DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

StateGovt Salary Package Accidental Insu

राष्ट्रीयकृत बँकांकडून प्राप्त State Government Salary Package (SGSP) अंतर्गत विमा योजनांबाबत कर्मचाऱ्यांना अवगत करणेबाबत...

महाराष्ट्र शासन वित्त विभाग

शासन परिपत्रक क्र. संकीर्ण-२०१९/प्र.क्र.१४१/२०१९/कोषा-प्रशा-५ मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२. दिनांक : ०८ ऑक्टोबर, २०२०.

संदर्भ - वित्त विभाग, शासन पत्र क्र. संकीर्ण २०१९/प्र.क्र.१४१/२०१९/ कोषा प्रशा ५. दि.३१.०८.२०२०

       शासन परिपत्रक

शासकीय/निमशासकीय अधिकारी / कर्मचारी यांच्या वेतन बँक खात्याशी संलग्न अपघात विमा विषयक योजना विविध बँकाकडून राबविण्यात येत आहेत. सदर योजनांसंदर्भातील माहिती संदर्भाधीन पत्रान्वये सर्व प्रशासकीय विभागांना अवगत करण्यात आलेली आहे.

शासकीय अधिकारी / कर्मचारी यांचे वेतन खाते कोणत्या बँकेत असावे याबाबत शासन कोणतेही निर्देश देऊ शकत नाही. तथापि वेतन खात्याशी संलग्न असणाऱ्या अपघात विमा विषयक विविध योजना या अधिकारी / कर्मचारी यांच्या वैयक्तिक फायद्याच्या आहेत. त्याकरीता बँकांकडून कोणतेही वेगळे शुल्क आकारले जात नाही. तसेच अशा योजना वेतन खात्याशी संलग्न असल्याने वेतन खाते उघडल्यानंतर त्या आपोआप लागू ठरतात. त्यामुळे काही राष्ट्रीयकृत बँकांकडून प्राप्त State Government Salary Package (SGSP) अपघात विमा योजनांचा लाभ मिळण्यासंदर्भात अधिकारी / कर्मचारी यांना परिपत्रकान्वये अवगत करणे आवश्यक वाटते. बँकांकडील वेतन खात्याशी संलग्न योजनांच्या माहिती अभावी शासकीय अधिकारी / कर्मचारी अशा योजनांपासून वंचित राहू नये अशी यामागे शासनाची भूमिका आहे. सदर योजनेच्या अनुषंगाने खालील बाबी निदर्शनास आणण्यात येत आहे.

१. सदर परिपत्रकासोबत जोडलेल्या विवरणपत्रामध्ये वित्त विभागास राष्ट्रीयकृत बँकांकडून प्राप्त "State Government Salary Package" (SGSP) अंतर्गत अपघात विमा योजनेचे विविध लाभ यांची माहिती दर्शविलेली आहे.

२. सदर परिपत्रक हे केवळ मार्गदर्शनपर आहे. अधिकारी / कर्मचाऱ्यांचे वेतन खाते कोणत्या बँकेत असावे याबाबतचा निर्णय कर्मचाऱ्याने वैयक्तिकरित्या घ्यावयाचा आहे.

३. शासकीय अधिकारी / कर्मचारी यांना उपरोक्त योजनेबाबत काही शंका उद्भवल्यास त्यांनी संबंधित बँकांच्या स्थानिक शाखेकडे अथवा बँकेच्या मुख्यालयाकडे परस्पर संपर्क साधावा. सदर प्रकरणी कोणतीही चौकशी अथवा पत्रव्यवहार वित्त विभागाकडे करु नये.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या 👉🌐 www.maharashtra.gov.in 👈 या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून, त्याचा संकेतांक २०२०१००८१७२९१७९८०१० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नांवाने,

(इंद्रजित गोरे)
शासनाचे उप सचिव

हेही वाचाल 👇 

महाराष्ट्र शासन
प्रति,
क्र.संकीर्ण २०१९/प्र.क्र.१४१/२०१९/ कोषा प्रशा ५ वित्त विभाग, मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई-४०००३२ दिनांक : ३१ ऑगस्ट, २०२०
अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव/सचिव, सर्व मंत्रालयीन विभाग,
मंत्रालय, मुंबई - ४०००३२
विषय : शासकीय/निमशासकीय अधिकारी / कर्मचारी यांना राष्ट्रीयकृत बँकांच्या "State Government Salary Package" (SGSP) या वेतन खात्याशी संलग्न अपघात विमा योजनेबाबत अवगत करणे
महोदय/महोदया,
शासकीय/निमशासकीय अधिकारी/कर्मचारी यांच्या वेतन बँक खात्याशी संलग्न अशा अपघात विमा विषयक लाभ आधारीत योजना विविध बँकाकडून राबविण्यात येत आहेत. काही बँकांकडून वित्त विभागाकडे शासकीय अधिकारी / कर्मचारी यांची वैयक्तिक वेतन खाती उघडण्यास मान्यता देण्यासंदर्भातील प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत.
शासकीय अधिकारी / कर्मचारी यांचे वेतन खाते कोणत्या बँकेत असावे याबाबत शासन कोणतेही निर्देश देऊ शकत नाही. तथापि वेतन खात्याशी संलग्न असणाऱ्या अपघात विमा विषयक विविध योजना अंतर्गत अधिकारी / कर्मचारी यांच्या वैयक्तिक फायद्याच्या आहेत. त्याकरीता बँकांकडून कोणतेही वेगळे शुल्क आकारले जात नाही. त्यामुळे काही राष्ट्रीयकृत बँकांकडून प्राप्त State Government Salary Package (SGSP) अंतर्गत अपघात विमा योजनांचा लाभ मिळण्यासंदर्भात अधिकारी / कर्मचारी यांना अवगत करणे योग्य वाटते. आवश्यक माहिती अभावी शासकीय अधिकारी / कर्मचारी यांच्या वेतन खात्याशी संलग्न असणाऱ्या अशा योजनांपासून वंचित राहू नये अशी यामागे भूमिका आहे.
👁️ 👁️
हेही वाचा
₹१०,००,०००/-
वैयक्तिक अपघात विमा योजना राज्यात सर्व अधिकारी / कर्मचारी यांना लागू करणे बाबत
Employee Personal Accident Scheme
राज्य शासकिय निम शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात विमा योजना निमशासकीय आस्थापनेवरील अधिकारी/कर्मचारी यांना लागू करणे बाबत
Employee Personal Accident Scheme अधिक जाणून घेण्यासाठी


सदर पत्रासोबत जोडलेल्या विवरणपत्रामध्ये वित्त विभागास राष्ट्रीयकृत बँकांकडून प्राप्त प्रस्ताव व त्याअंतर्गत "State Government Salary Package" (SGSP) या अपघात विमा योजनेचे विविध लाभ यांची माहिती दर्शविलेली आहे.

प्रशासकीय विभागांनी सदरची माहिती विभागाच्या अधिनस्त अधिकारी / कर्मचारी यांना अवगत करावी. तथापि अधिकारी / कर्मचाऱ्यांचे वेतन खाते कोणत्या बँकेत असावे याबाबतचा निर्णय कर्मचाऱ्याने वैयक्तिकरित्या घ्यावयाचा आहे.

अधिकारी / कर्मचारी यांना उपरोक्त योजनेबाबत काही शंका उद्भवल्यास त्यांनी संबंधित बँकांच्या स्थानिक शाखेकडे अथवा बँकेच्या मुख्यालयाकडे संपर्क साधावा. सदर प्रकरणी कोणतीही चौकशी अथवा पत्रव्यवहार वित्त विभागाकडे करु नये.

सहपत्र : वरीलप्रमाणे


आपला

(इंद्रजित गर)

उप सचिव, 

महाराष्ट्र शासन

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon