phule Award
Gyanjyoti Savitribai Phule Award
सन २०२२-२३ या वर्षासाठीचे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्रदान करण्यास मान्यता देण्याबाबत.
दिनांक : ७ मार्च, २०२५
संदर्भ :-
(१) शासन निर्णय, उच्च व तंत्र शिक्षण विभाग क्र. साफुपु-२०११/ (१४८/११) समन्वय, दि. १५.१२.२०११
(२) शासन निर्णय, उच्च व तंत्र शिक्षण विभाग क्र. साफुपु २०२४/ प्र.क्र.१२/७१६८४५/मशि-२, दि. २.२.२०२४
(३) संचालक, उच्च शिक्षण, पुणे यांचे पत्र क्र. उशिस / साफुपु / जाहिरात/प्रशा-३/२०२५/२७२, दि. २८.१.२०२५
प्रस्तावना :-
संदर्भाधीन क्र. १ येथील शासन निर्णयान्वये ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार योजना कार्यान्वित आहे.
संदर्भ क्र. २ येथील शासन निर्णयान्वये पुरस्कारार्थांची निवड करण्यासाठी छाननी समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे.
संदर्भ क्र.३ येथील पत्रान्वये संचालक, उच्च शिक्षण पुणे यांनी सन २०२२-२३ या वर्षासाठीचे पुरस्कार प्रदान करण्यासाठी छाननी समितीचा अहवाल शासनस्तरावरील निवड समितीसमोर सादर केला होता. त्यानुसार सन २०२२-२३ या वर्षासाठीचे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्रदान करण्यासाठी मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय :-
सन २०२२-२३ या वर्षासाठीचे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्रत्येक महसूल विभागातून एक याप्रमाणे खालील विवरणपत्रात दर्शविल्यानुसार राज्यातील सहा महिलांना प्रदान करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.
अ.क्र.महसूल विभाग पुरस्कारार्थीचे नाव
१ पुणे श्रीमती जनाबाई सिताराम उगले
रा. उगलेवाडी, ता. आंबेगाव, जि.पुणे
२ नाशिक डॉ. प्राजक्ता गिरीश कुलकर्णी
सावेडी, अहिल्यानगर.
३ कोकण श्रीमती फुलन जोतीराव शिंदे सीवूड्स, नेरुळ, नवी मुंबई.
४ छ. संभाजीनगर श्रीमती मिनाक्षी दयानंद बिराजदार शिवाजीनगर आमखेडा, ता. सोयगाव, जि. छत्रपती संभाजीनगर
५ अमरावती श्रीमती वनिता रामचंद्र अंभोरे बालाजीनगर, मेहकर, ता. मेहकर जि. बुलढाणा श्रीमती शालिनी आनंद सक्सेना
६ नागपूर श्रीमती शालिनी आनंद सक्सेना
गुरुदेवनगर, नंदनवन लेआऊट, नागपूर
२. प्रस्तुत पुरस्कार प्रदान करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करुन पुरस्कार प्रदान करण्याची कार्यवाही संचालक, उच्च शिक्षण महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी करावी.
3. सदर पुरस्कार प्रदान कार्यक्रमावरील खर्च मागणी क्र.डब्ल्यु-४-२२०५-कला व संस्कृती, ८००-इतर खर्च (०१) समित्या व समारंभ, (०१) (०१) समित्या व समारंभ (२२०५ ०४५८)-०५ बक्षिसे (अनिवार्य) या लेखाशिर्षाखालील सन २०२४-२५ या वर्षातील उपलब्ध मंजूर तरतुदीमधून भागविण्यात यावा.
२. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२५०३०७१२१५१९१३०८ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
(अशोक मांडे)
उप सचिव, महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग
शासन निर्णय क्रमांकः संकीर्ण २५२५/प्र.क्र.७५/९८१२२९/मशि-२
मंत्रालय, मुंबई
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon